मध्यम आकाराची दोन कवठं (कौठं), अर्धा कप दूध, साधारण दोन ते अडीच वाट्या नारळाचा चव, साधारण दोन ते अडीच वाट्या साखर, पाव वाटी पिठीसाखर.
कवठांचा गर काढुन घ्यावा. त्यात अर्धा कप दूध मिसळुन घ्यावे. त्यातल्या बिया मोडल्या जातील पण अगदी वस्त्रगाळ होणार नाही अशा बेताने मिक्सरमधे वाटून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणाच्या समप्रमाणात प्रत्येकी नारळाचा चव आणि साखर घ्यावे. हे सर्व एकत्र करुन कढईत मध्यम आचेवर ठेवावे. एकसारखे हलवत अटवावे. शेवटी शेवटी अगदी मंद आचेवर ठेवावे नाहीतर जळते. चांगला घट्ट गोळा तयार झाला की तुपाचा हात लावलेल्या ताटात/ट्रेमधे वड्या थापाव्यात. वरुन शोभेसाठी पिठीसाखर भुरभुरावी.
१. कधी कधी कवठात अजिबातच गर निघत नाही. तसे झाल्यास तीन कवठं घ्यावीत. नाहीतर अगदीच थोड्या वड्या होतात.
२. कप म्हणजे भारतात मिळणारा चहाचा कप. भारताबाहेर कवठं मिळतात की नाही शंकाच आहे त्यामुळे हेच माप दिले आहे
३. प्रमाणापेक्षा जास्त अटल्यास खलबत्ता तयार ठेवावा पण फेकुन देऊ नये. खूप मस्त खमंग हार्ड कँडीज तयार होतात
मलापण खुप आवडते कवठाची चटणी.
मलापण खुप आवडते कवठाची चटणी. थोडेसे तिखट, मीठ आणि भरपुर गुळ घातलेली.
ईथे मुंबईत मलातरी कुठे कवठ दिसतच नाही. आमच्या घरच्यांना सुध्हा हा प्रकार माहित नव्हता, पण मी पुण्याला शिवरात्रीच्या दिवसात गेले की घेऊन येते. चटणी केली की सासुबाई थोडीशी खातात पण बा़की सगळी माझ्या एकटीच्या वाटणीला येते.
उद्याच चालले आहे पुण्याला, येताना मिळाली तर कवठ घेउन येणार आणि अशा वड्या नक्की करुन बघणार.
डोंबिवलीत कवठ मिळतात.
डोंबिवलीत कवठ मिळतात. स्टेशनजवळ भाजी विकणारे हातगाडे असतात. त्यात काहीजण कवठ, चिंच, करमर, लहान बोरे.. असल्या आंबट्चिंबट वस्तु विकत असतात. तिथे मिळतात. मुंबईतपण मिळतील.
Pages