Submitted by दिव्या१७ on 13 May, 2024 - 07:32
कामवाली ने वैताग आणलाय कधीही न सांगता सुट्टी, टाइम न पाळणे, खूप उशिरा येणे. पण घरातली सगळी काम नाही होत ऑफिस असते, घरी आले कि घरातली काम, मुलांचा अभ्यास सगळी काम स्वतः करायला वेळ आणी शक्ती अपुरी पडते.
ऍमेझॉन वर आज रोबोट Vaccum अँड Mop बघितला पण खूप Model आणी companies आहेत. कुणाकडे रोबोट vaccum अँड mop आहे का? असेल तर कुठल्या कंपनी चा आहे किंवा घ्यावा. माहिती मिळाली तर खूप मदत होईल.
Review बघून Ilife किंवा Dreame चांगले वाटत आहेत.
ILIFE A20 Robotic Vacuum Cleaner
dreame D9 Max Robotic Vacuum Cleaner and Mop
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यावर इथे एक चर्चेचा धागा आहे
यावर इथे एक चर्चेचा धागा आहे.शोधते.
आमच्याकडे इकोव्हॅक डीबॉट आहे.अनुभवातून आलेले काही मुद्दे:
1. रोजचे हात फिरते झाडलेले घर असेल तर रोबो जास्त चकाचक सफाई करतो.जिथे हात जात नाहीत अश्या जागी, सोफ्याखाली चांगली सफाई करतो.
2. गोल असल्याने अगदी कोपऱ्यातले 1 इंच राहू शकते. ते राहू नये म्हणून त्याला मांजरीच्या मिश्यांसारखे झाडू असतात.पण तरीही किंचित एरिया राहू शकतो.
3. चेंबर लहान असल्याने पटकन भरते.त्यामुळे बरेच महिने बंद, धुळीने भरलेले घर साफ करायचे असेल तर रोबो आधी हाताने स्वच्छ झाडून घेतलेले बरे.आणि चेंबर स्वच्छ करत राहावे लागते पूर्ण भरले का बघून.
4. बाथरूममध्ये जातो,1 इंच पर्यंत असलेला उंबरा चढून.त्यामुळे बाथरूम आणि घराचे बाहेर जाणारे दार बंद करावे लागते.
5. फायदा हा की आपण काहीतरी वेगळे काम करत असताना लावून देता येतो.चार्जर लावून ऑन करून ठेवल्यास स्वतः चार्जर वर चढून चार्जिंग चालू करतो.
6. घरात लहान मुलं, इकडे तिकडे वस्तू असल्यास क्लिनिंग नीट होत नाही.पडणाऱ्या उभ्या वस्तू असल्यास सरकवून ठेवाव्या लागतात(रोबो ने उभ्या तिरक्या शिडी ला धक्का मारल्याने ती समोरच्या भिंतीवर पडून पेंट चिप झाला, आरसा फुटला असे होऊ शकते(झाले आहे पेंट चे)
5. हा रोबो असणे हे एखादे गुणदर्शक लहान मूल घरात असण्यासारखे आहे.मूल वेगवेगळ्या लीला करून दाखवते त्यामुळं कौतुक वाटतेच,पण लक्ष ठेवावे लागते.
हे पूर्वीचे धागे, यावर खूप माहिती आहे
https://www.maayboli.com/node/81055
https://www.maayboli.com/node/39354?page=1
https://www.maayboli.com/node/76732
आमच्याकडे एमआयचा रोबो आहे.
आमच्याकडे एमआयचा रोबो आहे. तुम्ही सांगितलेत तेच मेडचे प्रॉब्लेम होते, ज्येना एकटे राहत होते आणि वयोमानामुळे फारशी सफाई करू शकत नव्हते त्यावेळी घेतला.
१. धूळ चांगली साफ होते. पण केस वगैरे पडलेले असले तर रोबोच्या मिश्यात, रोलरमध्ये अडकतात. खूपच अडकले तर रोलर नीट फिरत नाही मग कात्री घेऊन ते केस कापावे लागतात.
२. घरात खाली पडलेले कागदाचे कपटे वगैरे व्हॅक्यूम होतात. पण लेगो ब्रिक्स, क्रेयॉन्स वगैरे वस्तूमुळे फिल्टर ब्लॉक होऊ शकतो. अशा वस्तू टाकणारी माणसे घरात असल्यास हे प्रकार रोबो-रनपूर्वी उचलणे किंवा त्यांना उचलायला लावणे यात आपली मानसिक शक्ती खर्च होऊ शकते. पण त्यांच्यावरच रोबो नीट चालतो की नाही हे बघण्याची जबाबदारी टाकल्यास हे साध्य होऊ शकते.
३. अश्या माणसांनी चित्रकला, क्राफ्ट इत्यादी करताना जमिनीवर पडलेले डाग रोबो घालवू शकत नाही. अशा वेळी 'हाथ बदलेगा हालात'च करावे लागते.
४. मऊ पायपुसणी, जमिनीपर्यंत लोळणारे पडदे वगैरे रोलरमध्ये अडकू शकतात. त्यामुळे ती आधीच बाजूला काढणे हे जास्तीचे काम होते.
५. घरात घालायच्या स्लिपरवर वगैरे रोबो चढून बसतो व उतरू शकत नाही अशावेळी आपण इंटरवेन करावे लागते.
६. अनु म्हणाल्या तसे हलक्या वस्तू धक्का लागून पडू शकतात.
७. खुर्च्या टेबलं खूपच इकडे तिकडे झाली असतील तर त्याचा मॅप गंडतो. मग पुन्हा रिसेट करावा लागतो.
८. आमचा रोबो वेट वाईप करतो त्यामुळे दररोज त्याच्या मिनी टॅंकमध्ये पाणी भरावे लागते कारण कपॅसिटी फार कमी आहे. त्याचा कापडी खरखरीत मॉप ३-४ दिवसामागे काढून धुतला तर जास्त फायदा होतो.
या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीला रोबो वापरण्याचा वैताग येऊ शकतो. पण घरातल्या सगळ्यांना शिस्त लागली की आपला वेळ आणि मनस्ताप वाचतो.
आम्ही प्रत्येक खोलीनंतर मॉप
आम्ही प्रत्येक खोलीनंतर,किंवा 2 खोल्या झाल्यानंतर मॉप धुतो(मदतनीस मावशींची सुट्टी 2 दिवस किंवा पुढे झाल्यास दर दिवसाआड लावतो, आणि घरात बरीच धूळ येते.)
केस बरेच अडकतात.मग रोबो ची सफाई करावी लागते.
पण सवय झाली की रोबो ने स्वच्छ पुसलेले स्वतः बसून बघताना मजा येते
मला 'तुम्ही' म्हटले नाही तरी चालेल.माझे मानसिक वय कमी आहे
थँक्स mi_anu, MazeMan खूप
थँक्स mi_anu, MazeMan खूप चांगल्या टिप्स दिल्याबद्दल. एमआय आणी इकोव्हॅक चे मॉडेल्स हि बघते.
आमचा रोबो वेट वाईप करतो त्यामुळे दररोज त्याच्या मिनी टॅंकमध्ये पाणी भरावे लागते कारण कपॅसिटी फार कमी आहे>>>> किती कॅपॅसिटी आहे?
तुम्ही कधी पासून वापरत आहात रोबो व्याकुम? आफ्टर सेल्स सर्विस कशी आहे?
मुले मोठी आहेत म्हणून लेगोस, क्राफ्ट आणी जास्त कचरा नसतो, आणी मी बघितलेल्या दोघी मॉडेल्स मध्ये इन्व्हिसिबल वॉल किंवा नो टच झोन आहे.
आम्ही 3 वर्षं वापरतोय.आफ्टर
आम्ही 3 वर्षं वापरतोय.आफ्टर सेल्स सर्व्हिस आता सुधारली आहे असं ऐकून आहे.अजून (टचवुड) वेळ आली नाही.
आपण बदलण्यासारखे स्पेअर्स असले तर अमेझॉन वर मिळतात.
मिनी टॅंक मध्ये एकदा भरलेले पाणी पूर्ण घराच्या 1 वेळच्या पोछा ला पुरते.कपॅसिटी पाहिली नाही पण बहुतेक अर्धा पाऊण लिटर असेल.अर्धा मग पाण्याइतकी. मोठा मग.लगेच रोज वापरणार नसल्यास पाणी पूर्ण रिकामे करून टॅंक उपडा ठेवावा.आम्ही एकदा 2 आठवडे टॅंक रिकामा करायला विसरलो होतो.नंतर बाटली स्वच्छ करायचा ब्रश, बार्बेक्यू स्कीवर्स ना फडके बांधून आतले शेवाळे साफ करावे लागले.
डायनिंग टेबल च्या खुर्च्या बरोबर रोबो च्या व्यासाच्या मापाच्या आहेत.त्यामुळे कधीकधी खुर्चीत अडकून 'प्लिज हेल्प मी आउट' म्हणतो.सर्व खुर्च्या शक्यतो वेगळ्या खोलीत ठेवून देतो.आणि दार बंद करून खोली दर खोली काम करतो.तसं नाही केलं तरी चालतं अर्थात.
माझा सूर 'फार नखरे आहेत' वाला झालाय खरा.पण तरी तो आणि त्याचं काम आवडतं.
मिनी टॅंक मध्ये एकदा भरलेले
मिनी टॅंक मध्ये एकदा भरलेले पाणी पूर्ण घराच्या 1 वेळच्या पोछा ला पुरते, आफ्टर सेल्स सर्व्हिस घ्यायची वेळ आली नाही अजून >>> सेम हिअर. एक-दीड फुलपात्र असावी कपॅसिटी. वीज नाही तरी पाणी वाचवतोच. तरी मॅन्यूअल शोधून सांगेन.
.
एमआय आणी इकोव्हॅक बघितले बाकी
एमआय आणी इकोव्हॅक बघितले बाकी ही companies बघितल्या recent reviews मध्ये aftersale problems आणी २-४ महिन्यात बंद पडणे वैगेरे reviews बघून थोडे confusion होत आहे प्रॉडक्ट फायनल करताना. ऍमेझॉन आणी फ्लिपकार्ट वर फक्त रिप्लेसमेंट option आहे रिटर्न नाही.
थँक्स mi_anu, MazeMan वेळ काढून रिप्लाय केल्याबद्दल.
माझा सूर 'फार नखरे आहेत' वाला झालाय खरा.पण तरी तो आणि त्याचं काम आवडतं.>>>>>>>> माझ्या कामवाली पेक्षा कमीच नखरे आहेत, दर ४ दिवसांनी तो आजारी तरी पडत नाही.
प्रॉडक्ट्स १०००० पासून १ लाख पर्यंत आहेत सेल्फ empty, सेल्फ cleaning आणी बरंच काही.
विचार करताना असे वाटते की एकदा प्रॉडक्ट घेताना जास्त सुविधा बघून घ्यावा, पण reviews वाचल्यावर प्रॉडक्ट लाईफ जास्तित जास्त २ वर्ष असेल जास्त चालला तर आपले लक, पण जर reviews प्रमाणे १ वर्षात बंद पडला तर? आणी सतत बदलती technology मुळे आज ३०-४० हजार चा एक रोबो घेण्या ऐवजी १०-२० हजार पर्यंत बेसिक मॉडेल घ्यावे आणी २ वर्षा नंतर परत नवीन टेकनॉलॉजि असलेला घ्यावा असा विचार चालू आहे. रिअली व्हेरी much confused
10-20 हजार वाला अप्रोच बरोबर
10-20 हजार वाला अप्रोच बरोबर आहे.किमान 5 वर्षं चालला तर पैसे वसूल.
सध्या 12 ते 19 हजार च्या रेंज मध्ये चांगल्या पॉवर चे क्लिनर्स अमेझॉन वर मिळत आहेत.ज्याचे चांगले रिव्ह्यू जास्त संख्येत आहेत तो बघून घ्या(आणि 1 स्टार, 2 स्टार रिव्ह्यू का 1 स्टार, 2 स्टार आहेत तेही वाचा.कदाचित त्या 1 स्टार देणाऱ्यासाठी डील ब्रेकर असलेली गोष्ट तुमच्या साठी 'चालेल हे' असेल.
(कितीही मोह झाला तरी कमी हॉर्स पॉवर वाले मॉडेल घेऊ नका, आणि हायर चे प्रॉडक्ट घेऊ नका.एम आय किंवा इकोव्हॅक बघा.युरेका फॉर्ब्स व्हॅक्युम क्लिनर च्या धंद्यात भारतात सर्वांच्या आधी आले असले तरी त्यांच्या कस्टमर सर्व्हिस आणि मॉडेल्स बद्दल जरा शंका आहे.त्यांचे साधे व्हॅक्युम क्लिनर आम्हाला लाभले नाहीयेत.वेट अँड ड्राय चांगला चालू आहे.त्यांचा रुंबा कोणाकडे असेल तर रिव्ह्यू विचारा.)
खूप सारे प्रॉडक्ट्स बघितले
खूप सारे प्रॉडक्ट्स बघितले आणी खालील कंपॅरिसन चार्ट बनवला इथे टाकते आहे कोणाला रोबो vaccum घ्यायचा असेल तर कामात येईल. मी पहिले ३ (ECOVACS Deebot N10, ECOVACS Deebot OZMO T8, ILIFE A80 Pro) चे youtube reviews बघून यातला एक फायनल करेन, Ecovac च्या दोघी मॉडेल्स ला auto empty station आणी vibrating mop नंतर ऍड करता येते म्हणून Ecovac ला प्रेफरेन्स आहे.
चायनिज कंपनी आहे म्हणून मी
चायनिज कंपनी आहे म्हणून मी इकोवास कॅन्सल केला.
आय्लाइफ ए २० चांगला आहे. (२६ के) एक वर्श चालला तरी बाईचे पैसे वसूल होतील म्हणून घेतलाय.
धन्यवाद दिव्या, आमच्या
धन्यवाद दिव्या, आमच्या नातेवाईकांना घ्यायचा आहे, त्यांना शेअर केला तर चालेल का?
mi_anu हो जरूर.
mi_anu हो जरूर.
मेधावि -- कधी घेतला तुम्ही?, मॉपिंग चांगले होते का? aftersales सर्विस कशी आहे? तुमचा अनुभव कसा आहे?
बर्याच reviews नेगेटिव्ह कंमेंट्स आहेत ऍमेझॉन वर २-३ महिन्यात प्रॉडक्ट प्रॉब्लेम देतो म्हणून , काही खाली दिले आहेत >>
Within 4-5 days of usage the product started giving issues. Battery issue, noise issue and mop issues
ILIFE I20 HAS BEEN GIVING ISSUES SINCE DAY ONE AND AFTER ONE MONTH I SENT THE MACHINE BACK FOR REPAIR AND THEY RETURN IT AFTER LOTS OF FOLLOWS UPS
We have used it for only a week or so, but all of a sudden a few days ago, it has gone off and won't come on.
the product stopped working after three months of purchase
एप्रिल मधेच घेतलाय.
एप्रिल मधेच घेतलाय.
चांगला आहे अजून तरी. पोछा फार उत्तम नाही होत पण ठिक आहे.
आ. से. सर्वीस चांगली आहे. पुण्यात तरी.
अजून घेतला नसेल तर milagrow
अजून घेतला नसेल तर milagrow चां पण विचार करा
गेले 3 वर्षे रोज वापरत आहोत, काहीही तक्रार नाही
काही शंका असतील तर त्यांची customer service टीम तातडीने उत्तरे देते
आता battery कमी वेळ चालते आहे , त्यामुळे buyback मध्ये त्यांचेच पुढचे मॉडेल घेणार आहे
थँक्स मेधावी, सामान्य वाचक
थँक्स मेधावी, सामान्य वाचक
अजून घेतला नसेल तर milagrow चां पण विचार करा >>> तुमचा मॉडेल कोणता आहे? मॉपिंग कसे करतो?
मला कामवालीला रिप्लेस करेल असा vaccum + Mop हवा आहे. सगळ्या रोबो मध्ये vaccum छान आहे पण मॉपिंग मध्ये प्रॉब्लेम आहे.
मी Milagrow मॉडेल्स बघितले पण youtube वर सगळे sponsored reviews आहेत आणी ऍमेझॉन वर हि खूप कमी review आहेत त्यात बरेच नेगेटिव्ह ही आहेत, म्हणून consider नाही केला.