Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 12:00
नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव! या 'मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!
पंचवीस वर्षे हा एक खूप महत्त्वाचा मैलाचा दगड. गणरायाच्या कृपेने आणि मायबोलीकरांच्या अलोट प्रेमाने, ओसंडणार्या उत्साहाने आजवरची ही वाटचाल आपल्या मायबोली परिवाराला शक्य झाली. मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सग्या-सोयर्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणेश चरणी प्रार्थना. _/\_
सालाबादप्रमाणे या विद्या आणि कलांच्या अधिपतीचा जागर करायला इथे जमलेल्या सगळ्या मायबोलीकरांचे सहर्ष स्वागत.
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
श्लोक : सुप्रिया जोशी यांच्या आवाजात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमुर्ती
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ||
अॅडमिन हा बाफ पिन करा कि वरती.
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा |
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवी ||
मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे
मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!>>>>
हार्दिक अभिनंदन !
सुश्राव्य श्लोक!
अॅडमिन हा बाफ पिन करा कि
अॅडमिन हा बाफ पिन करा कि वरती.>> मायबोली नवीन पानावर आणि वर मेनुमध्ये पिन केला आहे.
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक-
दावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम् ।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाह-
मुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य ॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरीवरे दुर्वाकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी विंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे|
प्रार्थना/ श्लोक अप्रतिम
प्रार्थना/ श्लोक अप्रतिम सुंदर गायला आहे.
बाप्पा मोरया.
बाप्पा मोरया.
तनौ दंत प्रचोदयात
गजाननं भूतगणाधि सेवितं
गजाननं भूतगणाधि सेवितं कपित्थजंबूफलचारू भक्षितम् |
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||
मोरया मोरया मी बाळ तान्हे |
मोरया मोरया मी बाळ तान्हे | तुझीच सेवा करु काय जाणे |
अन्याय माझे कोट्यानुकोटी | मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||
व्याघ्रचर्माम्बरो धीरः
व्याघ्रचर्माम्बरो धीरः सदामङ्गलरूपवान् ।
शुक्लास्यो मूषिकारोही केवलो मोक्षदायकः ॥
गणपती तुझे नाव चांगले|
गणपती तुझे नाव चांगले|
आवडे बहु चित्त रंगले||
प्रार्थना तुझी गौरीनंदना|
हे दयानिधे श्री गजानन||
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया _/\_
स जयति सिंदुरवदनो देवो
स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् l
वासरमणिरिव तमसां राशिंनाशयति विघ्नानाम् ll
ॐ गं गणपतये नमः |
ॐ गं गणपतये नमः |
परं धाम परं ब्र्हम परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनन्तकम् ||
सुरासुरेन्द्रै: सिध्देन्द्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ||
सुमुखश्च एकदंतश्च कपिलो
सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप:
धुम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन:
द्वादशैतानि नामानि य: पठेत्श्रुणुयादपि ll
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण विलंबितसूत्र |
वामनरुप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पाद नमस्ते ||
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
ॐकारं बिंदुसंयुक्तं नित्यं
ॐकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः l
कामदं मोक्षदंचैव ॐकाराय नमो नमः ll
स्वाती सुंदर आहे आजचा श्लोक.
स्वाती सुंदर आहे आजचा श्लोक. माझा फार आवडता आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !!
गणपती बाप्प्पा मोरया !
गणपती बाप्प्पा मोरया !
गणेशो गणनाथश्च हेरम्बो
गणेशो गणनाथश्च हेरम्बो गिरिशात्मजः ।
पार्वतीनन्दनो वीरो देवराजो गजाननः ॥
आदिपूज्यं गणाध्यक्षं
आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् | मंगलं परमं रुपं श्री गणेशं नमाम्यहम् ||
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
तेरी भक्ति तो वरदान है
तेरी भक्ति तो वरदान है
जो कमाए वो धनवान है
बिन किनारे की कश्ती है वो
देवा तुझसे जो अन्जान है
यूँ तो मूषक सवारी तेरी
सब पे है पहेरेदारी तेरी
पाप की आँधिया लाख हो
कभी ज्योती ना हारी तेरी
अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे
भूल के ये जहां रे
जिस किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा
हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमम् |
ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ||
ॐ नमोजी आद्या l
ॐ नमोजी आद्या l वेदप्रतिपाद्या l जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ll
अकार चरणयुगुल l उकार उदर विशाल l मकार महामंडल मस्तकाकारे ll
हे तिन्ही एकवटले l तेथ शब्दब्रह्म कवळले ll
ते मी या गुरुकृपा नमिले l आदिबीज ll
Pages