Submitted by राहुल बावणकुळे on 10 April, 2017 - 23:36
सध्या मी मुंबईमध्ये PhD करत असून एकटाच राहतो आणि दररोज स्वयंपाक करून institute ला डबा घेवून जातो. मुंबईत आल्यापासून तेल लावलेल्या पोळ्या/चपाती खायची सवय पडलेली. नागपूरकडे अशी पद्धत नाही. त्यामुळे पोळी/चपाती साठी कणीक भिजवताना आधी तेल की पाणी टाकू असा सदैव प्रश्न पडतो? तसेच कणीक मळून झाल्यावर पोळी/चपाती करण्यापूर्वी साधारण किती वेळ झाकून ठेवावी?
कृपया कणीक भिजवताना दूध किंवा तत्सम काही टाकण्याचा अनाहूत सल्ला देऊ नका.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण मिक्सिंग बोलमध्येच.
मी पण मिक्सिंग बोलमध्येच. कणकेपुरता फूड प्रोसेसर काढवत नाही बाहेर आणि डो मिक्सरमध्ये वगैरेही पैसे घालवत नाहीत.
दही आणि साखर खालून कणिक मऊ
दही आणि साखर खालून कणिक मऊ होते? हे नवीन आहे.. करून बघते next batch ला
हात खराब न करता कणिक अशीही
हात खराब न करता कणिक अशीही मिक्स करता येईल....मी रोज नाही वापरत पण nail extensions नंतर वापरते
https://m.youtube.com/watch?si=swDnTxTydJBruemx&v=gGgPy4WDypQ&feature=yo...
बाँग ईट्स वर त्यांनी कणीक गरम
बाँग ईट्स वर त्यांनी कणीक गरम पाण्यानी भिजवायला सांगीतली आहे. ग्लूटन जास्त सुटतं म्हणून.
आम्हाला सगळ्यांना चपात्या
आम्हाला सगळ्यांना चपात्या जास्त आवडतात त्यामुळे आई हा भला थोरला गोळा मळायची.
तिची ट्रिक होती की, आदल्या दिवशीच्या दुधाच्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं. त्याने राहिलेला सायीचा मऊपणा उतरतो.
पीठात खड्डा करून ते पाणी ओतायचं आणि चमच्याने हलवून लगेच झाकून ठेवायचं. ५ - १० सेकंदात.
मग ५ - १० मि.नी कणीक मळायची. लवकर आणि मऊ मळली जाते.
इथे पाहुणे असले आणि जास्त चपात्या करायच्या असल्या की मी असे करते.
दह्यानेपण मऊ होतात पण दही जास्त झालं की एक हलका ओशट वास येतो. दही शक्यतो पराठ्यात घालते. अजून मसाले असल्याने वास येत नाही.
एखाद्या खोलगट भांड्यात पिठ
एखाद्या खोलगट भांड्यात पिठ घालून त्यात मोजकं पाणि घालून ते दोन्ही मिक्स करून ठेवून दिलं तरि ५-७ मिनिटांनी कणिक पटकन मळून होते.
च्यायला, इथल्या लोकांना
च्यायला, इथल्या लोकांना साध्या चटण्या करता येत नाहीत, आयत्या कुठे मिळतील विचारतत्त.
कणिक भिजवून पोळ्या यांच्या सासूबाईंना तरी जमते का?
वर chioo यांचं वाचून, माझी आई
वर chioo यांचं वाचून, माझी आई आदल्या दिवशीच्या दुधाच्या पातेलीत कणिक भिजवायची ते आठवलं. थोडं दूध उरलेले असायचे आणि साय आजूबाजूला लागलेली असायची. बाकी वरची साय ती विरजायची.
अंजू & चिउ सेम माझी आई पण असे
अंजू & चिउ सेम माझी आई पण असे कणिक भिजवते..दुधाच्या भांड्यात.
अंजू & चिउ, आशू२९ सेम माझी आई
अंजू & चिउ, आशू२९ सेम माझी आई पण असे कणिक भिजवते..दुधाच्या भांड्यात.
आणि सासूबाई पण ..!
माझी असं पण करते कि पाणी घालून भिजवत ठेवते ५ min आणि मग भिजवते.
Pages