यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः
स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)
आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach
करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari
तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!
सध्या मरिनर आकाश नावाचे
सध्या 'मरिनर आकाश' नावाचे यूट्यूब चॅनेल फॉलो करतो आहे. मूळचा रत्नागिरीच्या असलेल्या आणि आता Merchant Navy (Cargo Ship) मध्ये काम करणाऱ्या तरुणाचे चॅनेल आहे. त्यात तो शिपवरील रंजक गोष्टी मराठीत सांगतो.
या कोकणस्थ काकांचा दीड शहाणा
या कोकणस्थ काकांचा दीड शहाणा म्हणून चॅनेल आहे. आताचे नाव आपला शामू.
https://www.youtube.com/watch?v=4lJF0h7x_IM
एक व्हिडीओ छान वाटला. दुसरा सुरू केला आहे. आवडतंय.
( माबोकर असाल तर हजेरी द्या ओ काका)
शामु चे कधी कधी बघते,
शामु यांचे कधी कधी बघते, बालमोहनमध्ये शिकलेत, भायखळ्यात रहायचे. कधी कधी फार बोअर होतात vlogs, मला शामु यांची आई फार आवडते. काही व्हिडीओज आवडले. 40 वर्ष इस्त्रायलमध्ये रहातात, त्याआधी 20 वर्ष मुंबईत.
Red Soil Stories हे चांगले
Red Soil Stories हे चांगले चॅनेल आहे.
शामु यांचे कधी कधी बघते,
शामु यांचे कधी कधी बघते, बालमोहनमध्ये शिकलेत, भायखळ्यात रहायचे. >>> ओह. हे नव्हतं माहिती.
हो त्यांनीच सांगितलं. ते
हो त्यांनीच सांगितलं. ते धर्माने ज्यू आहेत पण मातृभाषा मराठी.
ते शामू बोअर होतात. १,२
ते शामू बोअर होतात. १,२ व्हिडिओज पाहून बंद केलं बघायचं.
Brishti home kitchen हल्ली
Brishti home kitchen हल्ली पाहतेय.. झारखंड हून लग्नानंतर बंगलोर ला शिफ्ट झालेली ही मुलगी दिसायला फारच गोड आहे . पदार्थ छान करतेय. आणि एक ही पदार्थ बिघडत नाही असं वाटतंय.
सध्या ध्रुव राठी बघते आहे.
सध्या ध्रुव राठी बघते आहे.
शामू काकांचा अश्विनी भिडे
शामू काकांचा अश्विनी भिडे यांना कार्यक्रमात आपल्या आईचा वाढदिवस आहे असं खोटं सांगून मराठी गाणं गायला लावल्याचा व्हिडिओ मला सजेशन मध्ये आला होता म्हणून बघितला. ठीक आहे, फार खास नाही. बाकी बोअर होतात.
फरा खानचे चँनेल आवडले म्हणून
फरा खानचे चँनेल आवडले म्हणून subscribe केले आहे. मजेदार आहे, पण काही गोष्टी खटकत आहेत. सतत तिचे लसूण, आले इतके महाग म्हणून कूकला झापणे आवडत नाहीये. लोकांना आपण मिडल क्लास आहोत असे दाखवणे ही चॅनेलची यू एस पी असावी. पण एरवी कोट्यवधी पैसे मिळवणारी इतकी चिंधीचोर असेल ते पटत नाही.
तिचा कूक दिलीप जास्त पॉप्युलर झाला आहे. तो बिचारा ती सांगेल तसे डायलॉग म्हणतो. पण एक एपिसोडमध्ये ती त्याला 'तू मुझे जलाना चाहता हैं ना'' म्हणाली ते नाही आवडले. तिचा सेन्स ऑफ ह्यूमर थोडा वेगळा आहे, स्पष्टव्यक्ती आहे. चॅनेल कूकिंगसाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. एका महिन्यात तिला युट्युब कडून सिल्वर बटण मिळाले.
तिचा सेन्स ऑफ ह्यूमर थोडा
तिचा सेन्स ऑफ ह्यूमर थोडा वेगळा आहे>>> मला आवडते ती.. खूप सिरीयसली घेण्या सारखी नाहिये ती. मिडलक्लास वगैरे नुसता शो ऑफ आहे. सारा अली खान ला काय कमी आहे, ती लोकांनी तिला गम्भीर पणे घ्यावे म्हणुन पीआर सांगतो तसे करते.. मिडलक्लास आहे, बार्गेनींग करते वगैरे. आता रॉयल लोक बार्गेन करायला लागले तर बिचार्या शेतकरी/भाजीवाल्यांनी काय करावे? ५ स्टार होटेलात करा की बार्गेनींग
फार खान extremely talented
फरा खान extremely talented आहे. माझा आवडतीचा चानेल आहे. मधून मधून बघतो.
काय नाव फराहच्या चॅनेलचं.
काय नाव फराहच्या चॅनेलचं.
स्वानंदी सरदेसाईचे युट्युब शॉर्ट्स मस्त असतात. सध्या मी पुर्ण एपिसोड बघण्यापेक्षा, बहुसंख्य व्लॉगर्सचे असे छोटे व्हिडीओ बघते.
FarahKhanK
FarahKhanK
Shrunal waigankar (karwar)
Shrunal waigankar (karwar) याचा चानेल याच नावाने
https://youtube.com/@believer97?si=dh9bFecS1uN2u49d
आपला शामू चे काही व्हिडिओ
आपला शामू चे काही व्हिडिओ बघितलेत. विशेषतः मायलेकाच्या ट्रिप चे, आईच्या कॅन्सर ट्रिटमेंटच्या वेळी इजरायली हॉस्पिटल मध्ये कशी व्यवस्था असते ते दाखवणारे आणि युद्ध सुरू असतानाचे काही बरे वाटले. नंतर मध्येच शामरावांच्या ज्यू मैत्रिणीची एन्ट्री झाली मग मला नको झालं.
Brishti home kitchen हल्ली पाहतेय
>> बिष्टीचे व्हिडिओ मला आवडतात. एकतर छोटे असतात, उगीच पाल्हाळ नाही आणि अतीशय साधे सरळ, उगीच शो बाजी नाही. रोज सकाळी उठून डब्यासाठी इतका वेगवेगळा मेनू करायचा उत्साह बघून हेवा वाटतो.
दारू सोबतच सिगरेट, गुटखा
.
शामुची आई मला फार आवडते
केशवकुल धन्यवाद.
शामुची आई मला फार आवडते म्हणून काही छोटे बघितले आहेत, मोठे vlogs नाही बघत पण शामु कधी कधी फार बोअर करतो, बालमोहनमध्ये शिकल्याने मराठीवर मात्र प्रभुत्व आहे, मराठी मातृभाषाही आहे . खडूस वाटतो मात्र बोलण्यात.
मध्ये बरेच दिवस त्याचा vlog दिसला नाही तेव्हा मात्र आई बरी असेल ना त्याची अशी काळजी वाटलेली. नंतर येतो मात्र live, ते मी बघत नाही पण आई बरी आहे असं समजल्यावर बरं वाटलं. आईबरोबर एखादा vlog पोस्ट केला आणि तो लहान असला तर बघते.
शामूचा एकच व्हिडीओ पाहिला
शामूचा एकच व्हिडीओ पाहिला होता,ते ही भारताचे आपल्याला अपरिचित असलेले नाव समजल्यामुळे. चॅनेलचा विषय समजला नाही. माझ्याकडे एखाद्याचा एक व्हिडीओ पाहिला कि जोपर्यंत सेटींग्ज मधे जाऊन सेटींग्ज बदलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचे, देशाचे, विषयाचे व्हिडीओज इतके येत राहतात कि सबस्क्राईब करायचीच भीती वाटते. असे चॅनेल्स सबस्क्राईब करू नयेत असे वाटते.
ज्या गोष्टी सिरीयसली शिकायच्या आहेत त्यांचेच सबस्क्रीप्शन घेतले आहे. नेमके ते व्हिडीओज येत नाहीत. तो कंटेट कमीच असतो. अॅडव्व्हेन्चर्सचे व्हिडीओज आधी एक दोघांचे बघत होतो. आता ते इतके झालेत कि पुन्हा सेटींग्ज मधे जावे लागेल. ते ही लक्षात राहत नाही. सोशल मीडीयाचा हा दुर्गुण असल्याने मग नॉशिया येऊ लागतो.
आपले प्रतिसाद पण खूप वाढले कि इतरांना देखील इरीटेट होऊ शकते.
माझ्याकडे एखाद्याचा एक
माझ्याकडे एखाद्याचा एक व्हिडीओ पाहिला कि जोपर्यंत सेटींग्ज मधे जाऊन सेटींग्ज बदलत नाही>> मला काहीही देणंघेणं नसताना गेल्या आठवड्यापासून यु ट्युब घोड्यांचे व्हिडिओ दाखवायला लागले.
मला काहीही देणंघेणं नसताना
मला काहीही देणंघेणं नसताना गेल्या आठवड्यापासून यु ट्युब घोड्यांचे व्हिडिओ दाखवायला लागले. >>>
तुम्ही मनातल्या मनात या घोड्याला अक्कल कधी येणार वगैरे विचार आणले असतील.
युट्यूब वर असंख्य प्रकारच्या
युट्यूब वर असंख्य प्रकारच्या मानसिक आजार - विकार / गुंतागुंतींची सखोल माहिती देणारी खूप चॅनेल्स आहेत - इंग्रजी भाषेतली .. त्यामानाने मराठीतील कंटेंट तुटपुंजा आहे . आपणच एखादं क्रिएट केलं , बेसिक ट्रान्सलेट केलेली माहिती सोप्या भाषेत देणारं तर , असाही विचार आला पण आपण तज्ञ नाही उलट आपल्याला स्वतःलाच 10 प्रॉब्लेम आहेत ... तेव्हा अधिकार आहे का तसा आणि चुकीची माहिती मिळून कोणाचं नुकसान झालं तर , असेही विचार आले .. बघू पुढे कधीतरी .
सध्या ह्या विषयावरचं हे चॅनेल सबस्क्राईब केलं आहे -
https://youtu.be/Eqh273zolG0?si=KS4qFd1dbZK_VH6K
ध्रूव राठी - नॉन पॉलिटिकल
ध्रूव राठी - नॉन पॉलिटिकल कंटेटसाठी.
>>>>>>तुम्ही मनातल्या मनात या
>>>>>>तुम्ही मनातल्या मनात या घोड्याला अक्कल कधी येणार वगैरे विचार आणले असतील.
कसली हसतेय.
हिंदुस्तान टाईम्स
हिंदुस्तान टाईम्स वाचणाऱ्यांना ध्रृव राठी वगैरे एकांगी माहिती झोडपणारे चानेलस पाहण्याची गरज नसते.
आत्ता फक्त धागा वर काढून
आत्ता फक्त धागा वर काढून ठेवतेय. उद्या लिहीन एका चॅनेल बद्दल.
लडाखच्या ट्रीपसाठी व्लॉग्ज
लडाखच्या ट्रीपसाठी व्लॉग्ज बघत असताना एक व्लॉग्ज बघण्यात आला.
प्रोफेशनल व्लॉगर्स पासून ते हौशे, गवशे नवशे कुणाचेही व्लॉग्ज मी बघते (चाळते).
एक कळकटसा वीस वर्षांचा मुलगा बिहार मधून लडाखला चालला होता, ते ही सायकलवर. मायबोलीवरच्या खूप जणांची वर्णने वाचली आहेत. रिस्पेक्ट आहे या सर्वांबद्दल.
या मुलाचे बोलणे, कुठेही खाणे, मंदीरात झोपणे हे इरीटेट करत होते. तरी पण मी प्रत्येक एपिसोड बघत होते. राहवत नव्हतं. का बरं ?
कारण सायकलवर एकटा कसा काय हा गेला ? पोहोचला का ? गरीब दिसतोय, पैसे संपले असतील का ? तिथपर्यंत पैसे पुरले असतील का असे अनेक प्रश्न पडत होते. व्लॉग कसा असावा याचं ज्ञान त्याला नाही. कुणी भेटलं कि त्याच्याशी कसं बोलावं हे पण त्याला समजत नाही. एखादं वाक्य बोललं कि उगीचच हसणं हे सगळ सगळं इरीटेट करत असूनही त्याची सगळी ट्रीप पळवत का होईना पाहिली.
शेवटी त्याचं घर पाहीलं. बिहार मधलं खेडेगाव आहे. छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या आईने त्याला ओवाळलं तेव्हां डोळ्यात पाणी आलं. पण त्याही आधी जेव्हां तो १२००० फूटांवर असताना बोलला ना कि "एक मुलगा असतो, तो अंधाराला घाबरायचा, एकटा झोपायला घाबरायचा ..... तो मुलगा आता एकटा सोलो ट्रीप करतोय, एकटा निर्मनुष्य भागात टेण्ट लावतो" तिथे खूप इमोशनल केलं त्यानं. मग नंतर नाही इरीटेट झाले.
त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याचे वडील कुणाशी तरी फोनवर बोलत होते तेव्हां त्याच्या परिस्थितीची कल्पना आली. ती घराच्या भिंती पाहूनच आली होती आणि मग त्याचा चेंगटपणा पटला. ऐन विशीत नाही त्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा किती सुंदर काम करतोय तो. प्रत्येकाकडून म्हटलं तर शिकता येतं.
गाडीने लडाखला जाण्यातलं थ्रिल मात्र संपून गेलं.
विचार छान मांडलेत रानभुली.
विचार छान मांडलेत रानभुली.
सामो थँक यू
सामो थँक यू
असच चाळता चाळता हेअर केअर
असच चाळता चाळता हेअर केअर ह्या माझ्यासाठी सेन्सिटिव्ह विषयावरचं CARA P नावाचं चॅनल दिसलं. त्यात ती मुलगी केसांच्या समस्यांवर घरच्या घरी तयार करता येतील असे वेगवेगळे पॅक दाखवते. साधे आणि छोटे व्हिडिओ आहेत.
तुम्ही मनातल्या मनात या घोड्याला अक्कल कधी येणार वगैरे विचार आणले असतील.>> मनकवडा झुकू!
आत्ता पहिल्या पासून पोस्टी
आत्ता पहिल्या पासून पोस्टी वाचताना एक गोष्ट लक्षात आली. मला यातले बहुतेक चॅनेल्स फीड मधे येत राहतात. इथलं कनेक्शन असेल का?
Hind Sagar नावाचा चॅनल आत्ता सबस्क्राईब केला. हे Adventure Vlog प्रकरण आवडू लागलं आहे. हा मुलगाही विशीतलाच आहे. स्मार्ट, चुणचुणीत आहे. आधीचा सूरज होता त्यापेक्षा बोलतो छान. चांगल्या आर्थिक परिस्थिती असलेल्या बॅकग्राऊंडचा वाटतो.
पण चेंगटू हा पण आहे.
आई वडिलांचे पैसे वाचवतात ही मुलं. पैकीच्या पैकी गुण. फक्त गुरूद्वारा, मंदीर, चढावा किंवा अशा ठिकाणी जाऊन जेवण करावं का?
मुलं कसेही राहू शकतात. कुठेही टेण्ट लावून एकटे झोपू शकतात. अंघोळ किती दिवस करत नसतील काय माहीत.
एनी वे आधी त्याची लडाख ट्रिप पळवत पाहीन मग श्रीलंका.
बाकी विशीतली मुलं कधी कधी गंभीर होऊन ज्ञानप्राप्ती झाल्यासारखं काही तरी सांगतात ना ते ऐकायला मज्जा येते.
आत्ता पहिल्या पासून पोस्टी
आत्ता पहिल्या पासून पोस्टी वाचताना एक गोष्ट लक्षात आली. मला यातले बहुतेक चॅनेल्स फीड मधे येत राहतात. इथलं कनेक्शन असेल का?>>>>>> असू शकेल रानभुली. मलाही येत आहे नाकातु
मनकवडा झुकू!>>>>>>
Pages