काजू, पिस्ता, बदाम, खजूर, मध, तीळ, कलिंगडाच्या बिया, रोल्ड ओट्स, मीठ , वेलची पूड.
१. काजू, पिस्ता आणि बदाम श्रीखंडाच्या वाटीने प्रत्येकी एक वाटी.
२. मला अरेबिक दुकानात 'प्रेस्ड डेट्स' या नावाची खजूर पेस्टच मिळाली. त्यातली साधारण एक वाटी घेऊन भिजवून ठेवली. तुम्ही बिया काढलेले खजूर घेतले असतील ते पाऊन वाटी पेस्ट होईल इतके घेऊन, एक तास भिजवून ठेवा . नंतर मिक्सर मधून 'घूरकावून' घ्या.
३. मध पाव वाटी.
४. कलिंगडाच्या बिया किंवा मगज पाव वाटी.
५. तीळ दोन-तीन मोठे चमचे.
६. मीठ अर्धा चमचा.
७. वेलची पावडर पाव चमचा.
८. ओटमील दोन-तीन चमचे.
१. सगळे घटक.
खजूर बिया काढून कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवला.
२. बदामाचे मोठे तुकडे करून घेतले. काजू व पिस्त्याचे तुकडे आधीच होते.
३. ओटमील व तीळ भाजून घेतले.
*
४. बदाम, काजू व पिस्त्याचे तुकडे भाजून घेतले. फार भाजायचे नाहीत, फक्त खुटखुटीत करायचे आहेत.
५. ओटमीलचे पीठ करून घेतले व भिजवलेल्या खजूरांची पेस्ट करून घेतली.
६. भिजवलेल्या खजुराची पेस्ट पुरणासारखी शिजवून घेतली. फार शिजवल्यास कडवट होते त्यामुळे सांभाळून शिजवावी लागते. पाणी आटून मऊ गोळा तयार होतो.
७. या गोळ्यात सगळा सुकामेवा, तीळ घालून चांगले मिसळून घेतले. त्यात मीठ आणि वेलची पावडर घालून झाकण न लावता वाफ काढली, गोळा गच्च व्हायला सुरू होतो. त्यावर शेवटी ओटची पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित मिसळले. आच मध्यम ठेवायची आहे. शेवटी मध घालून पुन्हा मिसळून घ्यायचे.
८. हा तयार गोळा फॉईल वर डब्यात घातला.
९. तासभर फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढला.
१०. हव्या त्या आकाराच्या ब्राऊनीज कापून त्यावर क्लिंग रॅप लावून ठेवले. पटकन एक 'ग्रॅब ॲन्ड गो' साठी सुटसुटीत. प्रोफेशनल बेकरीतल्या सारखी स्मार्ट दिसते.
प्रोफेशनल लूक -
मग खेळत स्टोन हेंज केले.
गंमत -
लेक तिथे बसून 'गॉर्डन रामसे' टाईप हिणवत होती. हे तिनेच स्वतः ला दिलेलं नाव आहे. हे काही बरोबर दिसत नाही वगैरे. तुझा नंबर येणं कठीण आहे. मी म्हटलं 'अगं, नैसर्गिक घटक घालायला सांगितले आहेत', तर मग' mud सारखं दिसलं पाहिजे का ? म्हणाली'. नंतर चव घेऊन 'I need a Jelly bean to revive my tongue' म्हणे. अशा वेळी घरातले Men of few words बरे वाटतात म्हणून जेलीबीन देऊन 'Woman with a few dictionaries of her own' ला कटवले. Men of few words ना आवडले.
***हे कितीही बिघडले तरी छानच लागते. एवढ्या 'प्रतिकूल' परिस्थितीत मी हे केले आता 'छान' म्हणा.
धन्यवाद,
अस्मिता.
१. चमचाभर सुकं खोबरं घालू शकता. आमचं दुकानातच राहीलं.
२. ही मूळ कृती हेब्बरची आहे , आणि तिने 'एनर्जी बार' म्हटलं आहे. पण तिच्यापेक्षा माझं टेक्स्चर मऊ झालं आणि ब्राऊनी झाली. तिचे जास्तच चकाकत होते म्हणून मला थोडी काळजी वाटली. पण अचानक 'चकाकते ते सारेच सोने नसते' ही म्हण आठवली. मराठी भाषेचे उपकार... !
३. तिनं अर्धी वाटी मध घातला, मी नाही घातला. कारण काहीच नाही, सवय नाही व व्हिडिओ पुन्हा बघितलाच नाही. मनानेच घातला.
४. मध गरम करू नये या आयुर्वेदिक टिपवर विश्वास असेल तर वगळा. मला ते उगाच जेवल्यानंतर झोपू नये टाईप वाटते. कोण ऐकते ??
५. नंतरही फ्रीजमध्ये ठेवून लवकर म्हणजे आठवडाभरात संपवा.
बरोबर! ह्यात पाक नाही. म्हणजे
बरोबर! ह्यात पाक नाही. म्हणजे अस्सल भारतीय प्रकार असणार! :यक्क्क्कः #कम्पल्सिव्हजोक
'फिग बार' सारखं 'ट्रेल मिक्स डेट्स बार' म्हणू. काही तरी डंबxxx अमेरिकन नाव दिलं की बरं वाटतं हल्ली.
अमित,
अमित,
'ट्रेल मिक्स डम्ब बार' कसं आहे.
ह्यातल्या ओमेगा ३-६-९ मुळे चपखल वाटतेय.
-------
धन्यवाद ममो.
नट्सने नटलेल्या नट ब्राऊनी
नट्सने नटलेल्या नट ब्राऊनी मस्त दिसत आहेत.
नट्सने नटलेल्या नट ब्राऊनी >>
नट्सने नटलेल्या नट ब्राऊनी >>> थॅंक्स सोनाली.
काल अश्याच प्रकारची एक खजूर
काल अश्याच प्रकारची एक खजूर अंजीर नटस वाली बर्फी/वडी खायला मिळाली प्रशांत कॉर्नर ठाणे बहुतेक. तेव्हा ह्या रेसीपीची आठवण झाली.
सुंदर पाककृती अस्मिता !
सुंदर पाककृती अस्मिता !
यात वाईट लागण्या सारखे आहेच काय?
'I need a Jelly bean to revive my tongue' ... हे खूपच मस्त वाक्य आहे. दुसर्यांच्या तोंडावर फेकायला....!!
आपल्याला कुणी म्हटले....तर कोण ऐकते!!!!
भिजवलेली खजूर पेस्ट शेवया खीर
भिजवलेली खजूर पेस्ट शेवया खीर मध्ये घातली की खीर फारच भारी होते. साखर मग जरा बेतानेच घालावी.
खरं का लंपन, घट्टही होत असेल
खरं का लंपन, घट्टही होत असेल नं ? आयडिया आवडली.
हो आंबटगोड, हे सगळं आपण कच्चही खाऊच शकतो. त्यामुळे वाईट लागण्यासारखं काहीच नाही. 'टंग रिव्हाईव्ह' करायला आपणही पाणीपुरी वगैरे खायला हवी अधुनमधून.
अमा, अंजिराची अजून यम् असेल असं वाटतंय. आज मलाही रेडिओ वर बार्बीतलं Dua Lipa हिचं 'डान्स द नाईट ' ऐकलं तेव्हा तुमची आठवण आली होती. आजकाल रोजच लागतेय आणि आवडतेय .
अस्मिता छान रेसिपी, क्लिन्ग
अस्मिता छान रेसिपी, क्लिन्ग रॅप केल्यावर एकदम प्रो दिसतायत..
स्पर्धेसाठी शुभेच्छा
रेसिपी, लिखाण आणि फोटो मस्त.
रेसिपी, लिखाण आणि फोटो मस्त. वाईट लागने की कोई गुंजाईश ही नही है.
रेसिपी आवडली . निगुतीने करेन
रेसिपी आवडली . निगुतीने करेन म्हणते.
छानच पाकृ. पहिला फोटो एकदम
छानच पाकृ. पहिला फोटो एकदम कातिल आलाय.
धन्यवाद मामी, वर्णिता,
धन्यवाद मामी, वर्णिता, स्वस्ति आणि प्राजक्ता.
करून बघा आणि सांगा/दाखवा.
छान रेसिपी...
छान रेसिपी...
फोटोही मस्त..
एवढं कलाकुसरीची आणि मेहनतीची रेसिपी तुलाच उत्तम जमू शकते..
करून पाहायला हवेत हे ब्राऊनी.
करून पाहायला हवेत हे ब्राऊनी. हेल्दी स्नॅक ऑप्शन आहे अगदी.
नट ब्राऊनी होय? मी चुकून पॉट
नट ब्राऊनी होय? मी चुकून पॉट ब्राऊनी वाचलं.
मस्त, अगदी मस्त दिसताहेत.
मस्त, अगदी मस्त दिसताहेत. हेल्दी ब्रेक्फास्ट...
हाहा, नट च पॉट 'चुकून' कसं होईल?
पॉट वगैरे 'चुकुन' वाचायचं
पॉट वगैरे 'चुकुन' वाचायचं असेल तर ४२०एथ ... आपलं ४९नथ पॅरललच्या वर या. बोलेतो ट्रू नॉर्थ स्टाँग अॅंड फ्री!
फार मस्त गं... माझ्यापुरतीच
फार मस्त गं... माझ्यापुरतीच करून पाहावी लागेल. आमच्या घरी हेल्थी पाकृचे कोणी फॅन्स नाहीत.
लेकीबद्दल अगदी अगदी माझ्या घरीपण हाच सीन असतो
मला पण एकदा खजूर पेस्ट मिळाली होती. मी का कोण जाणे ती फ्रिजमधे ठेवली थोडी वापरली होती आधी जिथून कापलं तो भाग ओपन राहिला पॅकचा आणि जो दगडूराम झाला त्या पेस्टचा. आता गरम पाण्यत ठेवून बघावं लागेल.
>>>>'पॉट ब्राऊनी'
>>>>'पॉट ब्राऊनी'
आत्ता अर्थ वाचला. कै च्या कै कमेन्ट!!!
कसली सॉलिड दिसतेय, मस्तच.
कसली सॉलिड दिसतेय, मस्तच.
भारी आहे (pun intended) बार!
भारी आहे (सर्व अर्थांनी pun intended) बार!
मनी वसे ते स्वप्नी दिसे,
नट च पॉट 'चुकून' कसं होईल?>>>
मनी वसे ते स्वप्नी दिसे, मोरोबा
लेकीबद्दल अगदी अगदी माझ्या घरीपण हाच सीन असतो >>> अंजली, थॅंक्स. वाळलेली खजूर पेस्ट गरम पाण्यात भिजवून ठेवलीस तर होईल मऊ.
रमड, रूपाली, मनमोहन, अदिती आणि अंजूताई, धन्यवाद.
यातच थोडे हेम्प सीड्स घातले
यातच थोडे हेम्प सीड्स घातले की झाली पॉट ब्राऊनी.
हेम्प सीड्सलाही हे तर भांगेचे बी म्हणुन भुवया उंचावतात लोक. निदान माबोवरचे तरी.
पाककृती, फोटो आणि लिखाणाची
पाककृती, फोटो आणि लिखाणाची स्टाईल सगळंच मस्त...
अगदी. सर्वच भारी
एकदम मस्त दिसतंय. फोटोही
एकदम मस्त दिसतंय. फोटोही भारीयेत.
धन्यवाद मामी (अजून एकदा)
धन्यवाद मामी (अजून एकदा)
धन्यवाद जाई
मानवदादा, हो. थोडं हेम्प+थोडी खसखस+ थोडे जायफळ घालून त्याला 'मम-माबोकर-एकतेचार-ब्राऊनी' म्हणता येईल.
अभिनंदन अस्मिता. !
अभिनंदन अस्मिता. !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन अस्मिता
अभिनंदन अस्मिता
धन्यवाद संयोजक. सुरेख आहे
धन्यवाद संयोजक. सुरेख आहे प्रशस्तिपत्र!
धन्यवाद माऊमैया.
धन्यवाद सर्वांना
या प्रवेशिकेला एकुण तेरा मतं मिळाली आहेत, त्यापैकी एक माझंच आहे. त्या बारा जणांचे विशेष आभार
Pages