बुंदी (गोड)- दीड पावशेर
रबडी - पावशेर
सजावटीसाठी चांदी वरख् आणि सुकामेवा.
दरवर्षी प्रमाणे यंदाही वार्षिक ऑफिस मीटिंग डिनर दिल्ली जिमखाना क्लबच्या पार्टी कॉटेजला झाले. मे चा पहिला आठवडा असून मस्त गारगार वातावरण होतं. अशा दिल्ली पार्टी मध्ये तेपण जिमखाना आणि साऊथ दिल्ली म्हणजे फॅशन परेड बऱ्यापैकी.. उंची गाड्या, पर्स, कपडे अन् काय काय.. आपण तिथे असून सुद्धा आपले ममव मन अशा ठिकाणी काही रमत नाही. खोटेखोटे हसून, काय काय काम केलं ते उगा वाढवून सांगून, हातवारे करून करून बोलून तिथले ते दोन तीन तास घालवण्याकडे आपला कल. एखाद तास झाला की आणि स्टार्टर खादाडी झाली की मेन कोर्सला काय काय खादाडी आहे ते बघायचे. तर हा गोड पदार्थ यंदा पहिल्यांदा तिथे चाखला. फारच भन्नाट चव. कृती एकदम सोप्पी.
अव्हन २०० अं से. ला पाच सात मिनिट प्री हिट करावा. खोलगट बेकिंग पात्रात बुंदी पसरून त्यावर रबडी घालावी. हे दोन लेयर मध्ये केले तरी चालेल. आता हे पात्र बारा ते पंधरा मिनिट २०० से. ला बेक करावे. आता तयार पदार्थावर वर्ख आणि सुका मेवा पसरवावा, बुंदी रबडी तयार.
हा एकदम गरम गरम खायचा पदार्थ आहे, अगदी इतर जेवण झाले की बेक करायला घ्यावे आणि गरम गरम वाढावे. वर्ख सहसा वापरू नये, इथे द्यायची पाकृ म्हणून मी वापरला आहे. ह्यात रबडी आणि बुंदी करण्याचा वेळ धरला नाहिये.
मस्त दिसतेय बेक्ड बुंदी रबडी.
मस्त दिसतेय बेक्ड बुंदी रबडी.
मस्तच!
मस्तच!
ह्यात रबडी करण्याचा वेळ धरला
ह्यात रबडी करण्याचा वेळ धरला नाहिये.>>>आणि बुंदी करण्याचा सुद्धा
फोटो तर एकदम भारी आहे. मस्त!
आयडिया मस्त आहे ही. पण रबडी
आयडिया मस्त आहे ही. पण रबडी कमी आणि बुंदी जास्त दिसते आहे फोटोत. असेच अपेक्षित आहे का?
मस्त आहे फोटो .
मस्त आहे फोटो .
मस्तय की.
मस्तय की.
मस्तच दिसतोय.
मस्तच दिसतेय.
Mru, स्वाती, सोनाली, मैत्रेयी
Mru, स्वाती, सोनाली, मैत्रेयी, जाई, सायो आणि ममोजी धन्यवाद. सोनाली बदल केला आहे मैत्रेयी रबडी बरीचशी सोक झाली बुंदी मध्ये. बारीक तेलातली बुंदी घ्यायला हवी होती. कमी नाही वाटली रबडी. अगदीच तसे वाटल्यास थोडी रबडी नंतर गरम करून add करू शकता. हे कॉम्बो मात्र खरेच भारी लागते.
हे रबडी-जिलेबी सारखेच लागत
हे रबडी-जिलेबी सारखेच लागत असेल का?
नाही, जीलेबीची चव आंबट गोड
नाही, जीलेबीची चव आंबट गोड असते आणि मैदा. जीलेबि रबडी मध्ये जिलेबी बरेचदा कड्क राहते. इथे डाळीचं पीठ त्यामुळे बरीच वेगळी चव लागते आणि रबडी आणि बुंदी मिक्स होतात बऱ्यापैकी. फक्त हा गरम गरम खाण्याचा पदार्थ आहे.
आपण तिथे असून सुद्धा आपले ममव
आपण तिथे असून सुद्धा आपले ममव मन अशा ठिकाणी काही रमत नाही. खोटेखोटे हसून, काय काय काम केलं ते उगा वाढवून सांगून, >>>>
दिल्ली आणि तेथिल फोनी लोक
बेक्ड बूंदी रबडी एकदा खाल्ली
बेक्ड बूंदी रबडी एकदा खाल्ली होती बहुतेक बार्बेक्यू नेशनच्या डेझर्ट्स मध्ये. खूप हेवी वाटली पण आवडली होती. बूंदी/रबडी तयार आणली तर फारच सोप्पंय करायला. थंडीत गरमागरम खायला आवडेल.
असाच बेक्ड रबडी गुलाबजाम पण चांगला लागेल मिनी गुलाबजाम वापरून.
दिसतंय मस्त.
दिसतंय मस्त.
कसे लागेल ते imagine होईना.
लेखकाच्या घरीच जावे
हा पदार्थ उत्तर भारतात ऐन
हा पदार्थ उत्तर भारतात ऐन हिवाळ्यात तेही उघड्यावरच खायचा वाटतो आहे.
धन्यवाद लोकहो. छंदीफनदी हो
धन्यवाद लोकहो. छंदीफनदी हो असतात खरे ते लोक तसेच, त्यांना त्यात काही गैर पण वाटत नाही. Mazeman हो मिनी गूजा आणि रबडी चांगले लागेल चवीला नक्कीच. झकोबा करायचा आहे रे एकदा प्लॅन. भरतजी हो तसाच आहे काहीसा पदार्थ.
मस्त एकदम युपीय पदार्थ!
मस्त एकदम युपीय पदार्थ!