चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा शांत परिसर आहे लाँग आयलंड, न्यु यॉर्क. शहराच्या गजबजाटापासून दूर आणि तरीही सार्वजनिक वाहतूकीच्या सर्व साधनांनी सुसज्ज. या खिडकीशी छंद म्हणुन, माझे स्तोत्रे, गुरुग्रंथसाहीब यांचे वाचन, पठण चाललेले असते. होम ऑफिसही याच कोपर्‍यात थाटलेले आहे.

पुढच्या फोटोत मुलीच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारा परिसर टाकेन.

https://lh3.googleusercontent.com/pw/ADCreHeDbovYdUi0exa-iBJseNnLElYlSocomPa1bvBjLiskO5RmOPU15t2pflQfDqSG5EI1yOeyprKDxgk0hAfZ1QB16KG2SgWI8M5g3J9aQr4yiH-mypQndGNiBM8REPnFccNat6dtKI3kg6hcQqBFh8sVHA=w1166-h875-s-no?authuser=0
.
समोरच्या बंगल्याला कुंपण आहे. मग आमचं कॉम्प्लेक्स आणि मधे हिरवळ आहे. मला या हिरवळीवर खरे तर रोज अनवाणी पायांनी चालायचे असते पण हिंमतच होत नाही, कोणीतरी हटकेल म्हणुन. शेवटी आपल्या मालकीचं वेगळच असतं. इथे कोणीतरी कष्टाने राखलेली हिरवळ कशी तुडवायची? मग क्वचित एका बागेत जाउन, लोकांना फिरण्याकरता राखलेल्या हिरवळीवरती अनवाणी चालते.

पण नको सुरुवातीलाच जुना फोटो...
हा लेटेस्ट परवाच तेरवाचा पावसाळी..
ढग दाटून आलेत.. कोसळण्याच्या बेतात आहे..

Screenshot_2023-09-26-16-52-57-50_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

स्पर्धेसाठी म्हणून पहिल्यांदाच देतोय. आता सोसायटीतले चाणाक्ष एॅंगल बघून अचूक खिडकी ओळखतील Lol
Screenshot_20230926_165511_Gallery.jpg

या जागेपेक्षा लहान असतानाचे घर आणि आई वडील राहतात ते घर यांच्याशी इमोशनली कनेक्टेड आहे.

सामो,काय देखणं घर आहे. हेवाच वाटला क्षणभर.
मला आठवड्यासाठी पाहिजे भाड्याने.

धन्यवाद आचार्य.

समोरचं घर फार टुमदार आहे. ते लोक मस्त फळझाडांचे वेल चढवुन बागेत मंडपही घालतात. सतत बागकामात व्यग्र असतात. वयस्कच बाई दिसते व तिचा मुलगा वाटावा इतपत वयाचा तरुण.

ऋन्मेष हे असं पावसाळी वातावरण फार छान वाटतं.
>>>>

आताही जवळपास असेच आहे.
अर्ध्या तासाने मी काम थांबवून किंवा ब्रेक घेत चहाचा कप घेऊन अर्धा पाऊण तास बाल्कनीत बसेन.. वर्क फ्रॉम होम चे रूटीन आहे हे. दिवसभराचा कामाचा थकवा जातो सारा Happy

सामो या घराचे मालक कोकणी आहेत का ? Proud

आमच्या कडे पण या.येत्या रविवारी पायर्‍यांवर सोसायटीतल्या हौशी कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आहे ( हे आधी फोडायला नव्हते पाहिजे). Lol
डॉक्टरची सोय पण आहे.

>>>>>>>सामो या घराचे मालक कोकणी आहेत का ?
हाहाहा. कोरिअन आहेत. आमच्या जवळ कोरियन वस्ती खूप आहे आणि ज्यू. gentrification झालेले आढळते.
-------------------
मी अमेरीकेत पहील्यांदा डिस्क्रिमिनेशन पाहीले. आम्ही एका बागेत (पार्क) जात असताना आम्हाला गेटकीपर बाईने झिप कोड विचारला व सांगीतले की आम्हाला त्या बागेत जाण्याची मुभा नाही. आमच्या झिप कोडकरता म्हणे ती बाग नव्हती फक्त आसपासच्या लोकांकरता होती. इतका अ‍ॅफ्लुअंट (उच्चभ्रू, श्रीमंत) परिसर होता. फक्त मॅन्शन्स चे मॅन्शन्स होते.
मला इतकं अपमानास्पद वाटलं प्रचंड.

Untitled_0.jpg
माझा फेवरेट फोटो, आमच्या घराबाहेरचे स्नो लँडस्केप,

>>>>>सतत काही न काही कोरत असतील.
आसपास, कोरिअन फुड मुबलक मिळते. त्यांचा तो ड्राय पॉट अन हॉट पॉट मला अजिबात आवडत नाही ग बाई. इतकं मीट असतं. म्हणजे आपण ऑर्डर करण्यावरती आहे. यु कॅन ऑर्डर वेजीज पण नवरा आणि मुलीला ते मीटच आवडतं. मला अजिबात आवडत नाही.

वाह घराबाहेर हरीण किंवा जो काही प्राणी असेल.. भारी आहे..
इथे रोज खारुताई बघून माझे मन प्रसन्न होते.. हरीण बघणे किती भारी वाटत असेल..

>>>>>आमच्या कडे पण या.
Happy धन्यवाद.
>>>>>>>रविवारी पायर्‍यांवर सोसायटीतल्या हौशी कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आहे ( हे आधी फोडायला नव्हते पाहिजे). Lol
डॉक्टरची सोय पण आहे.

हाहाहा

र आ - हो घराच्य मागच्या बाजूला पाँड आणि वूडेड एरिया आहे, हा घराच्या खिडकीतून विंटर मधे काढलेला फोटो आहे.
सामो हो खरीच आहेत गं हरणं. रोजच दिसतात. आमच्या भागात हरणे, ससे, कायोटी, कोल्हे , रॅकून, स्कन्क्स, समर मधे कासवं हे कॉमन आहे. क्वचित अस्वल दिसते.

>>>>>आमच्या भागात हरणे, ससे, कायोटी, कोल्हे , रॅकून, स्कन्क्स, समर मधे कासवं हे कॉमन आहे. क्वचित अस्वल दिसते.
वाह!! किती मस्त. रकुन्स, ससे फार गोंडस असतात. अस्वल, कोयोटी, कोल्हे सुद्धा? वॉव.

घरासमोरच्या झाडीत क्वचित रेड टँजर, कार्डिनल, स्टारलिंग्ज किलबिलाट करताना, सुळकन सूर मारताना दिसतात. कार्डिनल दिसला, की मग मी समजते लकी ओमेन Happy इथे कार्डिनल दिसला की पूर्वजांनी भेट दिली असा समज आहे.

It's said that cardinals appear when angels are near and that the cardinal represents loved ones who have passed away. They are seen as messengers from Heaven who deliver words of love and comfort during difficult times.

अंधश्रद्धेपेक्षा मनाला एक सकारात्मक चाळा म्हणुन मला ते बरे वाटते.

वॉव, भारी फोटोज.

हा या वर्षी फेब्रुवारीमधे आमच्या गॅलरीतून काढलेला. टायमिंग आणि नशीबाने जोरदार साथ दिल्यामुळे घरबसल्या नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळाले.

IMG_E9221.JPG

वर पूलचा उल्लेख झाल्याने हा त्याला झब्बू
नवीनच राहायला गेलो तेव्हाचा फोटो आहे. म्हणून इतका शांत. त्यानंतर सोसायटीतील पोरांनी पूर्ण पैसा वसूल केला आहे Happy

FB_IMG_1695728498403.jpg

Pages