मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

No!
Bloatware फार आहे. !!
6.72 inch - मोठा आहे. चालणार असेल तर.
प्रोसेसर चांगला फास्ट आहे गेमिंग साठी.
Macro camera?, खास नाही.
बाहेर उजेडात स्क्रीन पाहण्यासाठी 600nits brightness ठीक आहे.
5g चे पाच बँड आहेत ते यापैकी.
ओडिओ डॉल्बी नाही.

रिअल मी,रेड मी,oppo,, ह्या कंपन्या कमी पैशात जास्त सुविधा देतात.
दर्जा मध्ये त्या कुठेच कमी नाहीत.
नोकिया स्पर्धेतून बाहेर गेल्या मुळे खरेच खुप दुःख होते.
ती स्पर्धेत असता तर आज भारतीय ग्राहकांना उत्तम मोबाईल वापरायला मिळाले असते. आयफोन हा फक्त ब्रँड आहे .
भरमसाट किंमत .
दर्जा च्या मानाने अती प्रचंड किंमती आहेत त्यांच्या.
चीन ला पर्याय नाही.

रिअल मी,रेड मी,oppo,, आणि वन प्लससुद्धा 'color os वापरतात.
वन प्लसची oxygen OS फक्त नावापुरती स्किन आहे.
त्यामुळे ब्लोटवेअर टाकू शकतात भरपूर. त्याबदल्यात पैसे कमी करतात.

१५-२० हजारांचा फोन सजेस्ट करा
ज्यात उत्तम कॅमेरा चांगला प्रोसेसर व battery हवी. मेमरी पण भक्कम हवी.
Bloatware प्रॉब्लेम नसेल.
सध्याच्या मोटो G4+ मध्ये ५जी चालत नाही.
दुसरा रेडमी नोट७प्रो घरात आहे तो जरा वजनाला जास्त वाटतो.

जे टेक सेव्ही आहेत, हाय एण्ड चा पावरफुल प्रोसेसर असलेला फोन ज्यांना हवा आहे त्यांनी ब्रॅण्डला न भुलता खालील लिंकवर जाऊन अंटुटु स्कोर बघावा. इथे तुम्हाला टॉपचे प्रोसेसर्स आणि मोबाईल मिळतील.
https://www.antutu.com/en/ranking/rank1.htm

नुसतंच कोर न बघता हायपरथ्रेडींग आणि ट्रान्स्झिस्टर्सची साईज किती एन एम आहे ते बघून घ्यावं. जितके जास्त कोअर तितका स्पीड चांगला. फिन्स जितक्या थिन तेव्हढी बॅटरी लाईफ जास्त.

इतरांनी इतके स्टेट ऑफ आर्ट प्रोसेसर खरंच आपल्या उपयोगाचे आहेत का हे बघितलं पाहिजे.
जर आपण मोबाईल वर क्वचित फोटो घेत असू, क्वचितच व्हिडीओ शूट करत असू आणि गाणी ऐकणे , फोन करणे, नेट सर्फ करणे, फार तर वर्ड, एक्सेल, पावर पाईंट असा वापर असेल तर आपल्याला आठ कोअरच्या प्रोसेसरची गरज नाही. ड्युएल कोअर सुद्धा चालेल. आपल्यासारख्यांनी ६ जीबी रॅम वापरणे ही लक्झरी आहे. गेमिंगसाठीचा प्रोसेसर वापरणे ही उधळपट्टी. त्या पैशात चार वर्षे मोबाईल बदलता येईल.

गेमिंग, इंस्टा रील्स, चित्रपट बघणे यासाठी फोनचा वापर नाही.
ऑफिस व वैयक्तिक ईमेल अकाउंटस, बँकींग, यांच्या कामासाठी मुख्य वापर आहे. त्यात भरपूर फाईल्स, डाटा डाउनलोड होतो, फोनमध्ये साठवावा लागतो. नेट सर्फिंग, कँमेराचा वापर बराच आहे. त्या शिवाय फोन कॉल्स ही खूप होतात.

२०२३ मधल्या बर्‍याचशा बजेट फोन मधे ऑक्टा कोअर प्रोसेसर असतो. यापेक्षा जुना प्रोसेसर बजेटफोन मधे नाही.
२०२० पासूनच हे प्रोसेसर आले आहेत. २०२३ मधे ३ नॅनो मीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहे. ५ ते ७ नॅनोमीटर सहज मिळतात.
माझ्याकडे १० नॅनोमीटर वाला गॅलेक्सी एम २१ आहे. तुमच्या प्रमाणेच वापर आहे. पुरेसा आहे. नवीन अँड्रोईड अपडेट मारताना सावधान रहावे लागते.

मोबाइल बदलणे आहे. सध्या रेडमी नोट ५ प्रो वापरते आहे. ५ वर्ष उत्तम चालला. अजून ६ महिनेही जायला हरकत नाही असं वाटलं होतं. पण बाकि सगळं उत्तम चाललेलं असलं तरी आता चार्जिंगला प्रॉब्लेम देतोय. गेल्या सहा महिन्यात चार्जिंग पोर्ट दोन वेळा बदललं, बॅटरी दोन वेळा, चार्जर्स अनेक वेळा. बदलल्यावर २-३ आठवडे नीट जातात आणि मग येरे माझ्या मागल्या. हे असंच अजून काही महिने काढायचा विचार आहे. पण सध्या जर काही ऑफर्स असल्या तर मग हरकत नाही.
असो
तर मोबाइलमधे बेसिक गोष्टींच्या नंतर मग उत्तम कॅमेरा हवा. माझ्या तारकामाच्या वस्तूंची आणि जनरलही फोटोग्राफीसाठी, व्हिलॉगिंगसाठी आणि काही रिसर्च प्रोजेक्टच्या क्लिप्स शूट करून ठेवण्यासाठी (ज्या नंतर डॉक्युमधे तश्याच वापरता येतील).
कॅमेरा उत्तम म्हणजे रॅम आणि जागा दोन्ही भरपूर हवी हे आलेच ओघाने.
मला अगदी नाईलाज झाल्याशिवाय फोन बदलायला आवडत नाही त्यामुळे आत्ता घेतानाच ५जी ला योग्य असलेला बरा. तेवढ्यासाठी उगाच नवीन घ्यायला लागायला नको.

बाकी फिंगरप्रिंट स्कॅनरची आता खूप सवय झालीये त्यामुळे तो असेल तर बरे पडेल.
माझे बजेट ताणून ताणून २० हजारापर्यंत नेऊ शकेन.

तर फोन सुचवा.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फेस्टिव्हल वर एक्स्चेंज + बँक ऑफर मिळतेय का बघा. प्रोसेसर कुठला आहे पहा. बरेच दिवस चालू आहे सेल.
आता एसबीआय ची ऑफर संपली. इंस्टंट डिस्काउंट १५०० ते २००० आणि ५ ते १०% डिस्काउंट फायनल पेमेंट वर शिवाय एक्स्चेंज आणि नो कॉस्ट ई एम आय मिळत होते.

या ऑफर्स तुमच्या बँकेकडे आहेत का ते अ‍ॅमेझॉनवर चेक करा. ९ तारीख शेवटची आहे.
फ्लिपकार्ट चं माहिती नाही.

तुमच्या स्पेसिफिकेशन मध्ये one plus nord ce 3 lite
किंवा realme narzo 50/60 येतील
दोन्हीचा रिव्ह्यू चांगले आहेत, कॅमेरा पण डिसेंट आहे

वन प्लस चे nord 3, nord ce3 आणि ce3 lite असे अनेक प्रकार आहेत
ते 33 हजार पासून खाली खाली येत जातात

मला एकांनी कॅमेऱ्यासाठी म्हणून रिफर्बिश्ड आयफोन घ्यावा असे सुचवलेय.
रिफर्बिश्ड याबद्दल जनतेचे मत काय आहे?

रिफर्बिश्ड याबद्दल जनतेचे मत काय आहे? >>> रिस्की आहे.
युज्ड मिळतात. पण कुणाचा रेफरन्स देणं धोक्याचं वाटतं.

नीधप, थोडे दिवस थांबू शकाल का ?
५ जी च्या फिक्वेन्सीज (बॅण्ड) इतक्यातच निश्चित झालेल्या आहेत. सध्या थोडेच ऑप्शन आहेत.
प्रोसेसर्स ऑक्टाकोअरच आहेत. ५ जी चा स्पीड आणि ऑक्टाकोअर हे गणित अजून समजलेलं नाही.

आता मायक्रोटेक , स्नॅपड्रॅगन आणि सॅमसंगचा स्वतःचा असे प्रोसेसर्स आहेत. ४ जी मधे हीच टेक्नॉलॉजी आहे. स्नॅपड्रॅगन ला मध्यंतरी इश्यूज होते,सॅमसंगला पण होते. पण सध्याचे ४ जी मोबाईल चांगले आहेत. ५ जी चे रिव्यूज म्हणावे इतके टेक्निकल नाहीत. सगळंच नवं आहे.

मी आजच मुलीसाठी दहा हजारात नवीन कंपनीचा ५ जी घेतला. दीड वर्षात बदलावा लागला तर वाईट वाटणार नाही. तोवर चांगले फोन येतील.
बॅटरी ५००० अ‍ॅम्पिअर अवर ची आहे. कॅमेरा ५० एम पी (एआय) असे फीचर्स आहेत. मायक्रोटेक ऑक्टाकोप्रोसेसएर्सर, १२जीबी रॅम आहे. पण बिल्ड क्वालिटी बद्दल माहिती नाही.

ओळखीत जुना मिळाला तर घ्यावा
शक्यतो रिफरबिश च्या मोहात पडू नये
चले तो चांद तक नाहि तो शाम तक असा प्रकार असतो तो

OnePlus CE3 Nord मी ऑगस्ट मध्ये घेतला.
फोन छान आहे पण कॅमेरा उत्तम हवा असेल तर CE3 Nord पेक्षा Samsung बघा. CE3 Nord जनरल फोटोग्राफी साठी ओके. माझा आधी Samsung F62 होता कॅमेरा क्वालिटी खूपच छान होती, ऑटो फोकस उत्तमरित्या काम करायचे, कमी उजेडातही क्लिअर फोटो, केव्हाही कसाही फोटो काढला तरी छानच यायचा. तो पाण्यात पडल्याने खराब झाला.

माझ्या सध्याच्या मोबाईलने चार्ज व्हायला पुरता नकार देईपर्यंत मी थांबू शकते. मला अजून 6 महिने आहे तोच मोबाईल खेचता आला तर हवेच आहे.
रिफर्बिश्डच्या भानगडीत पडणार नाही. मलाही शंका होतीच आणि इथे कन्फर्म झाले. थँक्स!
वन प्लस किंवा सॅमसंग बघेन.

सॅमसंगचा अनुभव चांगला आहे.
मुलीने कवर काढून पाडल्याने स्क्रीन खराब झाली. रिप्लेसमेंट ओरिजिनल ओएलईडी महाग असते एव्हढा एकच तोटा.

Rear Camera - 50mp normal +8 mp wide+2mp macro
Front 16mp 2.4
हेच स्पेक्स बजेट फोन्स मध्ये असतात. 2mp macro काही कामाचा नसतो. क्वचित 8mp wide and macro असतो.
_____
Mediatek G99 बराच चांगला प्रसेसर आहे.

________
5 G fail गेलं आहे. म्हणजे आतातरी सर्विस बरोबर नाही. शहरांत कुठे कुठे तुटकतुटक आहे.

आयफोन १४/आयफोन १५ बद्दल कुणाचे काय अनुभव?
मी बरीच वर्षे स्टेडी आयफोन युजर होते. मध्यंतरी चायनीज ब्रँडवर स्वीच झाले खरी पण आवडत नाहीये एकंदरीत. परत आयफोनचा विचार डोकावतो आहे. आयफोन १० चा फार चांगला अनुभव नव्हता माझा.
पण आता लेटेस्ट वर्जन्सच्या बाबतीत तुमचे काय अनुभव आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

आयफोन १४+ मागल्या वर्षापासून वापरतोय. बेश्ट आहे एकदम. १५ चे रिव्ह्यूज फार काय ग्रेट नाहीत. माझ्यासारख्या नॉर्मल युजर ला प्रो सीरीज नको वाटते कारण मी तसंपण फोन चा कॅमेरा फार वापरत नाही (ह्या निकषानुसार मी खरंतर आयफोनच वापरायला नको, पण...)
कुठलाही आयफोन घ्या पण + मध्ये घ्या कारण बॅटरी फारच चांगली चालते. अर्थात स्क्रीनही मोठा मिळतो.
सध्याचे नवे सॅमसंग सुद्धा उत्तम आहेत तर आयओएस वर स्विच व्हायचं नसेल तर हे ट्राय करू शकता. स्पे. सॅमसंग ची वन यूआय ६ एकदमच मस्त आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा प्रवासासाठी स्वस्त फोन येतो आहे २२ फेब्रुवारीला. मोटो M 04 . 16 mp back,+5 mp front camera . 8+128 storage. Dual 4g lte sim. ( 5g नसणे चांगली गोष्ट आहे. फार प्राब्लेम आहे त्यात), रुपये ८०००. Unisoc 606 processor (2'20000 antutu score)

धन्स एसारडी !दुसरा फोन घेण्याच्या विचारात होतो, बिझिनेस व्हॉट्सअ‍ॅप साठी. हा चांगला पर्याय होउ शकेल Happy

मोटो G04 असे मॉडेल आहे

होय Moto G04.
या अगोदर एक चिनी कंपनी Techno Pova, Infinix आणि Itel अशा वेगवेगळ्या नावाने भारत आणि आफ्रिका येथे स्वस्त फोनांची दमदार विक्री करत होती. हेच आता जरा विश्वसनीय Motorola करणार आहे.
१)फोनची मेमरी slow eMMC, uMMC नसून वरच्या लेवलची fast uFS 2.2 आहे.
२) 4GB RAM रु सात हजारला आहे ते न घेता 8GB RAM चे मॉडेल रुपये ८हजारला आहे ते चांगले.
३) प्रथमच मोटोने पाच सहा ऍप्स दिली आहेत नको असलेली ती uninstall करून टाका.
४) मुख्य म्हणजे मला साध्या फोनमध्ये full hd+ screen आवडत नाही. अक्षरे बारीक दिसतात ती सतत झूम करावी लागतात. साधी hd screen च बरी.
या किंमतीला फोन बरा आहे.
५) Android 14 आहे. हे राहिलं.
६) लेनोवो + मोटोरोला(एकच आहेत) सर्विस सेंटर्स बरीच सापडतील.

फोन बदलायचा आहे. सध्या लॉक डाउन च्या आधी घेतलेला रेडमी के 20 वापरते आहे. मोबाईल चा वापर नेट सर्फिंग ( फेसबूक, इन्स्टा), थोडे फार बेसिक फोटो एडिटिंग, चित्रं काढणे( हे अधून मधून कधीतरी), वर्ड - एक्सेल ( फक्त डॉक्युमेंट वाचणे/ रिव्ह्यू करणे, एडिटिंग साठी लॅपटॉप), फोटो काढणे ( साधे नेहेमीचे आणि कधी कधी माझ्या mosaics चे) इतकाच असेल.
Apps बरेच वापरले जातात.
बजेट २० हजारांच्या वर नकोय मला. कोणता घ्यावा?
खरे तर सध्याचा फोन अजून छान चालू आहे. पण मला आता कंटाळा आलाय याचा, स्पेशली फ्रंट पॉप अप कॅमेऱ्याचा.

अल्पना, सॅमसंग मध्ये एफ २४, ३४, ए २४/३४ हे पाहा. माझं मत एफ (ऑनलाईन ओन्ली म्हणून एफ) बाकी काहीही फरक नाही, किंवा ए ३४ ला.
काय १६-१७ ला डिसेंबर मध्ये घेतला होता आई- बाबांकरता. फार चांगला अनुभव आहे.
सॅमसंग चा ओएलईडी डीस्प्ले विथ ऑल्वेज ऑन डिस्प्ले फिचर. ५ का ६ हजार एमएएच बॅटरी. ६ जिबी रॅम, १२८ का २५६ जिबी स्टोरेज. सॅमसंगचाच एक्सिनॉस प्रोसेसर.
२ वर्षे ओएस अपडेट्स आणि ४ वर्षे सिक्युरिटी अपडेट्स ची गॅरंटी ही आहे.
बक्कळ झालं येवढ्या पय्श्यांत,

जुना मोबाइल स्लो झालाय, म्हणून नवीन घ्यायचा आहे. थोडासा वेगवान हवा, दैनंदिन व्यवहाराची बरीच अप्स वापरतो; ती सहज चालायला हवीत. बजेट १० ते १५ हजाराच्या आसपास. कॅमेरा साधा चालेल. मी खूप कमी फोटो काढतो. गेम खेळत नाही. ४G हवे पण ५G ची गरज वाटत नाही. घरचे वायफाय आहे.

Pages