चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१० - खेळाचे साहित्य

Submitted by संयोजक on 28 September, 2023 - 05:59

मायबोलीकरांनो आजचा विषय आहे 'खेळाचे साहित्य'. लहानपणापासूनच निरनिराळ्या खेळांनी आपले मनोरंजन करण्यामध्ये आणि आपले स्वास्थ्य चांगले राखण्यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला असतो. कधी कधी आपण स्वतः जरी खेळ खेळत नसलो तरीही तो खेळ दुसऱ्यांना खेळताना बघूनसुद्धा आपल्याला आनंद आणि समाधान मिळत असते. अशाच या खेळांच्या साहित्याचे प्रकाशचित्र तुम्हाला या झब्बूच्या धाग्यासाठी द्यायचे आहे. चला तर मग, उत्सवाच्या या शेवटच्या विषयासाठीसुद्धा भरघोस प्रतिसाद येउद्या.

खेळाचे नियम आणि अटी
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला सुरुवात मीच करतो पुन्हा,
२५ वर्षे जुना कॅरम स्ट्राईकर Happy

आणि सोबत त्याची रिक्षा सुद्धा फिरवतो
https://www.maayboli.com/node/81663

IMG_20230928_153408.jpg

Badminton ला झब्बू...
कोरोना काळातला फोटो आहे. तेव्हा हे मैदानी खेळाचे आवडीचे साहित्य आणि लॉकडाऊनमुळे टेरेस हेच त्या खेळाचे मैदान होते Happy

FB_IMG_1695900657786.jpg