मायबोली गणेशोत्सव २०२४ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 22:07

वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

IMG-20240906-WA0020.jpg

मंगलमूती मोरया! गणपती बाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gauri_Resize.jpg

आमच्या घरच्या गौरी. (चुलत साबांकडे सामाईक असतात. आम्ही सकाळी त्यांच्याकडे जाऊन नैवेद्य करून हळदीकु़कू झालं की संध्याकाळी येतो घरी परत)

Gauri_2.jpg

पुरणाची आरती. १६ दिव्यांची गौरीची, २१ दिव्यांची गणापतीची. हे दिवे पुरणाच्या पट्टीवर बोटांनीच १६ आणि २१ उमटवायचे आणि २ मोठे दिवे करून त्यात फुलवात लावायची. बाजूला पुरणाच्याच २ वाती करून ठेवल्या आहेत. आरती झाली की मोठे दिवे गोग्रासाबरोबर ठेवले तरी चालतात किंवा निर्माल्यात ठेवायचे कारण त्याला वास येतो. मग आरतीतलं सगळं पुरण प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचं. देवीसमोर १ ओटी गव्हाची, १ ओटी तांदळाची. गव्हाचीच रांगोळी. संध्याकाळी नेहमीची रांगोळी काढायची. गौर बसवण्यापूर्वी देवीचे स्टँड जे आहेत त्याच्या आतमधे थोडा फराळ भरलेले डबे ठेवायचे (देवीच्या नुसतं समोर नको, पोटात पण फराळ असूदे म्हणून). पडवळ पण कापून ते बाजूला ठेवायचं. (कारण माहिती नाही)
महानैवेद्य : पुरणपोळी, कटाची आमटी, बटाटा भाजी, फ्लॉवर-मटार सुकी भाजी, २-३ शेंगांची मिक्स भाजी, वाटली डाळ, कोबीची भजी, घोसाळ्याची भजी, (अळूची पानं खराब निघाली, नाहीतर अळूवड्या पण असतातच), पडवळ घालून कढी, पुपोबरोबर दूध, कोथिंबीर-खोबर्‍याची चटणी, कच्च्या दाण्याची भिजवून केलेली चटणी, पंचामृत, केळं-काकडी मिक्स कोशिंबीर, गव्हलयांची खीर, आम्रखंड (चक्का आणुन घरी केलं), साध्या पोळ्या.
नैवेद्याच्या ५ पोळ्या आणि आरतीचं पुरण घरी. वाढायच्या पुपो विकतच्या. साध्या पोळ्या नैवेद्याच्या घरी, वाढायच्या विकतच्या.
देवीसमोरचा फराळ : खिरापत- रवा- बेसन लाडू-चिवडा (घरी), चकली-म्हैसूरपाक-करंज्या (चितळे)

सगळ्यांकडे गणपती, आरास छान दिसतेय. गौरी ही दिसल्या काही जणांकडे. प्रज्ञा९ तुझ्या कडची आणि आमच्या कडची पद्धत बरीच सारखी आहे. आम्ही पडवळाची कढी करतो, १६ भाज्या ंची भाजी, उसळ, पुरणाची आरती. पुपो, आणि बाकी साग्रसंगीत स्वयंपाक सगळा घरी केलेलाच लागतो.
फारेंड देऊळ बांधलं! खूप छान दिसतेय.
आता आमच्या गणपती गौरी चे फोटो देते
यंदा मखर नाही केला गणपतीला
Screenshot_2024-09-14-01-32-24-352_com.whatsapp.jpg

आणि ह्या गौरी
Screenshot_2024-09-14-01-31-11-554_com.whatsapp.jpg
हा जरा लांबून
Screenshot_2024-09-14-01-31-25-452_com.whatsapp.jpg

Pages