पुण्यात घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची उत्तम दुकाने

Submitted by हर्ट on 2 July, 2013 - 00:17

नमस्कार, मला माझ्या नवीन घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची खरेदी करायची आहे. साधारणः

१) सोफा सेट
२) टी पॉय
३) डायनिंग टेबल
४) सिंगल्/डबल बेड आणि त्यावरच्या गाद्या.
५) कपडे ठेवायला कपाट
६) पुस्तक ठेवायला कपाट
७) लॅपटॉप ठेवायला टेबल आणि खुर्ची
८) चप्पल बुट ठेवायचे रॅक
९) किचनमधले कपाट

हे सर्व नीट कुठे मिळेल अथवा चांगल आणि लवकर करुन कोण देईल?

साधस पण छानस लाकडी फर्निचर हव आहे.

एक विचारायच आहे की डायनिंग टेबल काचेचा बरा की पुर्णतः लाकडी बरा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाद्या अन इतर फर्निचर हे आपल्या राहात्या भागातून घेतलेलं बरं असं माझं मत. कारण, ट्रन्स्पोर्ट अन बाकी बाबतीत काय फारसा फरक पडत नसावा. दुसरं हे की समजा काही तूटफूट झाली तर जवळचा माणूस चांगली आणि लवकर सर्वीस देऊ शकेल.

थँक्स अनुश्री अन योकु

मी सुद्धा जवळच्या गादी वाल्याकडून बनवून घेतल्या आहेत पण ही मला मम्मी साठी हवी आहे तिला मान अन कंबरेत गॅप आहे म्हणून हल्ली अश्या दुखण्यावर खास आर्थो गाद्या मिळतात. ऑनलाईन काही सापडल्यात पण कोणती घ्यावी कळेना म्हणून इकडे विचारले

Pages