लेखन उपक्रम-१ - मी ...... झालो/झाले तर.(तुमच्या कल्पनेतील व्यक्ती )

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 16:58

लोकहो, आपल्या आयुष्यात आपण अनेक तर्हेच्या व्यक्ती पाहिलेल्या असतात आणि त्या व्यक्ती करत असलेली कामेसुद्धा. अशी व्यक्ती कोणीही असू शकते, आपले शिक्षक, प्राचार्य, आपण काम करत असलेल्या कंपनीचा मालक किंवा समाजातील एखाद्या पदावर असलेली व्यक्ती. अशा व्यक्तींचे काम पाहताना कधी कधी असे वाटते कि "अरे, याने जर असे केले असते तर किती बरे झाले असते किंवा याच्या जागी जर मी असतो/असते तर असे केले असते. शाळेत असताना तर प्रत्येकाने मी प्राध्यापक झालो तर किंवा अशा संबधी निबंध नक्कीच लिहिला असेल. या उपक्रमात सुद्धा हेच करायचे आहे. मी ---- झालो तर यामध्ये रिकाम्या जागी तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल लिहिणार असाल त्याच्या पदाचे नाव लिहायचे आहे आणि तुम्ही काय केले असते ते लिहायचे आहे. कोण जाणो यामध्ये कोणालातरी खूप नाविन्यपूर्ण अशा कल्पना सुचतील आणि काहीजण त्या अमलात सुद्धा आणतील. तर चालू करा लिहायला.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव लेखन उपक्रम -१ - मी ...... झालो/झाले तर. यामध्ये रिकाम्या जागी तुम्ही ज्या व्यक्तीच्या पदाबद्दल लिहिणार आहेत ते पद लिहावे ..- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे.
3. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा शाळेत जाण्याचा आनंद मिळेल या उपक्रमात.

श्रीगणेशा केला या उपक्रमाचा.

हा धागा गणेशोत्सव ग्रूपमधे नाही, त्यामुळे 'कटी पतंग' झाला आहे. दिसत नाहीये. कृपया , ह्याला ग्रूपमध्ये टाकावे. Happy

खरे तर 'व्यक्ती' या मर्यादेमुळे अनेक पर्याय टाळले गेलेले आहेत - फुलपाखरू, उद्गारचिन्ह, कविता वगैरे वगैरे.
अर्थात मला त्या संदर्भातही काही सुचत नाहीये. नाहीतर मी लिहीले असते.