कुळ कायदा हा तसा महाराष्ट्रभर सर्वत्र लागू आहे. तरी याचं उगम मात्र कोकणातला आणि खो-यानी केसेस येतात ते पण कोकणातुनच. त्यामुळे कुळ कायदा म्हटलं की कोकणी माणूस थेट जोडला जातो. त्याचा काही ना काही संबंध येतोच आणि तो कुळ कायदा ब-यापैकी जाणतो सुध्दा. तरी ब-याच लोकांना हा कायदा नीट माहीत नाही. तो कळावा म्हणून त्याची बेसीक माहिती बघू या.
उद्देश : "कसेल त्याची जमीन" या तत्वावर कसणा-याला जमिनीची मालकी देणे हा मूळ उद्देश आहे. म्हणजे जरी तुम्ही मालक नसलात तरी तुम्ही जर जमीन कसत असाल तर त्या जमिनीची मालकी तुम्हाला देण्यात यावी हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. म्हणून याला वेलफेअर अक्ट असेही म्हणतात. कारण हा कायदा कल्याणकारी कायदा आहे. असा कायदा असावा की नसावा हा वादाचा विषय असू शकतो, पण तो आहे हे वास्तव आहे.
पार्श्वभूमी: भारत स्वतंत्र झाला त्याच्या आधी देशात विविध प्रांतात विविध प्रकारे जमीन धारणा करण्याची पद्धत व कायदे होते. देशाच्या उत्तरेला व पुर्वेला जमिनीदारी पध्दत होती. एका एका जमिनदाराकडे हजारो एकर जमीन होती. विधर्भ व मध्यप्रांत मध्ये मालधारी व चौधरी किंवा सावकार हा प्रकार होता. किंवा इतर कुठल्या प्रांतात अजून कुठली तरी पध्दत होती. थोडक्यात जमीन धारण करण्याच्या पध्दतीचं नाव काही असले तरी खूप जमीन धारण करता येईल याची सोय होती. त्यामुळे जमीन धारण करताना समाजात एक सामाजीक असतोल निर्माण झालेला होता. मग ज्याच्याकडे पैसे होते तो हजारो एकर जमीन धारण करत असे. आणि ज्याच्याकडे पैसे नव्हते तो मात्र शेतात अगदी मजूर म्हणून राबत असे. त्याची अजून एक बाजू अशी होती की पैसेवाला सावकार थोडेसे पैसे कर्ज देऊन जमिनीचा ताबा घेत असे. त्यानंतर ती जमीन कायमची त्या जमिनदाराची होत असे. कारण व्याजाचे पैसे कधीच फिटत नसत. मग त्या जमिनीचा मालक स्वत:च्याच जमिनीत मजूर म्हणून राबत असे. कारण काय? तर जमीन गहाण पडली होती अन ती कधीच सोडविता येत नसे. थोडक्यात १९४७ ला देश स्वतंत्र झाला तेंव्हा ही अवस्था होती. मग यावर उपाय काढला पाहिजे व सावकारांच्या तावडितून जमीन सोडवायची व ती शेतक-याला द्यायची या हेतून सन १९४८ साली कुळ कायदा आणला गेला.
कृषक दिन: कुळ कायद्यात १ एप्रिल १९५७ हा कृषक दिन म्हणून तरतूद केलेला आहे. हा दिवस कुळ कायद्याचा पाया आहे. कुळ कायद्याची अख्खी केस याच तारखेला आधार बनवून मांडली जाते. आणि ही तारीखच ठरवते की कुळाला हक्क द्यावे की त्याचा कुळ म्हणून हक्क नाकारावे. कारण कायद्याची तरतुदच तशी आहे. काय म्हणतो कृषक दिन... एखादा शेतकरी जमीन कसत असेल आणि कृषक दिनी त्याचा संबंधीत जमिनीवर ताबा असेल आणि तो स्वत: कसत असेल. तर तो संबंधीत जमिनीचा मानीव मालक बनला. म्हणजे काय? कुळ कायद्या मध्ये कृषक दिनी ताबेदार असलेला माणूस ऑटोमेटीक मालक बनला. याचा दुसरा अर्थ असा आहे की, तुम्ही एखाद्या जमिनीचे मालक असाल आणि तुमच्या जमिनीत एखादा माणूस कुळ म्हणून राबत असेल आणि कृषक दिनी जर तो त्या जमिनीचा ताबेदार असेल तर तुमचा मालक म्हणून त्या जमिनीतील हक्क संपुष्टात आलेला आहे.
सारांश: एखाद्या जमिनीत एखादा माणूस कुळ म्हणूण राबत असेल, तो खंड देत असेल आणि कृषक दिनी त्याचा प्रत्यक्ष ताबा असेल तर तो ऑटोमेटीक मालक बनलाय, आणि मुळ मालकाचा हक्क संपुष्टात आलेला आहे. विषय संपला.
पुढील भागतः ३२ ग ची प्रक्रीया आणि ३२ म चे प्रमाणपत्र
धन्यवाद माहितीबद्दल.
धन्यवाद माहितीबद्दल.
जेव्हा अशा कुळांना जमिनी दिल्या गेल्या तेव्हा मूळ मालकांना काही मोबदला दिला गेला होता का? तसे कोठेतरी वाचले आहे पण नक्की माहीत नाही.
खूप छान माहिती. याच व संबंधित
खूप छान माहिती. याच व संबंधित विषयावर वाचायला अजून आवडेल. आनंद यादव यांच्या "घरभिंती" आत्मचरित्रात त्यांनी असे लिहिलेय कि त्यांचे कुटुंब वर्षानुवर्षे कसत असलेला मळा त्यांना मालकाला परत द्यावा लागला. त्यांना कुळकायद्याचा का उपयोग झाला नाही याचे कुतूहल वाटले होते. असो.
काही कदाचित अवांतर प्रश्न :
घरमालक व भाडेकरू ११ महिन्यांचेच करार का करतात? त्याच्यामागे काय कायदेशीर कारण आहे का? रजिस्टर न केलेले अग्रीमेंट कोर्टात चालत नाही असे ऐकले होते. ते खरे आहे काय?
>>>> एखादा माणूस कुळ म्हणूण
>>>> एखादा माणूस कुळ म्हणूण राबत असेल, तो खंड देत असेल आणि कृषक दिनी त्याचा प्रत्यक्ष ताबा असेल तर तो ऑटोमेटीक मालक बनलाय, >>>
१) तो खंड देत असेल ....
२)कृषक दिनी त्याचा प्रत्यक्ष ताबा असेल तर .....
१९४८ ते १९५७ या काळात कुळाने आपल्या नावावर जमीन करायची होती स्टॅम्प ड्युटी भरून.
पण ते त्यांनी केले नाही तर जमीन अजूनही मूळ मालकाच्या नावानेच दाखवते सात बारा उताऱ्यावर. पण तो जुना सातबारा ठरतो कारण कुळाने खंडही (levy )भरलेला नसतो. मालकांचा सातबारा अद्ययावत ठरत नाही. त्या आधारे मालक दुसरी जमीन घेऊ शकत नाही. संगणीकरणामुळे जुना सातबारा स्विकारला जात नाही.
मग यातून खटले चालू राहतात.
जेव्हा अशा कुळांना जमिनी
जेव्हा अशा कुळांना जमिनी दिल्या गेल्या तेव्हा मूळ मालकांना काही मोबदला दिला गेला होता का? >>> मूळ मालक असा प्रकार दुर्मिळ असेल.
जे काही होते ते वतन, इनाम होते. म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी वतन / इनाम किंवा देशमुखी च्या अंतर्गत एका अशा अधिकार्याकडे असत ज्याला कर घेण्याचा अधिकार होता. त्याला जमीनदार म्हणत.
जमीनदाराकडे त्याच्याकडे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या सर्व शेतकर्यांच्या जमिनीची कागदपत्रे असत. आपल्याच जमिनीत शेतकरी कूळ असे. या व्यतिरिक्त लढाईत जिंकून घेतलेल्या जमिनी कसण्यासाठी ठेवलेले लोक असत.त्यांचे दोन प्रकार असत.
१. मजूर, वेठबिगार
२. कराराने कसायला ठेवलेले लोक
यातले क्र. २ चे लोक आहेत यांनाही कूळच म्हणतात. ज्या जमीनमालकांना आपली जमीन कसायला वेळ नाही. पगार देण्याची ऐपत नाही, अशांनीही करारावाटे कुणाला कसायला दिली तर त्याचे नावही कूळ म्हणून सात बार्याला येते.
मूळचा विषय नेहरूंच्या काळातला जमीनदारांकडची जमीन काढून घेण्याचा.
तर हे काही या जमिनींचे मालक नसत. पण त्या भागाचे राजेच असत. त्या अर्थाने ते मालकांसारखेच वागत.
धन्यवाद माहितीबद्दल.
धन्यवाद माहितीबद्दल.
धन्यवाद र.आ.
धन्यवाद र.आ.
माहितीपूर्ण लेख..!
माहितीपूर्ण लेख..!
आचार्य , तुमचा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे.