१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.
मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.
साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही.
सायो, मी लिहिलं तेव्हा मला
सायो, मी लिहिलं तेव्हा मला रियलाईज झालं नव्हतं पण तुझी पोस्ट वाचून जाणवलं आणि पटलं ही ...थॅंक्यु...
माझं क्रोम चालत नव्हतं, सारखं बंद पडत होतं म्हणून उशीर झालाय हे लिहायला.
दर वर्षी गणपतीसाठी नव्या
दर वर्षी गणपतीसाठी नव्या पद्धतीचे मोदक करायचे आणि ते करताना दर वर्षी नवी चूक करायची हा वसा मी या वर्षीही सोडला नाही.
नेहमी मोदकासाठीचं मिश्रण ओलसर, सैल राहतं म्हणून या वर्षी व्यवस्थित लोखंडी कढईत शिजवलं. गोळा फिरू लागल्यावर आणखी थोडा वेळ शिजवलं. मग रात्रीचं जेवण उरकून ओटा आवरून आणि टीव्ही बघून मोदक करायला घेतले तेव्हा मिश्रण जास्त कोरडं आणि घट्ट झालं होतं. शिवाय बदामाचे काही चंक्सही होते. मिश्रणाचा वास, चव आणि रंग बघून केशर जास्त पडलंय की काय असं वाटू लागेल. थोडं दूध घालून मिश्रण थोडं सैल करता आलं असतं. पण कंटाळा केला. तसेच मोदक केले आणि डब्यात भरून ठेवले.
दुसर्या दिवशी डबा उघडला तेव्हा चमत्कार झाला होता. रंग, वास आणि चव तिन्ही सुरेख होते.
जिंकलंच की मग, भरत!
जिंकलंच की मग, भरत!
मग रात्रीचं जेवण उरकून ओटा
मग रात्रीचं जेवण उरकून ओटा आवरून आणि टीव्ही बघून मोदक करायला घेतले ..... टोटली गहिवरले.
मग रात्रीचं जेवण उरकून ओटा
मग रात्रीचं जेवण उरकून ओटा आवरून आणि टीव्ही बघून मोदक करायला घेतले ..... टोटली गहिवरले.>>
शेवट वाचून मस्त वाटल.
शेवट वाचून मस्त वाटल.
>>>दुसर्या दिवशी डबा उघडला
>>>दुसर्या दिवशी डबा उघडला तेव्हा चमत्कार झाला होता. रंग, वास आणि चव तिन्ही सुरेख होते.
वाह!
>>> दुसर्या दिवशी डबा उघडला
>>> दुसर्या दिवशी डबा उघडला तेव्हा चमत्कार झाला होता. रंग, वास आणि चव तिन्ही सुरेख होते.
भारीच की! पण पुराव्याने शाबित करा, भरत.
योगायोगाने मी आत्ताच ममोंच्या नारळाच्या बर्फीवर माझी चित्तरकथा लिहून आले. पण त्यात अशी डिव्हाइन इन्टरव्हेन्शन्स नाहीयेत.
पुरावा म्हणून कढईला सोडायला
पुरावा म्हणून कढईला सोडायला तयार नसलेलं मिश्रण तेवढं शिल्लक आहे. ते चमच्याने खरवडून खातो आहे.
मोदक खाऊन आणि वाटून संपले.
या वेळी बदामाची तयार पूड
या वेळी बदामाची तयार पूड वापरून मायक्रोवेव्हमध्ये केल्या. दीड कप पूड (दाबून आणि शीग लावून) होती, त्याला कपभर साखर घातली ती कमी वाटली, म्हणून आणखी १-२ टेबलस्पून घातली.
बरं झालं वर काढलीस. बदाम पूड
बरं झालं वर काढलीस. बदाम पूड वापरुनच करणार होतो.
दीडकप पूड, एक+ कप साखर, आणि अर्धा कप दूध घेतलंस का? आणि ते कढईत/ मावेत तूप घालून गो़ळा होई पर्यंत परतायचं?
बरोबर - अर्धा कप गरम दुधात
बरोबर - अर्धा कप गरम दुधात केशर खलून त्यात दीड कप बदाम पावडर १५-२० मिनिटं भिजवून ठेवली. मग त्यात कपभर साखर आणि दीडेक चमचा तूप घालून २-२-२ मिनिटं असं मायक्रोवेव्ह केलं. कमी वाटली म्हणून अजून थोडी साखर, वेलचीपूड, आणि लाडात येऊन एक टेबलस्पून मावा पावडरही घातली, मग अजून मिनिटभर मायक्रोवेव्ह करून थापल्या वड्या.
आज पेढे बनवले. खूप छान झाले.
आज पेढे बनवले. खूप छान झाले. मोदकांचा साचा वापरला.
स्वाती, कॉस्कोत मिळणारं
स्वाती, कॉस्कोत मिळणारं अल्मंड फ्लावर वापरलं तर चालेल का बदामाच्या पावडरच्याऐवजी? पार्टीसाठी करायचे आहेत?
हो. मी तेच वापरुन केले आणि
हो. मी तेच वापरुन केले आणि छान झाले. फोटो राहिला काढायचा.
थॅंक्यू, अमित.
थॅंक्यू, अमित.
स्वाती, कॉस्कोत मिळणारं
स्वाती, कॉस्कोत मिळणारं अल्मंड फ्लावर वापरलं तर चालेल का बदामाच्या पावडरच्याऐवजी? पार्टीसाठी करायचे आहेत?>>>>
तुझं प्रमाण लिहून ठेव झाले की.
स्वातीताई.. एक नंबर
स्वातीताई.. एक नंबर सॅटीस्फाईंग चौकोनी वड्या झाल्यात.
वलयचे पण मोदक भारी!
स्वातीच प्रमाण वापरूनच केल्या
स्वातीच प्रमाण वापरूनच केल्या वड्या. फक्त मायक्रोवेव्हमध्ये न करता स्टोव्हवर केल्या. परफेक्ट झाल्या. थॅंक्यू स्वाती आणि अमित.
यावेळेस पुर्ण मायक्रोवेव्ह
यावेळेस पुर्ण मायक्रोवेव्ह मधेच पेढे केले..अगदी विनासायास पेढे होतात...एक्झेट काउन्ट ठेवला नाही पण दर दोन मिनिटानी काढुन हलवले आणी शेवटी गोळा जमायला लागल्यावर ३० सेकन्दानी काढुन बघितले..
यावेळेस १ कप बदामाला पाउणच कप साखर वापरली त्यामुळे बेताचे गोड झालेत..
Pages