पारी साठी: एक दीड वाटी मैदा, थोडे मीठ व तेल पाणी भिजवायला.
फिलिन्ग साठी: चिकन खिमा एक वाटी, फ्रेश कोबी/ चायनीज कोबी/ कांद्याची पात, लसूण पाकळ्या तीन/ तिळाचे तेल किंवा साधे रिफाइन्ड तेल. कुकींग साके एक मोठा चमचा, सोया सॉस एक चमचा, चवी पुरते मीठ, ताजी कोथिंबीर. काटाकुरिको - बटाटयाचे स्टार्च किंवा आपले साधे कॉर्न स्टार्च एक दीड मोठा चमचा. बारका चमचा काळी मिरी पावडर
ग्योझे तव्यावर परतायला: एक चमचा तेल व अर्धी वाटी पाण्यात एक बारका चमचा मैदा मिसळून केलेली पातळ स्लरी.
आदल्या रात्री:
सर्व प्रथम भाज्या कापून घ्या. कोबी, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे. कांद्याच्या पातीचे पण आपण नेहमी करतो तसे चिरून घ्यायचे फार मोठे तुकडे नाही ठेवायचे. लसूण पाकळ्या ठेचुन घ्या. लसूण खात नसल्यास नका घालू. कोणी सामुराई तलवार उपसून येणार नाही.
बोलमध्ये चिकन खिमा, को, को, कांपा, ल, भाज्या मिसळून घ्या, त्यात आता सर्व सिझनिन्ग घाला. मीठ, कॉर्न स्टार्च, तेल, सोया सॉस, साके घाला, एक दोन चिमूट काळी मिरी पाव्डर हे सर्व मिसळून घ्या. हलक्या हाताने कालवा. हे सर्व आता क्लिन्ग फिल्म लावुन किंवा पर्यावरणार्थ एअर टाइट डब्यात घालुन फ्रिझ मध्ये ठेवा. उद्या ग्योझे करायचे लंच मध्ये. ओव्हर नाइट राहिले पाहिजे अशी ग्योझा मास्टर ची टिप आहे.
पारीचा मैदा तेल मीठ घालुन मध्यम भिजवून घ्या. माझा डो जरा सैल झालेला. हे पण फ्रिजात टाका. १२- १८ तासाचा हा वेळ पूर्व तयारीत धरलेला नाही.
दुसृया दिवशी लंच च्या आधी:
पोळपाट लाटणे सज्ज ठेवा. तो मैदा बाहेर काढून बारक्या पुरी साइज लाटून घ्या. प्लेट मध्ये थोडा मैदा पसरुन घ्या.
एक एक पुरीत आता
एक छोटा चमचा; छोटाच घ्या ,फार भरायचे नाही नाहीतर ग्योझा फुटू शकतो; सारण भरुन आपण करंजी बंद करतो तसे बंद करायचे.
नवशिक्यांनी पुरीच्या कडांना थोडे पाणी लावुन बंद करावे सर्व ग्योझा करंज्या प्लेट मध्ये ठेवुन घ्या.
सारण फ्रिज च्या बाहेर काढल्यावर आधी चेक करा , जास्तीचे पाणी असल्यास एका वाटीत काढून घ्या. सारण जमेल तितके कोरडे हवे.
ग्योझा मास्टर पोर्क वापरून खरे तर ग्योझा करतो. ही पोर्कचीच डिश आहे मूळची चीन देशातली. हॉटेल मध्ये एकेक दिवशी १२००- १३००
पिसेस बनवले जातात. सारण बनवताना ते कोबी हाताने पिळून पिळून त्यातले जास्तीचे पाणी काढून टाकतात. बनवलेले पिसेस खाली थोडा मैदा फेकून एका ट्रे मध्ये ठेवतात. ऑर्डर आली की खटाखट परतून सर्व्ह करतात.
आता फायनल सर्व करायच्या वेळी : तवा गरम करायला ठेवा. मध्यम गरम झाले की एक चमचा तेल लावा, किंवा डोसा बनवताना कसे कांद्याने किंवा नारळाच्या शेंडीने तेल लावुन घेतात तसे करा. मग त्यात एक एक ग्योझे हलक्या हाताने ठेवा. आगगाडी बनवायची.
अर्धी वाटी पाण्यात सारणातले उरलेले पाणी, दोन तीन चिमुट मैदा मिसळून पातळ मिश्रण करुन घ्या. व गरम ग्योझे परतत असतानाच त्यावर ओता व लगेच झाकण ठेवा. हे फार महत्वाचे आहे. पाच परेन्त ग्योझे एका लायनीत तव्यात बसले पाहिजेत मग स्लरी घातली व झाकण ठेवलेले. पाच सहा मिनिटात झाकण काढा. व उलथ न्याने सर्व पाच एकदम तव्यावरून उचलून सर्विंग प्लेट मध्ये ठेवून गरम गरम सर्व्ह करा.
मूळ चायनीज पदार्थ असल्याने आपण भारतीय शेजवान चटणी बरोबर किंवा मोमो बरोबर जी तिखट चटणी येते त्या बरोबर खाउ शकतो.
भारतात रेडीमेड फ्रोझन मोमो मिळतात त्याबरोबर एक चटणी येते ती छान असते.
तयार ग्योझे जर नुसतेच इडली पात्रात उकडून घेतले तर मोमो झाले. पण ग्योझा ची स्पेशालिटी म्हणजे एक बाजु - तव्याकडची - छान भाजलेली कुरकुरीत, सोनेरी होते, रामेन/ गरम भात व चिकन तेरियाकी बरोबर पण खाउ शकतो म्हणजे फुल मील होते. इतादाकी मास.
पाण्याची स्लरी नीट जमली तर ग्योझाची जी तव्याकडची बाजु आहे ती कुरकुरीत मस्तच होते पण त्यावर एक प्रकारची लेसी जाळी पण येते, कॅरमलाइज्ड असल्याने मस्त लागते. हे मास्टर लेव्हल काम आहे.
तव्याखाली मध्यम आचच ठेवा नाहीतर ग्योझा करपतील. एकदा चेक करुन हवे असल्यास एक -दोन मिनिटे जास्त ठेवता येइल.
ग्योझाचे मिठाचे प्रमाण बरोबर यायला जरा ट्रायल एरर करावी लागते. फिलिन्ग मध्ये सोया सॉस आहे त्यात मीठ, व आपण पण घालतो ते,
मैद्याच्या पारीत पण भिजवताना मीठ घालतो. मी पारीत घातले नव्हते त्यामुळे जरा कमी पडले असे लेडी खाडीलकर म्हटल्या मग वरुन थोडे पेरले. मी जनरली बिन मिठाचेच जेवते त्यामुळे मला चालले. तुमच्या घरच्यां च्या चवीनुसार मिठाचे प्रमाण अॅडजस्ट करा.
फिलिन्ग व पारी उरल्यास चिकन पराठा किंवा शेफले नावाचा पदार्थ करुन संपवता येइल.
प्रादेशीक मध्ये जपानी हा
प्रादेशीक मध्ये जपानी हा प्रकार दिलेला नाही. डिश ओरिजिनली चीन ची असल्याने चायनीजच लिहिले आहे. फोटो फोन मध्ये आहेत अपलोड करीन.
रेसिपी सोपी वाटते आहे.
ग्योझा मस्त दिसतो आहे. सोबतच्या पॅनमधला प्रकार पण छान दिसतो आहे.
रेसिपी सोपी वाटते आहे. घरच्यांनी खायची तयारी दर्शवल्यास करून पाहीन.
एक शंका >>> कुकिंग साके असल्याने लहान मुले हा किंवा कुकिंग साके घातलेला कोणताही पदार्थ खाऊ शकतात का?
Japanese kids eat cooking
Japanese kids eat cooking sake seasoning food all the time. You can avoid using it. Not an issue.
मस्त आहे. अनेकदा खाल्लेय पण
मस्त आहे. अनेकदा खाल्लेय पण बाहेर.
छान दिसतायत. आमच्याकडे
छान दिसतायत. आमच्याकडे पॉटस्टिकर्स बरेचदा होतात मात्र जपानी अवतार नाही होत फारसा.
अरे वा विंटरेष्टिंग प्रकार.
अरे वा विंटरेष्टिंग प्रकार.
नेमेचा सव्वाल - व्हेज पर्याय काय? बटाटा, पनीर, सोया सोडून. (कोणेरेते? आता भाज्याच भरा म्हंण्णारं आं?)
व्हेज पर्याय काय? बटाटा, पनीर
व्हेज पर्याय काय? बटाटा, पनीर, सोया सोडून. >>>> फ्लॉवरचा किंवा मश्रूमचा (खास करून ऑयस्टर मश्रूमचा) खिमा भरून बघा. मश्रूमने टेक्श्चर चांगले येईल.
व्हेज पर्याय काय? बटाटा, पनीर
डु पो
व्हेज मधे , मिक्स डाळी
व्हेज मधे , मिक्स डाळी भिजवून, वाटून, आलं लसूण मिरची घालून परतून - भरता येतील. अथवा, मिक्स स्प्राऊट्सही.
किंवा कॉर्न - हरभरा डाळीचे सारण. किंवा कोबी, गाजर, सिमला अशा भाज्या परतून.
किंवा मटार- बटाटा चे सारण! वाफवलेल्या मटार करंज्या !
व्हेज मधे खूप ऑप्शन्स आहेत.
व्हेज मधे खूप ऑप्शन्स आहेत. सिमला कोबी झुकिनी घालुन. सोया (नको लिहिलेय तरी) सोया चंक्स चा किमा, मश्रूम्स, घालून. एके ठिकाणी लोटस रूट्स बारीक चिरून त्यात बारीक चिरलेला कांदा आलं लसूण असा ही ग्योझा खाल्ला आहे.
लोटस रूट्स >>> यस्स....लोटस
लोटस रूट्स >>> यस्स....लोटस रूट्स कोवळी असतील तर छान टेक्श्चर येईल. पण मटार करंजी नका करू बुवा. मटार करंजीशी दुश्मनी नाही, मला आवडते. पण ग्योझा खाताना मटार करंजीचा फील नको.
अरेवाबरेचपर्यायमिळालेकी
अरेवाबरेचपर्यायमिळालेकी.करूनपाहयलाहवाहाप्रकार
छान रेसिपी. मी इकडे फ्रोझन
छान रेसिपी. मी इकडे फ्रोझन आणते नेहमी. सोप्पे काम, मुले आपापले तव्यावर करून घेतात. स्वतः कधी करून बघण्याचे डोक्यात नव्हते आले.
व्हेज पण मिळतात इकडे, त्यात फक्त कोबी, गाजर, कांदा पात, लसूण असे सारण असते.
फणसाची भाजी बारक्या फोडी
फणसाची भाजी बारक्या फोडी करून करून अन मश्रुम फ्राय करून घाला.