Submitted by संयोजक on 25 September, 2023 - 01:58

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)
पहिलं प्रेम,पहिली नोकरी,पहिला पगार या गोष्टींचं जसं जरा जास्तच कौतुक किंवा नवलाई असते, तसंच पहिल्या विमानप्रवासचही असतं. नाही का...हा प्रवास विमानतळापासूनच आपण फोटोंच्या / प्रकाशचित्रनाच्या रुपात जपून ठेवतो.
मग अशीच विमानतळाची तुम्ही काढलेली प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाँगकाँग विमानतळ
हाँगकाँग विमानतळ
बेंगलोर विमानतळ
बेंगलोर विमानतळ (हा रिसेंट फोटो आहे, पहिला विमानप्रवास नाही, चालेल का फोटो)
पहिल्या विमानप्रवासाच्या वेळी
पहिल्या विमानप्रवासाच्या वेळी फोटो काढलेले नाहीत काढले असते तरी तेव्हा रीळाचा कॅमेरा होता.
माझ्याकडे तेव्हा कॅमेराही
माझ्याकडे तेव्हा कॅमेराही नव्हता.
पण पहिल्या विमानप्रवासाचे नसतील तर आपल्या (सध्याच्या) कॅमेराने टिपलेल्या पहिल्या विमानप्रवासाचे फोटो द्यायला हरकत नसावी.
हा एक लेटेस्ट.. थोडा वेगळा
हा एक लेटेस्ट.. थोडा वेगळा फोटो
जाऊ तिथे म्याऊँ
ऋ गोड दिसतायत मुलं.
ऋ गोड दिसतायत मुलं.
>>>>>>>ऋ गोड दिसतायत मुलं. +१
>>>>>>>ऋ गोड दिसतायत मुलं.
+१
धन्यवाद, ममो आणि सामो
धन्यवाद, ममो आणि सामो
कोणीतरी पुढचा फोटो टाका रे.. मला चंद्र यान टाकायचे आहे
ऋ गोड दिसतायत मुलं. >>>> +100
ऋ गोड दिसतायत मुलं. >>>> +100
१५ ऑगस्टला सजलेलं मुंबई
१५ ऑगस्टला सजलेलं मुंबई विमानतळ
(No subject)
पहिल्या विप्रचे द्यायचेत का ?
पहिल्या विप्रचे द्यायचेत का ?
शोधायला लागतील.
जाऊ तिथे म्याऊँ >>>> डोळ्यात
जाऊ तिथे म्याऊँ >>>> डोळ्यात बदाम
आता पुन्हा म्हणाल हा इकडे
आता पुन्हा म्हणाल हा इकडे सुद्धा आला त्यामुळे माझी माघार.. तुम्ही म्हणाल तरच फोटो टाकेन
पण माझा नाही तर बायकोचा पहिला परदेश प्रवास, तिने तो डॉक्युमेंट हि केला आणि त्याचा विडिओ हि बनवला होता.. इनफॅक्ट इथूनच तिचा तूनळीकर म्हणून हि प्रवास सुरु झाला.. पहिला विदेश प्रवास आणि पहिला तूनळी विडिओ... भारत ते कॅनडा प्रवास करताना तिचे डोळे आणि मन दोहींनी भरून आलेले.. पहिल्यांदा घरच्याना सोडून इतक्या दूर आम्ही निघालो होतो तेही कोविड काळानंतर लगेच. उत्सुकते पेक्षा भीतीच जास्त होती, घरचेही काळजीत होते. प्रवास सुखरूप झाला आम्ही इथे पोहोचलो.
ह्या उपक्रमामुळे खूप दिवसांनी ह्या विडिओ आणि आठवणींची उजळणी झाली..संयोजकांनाचे आभार _/\_
विडिओ नसेल चालणार तर पोस्ट माघारी घेतो, पण आठवणींचा उजाळा झाला त्या बद्दल धन्यवाद..
rmd आणि ऋ नी जोरदार सुरुवात केली.. उपक्रमात लवकरच शंभर प्रतिसाद येवो
आणि जाता जाता व्हिडिओ आवडला तर सांगा, बायकोला तसे कळवतो.. म्हणजे जरा उद्या गोडधोड ची सोय होईल
व्हिडिओ लिंक
https://youtu.be/EPLRfUAwzCo?si=N-TLUpieDw-VxPf8
सही फोटो एकेक.
सही फोटो एकेक.
ऋ गोड दिसतायत मुलं. >>> अगदी अगदी.
मध्यलोक व्हिडिओ मस्त. माऊंटन कपल नावाने तुम्ही vlogs करता का. नजरेखालून गेल्यासारखे वाटतात. मी हल्ली लहान लहान मराठी vlogs बघते अगदी भारतातल्या खेडेगावापासून ते युरोप, अमेरिका, जर्मनी. तुम्ही मराठीतून vlogs करा, माहिती वगैरे ऐकायला आवडेल. हा ही छान होता, लहान होता, मला आवडतात असे लहान.
बायकोला तसे कळवतो.. म्हणजे
बायकोला तसे कळवतो.. म्हणजे जरा उद्या गोडधोड...
>>>>
मी एक लाईक सुद्धा वाढवला... होईल सोय आता
बाई दवे.. माबोवर इतके अमेरिकेची जनता असताना हा धागा मोकळा कसा.. पाहिलाच प्रवास हवा हा हट्ट कश्याला संयोजकांचा.. तोडा हा नियम.. तसेही बाप्पा गेले आता
जुनी प्रिंटेड प्रचि असल्याने
जुनी प्रिंटेड प्रचि असल्याने १२०० पिक्सेल ने स्कॅन केले. त्याच्या स्क्रीनशॉट चा स्क्रीनशॉट घ्यावा लागतोय. नंतर साईझ माबोमान्य झाली पण चित्र एकदम अस्पष्ट दिसते. फोटो रिस्टोरेशन चं App आहे का?
वास्को द गामा - पहिल्या विमान
डपो
(No subject)
शेवटचा आहे तो विमानतळ परिसर आहे आणि बाकी सर्व विमानतळ च्या वरचे परिसर आहे
(No subject)
तारीख - १६ ऑगस्ट २००८ .
तारीख - १६ ऑगस्ट २००८ .
स्थळ - कोलकता एअरपोर्ट
माझं नवीनच लग्न झालं होतं आणि माझा पहिलाच विमानप्रवास होता तेव्हाची गोष्ट..
दार्जिलिग, शिलाँग, गुवाहाटी फिरून कोलकता मार्गे मुंबई असा परतीचा प्रवास सुरु असताना कोलकता - मुंबई फ्लाइटला तीन तास उशीर झाला होता. आमच्या सोबत असणारे एअरपोर्टच्या आजूबाजूचा परिसर फिरायला निघून गेले. .!
मी आणि माझे पती आम्ही दोघे एअरपोर्टवरच थांबलो. आम्ही जिथे बसलो होतो तिथेच बाजूला एक शीख दांपत्य बसलेले होते. त्यांचा गोड चिमुरडा त्यांच्यासोबत होता. त्यांची लखौनोची फ्लाइट होती. त्यादिवशी नेमके रक्षाबंधन होते..
थोड्या वेळाने त्या शीख बांधवाची पत्नी माझ्याजवळ आली आणि म्हणाली,
" प्लीज आप इनको आज राखी बांधोगी क्या ?? इनकी बहन अमेरिका में रहती है.. उन्होंने राखी भेजी है अपने भाई के लिए...!!"
मी आनंदाने राखी बांधायला तयार झाले.. खरंतर मी खूप भावूक झाले त्यावेळेस...सख्खा भाऊ नसलेल्या मला देवाने त्या दिवशी रक्षाबंधन साजरा करायला भाऊच पाठवला .. तो पण थेट एअरपोर्टवर..!
रक्षाबंधन सारखा पवित्र सण मी ध्यानीमनी नसताना कोलकताच्या एअरपोर्टवर एका अनोळखी कुटूंबासोबत साजरा केला.. तो प्रसंग आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात साठवलेला आहे.
मला आता त्यांचं नाव पण लक्षात नाही.. पंधरा वर्षापूर्वी रक्षाबंधनच्या दिवशी कोलकता एअरपोर्टला भेटलेला हा शीख बांधव आणि त्याचे कुंटूंबिय जिथे असेल तिथे सुखरूप असू दे .. हि देवाकडे प्रार्थना..!.
सर्व फोटो सुंदर आहेत
सर्व फोटो सुंदर आहेत
किती सुरेख अनुभव आहे रूपाली, फोटोही गोड आहे. एकदम शांत वाटलं बघून.. !
अनुभवही गोड आहे फोटोही सुंदर
अनुभवही गोड आहे फोटोही सुंदर आहे रुपाली.
खूप छान आठवण @रूपाली
खूप छान आठवण @रूपाली
किती गोड रुपाली, फोन नं वगैरे
किती गोड रुपाली, फोन नं वगैरे नव्हता का, नाव जरी थोडं आठवत तरी फेसबुकवर शोधून बघता येईल. त्यांनीही तुमचा नं वगैरे घेतला नाही का. किती टचिंग आठवण आणि दुर्मिळ क्षण.
सर्वांचे फोटो सुरेख.
आयुष्यात एकदाच विमानप्रवास केलाय, मुंबई ते गोवा १९९६ मधे, माझ्या मुलाचं काढलेलं पहीलं तिकीट विमानाचं होतं. तो एकमेव विमानप्रवास. फोटो नव्हते काढले.
रूपाली विशे-पाटील - छान अनुभव
रूपाली विशे-पाटील - छान अनुभव आणि फोटो. इतर "परिसर" फोटोंच्या तुलनेत हा एकदम वेगळा वाटला.
अरे वाह.. किती मस्त अनुभव !
अरे वाह.. किती मस्त अनुभव !
आधी पटकन मला फोटो बघून वाटले तुमचीच फॅमिली. त्यामुळे कन्फ्युज झालो आणि तुमची दोन्ही आडनावे पुन्हा वाचली
किती वेगळा अनुभव रूपाली
किती वेगळा अनुभव रूपाली
छान फोटो.
पहिल्या विमानप्रवासाचे फोटो नाहीत. नंतरचे काही आहेत.
छानच आठवण आहे रुपाली!
छानच आठवण आहे रुपाली!
रूपाली, हृद्य अनुभव.
रूपाली, हृद्य अनुभव.
या धाग्यावर अनपेक्षितपणे वाचायला मिळालं.
Pages