"तू हां कर......या ना कर.....तू है मेरी किरन....." प्रत्येक किरण, अंकिता, निकिता, मनाली, रुपाली, दीपाली, राखी, पाखी प्रत्येक अब्दुलला हवीच. तू हो म्हण किंवा नाही म्हण, तू माझीच. "डर" चित्रपटात सायकिक राहुल मेहरा, किरणचा नवरा, सुनील मल्होत्रा, जो भारतीय नौदलाचा अधिकारी आहे, त्याला ठार मारतो. या चित्रपटाचा नायक भारतीय लष्कराचा देशभक्त अधिकारी नाही , तर एक मनोरुग्ण, तोतरा, स्वतःशी बोलणारा , सायको किलर नायक आहे. काय संदेश देतोय हा सिनेमा? भारतीय सैनिकांपेक्षा, मनोरुग्ण,तोतरे, स्वतःशीच बोलणारे , सायको किलर्स जास्त प्रेमळ आणि चांगले असतात. बेटर अँड हॉटर लव्हर्स. इज इट ?
अंजाम' चा ऑब्सेसिव वन सायडेड लवर विजय अग्निहोत्री, एयरहोस्टेस शिवानीचा पती, तिची बहीण आणि मुलगी यांची हत्या करतो, शिवानीवर खोटे आरोप रचून तिला जेलला पाठवतो परंतु जेलमधून बाहेर आल्यावर शिवानी 'स्टॉकहोम सिंड्रोम' ची शिकार बनते आणि त्याच पॅरालाइज्ड विजयची सेवा करायला लागते. शेवटी त्याच्यासोबत स्वतःला संपवते.
बाजीगरमध्ये, अजय शर्मा सीमाला तिच्या वडिलांचा सूड घेण्यासाठी उंच इमारतीवरून फेकून देतो.त्यानंतर ही गोज ऑन अ किलिंग स्प्री. नातेवाइकांसकट डझनभर लोकांना जिवानिशी मारल्यावर आईच्या मांडीवर मरतो, प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायला.
बऱ्याच काळापासून अशी कंडिशनिंग चालू आहे, खलनायकच नायक होऊ घातलाय. मारधाड करणाऱ्या, दुसऱ्यांच्या बायकांवर नजर ठेवणाऱ्या, दबाव निर्माण करणाऱ्या, खल प्रवृत्ती असणाऱ्या माणसाचे गुणगान करून आम पब्लिकला मूर्ख बनवणाऱ्या नायकांचा. नायक नही, खलनायक हूँ मैं म्हणणारे बरेच नायक आहेत.ग्रे शेड्स असणाऱ्या कथेला ग्लॅमराइज करण्याची टेक्निक तर माशा अल्ला! 'ही इज 'किलर' मॅन, 'आई सो मच लाइक हिज 'वाइल्ड' साइड, 'आई लाइक हिज 'पजेसिवनेस', 'आई गो क्रेजी व्हेन ही शाऊट्स एट मी'.... “ही इज अल्फा मेल’असले डायलॉग्स दहावीच्या विद्यार्थिनींच्या तोंडून निघतात. सो कूल असं कॉम्प्लिमेंट तिला मिळतं तेंव्हां ती हवेत तरंगते. असले फिल्म्स, ,टीवी सीरियल्स आणि वेबसीरीज द्वारा कन्टीनुअसली मुलींच्या मेंदूत ही गोष्ट ठासून भरली गेली आहे की पाठलाग करणे, स्टॉकिंग, छेड काढणे, धमकावणे, मारहाण करणे हीच प्रेमाची विविध रूपे असतात. एकता कपूरच्या सीरिअल्स, स्त्रैण असणारा तिचा भाऊ आणि नाच्या असणारा त्यांचा बाप यांच्याबद्दल बोलणे म्हणजे गंदी बात करणे होय.
"पाकिस्तान की टीम जीतती है तो लगता है कि वालिद साहब की टीम जीत गई......" असे उद्गार काढणाऱ्या तोतऱ्याला बादशाहचा किताब देणाऱ्या हिंदूंची डोकी मुस्लिम सावकारांकडे गहाण ठेवली आहेत कि काय?अशा मूर्खांची वानवा आहे कुठे?आतंकवादाला फंडिंग चालले आहे काय आपले?
'इश्क और जंग में सब जायज है’ असली वाक्ये तर राष्ट्रगीताचा दर्जा दिल्यासारखी वापरली जात आहेत.
'नायक नहीं खलनायक हूं मैं' या गाण्याच्या माध्यमातून भारतीय समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला नायक बनवणारा आक्रमक हल्लेखोर पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर हार्मोनल चेंजेस मधून जाणाऱ्या मुलींना लैंगिकदृष्ट्या आकर्षित करतो. 'इतना गुस्सावाला है तो बेड में कितना हॉट होगा' ही कॉलेज कॅन्टीनमध्ये चालणारी चर्चा. अकरावी बारावीला असणाऱ्या मुलींना इतके 'हॉट' म्हणजे किती हॉट हे तेंव्हाच कळते जेंव्हा अंकिता सारखी निष्पाप, मुलगी ड्रगिस्ट व्यक्तीच्या एकतर्फी 'हॉटनेस' मध्ये जळून मरते.
हार्मोनल चेंजेस मधून जाणाऱ्या मुलींना आपला पाठलाग करणारी व्यक्ती “ स्वतःचा वेळ खर्ची घालून आपल्याला काहीतरी विशेष असा दर्जा देतेय अशी समजूत करुन घेतात आणि हळू हळू जाळ्यात फसायला लागतात. आणि एकदा त्या जाळ्यात सापडल्या की मागे वळणे कठीण होते. गॅरेजवाला, कार ड्रायव्हर, रिक्षावाला, धोबी, केबलवाला, शाळेची बस चालवणारा चालक यांच्या बरोबर मुली पळून कशा जातात हा संशोधनाचा विषय आहे. आई बाबांची बदनामी करुन जाणाऱ्या मुलींनी परतीचे दोर कापून टाकलेले असतात. त्यांची कितीही तीव्र इच्छा असली तरीही ते या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकत नाहीत.
पालकांनी याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना आणि मुलींना सांगायला हवे कि कोणालाही तुमच्यावर प्रेम करायला भाग पाडले जाऊ शकत नाही.या वयात प्रेमबीम असे काही नसते, केवळ शारीरिक आकर्षण असते आणि त्याला वेळीच आळा घालायचा असतो. पाठलाग करणारे, स्टॉकिंग करणारे, छेड काढणारे, रस्ता अडवणारे, मारहाण करणारे, किलर, वाईल्ड, पजेसिव, क्रेजी हे सगळे अल्फा मेल नसतात. खरेखुरे अल्फा मेल खऱ्या खुऱ्या शत्रूंसमोर सीना तानके उणे पंचवीस अंश सेल्सिअस तापमानात रात्रंदिवस सतर्क राहून देशाचे रक्षण करत असतात. संदीप उन्नीकृष्णन, विक्रम बत्रा, विवेक गुप्ता,अभिनंदन वर्थमान, मनोज पांडे, सौरभ कालिया, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, यांना तुमच्या मुलींचे आदर्श बनवा. प्रोटीन शेक पिऊन सिक्स पॅक दाखवणारे आणि जामनगरी लग्नात नाचणारे टेक रिटेकवाले भांड नकोत.
….
डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा
डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा लेख
अब्दुलच्या जागी प्रज्वल किंवा
अब्दुलच्या जागी प्रज्वल किंवा ब्रीजभूषण हे नाव जास्त शोभेल.
. . . . असे उद्गार काढणाऱ्या
. . . . असे उद्गार काढणाऱ्या तोतऱ्याला बादशाहचा किताब देणाऱ्या हिंदूंची डोकी मुस्लिम सावकारांकडे गहाण ठेवली आहेत कि काय?
>>> हेच शीर्षक हवे होते ... MASSIVE POTENTIAL आहे यात !
छान लेख आहे.
छान लेख आहे.
नेटफ्लिक्सवर शैतान बघा. माधवनच्या प्रेमात पडाल. (शिवाय हिंदूच आहे बहुतेक तो.)
एकता कपूरच्या सीरिअल्स,
एकता कपूरच्या सीरिअल्स, स्त्रैण असणारा तिचा भाऊ आणि नाच्या असणारा त्यांचा बाप यांच्याबद्दल बोलणे म्हणजे गंदी बात करणे होय## कपूरनी आपला धर्म बदलला की काय? ताई तुटून पडल्यात?
स्त्रैण म्हणजे काय ?
परी स्त्री मातेसमान समजणारा.
परी स्त्री मातेसमान समजणारा.
कपूरनी आपला धर्म बदलला की काय
कपूरनी आपला धर्म बदलला की काय? ताई तुटून पडल्यात?>>
आधी हेमंत सर दिसेल त्याच्यावर तुटून पडायचे. आता ह्या ताई आल्यात.
डर मध्ये सनी देओल जुही चावला
डर मध्ये सनी देओल जुही चावला शेवटी आनंदाने नांदू लागल्याचं आठवतं आहे .. व्हिलन मरतो , त्याला हिरोईन पूर्ण सिनेमाभर कोणताही प्रतिसाद देताना दाखवली नाहीये .. हॉलिवूड सिनेमांकडून कोणी चांगले संदेश बिंदेश द्यावेत अशी अपेक्षा करत नाही , चांगली स्टोरी खिळवून ठेवेल अशी दाखवली म्हणजे चांगला सिनेमा मानतो ..... अगदी खुन्याने हिरोला मारलं तरी दुष्ट प्रवृत्ती जिंकते असं सिनेमा दाखवू पाहतो आहे असं काही म्हणत नाही .... भारतीय सिनेमांकडून संदेशांची अपेक्षा कशाला ? त्यापेक्षा तरुण पिढीने सिनेमाकडे फक्त एक रंजक कथानक म्हणून बघावं , त्यातून इन्फ्लुएन्स होऊ नये यासाठी त्यांचं थोडं प्रबोधन करणं योग्य होईल ...
जी अक्कल युरोपातल्या 50 - 60 वर्षांपूर्वीच्या तरुण पिढीला होती ती भारताच्या आजच्या पिढीला नाही ? आणि नसेल तर येईल हळूहळू .. बरीचशी आली आहे ऑलरेडी .
डर मध्ये सनी देओल जुही चावला
डर मध्ये सनी देओल जुही चावला शेवटी आनंदाने नांदू लागल्याचं आठवतं आहे ..>> शोले सारखे डर चे पण दोन शेवट असावेत. ताईंनी दुसरी कॉपी पाहिली असेल.