Submitted by तृप्ती आवटी on 11 February, 2022 - 08:31
रोबाटिक व्हॅक्युम क्लीनरबद्दल चर्चा करण्यासाठी धागा. प्रश्न विचारा. तुमचे अनुभव कथन करा. रोबाट आणि तुमची कोतबो सिचुएशन असेल तर थोडक्यात पण मेक-मॉडेलसहीत इथेच लिहा म्हणजे इतरांना कल्पना येइल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतात रूम्बा आणि तसे रोबाटिक
भारतात रूम्बा आणि तसे रोबाटिक व्हॅक्युम मिळतात का? इथून नेला तर तिथल्या धुळीच्या जाचामुळे बंद पडेल का?
Submitted by सिंडरेला on 10 February, 2022 - 10:28
मिळतो रूंबा भारतात. किमतीत फरक भरपूर असू शकतो, तेवढा बघून प्रॉफिटेबल वाटला तर घेऊन जा. धुळीचा काही प्रॉब्लेम झालेला ऐकण्यात नाही.
Submitted by भास्कराचार्य on 10 February, 2022 - 10:33
आमच्याकडचा रुम्बा आता जुना झालाय. नवी मॉडेल्स जास्त चांगली आहेत हे ऐकलं आहे. पण तरी रुम्बा पुरवणीसारखा आहे, मुख्य काम क्लिनिंग सर्विसवाले करून गेले की मग आठवड्यातून १-२ वेळा वापरण्यासाठी.
Submitted by सिंडरेला on 10 February, 2022 - 13:29
. पण तरी रुम्बा पुरवणीसारखा आहे, >> +१ हे खरय. मधे उगाच फिरवायला बरा पडतो. मधे वेट ऑप्शन वापरून बघितला नि नंतर ची जी साफ सफाई करायला लागली ती बघूण सोडून दिला. थोडक्यात काय रोबोट्स आले तरी व्हॅक्यूम चे काम मॅनुअल च राहणार Wink
Submitted by असामी on 10 February, 2022 - 13:45
इकडे रुंबा वाचून नाक खुपसतेय हां
भारतात मी आणि अजून काही सोशल मीडिया मैत्रिणींनी घरी डीबॉट इकोव्हॅक 950 घेतला आहे.चांगला चालतो.सुरुवातीला रांगत अडथळे बघतो, मॅप आखतो आणि मग इमानदारीने त्या आकाराच्या पाथ मध्ये सगळं ककव्हर करणाऱ्या लांब रेषा मारून झाडू पोछा करतो.जिन्यावरून पडत नाही.सेन्सर आहेत.काम झालं की रांगत रांगत स्वतः ऑन असलेल्या चार्जिंग स्टेशन वर जाऊन आराम करतो.
किंमत 33 हजार भारतात आम्ही तिघीनी घेतलेल्या ची, थोडे लो पॉवर चे 10-12 पासून पुढे मिळतात.
त्याचा फडका प्लेट खूप धुळीने घाण झाली की काढून पाण्यात भिजवून धुता येते किंवा इतर फडके नॅपकीन बरोबर मशीन ला लावता येते.क्लिनर बरोबर 3 प्लेट मिळतात, अजून घ्यायच्या असल्यास 800 रु ला 3 अश्या ऑनलाइन मिळतात.
खूप फिरून मॅप आखण्यात त्याच्या मेंदूचा गोंधळ टाळायचा असेल तर दार बंद करून एकावेळी एक खोली करता येते.बाईलेस राहणी अजून पूर्ण केली नसली तरी बाई 5-6 दिवस नाही, घरात वेळ नाही अश्या वेळी खूप उपयोग झाला.
Submitted by mi_anu on 10 February, 2022 - 21:12
आमचा रोंबा आमच्या सारखाच झाडू मारतो. Random. एकदा सरळ जाईल, मग मनात आलं की एकाच ठिकाणी चक्कर येई तो गरागरा फिरत बसेल. मग ४५ डिग्री मॅजिक नंबर घेऊन अडखळला की ४५ डिग्री करत फिरत बसतो. आम्ही खोलीचं दार लावून त्याला अपने हाल वर सोडून देतो. स्केड्युल वगैरे करण्याची हिम्मत नाही, कारण दररोज ठराविक वेळी सपाट जागा त्याला मिळण्यासाठी अपार मेहेनत करावी लागेल.
Submitted by अमितव on 10 February, 2022 - 21:25
आम्ही मिलाग्रोचा रोबोट वापरत होतो गुरगावात असताना. भारतीय बनावटीचा आहे. पण तो ठाण्यात शिफ्टींग मधे खराब झाला. नंतर काही वापरला नाही. २४००० ला घेतला होता.
Submitted by mandard on 10 February, 2022 - 22:47
ज्येना ना मस्त पडेल सिंड्रेला.
फक्त रिव्ह्यू वाचून घ्या.त्यातल्या त्यात न्यू जेनरेशन चे आहेत त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता जास्त सुधारलेली आहे.मॅप आखणे चांगले करतात.
आमचा बाकी शहाणा आहे.पण त्याच्या वाटेत खुर्ची मॅप आखताना सुरुवातीला असेल तर नंतर ती हलवली तरी तो तिथे अदृश्य खुर्ची असल्या प्रमाणे त्या एरिआ भोवती पुसून जातो.(नारायण धारप कथा-अदृश्य अस्तित्वाचा घातक निर्यास वगैरे).मॅप आखताना त्याला चांगले मोकळे मैदान मिळाले की नंतर पटापट आवरतो.
किचन मध्ये जिद्दी दाग असल्यास आपण दाबून पुसतो तितके स्वच्छ तो करणार नाही.अर्थात इतके जिद्दी दाग पडणारे कुकिंग हल्ली आपण करत नाही कमी माणसात.
त्याच्या पोछा चेंबर मध्ये फिनेल लायझोल चे पाणी अजिबात भरायचे नाही, मॅन्युअल मध्ये परवानगी असल्याशिवाय.हे वापर कर्त्याना समजवायचे.
Submitted by mi_anu on 11 February, 2022 - 00:56
माझ्याकडे पण आहे रुंबा. त्याला पोछा अटॅचमेंत पण आहे पण ती काही मी वापरत नाही. एकदम सोपा आहे वापरायला. मी अमेझॉन.इन वरून घेतला होता. चार वर्शामागे. गुजरातेतून सप्ल्याय होतो. तिथे रिव्यु वाचून घ्या.
Submitted by अमा on 11 February, 2022 - 00:58
https://www.amazon.in/Ecovacs-Vacuuming-Technology-Cleaning-Multi-Floor/...
यात पडू का पडू का वाला पायरी व्हिडीओ आहे तो माझा रिव्ह्यू पण आहे.
Submitted by mi_anu on 11 February, 2022 - 01:01
सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे तो पसारा आवरून ( विशेषत: खेळणी Wink ) - मग पुसत नाही. जे काम माणूस करतो. Lol
ज्यांच्याकडे हा प्रोब्लेम नाही, त्यांच्याकरता चांगला ऑप्शन आहे.
Submitted by नानबा on 11 February, 2022 - 01:12
अमॅझॉन वर आता पंखा खालीच उभे राहून एक एक पाते साफ करायला असा वेगळाच एक झाडू पण मिळतो. माझ्या फेसबुक फी ड मध्ये असेच काय काय येते त्यांचे. ज्येनांना शिडी चढायला नको म्हणजे.
Submitted by अमा on 11 February, 2022 - 02:11
मला पण बरेच दिवस झाले घ्यायचा
मला पण बरेच दिवस झाले घ्यायचा आहे. शोधाशोध करत आहे.
मला खरे तर Roomba घ्यायचा होता. पण जरा महाग आहे.
भारतात MI आणि Eureka Forbesचे आहेत.
MI वाले घरी येऊन डेमो देत नाहीत म्हणून शोरुममधे जाऊन बघून आलो पण तो आवडला नाही. Eureka वाले घरी येऊन डेमो देऊन गेले पण त्यांच्या बेसिक मॅाडेल मधे मला हवे ते फिचर्स नव्हते. शिवाय त्याचे मॅापिंग फारसे ईफेक्टिव्ह वाटले नाही. नोव्हेंबर पासून त्यांच्या नविन मॅाडेल साठी ॲार्डर देऊन ठेवली होती.
काल येऊन ते चेक घेऊन गेले. एक दोन दिवसात येईल. १० दिवस मनी बॅक गॅरेंटी आहे असे त्यांनी सांगितले आहे. ती कितपत सहजासहजी परत मिळेल याविषयी साशंक आहे.
हे जर मॅाडेल आवडले नाही तर ते परत करून Roomba घ्यायचा विचार आहे.
माफ करा विषयाशी संबंधित नाही.
माफ करा विषयाशी संबंधित नाही. पण एव्हढ्यासाठी मुद्दाम वेगळा धागा नको म्हणून इथेच विचारतोय.
स्टेअर लिफ्ट (मोटराईज्ड चेअर) कुणी घरातल्या जिन्यात बसवली आहे का ? घ्यायची आहे. कोणती कंपनी चांगली आहे ?
किंमत, काय काय बघून घ्यावे ? अनुभव सांगा प्लीज.