मायबोली गणेशोत्सव २०२३- मतदान धाग्यांचे दुवे

Submitted by संयोजक on 16 October, 2023 - 03:26

लेखन विभाग

मतदान - लेखन स्पर्धा १- स्त्री असणं म्हणजे
https://www.maayboli.com/node/84267

मतदान - लेखन स्पर्धा २- फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
https://www.maayboli.com/node/84266

पाककृती विभाग

मतदान -पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ
https://www.maayboli.com/node/84261

मतदान - पाककृती स्पर्धा क्र २ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार
https://www.maayboli.com/node/84262

मतदान - पाककृती स्पर्धा ३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)
https://www.maayboli.com/node/84263

पाककृती स्पर्धा क्र ४ - चविष्ट आणि पौष्टिक पेय साठी एकही प्रवेशिका आली नाही म्हणून त्यासाठी मतदानाचे पान तयार केले नाही.

हस्तकला विभाग

हस्तकला स्पर्धा-१ - मोठा गट -पक्ष्यांची घरटी- यासाठी एकही प्रवेशिका आली नाही म्हणून त्यासाठी मतदानाचे पान तयार केले नाही.

मतदान - हस्तकला स्पर्धा-२-मोठा गट- काचेच्या बाटलीचे शोपीस
https://www.maayboli.com/node/84268

चित्रकला विभाग

चित्रकला स्पर्धा-१ - मोठा गट - 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'- यासाठी एकही प्रवेशिका आली नाही म्हणून त्यासाठी मतदानाचे पान तयार केले नाही.

चित्रकला स्पर्धा-२ - मोठा गट - वस्तुचित्र यात एकच प्रवेशिका आल्याने मतदान धागा केलेला नाही.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ संयोजक: दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करायच्या आधीच प्रत्येक स्पर्धेचा निकाल दिसत आहे.

मला नाही दिसत. मी ज्या स्पर्धांसाठी मतदान केलं तिथेच प्रत्येक स्पर्धकाला मिळालेली मतं दिसत आहेत. ज्या स्पर्धांसाठी मतदान केलं नाही, तिथे फक्त स्पर्धकांची नावं दिसताहेत.

मला नाही दिसत. मी ज्या स्पर्धांसाठी मतदान केलं तिथेच प्रत्येक स्पर्धकाला मिळालेली मतं दिसत आहेत. ज्या स्पर्धांसाठी मतदान केलं नाही, तिथे फक्त स्पर्धकांची नावं दिसताहेत.

मला व्यवस्थित दिसत आहे.
जिथे मी मतदान केले तेथे मला - रिझल्ट नाही- तर मतगणना दिसत आहे. (सद्यस्थिती).
जिथे मी मतदान केलेले नाही तेथे अजून मतदान करायची संधी दिसत आहे.

मी काल मतदान केले तेव्हा मलाही दोन tab दिसत होत्या. एक मतदान करायची तर एका तोपर्यंतच्या मतमोजणीची.
मी कालच सगळीकडे मतदान केले. आज सगळीकडे फक्त मतमोजणी दिसत आहे.
गेल्या वर्षी दोनेक दिवसांनी काहीतरी सेटिंग करून कोणाला मतमोजणी दिसणार नाही असे केलेले. तेच यावेळी देखील करणे योग्य राहील असे वाटते. उगाच सकाळ संध्याकाळ जाऊन बघावेसे वाटते Proud

माझी चूक झाली. मी फक्त अवलोकन टॅब पाहत होतो. रिझल्ट टॅब वर क्लिक केलं तर मी मत न दिलेल्या ठिकाणीही झालेलं मतदान दिसतंय.
जिथे मी मतदान केलं आहे तिथे फक्त झालेलं मतदान दिसतंय.

मी अद्याप कोणत्याही स्पर्धेसाठी मतदान केले नाही तरीही मला प्रत्येक स्पर्धेच्या टॅबवर मतगणना (मतदान) दिसत आहे.

लॉग out करून बघितलं तर दिसतय पण लॉग in असताना ज्या धाग्यावर मतदान केलं आहे त्याचीच मतं दिसत आहेत. राहुल तूम्ही ट्राय करून बघा.

माझा मुद्दा हा आहे की मी कोणत्याही स्पर्धेला मतदान करण्यापूर्वीच मतगणना बघू शकत आहे. त्यामुळे मी प्रभावित होऊन सर्वात जास्त मते मिळालेल्या व्यक्तीस माझं मत देण्याची शक्यता आहे.

@मनीमोहोर >>> ऊहूं, अगदी तसही केलं.

मतदान करण्यापूर्वी दोन टॅब्ज दिसतात. मतदान आणि रिजल्ट्स. मतदान न करता रिजलट्स टॅब वर क्लिक केल्यास आता पर्यंत झालेल्या मतदानाचे निकाल दिसतात.
एकदा मतदान केले की एकच टॅब दिसतो त्यात निकाल दिसतात.

लॉग आउट असताना बघितलं तर मतदान न केलेल्या दुव्यावरही मतमोजणी दिसतेय. पण लॉग इन केले असताना ज्या धाग्यावर मतदान केलं आहे त्याचीच मतं दिसत आहेत.

विजेत्यांचे अभिनन्दन, मान्यवरांचे आभार. बाकी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

मी उरलेले मिलेट भिजवून कबुतरांना खायला टाकून देणार. >>>>> अय्यो ! कायको?
फ्रीज मध्ये थोड्या थोड्या exotic vegetables उरल्या होत्या. त्या आणि बाकी इतर भाज्या मिळून मस्त मिलेट पुलाव केला होता. फार मस्त one dish meal झालं होतं. आता नेहमी करणार आहे. तुम्ही पण करून पहा.

निकालाचे धागे उशीरा आले. आता संयोजक दुसर्या गोश्तीन्मधे बिझी असतील. त्यांनी त्यांची कामं वेळेत पुर्ण केली होती. आता त्यांना निकाल पब्लिश करण्यात किती उत्साह राहिला असेल काय माहीत. हे असं झालं तर पुढे संयोजनात त्यांना किती इंटरेस्ट राहाणार?

निकालाचे धागे उशीरा आले...
>>>
इथे मतदानाचे धागे म्हणायचे आहे का? ते संयोजक नाही काढत का? Admin काढतात का किंवा त्यांची मदत लागते का?

असो, मी स्पर्धेत भाग घेतला होता. निकाल कळला नसता तर हुरहूर असती. पण मतदानाचे धागे चेक करून तो स्वतापुरता समजला आहे. त्यामुळे निकालाचा धागा कधीही आला तरी पर्सनली मला काही फरक पडत नाही. निकालासोबत प्रशस्तीपत्रके बनवायचे सुद्धा काम असावे. संयोजक कधीही आपल्या सवडीने हे करू शकतात. उशीरा झाला तर मजा गेली वगैरे असे काही नसते Happy

बाई दवे,
दिवाळीला सुद्धा काही करता येईल का बघा..
लोकं फटाके वाजवण्याऐवजी घरी बसून स्पर्धेत भाग घेतील Happy

रिया हे नक्कि का?
मला वाटत स्पर्धा,मतदान्,निकाल्,प्रशस्तपत्रक सगळ गणेशोत्सव सयोजकच करतात...म्हणजे तसच असण सयुक्तिक नाहिये का? .मतदानाचा धागा काढा याची आठवण करुन दिली तेव्हा काही दिवसानी कधितरी धागा आला होता.