Submitted by टयुलिप on 29 February, 2024 - 20:30
मायबोलीवर छोटे मोठे उद्योजक आहेत काय ?
तुम्ही तुमचा सोशल मीडिया कसा हाताळता ? मी हल्लीच एक छोटा बिझनेस सुरु केलाय . आधी विकांताला असंच हौस म्हणून क्ले कानातले करायचे , आता लोकल मार्केटमध्ये दाखवावे असा विचार आहे . त्यासाठी सगळ्यात मोठा हातभार सोशल मीडियाचा लागणार आहे . इथे असे उद्योजक एकत्र येऊन एकमेकांना प्रोत्साहन सपोर्ट करण्याबाबत काय मत आहे ?
आपापले सोशल मीडिया हॅन्डल्स इथे टाकुयात आणि एकमेकांना फॉलो करूयात ?
अगदी उद्योजक नसले तरी हौशी कलाकार , चित्रकार , प्रकाशचित्रंकार आहेत त्यांनी देखील लिंक टाका .
असा धागा आधी असेल तर हा काढून टाकते
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वल्ली (वल्लरी चवाथे), निलू,
वल्ली (वल्लरी चवाथे), निलू, निधप ह्या देखील आभूषणे बनवून विकतात (प्रत्येकीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत). त्यांना संपर्क करून विचार
धन्यवाद भ्रमर माहितीसाठी.
धन्यवाद भ्रमर माहितीसाठी.
सुरेख.
सुरेख.
>>>>असा धागा आधी असेल तर हा काढून टाकते
नको. असू देत की.
हाय tulip.. सुंदर आहेत
हाय tulip.. सुंदर आहेत कानातले सगळे..
मी पण insta वरून क्राफ्ट आणि केक्स ऑर्डर घ्यायचे... सध्या वेळ मिळत नसल्याने बंद आहे...
हे माझे insta handles
https://www.instagram.com/crafting_around28?igsh=cnZxYnVmOW0wbXJy
https://www.instagram.com/the_bakingbee_?igsh=MjAxMzdoYmZqMm10
धन्यवाद सामो , तसाही धागा
धन्यवाद सामो , तसाही धागा असेल असं वाटत नाही
jui.k , धन्यवाद . दोन्ही अकाउंटला केलं फॉलो . किती सुंदर क्राफ्ट्स आहेत तुझे .
नमस्कार , मी सुद्धा असे काही
नमस्कार , मी सुद्धा असे काही बुकमार्क्स बनवले आहेत ,पण ऑनलाईन विक्री कशी करता येईल हे समजत नाही
कृपया कोणाला माहित असल्यास मदत करावी , मी instamojo वर try करून पहिले आहे पण काही यश मिळालेलं नही
Instagram वर टाकले का?
Instagram वर टाकले का?
घरून आर्ट n क्राफ्ट च्या
घरून आर्ट n क्राफ्ट च्या वस्तू , ज्वेलरी, कपडे, बनवणाऱ्यांसाठी -
- व्यवसायाचे एक नाव ठरवा.
- insta ani Facebook account open करा , पर्सनल अकाऊंट आणि बिझनेस अकाऊंट शक्यतो वेगळं ठेवा.
- बिझनेस साठी शक्यतो वेगळा फोन नंबर ठेवा कारण बऱ्याचदा तो पब्लिकली शेअर केला जातो.
- regularly कामाचे फोटो, रिल्स टाकत रहा.
- प्रत्येक वस्तूच्या किंमती ठरवून एक लिस्ट बनवून ठेवा.
- फेसबुक वर खूप बिझनेस ग्रुप आहेत तिथे जॉईन व्हा.
- घे भरारी हा एक छान फेसबुक ग्रुप आहे. अजूनही अनेक आहेत.
- या फेसबुक ग्रुप वर तुमच्या पोस्ट शेअर करा.
- इथून येणाऱ्या मेसेजला नियमित उत्तरं द्या
- इथूनच हळूहळू ऑर्डर्स यायला सुरुवात होईल.
- ऑर्डर्स WhatsApp वर घेऊन, पूर्ण पत्ता, पिन कोड, फोन नंबर घेऊन, किती पैसे वस्तूचे, किती शिपिंगचे हे सगळे सांगून मग फायनल confirmation घ्या.
- कस्टमर ने confirmation दिले की ऑनलाईन पेमेंट घ्या आणि मगच वस्तू शिप करा. ( कॅश ऑन डिलिवरी शक्यतो नवीन लोकांबरोबर नकोच)
- ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी gpay किंवा bhim app वापरू शकता. लक्षात ठेवा - पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला कुठलाही पिनकोड किंवा otp लागत नाही.
- अनेक बिझनेस व्हॉट्सअँप ग्रुपही आहेत त्यांना जॉईन करू शकता.
- WhatsApp or Facebook or instagram वर रोज , किंवा दिवसा आड पोस्ट टाकणं गरजेचं आहे.
तुमचा ब्रँड वाढत असेल तर पुढे जाऊन सोशल मीडिया जाहिराती वगैरे करता येईल. वन पेज वेबसाईट हवी असेल तर ती पण करता येईल . ( यासाठी मला संपर्क करू शकता)
तुम्हा सगळ्यांच्या नवीन व्यावसायिकता मन:पूर्वक शुभेच्छा.
आता माझ्याबद्दल -
माझा व्यवसाय नॅचरल पर्सनल केअर प्रॉडक्टसचा आहे. या प्रॉडक्ट्स मध्ये नारळाच्या दुधापासून काढलेले तेल हा प्रमुख घटक आहे. नेचरझेस्ट ( NaturZest) हे ब्रँड नेम आहे. हे प्रॉडक्ट्स certified आणि कंपनी manufactured आहेत. नैसर्गिक आणि सिंथेटिक fragrance आणि रंग, पेट्रोलियम पदार्थ यात वापरलेले नाहीत.
वेबसाईट - http://www.naturzest.com
Insta handle - naturzest_
Facebook handle - naturzest
हा प्रतिसाद 'जाहिरात कशी
हा प्रतिसाद 'जाहिरात कशी करावी' याबाबत नसून 'जाहिरात कशी करू नये' किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या जाहिरातींचा कसा परिणाम होऊ शकतो यावर आहे.
मी आपल्याला demotivate करू इच्छित नाही, परंतु या जगात माझ्यासारखे अन्य ग्राहकही असतील, त्याबाबत सावध करू इच्छितो.
आता माझ्यासारखे म्हणजे नेमके कसे?
मी माझा मोबाईल क्र. DND (Do Not Disturb) मध्ये नोंदवलेला आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती / जी कोणी कंपनी या DND चे उल्लंघन करते, त्या व्यक्ती / कंपनीला मी सरळ boycott करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर HDFC बँकेने आम्ही तुम्हाला क्रेडीट कार्ड ऑफर करत आहोत (माझे त्यांच्याकडे एकही खाते नसतानाही) हे सांगण्यासाठी मला वारंवार फोन केले, त्यामुळे आता मी अशा टप्प्याला आलो आहे की, HDFC ची कोणतीच सेवा मला नको. कितीही चांगला investment plan असो, HDFC असेल तर नको.
अर्थात आपल्या product चे फोटो / माहिती WhatsApp Status वर ठेवण्याला, Reels / YouTube video /shorts बनवून टाकायला, FB पेज बनवायला माझा काहीही आक्षेप नसतो, कारण या साऱ्यामुळे मला माझ्या कामात व्यत्यय येत नाही, पण जर कोणी मला normal / WA call केला किंवा SMS / WA msg पाठवला (ज्याने माझ्या फोनवर रिंग वाजून लक्ष विचलित होते) तर मात्र मी त्याची DND violation ची तक्रार नोंदवतो आणि वर म्हटल्याप्रमाणे boycott करतो. याउलट एका उद्योजकाने त्याच्या customize gift चे रील बनवून टाकले होते, जे मी माझ्या best friend ने लग्न केल्यावर त्याच्यासाठी बनवून घेतले!
आजवर अनेक बिल्डरच्या telecallers ना मी झापले आहे की, माझा फोन मी माझ्या पैशाने, माझ्या वापरासाठी विकत घेतला, त्याला चालू ठेवायला दर महिन्याला रिचार्ज मी करतो. तुझे त्यात एक पैशाचेही योगदान नाही, मग कोणत्या अधिकारात तू तुझ्या व्यवसायाची जाहिरात माझ्या फोनवर करतो आहेस? हा माझा फोन आहे, तुझ्या **ची (तीर्थरूपांची) मालमत्ता नाही.
.
.
.
तेव्हा असे call वगैरे करून / SMS पाठवून मार्केटिंग करायचा विचार असेल तर अशा (माझ्यासारख्या!) ग्राहकांपासून सावधान!!!
आणि हो, आपले नेहमीचे १० आकडी मोबाईल क्रमांक हे वैयक्तिक वापरासाठी असतात. नियमानुसार तुम्ही त्यावरून telecalling /telemarketing करू शकत नाही. त्यासाठी TRAI (Telecom Regulatory Authority of India) कडे रीतसर नोंदणी करून लायसन्स घ्यावे लागते आणि मग 140 ने सुरु होणारा क्रमांक मिळतो, जो तुम्ही telemarketing साठी वापरू शकता.
तुमच्या fb page वर १० आकडी मोबाईल क्र. देऊ शकता, त्यावर order घेऊ शकता. थोडक्यात inbound traffic असेल तर चालेल, पण "Hello sir / madam, I am **** from abc company. We provide bla bla service. Are you looking for such service?" असल्या type चे call १० अंकी मोबाईल क्रमांकावरून करता येत नाहीत, तो नियमभंग आहे. त्यासाठी 140 ने सुरु होणारा क्रमांकच हवा!
मला प्रतिसाद दिल्या बद्दल
मला प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद
https://www.instagram.com/beriindian
हे माझं इंस्टाग्राम वर पेज आहे पण ... त्यामध्ये अजून बुकमार्क्स तर नाही टाकलेत पण २ वर्षा पासून पोस्टर्स टाकत आले आहे
हौशी कलाकार म्हणा हवं तर ... पण माझ्यातील कलाकारी कुठे तरी exhibit करायचा प्रयत्न केला आहे
सावली , खूप छान माहितीसाठी
सावली , खूप छान माहितीसाठी धन्यवाद .
दवबिंदु , छान आहेत तुमचे बुकमार्क्स . पेज नेहमी ऍक्टिव्ह ठेवा .