Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर
माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परदेशी राहणाऱ्या
परदेशी राहणाऱ्या मायबोलीकरांचे फोटो पाहून आपण कशाला इथे झब्बू दिला असं झालं खरं माझं... >> नॉट अॅट ऑल! भारतातील फोटोही आहेत की मस्त! विशेषतः पावसाचे. मला ते ऋन्मेष च्या समोरचे ग्राउण्ड वाले तीन आवडले. पहिला फोटो पाहताना तेथे "आता खेळता येणार नाही" म्हणून बाजूला बॅटी वगैरे घेउन वैतागून बसलेली पोरेही डोळ्यासमोर आली
आपल्याकडचे पावसातले फोटो दिसतात तसे इतर कोठेही दिसत नाहीत. भारतात आल्यावर सहज फिरताना मला जाणवते की आपल्याकडे घराच्या आजूबाजूला निसर्गाचे इतके वैभव आहे ते इतर देशांत फार क्वचित दिसते. इथे स्नो असेल, सुंदर मेण्टेन केलेली नेबरहुड्स आहेत पण ते सौंदर्य वेगळे. मी एकदा पावसाळा सुरू होउन एक दोन महिने झाल्यावर भारतात आलो होतो. आमच्या सोसायटीत बाजूला इमारती व मधे बाग आहे. साध्या लहान फुलझाडांपासून मोठी आता चांगली वाढलेली झाडे आहेत. वरून खाली पाहताना नुसते रंगीत फुलांचे प्रकार मोजले तर २५-३० सहज होतील. इतके व्हायब्रंट रंग इतरत्र फार कमी आहेत. त्यात एरव्ही झाडांवर असलेली धूळ पावसाळ्यात सतत धुतली जाते व त्यामुळे त्यांचा मूळचा रंग उठावदार दिसतो.
इथे स्वच्छता, नीटेनेटकेपणा आणि अगदी घरांच्या बाहेरच्या फोटोत कटाक्षाने मेण्टेन केलेले "डेकॉर" यातून आलेले सौंदर्य आहे. भारतात तसे क्वचितच दिसेल. पण तरीही इतर भरपूर काही आहे.
तेव्हा ते ही फोटो टाका ते बघायला आवडणारे इथे बरेच आहेत.
हे खरं हरीण त्यानंतर
हे खरं हरीण त्यानंतर पहील्यांदा आलं तेव्हा खोट्या हरणाला बघून कंफ्यूज झालं वाटतं एकदम, कदाचित "तेजा मै हू मार्क इधर है" सारखं काहीतरी मनात म्हणत असेल >>> मंदार तो फोटो धमाल आहे.
उन्हाळ्यात इथे दिवस मोठा असतो
उन्हाळ्यात इथे दिवस मोठा असतो इतका कि मध्यरात्री हि सूर्य दिसतो (अगदी नॉर्वे सारखा नाही), पण आमच्या घरापासून अजून उत्तर दिशेला गेलो (आर्टिक सर्कल) तर अगदी सूर्य मावळतच नाही अशीही अवस्था असते. आमच्याकडे तरीही काही दिवस
मध्यरात्रीला सूर्य दिसतो. ह्या वर्षी हाच विचार मनात ठेऊन एक फोटो सिरीज करण्याच्या प्रयत्न केला, त्यात रात्री १२ वाजता अंधार झाला आणि ४am ला उजाडले सुद्धा त्याचे हे काही फोटो देतो (सिरीज आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त फोटो द्यावे लागत आहेत, संयोजकांनी माफी द्यावी)
आणि हे सगळे फोटो घराच्या बाल्कनी मधून काढलेत, डाउनटाउन मध्ये राहत असल्याने इतरांसारखे झाक दृश्य आमच्या इथून दिसत नाही त्या साठी आम्हाला जरा रॉकीज मध्ये जावे लागते :).. पण हेच फोटो गोड मानून घ्या
गणपती बाप्पा मोरया
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
@ दियु - कसला चित्रासारखा
@ दियु - कसला चित्रासारखा फोटो आहे.
@ मंदार - खरं खुरं हरीण आहे का ?
तिकडे बर्याच लोकांच्या फोटोत हरीण दिसतंय. इथे हरीण आलं असतं तर दुसर्या दिवशी ते लोकांच्या पोटात गेलं असतं.
@ मध्यलोक - इकडेही तुम्हीच बाजी मारताय. ( मोबाईलवरून आपोआपच मध्यकाल टाईप होतं )
जबरी फोटो, मध्यलोक! थोड्या
जबरी फोटो, मध्यलोक! थोड्या थोड्या वेळाने काढलेले असल्याने बदल चांगला कळतो. साडे दहाला सूर्यास्त व तासाभरात अंधार म्हणजे सुमारे तास दीड तास संधीप्रकाश असावा.
उत्तरेतील ठिकाणांमधे काही काही ठिकाणी हा संधिप्रकाशही खूप जास्त वेळ असतो असे अनुभवले आहे.
मध्यलोक मस्त, एक time lapse
मध्यलोक मस्त, एक time lapse video सुद्धा बनवा. सूर्य मावळतानाचा.. किंवा मेला मावळतच नाही त्याचा
आता खेळता येणार नाही" म्हणून
आता खेळता येणार नाही" म्हणून बाजूला बॅटी वगैरे घेउन वैतागून बसलेली पोरेही डोळ्यासमोर आली Happy
>>>>
पावसाळ्यात फुटबॉलचा खेळ रंगतो. चिखल पाण्याची पर्वा न करता खेळणारी मुले बघून आपल्यालाही फ्रेश वाटते.
बाकी क्रिकेट हे पहिले प्रेम आहेच. रस्त्याने जातानाही कुठे क्रिकेट खेळणारी मुलं दिसली की दोन बॉल बघूनच पुढे जातो. तिथे रोज घरबसल्या येता जाता खिडकीत उभे राहून दोन चार बॉल बघणे फार आनंददायी अनुभव वाटतो
नाही हो रआ, बाजी वगैरे काही
नाही हो रआ, बाजी वगैरे काही नाही, धागा पुढे नेतोय
जबरी फोटो, मध्यलोक! थोड्या थोड्या वेळाने काढलेले असल्याने बदल चांगला कळतो >> अगदी अगदी, हाच हेतू होता
साडे दहाला सूर्यास्त व तासाभरात अंधार म्हणजे सुमारे तास दीड तास संधीप्रकाश असावा. > हो
उत्तरेतील ठिकाणांमधे काही काही ठिकाणी हा संधिप्रकाशही खूप जास्त वेळ असतो असे अनुभवले आहे >> जेवढे उत्तरेला जाऊ तेव्हढा हा काळ मोठा आणि हिवाळ्यात अगदी उलट आता आमच्याकडे संध्याकाळी ५ pm ला अंधार होईल आणि ८/८:३० am ला उजाडेल (वो दिन अभी दूर नहीं)
दिवस छोटा झाला कि अगदी भकास वाटते
एक time lapse video सुद्धा
एक time lapse video सुद्धा बनवा. सूर्य मावळतानाचा >> ऋ जी, आयडियाची कल्पना भारी दिली, नक्की करतो हे
भारतातील फोटोही आहेत की मस्त!
भारतातील फोटोही आहेत की मस्त! विशेषतः पावसाचे. >> १०० टक्के
मला ते ऋन्मेष च्या समोरचे ग्राउण्ड वाले तीन आवडले >> + १
>>>>>> परदेशी राहणाऱ्या
>>>>>> परदेशी राहणाऱ्या मायबोलीकरांचे फोटो पाहून आपण कशाला इथे झब्बू दिला असं झालं खरं माझं...
अरे कोणी टाकलीये ही कमेन्ट. मी अजुन फोमो आहे. कॅचिंग अप.
असं काही नसतं. दोन्हीकडे आपापली बलस्थाने आहेत. इथल्या ‘राखलेल्या 'लॅन्डस्केप्स' चा कंटाळा येतो बरेचदा. मला wilderness आवडतो.
आमच तर भाड्याचं घर आहे. हेच जर भारतात असलो असतो तर स्वतःचं असतं. येइल ते आयुष्य ईश्वरी कृपा असते.
पण तरीही इतर भरपूर काही आहे.
पण तरीही इतर भरपूर काही आहे.
तेव्हा ते ही फोटो टाका Happy ते बघायला आवडणारे इथे बरेच आहेत.
Submitted by फारएण्ड on 28 September, 2023 - 21:10 >>> सर, टाकणार फोटो, सध्या तिन्ही उपक्रमात फक्त मोबाइल मधील फोटो डकवतोय, भारतातील फोटो Gड्राईव्ह ला आहेत, त्यातून घेतो काही
मस्त फोटो आहेत मध्यलोक!
मस्त फोटो आहेत मध्यलोक!
हा आजच्या इंद्रधनुष्याचा. खूप दिवसांनी मी असं स्पष्ट, संपूर्ण अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य बघितलं.
मस्त फोटो मध्यलोक
मस्त फोटो मध्यलोक
वावे इंद्रधनुष्य कसलं मस्त दिसतय (इथे व्हॉट्स ॲप वरची डोळ्यात बदाम स्मायली इमॅजीन कर)
वावे सुरेख!!
वावे सुरेख!!
डबल आहे.
वावे >>> कमाल
वावे >>> कमाल
खूप दिवसांनी मी असं स्पष्ट,
खूप दिवसांनी मी असं स्पष्ट, संपूर्ण अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य बघितलं.>>> मी सुद्धा
किती दिवस असे इंदधनुष्य
किती दिवस असे इंदधनुष्य दिसलेले नाही. सुंदर .
खूप सुंदर !!
खूप दिवसांनी मी असं स्पष्ट,
खूप दिवसांनी मी असं स्पष्ट, संपूर्ण अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य बघितलं. >>> ते बाहेरचेही अस्पष्ट का होईना पण सलग दिसत आहे. त्या तीन बॅण्ड्स मधल्या आकाशाच्या रंगांचा फरकही नेहमी इंटरेस्टिंग वाटतो. तो खराच आहे असे नेहमी वाटते पण तो नजरेचा भ्रम असतो असे दिसते.
उत्तरेतील ठिकाणांमधे काही
उत्तरेतील ठिकाणांमधे काही काही ठिकाणी हा संधिप्रकाशही खूप जास्त वेळ असतो असे अनुभवले आहे >>> दक्षिणेला दक्षिण अमेरिकेच्या टोकाच्या देशात, न्युझीलंडला हे वातावरण असते.
मी अंटार्क्टिकावर समर सीझनला होतो दोन्ही वेळा. ध्रुवापासून थोड्या अंतरावर असल्याने सूर्य गोल गोल फिरतो. मकर संक्रांतीनंतर मात्र तो उत्तरेला जाऊ लागला कि सावल्या पडू लागतात.
परदेशी राहणाऱ्या
परदेशी राहणाऱ्या मायबोलीकरांचे फोटो पाहून आपण कशाला इथे झब्बू दिला असं झालं खरं माझं...
>>>छे! छे!! काहीही काय! डगमगनेका नै अजिब्बात. "आज तुम्हारे पास स्नो है, हरणं है, झालंच तर नॉर्दर्न लाईट्स है पण मेरे पास तो भारतमां है" असा डायलॉग मारून आपले फोटो टाकायचे.
वावे ह्यांना झब्बू
वावे ह्यांना झब्बू
(घर समोरून वाहणाऱ्या नदी पात्रातून फोटो घेतला आहे, नदीचे नाव: Bow )
वा वा वावे. डबल इंद्रधनुष्य
वा वा वावे. डबल इंद्रधनुष्य.
मध्यलोक,
मध्यलोक,
मायबोलीवर दिसत नाहीत तुम्ही, तरीच एव्हढे फोटो काढायला वेळ मिळालाय
कसलाही फोटो टाका. झब्बू आहेच.
धावायला म्हणून बाहेर पडलो
धावायला म्हणून बाहेर पडलो होतो, धावता धावता दोन उभे फोटो घेतले होते, ते जॉईन केले आहे. एक थोडे पात्रात उतरून तर दुसरा जॉग्गीग ट्रॅक वरून. ह्यात अंधुकसा दुसरा इंद्रधनुष्य हि दिसतोय
Pages