चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-३ - प्रवेशद्वारावरील तोरण

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:19

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय आहे - प्रवेशद्वारावरील तोरण

सणासुदीचे दिवस म्हटलं की घराची साफसफाई, सजावट ही करावीच लागते. घराच्या सजावटीमध्ये मुख्य दारावरील तोरणाचा ही मोठा सहभाग असतो .सणाच्या दिवशी आपण पारंपरिक पध्दतीने दाराला तोरण बांधतो. घरात कोणतही शुभकार्य असेल तर दाराला तोरण बांधले जाते. घरा-दारावर तोरण बांधून पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा अगदी पुरातन काळापासून चालत आली आहे. एखाद्या घराच्या दारावर तोरण दिसले म्हणजे काहीतरी शुभकार्य आहे असेही मानले जाते. आजकाल काचेची , मोत्यांची , कृत्रिम पानाफुलांची अनेक तोरणं बाजारात मिळतात.
तुम्हीही आजपर्यंत अशी बरीच सुंदर तोरणं पहिली असतील... मग पाठवा बर त्याची प्रकाशचित्रे आम्हाला...

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वतः पॅटर्न डिझाईन करून विणलेली मोरपीस तोरणे

IMG-20230926-WA0011.jpg

वा, साक्षी, हा धागा बघतांच ही तुझी मोरपीस तोरणंच आठवली होती, वाटच बघत होते या फोटोची.
अप्रतिम कलाकारी !!

धन्यवाद सगळ्यांना... मामी खूपच सुंदर आणि नाजूक दिसतय...
अश्विनी क्रोशाने दोऱ्याचे विणलेले आहे.

सगळीच तोरणं छान आहेत.
मामी खूप सुंदर नाजूक आणि आकर्षक आहे तुमचं तोरण. खुप आवडलं!

ताजं ताजं... गणेशोत्सवानिमित्त केलेलं
IMG-20230926-WA0006.jpg