भायखळा, मुंबई येथे मायबोली गटग

Submitted by Srd on 2 February, 2024 - 18:33

मायबोलीकर श्री अतुल यांचा पुणे गटग धागा वाचून सुचलं की मुंबईत आसपासच्या मायबोलीकरांचे मिनी गटग करावे. त्या धाग्यावर काल रात्री प्रतिसाद टाकला परंतू वेगळा धागा काढल्याशिवाय याबद्दल कळणार नाही म्हणून वेगळा धागा. श्री हर्पेन यांनी सुचवले की पुढाकार घ्यावा. तर तिकडचा प्रतिसाद इथे कॉपी करत आहे.
//
मुंबईत भायखळा फुले प्रदर्शन २-३-४ फेब्रुवारीला राणी बागेत सकाळी आठ ते आठ संध्याकाळी आहे.
https://www.facebook.com/bycullazoo/ इथे पाहा.
रविवारी(४ फेब्रुवारीला)नऊ वाजता भाऊ दाजी लाड म्युझियमपाशी भेटता येईल. तिकिट खिडकी समोर आहे ही इमारत. सध्या बंद आहे. त्याच्या डावीकडे सुस्वागतम लिहिलेले दिसेल आणि झेंडुच्या कुंड्या. तिथे बाजूला बसायला कट्टा आहे.

गटग अधिक प्रदर्शन अशी दोन कामे होतील. मी येईन. रविवारी उशिरा दुपारनंतर मात्र खूप गर्दी होते हा अनुभव आहे. खादाडीचं एकच हॉटेल समोरच्या रस्त्यावर आहे पण तिथे फार गर्दी असते. पदार्थ चांगले असतात. पण हॉटेल लहान आहे.(हॉटेल गणेश), हॉटेल संतोष हे एक आहे.
दोन तीन गोष्टी साध्य होतील - इतर मायबोलीकरांना भेटणे आणि बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी तिथले फुले भाजीपाला प्रदर्शन पाहाणे. लहान मुलांना आणल्यास राणीचा बाग ऊर्फ जिजामाता उद्यान पाहता येईल. //

Western suburbहून मुंबई सेंट्रल स्टेशन ते जिजामाता उद्यान स्टॉप - बेस्ट बस नं ६७ . पाच सहा स्टॉप्सचे अंतर आहे.
Central railway वरील भायखळा स्टेशन (पूर्वेला बाहेर पडून चालत सात मिनिटांत)

(काला घोडा उत्सव संपला . नेहमी फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात असतो.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो म्हणजे उद्याच सकाळी.
फारच शॉर्ट नोटीसवर धागा काढलात. फक्त 24 तास आधी Happy

दुर्दैवाने आमचे फॅमिली फंक्शन आणि इतर प्लान असल्याने मी इच्छा असूनही येऊ शकत नाही. अन्यथा पोरांसोबतच आलो असतो. राणीबाग त्यांची फेवरेट जागा आहे. इतर कोणाची लहान मुले असती तर त्यांनाही राणीबाग फिरवले असते. मला ते आमचे घरचेच वाटते Happy

खूप छान उपक्रम. पण थोडा अवधी द्यायला हवा होता असे वाटते. तरी हरकत नाही जे येऊ शकतात ते तरी भेटू शकता. शुभेच्छा!
फोटो अपलोड करा शक्य असल्यास. खरं आहे, अशी स्थानिक गटग अधूनमधून व्हायला हरकत नाही.

ठीक आहे. वेळ कमी पडला धागा काढायला. बघू काय होते. मुंबईत लोकल ट्रेन्सचे रविवारी मेगा ब्लॉक असतात. त्यामुळेही कार्यक्रमांवर परिणाम होतो. माझा एक मित्र मुंबई विद्यापीठाचा (कालिना) बागकामाचा अभ्यासक्रम करतो आहे त्यांची आज तिथे भेट होती. त्यांच्याकडून कळले की फुले प्रदर्शन फारच चांगले झाले आहे. फुलांच्या सजावटीसाठी सुंदर आहेत. सेल्फीला गर्दी आहे. झाडे,रोपे ,खते वगैरे विकणारेही यावेळेस खूप आले आहेत. अगदी सकाळी जमले नाही तरी प्रदर्शन अवश्य पाहा.

>>>>>फारच शॉर्ट नोटीसवर धागा काढलात. फक्त 24 तास आधी Happy
कधी कधी झट मंगनी पट ब्याह च चांगलं असतं, चालढकल फार होते नाही तर .. आयत्यावेळी प्लॅन बदलतात.

कधी कधी झट मंगनी पट ब्याह च चांगलं असतं
>>>>>

हो पण निदान पोराने पोरीला आणि पोरीने पोराला पाहिले तरी पाहिजे ना... जे लोकं आज मायबोली उघडणार नाही त्यांना तर कळणार सुद्धा नाही. सगळेच थोडी ना आपल्यासारखे पडीक असतात माबोवर Happy

>>>>>>जे लोकं आज मायबोली उघडणार नाही त्यांना
आँ असे लोक आहेत? कहां से आते है ये लोग! माबोच्या नावाला बट्टा आहेत ही लोकं. Wink

चालू आहे गटग अजून... राणीबाग संध्याकाळी सहा वाजता बंद झाली की शेअर करतो

कुणी आलं नाही. (ओके. )पण प्रदर्शन महत्त्वाचं. त्यामुळे पुढच्या आठवड्यात गटग ढकलले नाही. प्रदर्शनाचे फोटो काढले. सजावट छान होती.
एक आठवडा अगोदर धागा टाकायला हवा होता हे मान्य.

आज फेसबूकवर एक फोटो पाहिला त्या प्रदर्शनाचा.. छान वाटला. मला शक्य असते तर नक्की गेलो असतो ते बघायला. फोटो काढून धागाही काढला असता. तरी तुम्ही तुमचे फोटो शेअर करा ना ईथे

प्रदर्शनाचे काही फोटो

फोटो १

फोटो २

फोटो ३

फोटो ४

फोटो ५

फोटो ६

फोटो ७

फोटो ८
हे दुसरे एक प्रदर्शन होणार आहे

फोटो ९

फोटो १०

फोटो ११

फोटो १२

फोटो १३

छान फोटो
हेच पुष्प रचनेचे फोटो मी पाहिले होते आज फेसबूकला