व्हेज तंदूरी

Submitted by अवल on 3 September, 2012 - 05:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवरचे मोठे ४-५ तुरे
४ मध्यम आकाराचे बटाटे
१ मोठे गाजर
२ सिमला मिरच्या
४ कांदे
२ टॉमेटो
पनीरचे ७-८ मोठे तुकडे
घट्ट दही पाव किलो
आलं १/२ इंच
लसून ४ पाकळ्या
मिरच्या चार
चाट मसाला १ चमचा
मीठ चवी प्रमाणे
थोडे बटर

क्रमवार पाककृती: 

आलं, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.
दही, आलं-लसूण्-मिरच्यांचे वाटण, मीठ, १/२ चमचा चाट मसाला सगळे एकत्र करावे.
बटाटे सोलून त्याचे ४ भाग करावेत.
गाजरं सोलून त्यांचे १-१ इंचाचे तुकडे करावेत.
बटाटे, गाजर, फ्लॉवर जरा जास्त पाण्यात उकडत ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ आणि १/२ चमचा साखर टाकावी. १० मिनिटं उकडावे.
सिमला मिरच्यांचे १-१ इंचाचे तुकडे करावेत. टॉमेटोचे ४ भाग करावेत.
कांद्याचे ४ भाग करावेत ( मूळाकडचा भाग काढू नये. भाजताना बरे पडते.)
आता मसाला लावलेया दह्यात सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्यांना मसाला नीट चोळावा.
४ तास मिश्रण बाहेरच मुरवत ठेवावे.
ओव्हन १०० तापमानाला १० मिनिटं प्री हिट करावा.
प्रत्येक भाजीचा एक तुकडा येईल अशा पद्धतीने फॉईलमध्ये भाज्या घ्या. त्यावर ए छोटा चमचा (भातुकलीतला) बटर टाका. फॉईल गुंडाळून ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे शिजवा.
लोखंडाची कढई तापवा. त्यात प्रत्येक पुडीतल्या भाज्या मोठ्या आचेवर भाजा.
देताना चिमुटभर चाट मसाला भुरभुरवा.

वाढणी/प्रमाण: 
सहा जणांना पुरावे.
अधिक टिपा: 

बटाटा, फ्लॉवर, गाजर फार शिजवू नका, नाहीतर गाळ होईल.
दही शक्य तेव्हढे घट्ट घ्या. मी चक्क रात्री बांधून ठेवते फडक्यात, चक्क्यासारखे.
एका वेळेस एकाच पुडीतल्या भाज्या कढईत टाका. फार परतू नका. जरा जळकट होऊ द्या. शेवटचा हप्ता स्वतः साठी ठेवा. कारण त्याला जास्त छान जळकट चव येते Wink

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये हुयी ना बात ...... आताच तुझी नॉन-व्हेज तंदुरीची रेसीपी वाचून आले आणि व्हेज साठी विपू करायच्या आधीच रेसीपी हज्जर Happy
मस्त रेसीपी.... करुन सांगते कशी झाली ते Happy

विनार्च मी तशी सगळ्यांच्याच मनातलं ओळखते Wink
बित्तु धन्यवाद हे नाव दिल्याबद्दल. बदलावा का आय डी Uhoh Happy
दिनेश Happy मोस्ट वेल कम Happy

अवलतै, इथे लोखंडी कढई नाही हो (प्रत्येक वेळेला पालेभाजी करताना ह्या गोष्टीच वाईट वाटत आज अजुन एकदा Sad ) ........ पण नॉनस्टिक मध्ये होईल तसे नक्की करुन बघेन.
मस्त पाकृ. आहे Happy

अनु, नॉनस्टिक मध्ये पण होईल पण जळकट वासा साठी नंतर डायरेक्ट फ्लेमवर धर. रच्याकने इलेक्ट्रिक शेगडीला फ्लेम असते का ? किती मी बावळट Uhoh

मस्त रेसिपी... आणि तंदुरी खाताना जीवहत्येचे पापही नाही लागणार...
शाकाहारी लोकांचा विजय असो...

अरे छान पाकृ.
ते ओव्हन मध्ये नक्की कसे ठेवायचे तेवढं कळलं नाही.
भाज्या फॉईलवर पसरून ठेवायच्या आणि फॉईल रोल करत गुंडाळायची का?

मानव नुसतं ट्रेमधे स्प्रेड करून ठेव.
ही खूप जुनी रेसिपी. कालांतराने प्रयोग करत जस्ट ट्रेमधे पसरून ठेवणे असंही छान होतय हे कळलं. इव्हन नंतर कढईत भाजायचीही गरज नाही. पण आता एडिट नाही करता येत. ट्रेला आधी जरा बटर लावून घ्यावा. सो चिकटत नाही.
अमेरिकेतल्या ओव्हनमधे लेक असं चिकन करून खातो. कमी कष्टात होतॆ Wink
अंजू खरं तर नाहीत फार कष्ट. तुला का असं वाटलं बरं? मावेत कोरडं होईल. जरा बटर जास्त ढकल Happy

मस्त! हे असंच स्कुअर्सला लावुन ग्रिल करतो. असंच चिकन पण छान होतं.
बटाटे, गाजर, फ्लॉवर घेत नाही त्यामुळे ते उकडायची स्टेप वाचते. पण आता ते घेऊन त्याला मसाला लावून आवन मध्ये ट्राय करेन.

अंजू खरं तर नाहीत फार कष्ट. तुला का असं वाटलं बरं? >>> वाचताना वाटलं.

मावेत कोरडं होईल. जरा बटर जास्त ढकल >>> थँक्स, प्रयत्न करुन बघेन.