यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २५ वे वर्ष.
या गणेशोत्सवात माययबोलीला २८ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २८ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२४ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
अरे वाह, मस्त!
अरे वाह, मस्त!
भावी संयोजकांना आगावू शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया!
मला स्वयंसेवक म्हणून काम
मला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे.
मी तयार आहे स्वयंसेवक म्हणून
मी तयार आहे स्वयंसेवक म्हणून काम करायला.
गणपती बाप्पा मोरया.
मलाही आवडेल संयोजन समिती चा
मलाही आवडेल संयोजन समिती चा भाग व्हायला
मोरया!!
व्वा पटकन् टीम तयार होते...
व्वा पटकन् टीम तयार होते... मोरया...
अरे वा! संयोजन तर जमणार नाही
अरे वा! संयोजन तर जमणार नाही पण जमेल तसा उपक्रमात भाग नक्की घेणार, वाचायला डोकावणार
मस्तच होणार यंदाही कार्यक्रम.
वा वा मस्त. कविन ला अनुमोदन.
वा वा मस्त. कविन ला अनुमोदन.
>>>>.मस्तच होणार यंदाही
>>>>.मस्तच होणार यंदाही कार्यक्रम.
+१
छान होणार कार्यक्रम.
छान होणार कार्यक्रम.
नवीन संयोजकांना शुभेच्छा. उपक्रमांमधे आवर्जून भाग घेणार. मभागौदि २०२३ च्या संयोजनाचा अनुभव आहे, काही लागले तर खुशाल हक्काने विचारा संयोजकांनो.
किल्ली, तुझे फार कौतुक वाटते. /\
चुकून वविच्या धाग्यावर आलो
चुकून वविच्या धाग्यावर आलो असे वाटले
धन्यवाद अतरंगी, ऋतुराज.,
धन्यवाद अतरंगी, ऋतुराज., किल्ली.
अजून कोणी सहभागी होतंय का पाहुया. आणि २ दिवसांनी ग्रूप तयार करु.
मला आवडेल या वेळी संयोजन
मला आवडेल या वेळी संयोजन समितीत सहभागी व्हायला
शुभेच्छा सर्वांना, संयोजन
शुभेच्छा सर्वांना, संयोजन समितीत सहभागी होणाऱ्या सर्वांचं कौतुक. गणपतीबाप्पा मोरया.
मला स्वयंसेवक म्हणून काम
मला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे.
मला पण आवडेल. पण पुढचे दोन
मला पण आवडेल. पण पुढचे दोन तीन दिवस बाहेर आहे, रविवार १८ पासून जमेल.
अमित, किल्ली, अंतरंगी, ऋतुराज
अमित, किल्ली, अंतरंगी, ऋतुराज - अरे आख्खा वाडा आहे का काय यावेळेला संयोजनात?
धन्यवाद स्वरुप , Ashwini_९९९,
धन्यवाद स्वरुप , Ashwini_९९९, अमितव
आज संयोजन ग्रूप सुरु करतो.
हस्ताक्षर स्पर्धा - बोकलत
हस्ताक्षर स्पर्धा - बोकलत
वा, छान होणार कार्यक्रम !
वा, छान होणार कार्यक्रम !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
सगळ्यांना खूप शुभेच्छा
जवळ आलाय .
बोकलत सलाम हो !
बोकलत
सलाम हो !
धन्यवाद बिपिनजी
धन्यवाद बिपिनजी
चित्र सुरेख झाले आहे संयोजक
नवीन पोस्टर/ चित्र सुरेख झाले आहे, संयोजक टीम.