माबो वावर

Submitted by रघू आचार्य on 11 June, 2024 - 19:18

नियम :
१. अवांतराला बंदी नाही. '
२. अधून मधून धाग्याच्या विषयावर लिहील्यास आक्षेप नाही.

तुमचा मायबोलीवरचा वावर कसा आहे ?
म्हणजे ऑफीसमधून मायबोलीवर येता कि घरी गेल्यावर ? किती वेळ मायबोली साठी देता ? याबद्दल लिहा.
प्रतिसाद देताना कोणते ब्राऊजर वापरता ? एका जागी बसून किती वेळा लिहीता ? कोणत्या धाग्यावर जास्त रमता ? कोणते विषय टाळता ?

हवे तसे लिहा.
उदा.
मी कामाच्या ठिकाणी खूप कमी मायबोलीवर असतो. मायबोली बॅन केलेले आहे. मोबाईल वरून वापरता येते. पण मोबाईल वरून मराठी टंकन करणे जिवावर येते. त्यामुळे या वेळात जर माबोवर आलो तर आयते हातात आलेले व्यंगचित्र, फॉर्वर्ड इतकेच शेअर करण्याकडे कल असतो. रेंज नियमित नसल्याने जर मोबाईलवरून धागे उघडले तर लोड व्हायला वेळ लागतो. त्यामुळे बरेचसे प्रतिसाद त्या वेळी दिसत नाहीत. पण मोबाईलवरून उघडल्याने घरी गेल्यावर वाय फाय वर मायबोली चालवल्यावरही नवीन प्रतिसाद म्हणुन ते न उघडलेले प्रतिसाद दिसत नाहीत.

ज्या धाग्यावर वेळ खाऊ प्रश्नोत्तरे होतील असे धागे शक्यतो घरी निवांत वेळेत उघडलेले बरे असते. कामात असताना जर असा धागा उघडला आणि ट्रोलिंग सुरू झाले तर कुठून या वेळेला या धाग्यावर आलो असे वाटते. शक्यतो , जिथे वादविवाद होत नाहीत, स्पष्टीकरणे द्यायची गरज पडत नाहीत अशाच धाग्यांवर टीपी करायला आवडतो.

संध्याकाळी चहा घेताना थोडा वेळ घेत मायबोली बघून होते. नंतर पुन्हा चालायला गेल्यावर मोबाईलवरच बघणे होते. पण इथे रेंज असते. अधून मधून थांबत , कुत्र्याला आवरत प्रतिसाद टाईपायची सर्कस करताना खूप चुका होतात. त्या लक्षात ठेवून घरी आल्यावर दुरूस्त केल्या तर होतात नाहीतर तशाच राहतात. निर्दोष टायपिंग कुत्र्याच्या ( फिमेल आहे) सहकार्यावर अवलंबून असते. टाईप करायला दोन तीन मिनिटे लागली कि ती ढुशा देते.

पहाटे एसीची थंडी वाजली कि झोपमोड होऊन मग पुन्हा मायबोलीवर येणे होते.

तुमचा मायबोलीचा वावर कसा आहे ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आचार्य तुमचा वावर आवडला. मोबाईल कायम झोळीत ठेवता का?
-------
आमचा वावर - रोज असतो अधूनमधून. जिओकृपेने कुठेही मायबोली आणि इतर साईट्स उघडतात फटाफट. मोबाईलवरूनच लिहितो देवनागरीत. म्हणजे मायबोलीवर तरी देवनागरीतच लिहावे.

मोबाईल वरूनच येते इथे. app नाही browser वापरते.
कधीही येते जेव्हा आठवलं तेव्हा.
सकाळी वाड्यावर चहा द्यायला compulsory येणं होतं. मग दिवसभरात कधी रोमात तर कधी येणंच होत नाही.
हल्ली छान हॉरर कथा येणं बंद झालंय. कादंबरी सुद्धा लिहीत नाही कुणी.
माझी लेखकांना विनंती आहे की लिहा please.

Srd, धन्यवाद.
रमड Lol

झोळी नसते रोज. हातातच घेऊन फिरायला जातो.
स्लिंग बॅग अडकवून चालायला गेलं कि लोक विचित्र नजरेने पाहतात. Lol
मी राहतो तिथे रेंजचा प्रॉब्लेम नाही.

किल्ली +1

मोबाईल वरूनच येते इथे. app नाही browser वापरते.
कधीही येते जेव्हा आठवलं तेव्हा. पण मोस्टली टी ब्रेक/ लंच ब्रेक्/ रात्री - कधीही आले तरी हल्ली वाचनमात्र मोड असतो.

भुभु वाला धागा, चिकवा वर धावती नजर टाकलीच जाते पण लिहायचं आवरते स्पेशली भुभु धाग्यावर. नाहीतर घरच्या पेट बद्दल लिहीताना भान सुटणार आणि भस्म्या लागल्यासारखं लिहावे वाटणार मला म्हणून आवरते. इतर पेट्स बद्दल वाचताना बर्‍याच वेळा "अगदी अगदी" होते आणि रिलेट केले जाते.

फोटो टाकणे प्रकार बाकीच्या सोमीच्या मानाने इथे क्लिष्ट वाटतो म्हणून पण पेट धाग्यावर लिहायला उतरत नाही Lol

बाकी पहिल्या पानावर काही दिसले आणि थांबून वाचावे वाटले तर चक्कर मारते तिथे जस आत्ता इथे मारली Wink

Happy मायबोली मला अतिशय प्रिय आहे! मी केव्हाही इथे येते.

ऑफीस मधे जास्त काम झालं की, काही काम नसलं की , टेंशन आलं की, आनंद झाला की......एखादी रेसिपी पहायला, एखाद्या पुस्तकाचे नाव आठवायला...कधीही!
इथले अभ्यासपूर्ण, विनोदी, चिंतनात्मक, साहित्य विषयक, आरोग्यविषयक अणि लालित्यपूर्ण ...सगळेच धागे; ठेवा आहेत माझ्यासाठी.
ते वाचून खूप छान वाटते. स्वतःचीच थोडी लेव्हल उंचावल्यासारखे.
खूप जण मित्र मैत्रिणी असल्या सारखे वाटतात, प्रत्यक्ष कधी भेटलो नसलो तरीही. कारण सूर जुळल्या सारखे वाटते.

छान धागा. असे धागे आवडतात मला.

हा एक आयडी लिहायला वापरतो.
अजून एक आयडी फोटो अपलोड करायला वापरतो.

हल्ली लिहितो कमी आणि फोटो जास्त अपलोड करतो.
मायबोलीचे ॲप वापरतो पण फोटो ब्राउझर वरून अपलोड करतो.

टायपिंग हल्ली बोलून करतो. बोटे वापरायला कंटाळा येतो.

एका वैयक्तिक कारणामुळे, जे मायबोलीशी सुद्धा संबंधित आहे, गेले वर्षभर नवीन धागे काढणे जवळपास थांबवले आहे.
प्रतिसाद सुद्धा हल्ली मोजकेच देतो. त्यातले 80 टक्के क्रिकेटवरच देतो.

फेसबुकवर जसे मी फोटो अपलोड आणि मुलांचे कौतुकाच्या पोस्ट इतकेसाठीच जातो, जवळपास तसेच हल्ली मायबोलीवर सुद्धा करतो.
कारण मायबोली हे घरासारखे आणि मायबोलीकर कुटुंबीयांसारखे आहेत.

इतर वादविवाद चर्चांचा जो माझ्यात किडा आहे तो हल्ली शाळेतले मित्र आणि ऑर्कुट काळापासून असलेले नेट फ्रेंड्स यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर वळवळत ठेवतो.

वाचनाची तशी कमीच आवड होती. त्यामुळे मायबोलीवाचन बंद झाले याने फार फरक पडला नाही.

दोन्ही मुले सध्या अशा वयात आली आहेत की त्यांच्या सोबत वेळ जास्त जातो. मुले आणि मायबोली दोघेही बुढापे का सहारा आहेत. त्यामुळे दोघांनाही अखेरपर्यंत पकडून ठेवणे गरजेचे आहे Happy

आयुष्य कधीच एकसारखे नसते.
त्यामुळे आयुष्याची प्रत्येक फेज भरभरून एन्जॉय करावी. त्या त्या क्षणात जागून घ्यावे ते पुन्हा फिरून येतील याची खात्री नसते..

हे लेटेस्ट अपडेट म्हणून लिहिले. माझा स्वतःचा धागा नसल्याने थोडक्यात लिहिले. बाकी तुम्हाला माहित आहेच. माझे आयुष्य तसेही खुली किताब आहे Happy

मी साधारण २०११ पर्यंत मायबोलीवर पडिक होतो. तेंव्हा भारताबाहेरचे लोक मायबोलीवर जास्त होते अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. कुठेहि शिव्यागाळी, भांडणे नसत. अगदी भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका सगळीकडचे लोक मला ओळखत.
भारतातील लोक आल्यापासून इथे भांडणे, शिव्यागाळी, विषयाला सोडून लिहिणे इ. प्रकार इतके वाढले की की मी मायबोली सोडूनच दिली.
नंतर पुन्हा माझे काही मित्र, मैत्रिणी यांचेबरोबर एकत्र भेटणे झाले नि मी परत नविन आय डी घेऊन आलो.
मला कुणाशीहि वादविवाद घालायचा नाही. आयुष्यात महत्वाचे कायनाहे नि काय नाही हे पंच्याहत्तरी ओलांडल्यावर हळू हळू लक्षात येऊ लागले. मग सगळीकडे नुसता विनोदच दिसतो. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या चा अनुभव येऊ लागला.
आता केवळ मनोरंजन म्हणून मायबोली.

मी मोबाईल वरूनच येते. ॲप नाही. पूर्वी पिसी वरून यायचे तेव्हा ऑफिस च्याच पिसी वरून. घरी नव्हता. पण आता मोबाईल वर जास्त बरं पडतं. मलाही माबो अतिशय प्रिय आहे. घरचे चिडवतात कि आलं हिचं "मायबोली " पण मी टिपी वाड्यावरचं करते. बाकी वाचते प्रतिक्रिया देते . दिवसभरात तीनचार वेळा तरी डोकावते. हल्ली ऑफिस मध्ये काम जास्त असतं त्यामुळे इच्छा असूनही वावर कमी केलाय.
बाकी आचार्य धागा मस्त आहे. तुमचा वावर पण आवडला.
कवे लिहायचं मनावर घे
ऋ ची पोस्ट आवडली.

 की मी मायबोली सोडूनच दिली. >>> असे काही नसते! लोक रोमात राहून वाचतात. Proud
(आणि जुने लोक गोळा झालेले दिसले की येतात 'अचानक')

मायबोली आठवडा भर नाही पाहिली तर चुकल्या चुकल्या सारखं होतं.. अस्मिता, अनू, फारेंड ह्याच्या सारख्यांचे प्रतिसाद वाचायला यावेसे वाटते.
रहस्यकथा, चित्रपट, अ& आ धागा असे मनोरंजनात्मक धागे आवडतात. चित्रपटांची चिरफाड, लहान मुलांच्या गमती जमती, वेंधळेपणा असे धमाल धागे आधी होते..
साधारणपणे वीकडे ला लंच अवर किंवा चहा पाना च्या वेळी माबो उघडुन वाचते & रीप्लाय देते.
एखाद्या दिवशी रील्स जास्त पाहिल्या तर अपराधी वाटते, डोळ्यांसाठी. माबो चे तसे नाही Wink मोअर द मेरियर Lol

माबोचा समहाऊ कंटाळा आलेला आहे. सम डिस्कॉर्ड, डिसहार्मनी. नाही यावसं वाटत . अमेरीकेच्या, सकाळी वाड्यावर तेवढे जरा बरे वाटते.

वीस वर्षे पार केलेली ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वे उगवलीत रे मुलांनो. वावर त्यांच्याकडून शिका. Proud

ते दुसरं नुसतं म्हणायलाच ऋषीतुल्य आहे. शिव्या, आता ओशट-शिळं झालेलं कुजकं बोलणं, देश-धर्म-जातींवरून डिस्क्रिमिनेशन- असे उद्यग करण्यात आयुष्य घालवलं.

आणि हो, "मायबोली सोडूनच दिली" हे (नेहेमीप्रमाणेच) खोटं आहे. यांना आक्षेपार्ह लिहिल्याबद्दल घालवलंय इथून. त्यामुळे यांच्या वावरामधून काही घेऊ नका नि शिकू नका.

HH , अचानक काही लिहावं पण. आम्हा जुन्याना 'अशी होती रे आमच्या वेळची मायबोली' असे कढ काढायला चान्स मिळेल की

MBVaVi2024JIF.gif

वर्षाविहार धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/85290

मायबोली वर्षाविहार २०२४ नावनोंदणीचा गुगल फॉर्म - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...

मायबोली वर्षाविहार २०२४ चे शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे