अग आई बनुताई का गं आली नाई?
कित्ती शोधलं तरी मला दिस्ली कशी नाई?
बोलव न ग तिला जर थांब्ली असेल घरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी
तिनंच नं माझ्यासाठी हट्ट होता केला?
म्हणून तर बाप्पा मला "जा तू" म्हणाला
चल नं आई, जाऊया आत्त्त्त्ता आपल्या घरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी
बाप्पा म्हण्ला होता, ताई आहे पॉप्युलर
मावश्या, काक्या सगळे करतात प्रेम तिच्यावर
नक्की छान असणार ताई, जशी कुणी परी !
ताई माझी कशी? मला बघू दे तरी
मांडीवर तिच्या मला आहे लोळाय्चं
धुम्म मचाले गाणं तिचं आहे ऐकाय्चं
ऐकाय्चीये मला तिच्या ट्रीपमध्ली स्टोरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी
तिच्याकडे पक्षी म्हणे येतात जेवाय्ला
खानाव्ळीत तिच्या तुम्ही अस्ता कामाला
जोक्स तिचे एंजॉय करता म्हणे तुम्ही सारी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी
ताईबद्दल बोल्ताना बाप्पा नाई थक्ला
"आण्खि सांग्तो आण्खि सांग्तो" सारखं म्हणत र्हाय्ला
कामं जरी होती त्याची पेंडिंग कितीतरी.
अश्शी माझी ताई !! मला बघू दे तरी
किती गोड आणि योग्य तक्रार
किती गोड आणि योग्य तक्रार आहे. मुकुंदजी, पुन्हा परत आणा ना लाडक्या बनुताईंना.....प्लीज!
कर्णिक काका, अशा गोड गोड कवित
कर्णिक काका,
अशा गोड गोड कवित वाचुन बनुताई व बंटीचा लळा लागला हो. उमेश म्हणतात तसं, परत आणा बनुताईना.........
गोड. बनुताईंना म्हणाव
गोड. बनुताईंना म्हणाव मायबोलीवर एक चक्कर माराच.
खुपच गोड.. बनुताईसारखे
खुपच गोड.. बनुताईसारखे बंटीबाबापण
कित्ती गोड
कित्ती गोड
एकदम क्युट आहे
एकदम क्युट आहे
वा ! आता बनुताई बंटीला बघून
वा ! आता बनुताई बंटीला बघून काय म्हणते ते वाचायला आवडेल .
वा बनुताई बरोबर आता हा गोडुला
वा बनुताई बरोबर आता हा गोडुला बंटी बाबा..:) दोघ ही धमाल आणतील आता..आम्ही अजुन उत्सुक झालोय
वा !!! वा !!! वा !!!! कित्ती
वा !!! वा !!! वा !!!! कित्ती गोड आहे बंटीबाबा खरच आता बनुअताईला घेऊनच या
गोड
गोड
खुप छान !
खुप छान !
ग्रेट.. बनुताईंचा बंटी पण
ग्रेट.. बनुताईंचा बंटी पण अगदी ताईच्या पावलावर पाउल ठेऊन चालायला लागला.... अजुन दोन दिवस झाले नाही बाप्पाकडुन येऊन तर लग्गेच सुरू.... बनुताईम, कुठे गं गेलीस?? ये ना बंटीला पाहायला..दुबईला मग जा...
वा! किती छान!!! मुकुंदकाका,
वा! किती छान!!!
मुकुंदकाका, तुमची ही कविता वाचताना अगदी पुनःप्रत्ययाचा आनंद आम्ही घेत आहोत!
बंटीबाबा आणि बनुताई ही जोडगोळी आता काय काय धमाल करते याकडे लक्ष लागले आहे!
बंटीबाबासाठी तुरीच्या शेंगा
बंटीबाबासाठी तुरीच्या शेंगा पाठवतोय मी. तुरीच्या शेंगा उकळून खायला चांगल्या वाटतात. त्याला थोडे बरे वाटेल
मस्त बनुताईला लवकर घेऊन या..
मस्त बनुताईला लवकर घेऊन या.. बंटीबाबा इतकीच आम्हाला पण उत्सुकता आहे बनुताईला भेटाय्ची..
मस्तच !!!
मस्तच !!!
गंगाधरजी, तुरीच्या उकडलेल्या
गंगाधरजी, तुरीच्या उकडलेल्या शेंगा! वा! काय आठवण करुन दिलीत! आणि तुरीच्या ओल्या दण्यांची भाजी!
मस्तच.. मजा आली. पहिल
मस्तच.. मजा आली.
पहिल बन्नुताई आणि आता बंटीबाबा, दोघांची गट्टी जमली तर मजाच मजा
खूप खूप खूप छान नेहेमीसारखी!
खूप खूप खूप छान नेहेमीसारखी!
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मस्तच!!! बंटी और बनुली
मस्तच!!! बंटी और बनुली
खुप सुन्दर. एकदम बालपनात
खुप सुन्दर. एकदम बालपनात हरवले.
मस्ताय बर्का दादा...
मस्ताय बर्का दादा...