कांदा १ चिरुन
हिरव्या मीरच्या २ लांब चिरुन
तेल पळीभर
शेंगदाणे मूठभर
कोथींबीर चिरुन
लिंबु अर्धा
ओले खोबरे कीसुन
मोहरी, जीरे, हळद, मीठ
नाचणीचे पोहे (Ragi flex) कपभर
पाणी पाव कप
काल अमांच्या मिलेट पुलाव धाग्यावर विषय निघाल्याने संध्याकाळी दुकानात गेलो तेव्हा नाचणी पोह्यांचे पाकीट बर्याच दिवसांनी आणले. नेहमी यांचा पातळ पोह्यांचा चिवडा करतो तसा करायचो, पण या पाकीटावर कांदे पोहे सारखी पाकृ लिहिलेली दिसली तेव्हा आज सकाळी नाश्त्याला तसेच करायला घेतले.
जवळपास तयार होत आले तेव्हा क्लिक झाले की अरे हे तर माबोच्या मिलेट्स पाकृ स्पर्धेत मोडतील.
पण तयारीचे, मधले फोटो काढले नव्हते, भांडी हाताला लागतील ती घेउन वापरली होती. तरीही कढईत असताना एक फोटो आणि प्लेटमध्ये घेतल्यावर एक फोटो काढुन घेतला.
फोटो वाड्यावर पोस्ट केला तिथे चांगले दिसताहेत म्हणुन मृणालिनी आणि अमांनी सांगीतले.
मग विचार केला शेवटी ही स्पर्धा म्हणजे मिलेट्सच्या जागरुकतेसाठी एक मोहीम आहे (टाळ्या वाजवा काहीजण), स्पर्धेसाठी नव्हे तर या मोहीमेसाठी सादरीकरणासारख्या गौण बाबींना अजिबात महत्व न देता केले त्या अवतारात सादर करणे हे एका जागरुक नागरीकाचे कर्तव्यच नव्हे काय?. (परत थोड्या टाळ्या येऊ द्या).
मग तडक पाकृ लिहायला बसलो.
तर ..
हे नाचणीचे पोहे:
.
कृती:
कढईत तेल तापवून मोहरी, ते तडतडलेकी जीरे, ते तडतडले की शेंगदाणे घालुन मिनिटभर परता. मग हिरवी मिरची आणि कांदा घाला, मीठ घाला. कांदा सोनसळला की हळद घालुन मग त्यात कोरडेच नाचणीचे पोहे घालुन चार पाच मिनिट परता.
मग साधारण पाव कप पण अंदाजाने पाणी शिंपडुन हलवा, सगळे पोहे ओलसर आणि मऊसर व्हायला हवेत, याला साधारण मिनिटभर लागतो. मग गॅस बंद करुन लिंबु पिळुन आणि कोथिंबीर घालुन मिसळुन घ्या. वर खोबरे पण घाला ( मी ते विसरलो.)
नाचणीचे कांदे पोहे तयार आहेत.
एकदा केले होते पण जमले नव्हते
एकदा केले होते पण मला जमले नव्हते म्हणजे चव विशेष आवडली नाही. माकाचू ?
छान. करून बघेन.
छान. करून बघेन.
मस्त आहे पाककृती आणि फोटो.
मस्त आहे पाककृती आणि फोटो.
छान पाककृती व फोटो. एकदा
छान पाककृती व फोटो. एकदा करून बघेन. मी खरेतर पूर्ण पणे कार्ब सोडायला पाहिजे पण मला काही जमत नाही. तुम्ही म्हणता तसे चिवडा करून बघीन. आता दिवाळीचे फराळाचे जिन्न स पाकृ टाकायचा सीझन येतोच आहे.
रोचक!
रोचक!
छान.
छान.
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद मंजुताई, लंपन, मृणाली
धन्यवाद मंजुताई, लंपन, मृणाली, अमा, हपा, सामो, रआ.
मंजुताई, तुम्ही करून पाहिले म्हणजे त्यात काही चुकले असेल कल्पना करवत नाही. फार तर रागी फ्लेक्स चव तुम्हाला आवडत नसावी असा अंदाज करू शकतो. किंवा कदाचीत तुम्हाला तेव्हा जसे मिळाले असतील त्यात चवीत फरक असेल.
इंटरेस्टिंग आहे. इथे मिळतात
इंटरेस्टिंग आहे. इथे मिळतात का बघते नाचणीचे पोहे.
>>> कांदा सोनसळला
बै बै कांदा लाजला असेल वाचून. आवडला शब्दप्रयोग.
मिलेट्सच्या जागरुकतेसाठी एक
मिलेट्सच्या जागरुकतेसाठी एक मोहीम आहे>>> मी उगाच खडबडून जागी झाले.
छान लिहिलेय , खुसखुशीत.
चांगली वाटतेय. फोटो वरून अंदाज आला.
स्वाती धन्यवाद, तो योकुचा
स्वाती धन्यवाद, तो योकुचा शब्द आहे.
धन्यवाद अस्मिता.
मस्त आहे प्रकार. इकडे असे
मस्त आहे प्रकार. इकडे असे फ्लेक्स पाहिल्याचे आठवत नाहीत. नाचणीच्या रुपड्यामुळे आमच्याकडे कोणी खायलाच बघत नाही (मी सुद्धा)
>>> तो योकुचा शब्द आहे.
>>> तो योकुचा शब्द आहे.
ओह बरं बरं.
>>>>>>नाचणीच्या रुपड्यामुळे
>>>>>>नाचणीच्या रुपड्यामुळे
हाहाहा खरय!!
>>>>>>>>>मी उगाच खडबडून जागी झाले.
हाहाहा
छान पाककृती..
छान पाककृती..
मी कधी पाहिले नाही नाचणीचे पोहे..
आता नक्की आणेन हे पोहे..
अभिनंदन मानव !
अभिनंदन मानव !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन मानवदादा !
अभिनंदन मानवदादा !
मानवजी, अभिनंदन!
मानवजी, अभिनंदन!
धन्यवाद संयोजक, अस्मिता,
धन्यवाद संयोजक, अस्मिता, प्राचीन.