BMM अधिवेशन खास आमंत्रण

Submitted by BMM2024 on 15 June, 2024 - 15:44

BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील १९८१ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या ५२ महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन.

यावेळेस २७ ते ३० जून या दरम्यान BMM चे अधिवेशन सॅन होजे कॅलिफोर्निया (Silicon Valley) येथे होणार आहे. या अधिवेशनास ६००० मराठी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
BMM2024guests.JPG
चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सर्व वयोगटाकरता आणि वेगवेगळ्या विषयांवरचे (सांस्कृतिक वैचारिक आध्यात्मिक व्यावसायिक) असे ४० हून जास्त कार्यक्रम होणार आहेत.
• महाराष्ट्रातून राज ठाकरे, सुनील गावस्कर, गौर गोपाल दास, गोविंदगिरी महाराज, अच्युत पालव यासारख्या अनेक मान्यवर अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येत आहेत.
• तसेच महेश काळे, राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, संजीव अभ्यंकर, अश्विनी भिडे, कौशल इनामदार यासारखे संगीत क्षेत्रातले दिग्गज खास या अधिवेशनासाठी येत आहेत.
• कवितांचे अभिवाचन आणि नाटक याचा उत्तम संयोग असलेला “प्रिय भाई, एक कविता हवी आहे” हा कार्यक्रम सादर होणार आहे आणि सध्या तरुणाईने डोक्यावर घेतलेला “भाडीपा – जगात भारी” हा standup comedy show देखील येत आहे. जोडीला अजय अतुल यांचा गाण्याच्या लोकप्रिय कार्यक्रम सादर होणार आहेत.
• अमेरिकेतील मराठी कलावंत आणि मराठी मंडळानी देखील जय्यत तयारी केली आहे. नवरसांचा आविष्कार दाखवणारा उद्घाटन सोहळा, अमेरिकेतल्या विषयावरची नावीन्यपूर्ण नाटके, कथाकथन, संगीत-नृत्याचे कार्यक्रम तसेच ढोल ताशा, एकांकिका आणि संगीत, नृत्य यांच्या स्पर्धा सादर केल्या जाणार आहेत.
• धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये गुरुजनांचे विचार, संत परंपरेची ओळख, कीर्तन, वारी, ज्योतिष,हीलिंग वर्कशॉप यासारखे कार्यक्रम असतील
• इतिहास, मेडीसीन, उद्योग अशा विषयावरील विविध चर्चासत्रे, कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित केले आहेत.
• इथे वाढलेल्या तरुण पिढीकरता करियर मार्गदर्शन, Shark Tank, Speed Dating, वधू-वर मेळावा, Fashion Show आणि नवीन विचारांना चालना देणारे असे खास कार्यक्रम आयोजित केले आहेत.

कार्यक्रमाची जंत्री इथेच संपत नाही. हा आनंद सोहळा तुम्ही स्वत येऊन अनुभवायला हवा. तुम्हा सर्वाना या अधिवेशनाचे खास आमंत्रण बर का !
या अधिवेशनाच्या तयारी साठी गेले दोन वर्षे ३५० स्वयंसेवक ३० समित्यांच्या माध्यमातून तयारी करत आहेत.

या अधिवेशनांचे महत्वाचे आकर्षण म्हणजे अस्सल मराठी जेवण! सुग्रास मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे.

संपूर्ण जागा अनेकविध थीमने सजवली जाणार आहे क्षणात कर्मभूमी तर तर क्षणात मायभूमी पाहायला मिळेल. आहे, प्रदर्शने आहेत, फोटो स्पॉट्स आहेत, फॅशन शो आहे .. शिवाय अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, वेगवेगळ्या विषयातील तज्ञ लेखक उद्योग क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातील अग्रणी मान्यवर येत आहेत.

आमची वेब साइट आहे. BMM2024.ORG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीएमएम च्या संमेलनाला शुभेच्छा

या संमेलनात अमेरिकेत राहणार्‍या भारतीय मुलांचे "मल्लखांब प्रात्यक्षिक" होणार आहे, ते जरूर पाहा. माझे काही मल्लखांब विद्यार्थी यात भाग घेत आहेत. आम्ही कनेक्टिकट मध्ये या मुलांसाठी गेल्या ३ वर्षांपासून मल्लखांब शिकवत आहोत. तेंव्हा नक्की पाहा आणि आपला अभिप्राय कळवा.

अरे व्वा, अरूण. तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा..! Happy
अमेरिकेत कुणी मल्लखांब शिकवतं हे वाचूनच कौतुक वाटलं.‌

अरे व्वा, अरूण. तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा..! Happy
अमेरिकेत कुणी मल्लखांब शिकवतं हे वाचूनच कौतुक वाटलं.‌>>>> +१

अरे व्वा, अरूण. तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा..! Happy
अमेरिकेत कुणी मल्लखांब शिकवतं हे वाचूनच कौतुक वाटलं.‌>+१११

संमेलनाला शुभेच्छा. एकदम जंगी कार्यक्रम दिसतायेत.

अरुण मस्त वाटलं वाचून, तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि गुरू म्हणून तुम्हालाही शुभेच्छा.

नंतर सर्वांनी संमेलन वृत्तांत, फोटो शेअर जरूर करा.

या संमेलनात अमेरिकेत राहणार्‍या भारतीय मुलांचे "मल्लखांब प्रात्यक्षिक" होणार आहे, ते जरूर पाहा >> नक्की प्रयत्न असेल.

धन्यवाद मंडळी

आर्च, आता मल्लखांब करत नाही, फक्त शिकवतो

अरे वा अरुण!
पुण्यात कोणच्या शाळेत होतास?

>>मुबईकर आहे गं मी.<<
हम्म. मग समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क कि पवनपुत्र, चेंबूर?

चेंबूर मधले असाल तर श्रीनिवास खळे सगळ्यांचे खळेकाका कसे झाले याची कल्पना असेल... Wink

सही अरूण! तुझ्या/सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

दंगल सारखे अरूणचे विद्यार्थी पारितोषिक मिळवताना अरूणला गंडवून एका रूम मधे कोंडून ठेवले आहे असे इमॅजिन केले Happy

हाहाहा फा.

फक्त आमच्याच सेंटरचे नाहियेत, ईतर सेंटरचेपण विद्यार्थी आहेत डेमोला

अरुण मस्त वाटलं वाचून, तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि गुरू म्हणून तुम्हालाही शुभेच्छा.>> ++१

संमेलनाला शुभेच्छा. एकदम जंगी कार्यक्रम दिसतायेत.

अरुण मस्त वाटलं वाचून, तुमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि गुरू म्हणून तुम्हालाही शुभेच्छा.>>+१

फार मस्त वाटल हे वाचुन! समेलनाला शुभेच्छा, उपस्थितीत राहणार्यानी फोटो,व्हिडियो,व्रुतात शेअर करा.

अरुण.फारच सॉलिड.कोणीतरी मल्लखांब ट्रेनिंग देतंय तेही अमेरिकेत ही मोठी गोष्ट आहे.कार्यक्रमाला शुभेच्छा.
सर्व बीएमएम टीमलाही शुभेच्छा. कार्यक्रम व्यवस्थित पार पडो, मायबोलीकरांनी भाग घेतलेले कार्यक्रम छान लोकप्रिय होवोत.

अरे व्वा, जोरदार दिसतोय कार्यक्रम. अगदी भरगच्च. खूप शुभेच्छा

अमेरिकेत कुणी मल्लखांब शिकवतं हे वाचूनच कौतुक वाटलं.‌>+100000000
अरूण तुमच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ झलक