काजू, पिस्ता, बदाम, खजूर, मध, तीळ, कलिंगडाच्या बिया, रोल्ड ओट्स, मीठ , वेलची पूड.
१. काजू, पिस्ता आणि बदाम श्रीखंडाच्या वाटीने प्रत्येकी एक वाटी.
२. मला अरेबिक दुकानात 'प्रेस्ड डेट्स' या नावाची खजूर पेस्टच मिळाली. त्यातली साधारण एक वाटी घेऊन भिजवून ठेवली. तुम्ही बिया काढलेले खजूर घेतले असतील ते पाऊन वाटी पेस्ट होईल इतके घेऊन, एक तास भिजवून ठेवा . नंतर मिक्सर मधून 'घूरकावून' घ्या.
३. मध पाव वाटी.
४. कलिंगडाच्या बिया किंवा मगज पाव वाटी.
५. तीळ दोन-तीन मोठे चमचे.
६. मीठ अर्धा चमचा.
७. वेलची पावडर पाव चमचा.
८. ओटमील दोन-तीन चमचे.
१. सगळे घटक.
खजूर बिया काढून कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवला.
२. बदामाचे मोठे तुकडे करून घेतले. काजू व पिस्त्याचे तुकडे आधीच होते.
३. ओटमील व तीळ भाजून घेतले.
*
४. बदाम, काजू व पिस्त्याचे तुकडे भाजून घेतले. फार भाजायचे नाहीत, फक्त खुटखुटीत करायचे आहेत.
५. ओटमीलचे पीठ करून घेतले व भिजवलेल्या खजूरांची पेस्ट करून घेतली.
६. भिजवलेल्या खजुराची पेस्ट पुरणासारखी शिजवून घेतली. फार शिजवल्यास कडवट होते त्यामुळे सांभाळून शिजवावी लागते. पाणी आटून मऊ गोळा तयार होतो.
७. या गोळ्यात सगळा सुकामेवा, तीळ घालून चांगले मिसळून घेतले. त्यात मीठ आणि वेलची पावडर घालून झाकण न लावता वाफ काढली, गोळा गच्च व्हायला सुरू होतो. त्यावर शेवटी ओटची पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित मिसळले. आच मध्यम ठेवायची आहे. शेवटी मध घालून पुन्हा मिसळून घ्यायचे.
८. हा तयार गोळा फॉईल वर डब्यात घातला.
९. तासभर फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढला.
१०. हव्या त्या आकाराच्या ब्राऊनीज कापून त्यावर क्लिंग रॅप लावून ठेवले. पटकन एक 'ग्रॅब ॲन्ड गो' साठी सुटसुटीत. प्रोफेशनल बेकरीतल्या सारखी स्मार्ट दिसते.
प्रोफेशनल लूक -
मग खेळत स्टोन हेंज केले.
गंमत -
लेक तिथे बसून 'गॉर्डन रामसे' टाईप हिणवत होती. हे तिनेच स्वतः ला दिलेलं नाव आहे. हे काही बरोबर दिसत नाही वगैरे. तुझा नंबर येणं कठीण आहे. मी म्हटलं 'अगं, नैसर्गिक घटक घालायला सांगितले आहेत', तर मग' mud सारखं दिसलं पाहिजे का ? म्हणाली'. नंतर चव घेऊन 'I need a Jelly bean to revive my tongue' म्हणे. अशा वेळी घरातले Men of few words बरे वाटतात म्हणून जेलीबीन देऊन 'Woman with a few dictionaries of her own' ला कटवले. Men of few words ना आवडले.
***हे कितीही बिघडले तरी छानच लागते. एवढ्या 'प्रतिकूल' परिस्थितीत मी हे केले आता 'छान' म्हणा.
धन्यवाद,
अस्मिता.
१. चमचाभर सुकं खोबरं घालू शकता. आमचं दुकानातच राहीलं.
२. ही मूळ कृती हेब्बरची आहे , आणि तिने 'एनर्जी बार' म्हटलं आहे. पण तिच्यापेक्षा माझं टेक्स्चर मऊ झालं आणि ब्राऊनी झाली. तिचे जास्तच चकाकत होते म्हणून मला थोडी काळजी वाटली. पण अचानक 'चकाकते ते सारेच सोने नसते' ही म्हण आठवली. मराठी भाषेचे उपकार... !
३. तिनं अर्धी वाटी मध घातला, मी नाही घातला. कारण काहीच नाही, सवय नाही व व्हिडिओ पुन्हा बघितलाच नाही. मनानेच घातला.
४. मध गरम करू नये या आयुर्वेदिक टिपवर विश्वास असेल तर वगळा. मला ते उगाच जेवल्यानंतर झोपू नये टाईप वाटते. कोण ऐकते ??
५. नंतरही फ्रीजमध्ये ठेवून लवकर म्हणजे आठवडाभरात संपवा.
>>>>> Proud अशा वेळी घरातले
>>>>> Proud अशा वेळी घरातले Men of few words बरे वाटतात म्हणून जेलीबीन देऊन 'Woman with a few dictionaries of her own' ला कटवले. Men of few words ना आवडले. Happy
किती मस्त लिहीलयस.
पदार्थ खूप पौष्टिक वाटतो आहे. अगदी राजस. दिसायलाही सुंदर आहे.
बाकी नटसची फॅन नसल्याने, माझा पास.
बक्षिसाकरता शुभेच्छा.
छान.
छान.
पण अचानक 'चकाकते ते सारेच सोने नसते' ही म्हण आठवली. ..... भारीय.
पाककृती मस्त आहे. फायनल
पाककृती मस्त आहे. फायनल प्रॉडक्ट लगेच उचलून खावून टाकावे असे वाटले. मध नसता घातला तर स्पर्धेच्या नियमांत बसली असती.
मध चालत नाही ?
मध चालत नाही ?
मला कल्पना नव्हती. ह्यातला गोडवा खजूराने येतो. मध ग्लेझ पुरता होता. सगळी मेहनत वाया गेली म्हणायची.
@संयोजक, ही पाककृती बाद आहे का ?
@admin, चालत नसेल तर कृपया गणेशोत्सव ग्रूपमधून काढून नेहमीच्या ग्रूपमध्ये टाकणार का ?
वा काय सुं दर दिसतंय. मला
वा काय सुं दर दिसतंय. मला जमेल असा कॉन्फिडन्स अजिबात वाटत नाहीये.
चुकून मध लिहिलयस ना? सुधार ती
चुकून मध लिहिलयस ना? सुधार ती चूक. मधाची वाक्य काढून टाक बरं!
बेस्ट दिसत्येय!
हे कॉस्को मधल्या त्या स्लॅब तोडलेल्या नट चिकी सारखं लागतं का? अर्थात त्यात साखरेचा पाक असेल इथे खजूर आहे.
ब्राऊनी मस्तच !
ब्राऊनी मस्तच !
मला ते उगाच जेवल्यानंतर झोपू नये टाईप वाटते. कोण ऐकते ?? Happy)))) हे आणखीनच मस्त !!!
मस्त!
मस्त!
खजूराची अशी तयार पेस्ट मिळते हे माहीत नव्हतं - इथल्या मिडल ईस्टर्न दुकानात बघते.
Mast recipe karun baghen
Mast recipe karun baghen
भारी दिसतेय.. मराठीत खजूर
भारी दिसतेय.. मराठीत खजूर चिक्की बोलू शकतो का.. की हे फज झाले.. की हे वेगळेच.. मला पाकृ मध्ये काही कळत नाही.
छान आहे रेसिपी. नक्की करून
छान आहे रेसिपी. नक्की करून बघणार.
पाककृती बाद आहे की कसं संयोजक सांगतीलच पण स्वतः स्पर्धक असताना धनिनं नियमात नाही लिहिणं अखेळाडू वाटलं.
Men of few words ना आवडलंना
Men of few words ना आवडलंना जमलं एकदाचं
खुटखुटीत, घुरकावून नवीन शिकलो.
छान जमलीय...
Men of few words
Men of few words
पाककृती
झकास !
भारी दिसतंय.
भारी दिसतंय.
लेकीचे प्रतिसाद हहपुवा लावणारे आहेत.
छान दिसतेय एकदम पौष्टिक.
छान दिसतेय एकदम पौष्टिक. लिखाण नेहमी प्रमाणे खुसखुशीत.
मध ऑप्शनल असल्याने चालुन जायला हवी असे वाटते.
शेवटच्या फोटोनंतरचा मजकूर
शेवटच्या फोटोनंतरचा मजकूर आवडला.
खजूर आणि ब्राउनीचं टेक्स्चर आवडीचे नाहीत.
विकतची खजूर पेस्ट वापरली आहे, तर "खजूर बिया काढून कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवला." हे कशाला?
घटक पदार्थांच्या फोटोत मध दिसत नाही. कृतीतूनही वगळता येईल.
मस्त .. स्वाद संजिवनीची
मस्त .. स्वाद संजिवनीची भेलांडेच आठवली आणि लेक म्हणजे आलेला गेस्ट तिथे पण साखर गूळ वर्ज्य ना..
मी मध खाल्ला नाही, मी मध
मी मध खाल्ला नाही, मी मध वाचला नाही..
पाकृ खुसखुशीत लिहिलेय पण मी पूर्वी मिक्सरची 2 भांडी खजूर पेस्ट करुन धारातिर्थी पाडली आहेत.. सो आता खजूर पेस्ट वाचली की मी पाकृ not-to-do list मधे टाकते.
मला प्रतिसादामागच्या
मला शब्दामागच्या खऱ्याखुऱ्या भावना कळतात, मग गणरायापर्यंत तर सगळं पोचतच असेल. तो तर 'अ-क्षरब्रह्म' आहे. माझा उत्साह गेला नाही, संयोजक जे म्हणतील ते आवडेलच. निर्मिती प्रक्रियेचा आनंद घेणं महत्त्वाचं. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया.
>>>>मला प्रतिसादामागच्या
>>>>मला प्रतिसादामागच्या खऱ्याखुऱ्या भावना कळतात, तर गणरायापर्यंत सगळं पोचतच असेल. तो तर 'अ-क्षरब्रह्म' आहे.
_/\_ त्रिवार सत्य.
>>>उत्साह गेला नाही
खूप मस्त वाटलं ऐकून. तुझ्या आनंदावरती विरजण पडलेलं नाही हे ऐकून बरे वाटले.
धनवन्ती, डिंकाची पूड करताना
धनवन्ती, डिंकाची पूड करताना एकदा मी मिक्सरच पातं तोडलं होतं, पण हे तर मऊ आहे. तरी नकोच प्रयोग.
लंपन, भेलांडे बाईंचं बघावं लागणार आहे आता. पण गॉर्डन रामसे मास्टर शेफचे कॉन्टेस्टन्ट पाककृती करताना शेजारी उभं राहून मानसिक खच्चीकरण करतो. फार mean बोलतो.
भरत, मी जरी तयार पेस्ट घेतली तरी इतर लोक खजूर वापरतील म्हणून लिहायचे होते, ते वर जाऊन वाक्यरचना इतक्या वेळा बदलली की 'खाजवून खजूर' झाले.
सामो , फार गोड आहेस.
सामो , फार गोड आहेस.
पाककृती, फोटो आणि लिखाणाची
पाककृती, फोटो आणि लिखाणाची स्टाईल सगळंच मस्त...
माझी कॉम्प्लिमेन्ट मला इतक्या
माझी कॉम्प्लिमेन्ट मला इतक्या लवकर देउ नकोस. आपल्याला आवडणार्या व्यक्तीचे थोडे ऋण असू द्यावे तेवढीच पुढील कार्मिक नात्याची शाश्वती
हाहाहा
--------
का माहीत नाही डोळ्यात पाणी आले.
अगं काय हे सामो , रोज एकदा
अगं काय हे सामो , रोज एकदा 'गोड' म्हणावं लागणार आता. शाश्वत गोड . थॅंक्स.
धन्यवाद दसा, हर्पा, अनिंद्य,
धन्यवाद दसा, हर्पा, अनिंद्य, सिंडरेला, ऋ, अमा, भरत, धनवन्ती, लंपन, स्वाती, स्वान्तःसुखाय, अमित, देवकी तै, मानवदादा, मृ आणि सामो.
प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार.
Uplifting posts
पहिला फोटो Tempting आलाय .
पहिला फोटो Tempting आलाय . खजूर रोल करून बघितले होते . त्याचे थोडे वेगळे version ( fry fruit loaded) . जरूर करून बघेन . घरी आवडेल सगळ्यांना.
सायो, जमेल सहज. तू तर
सायो, जमेल सहज. तू तर एकापेक्षा एक पाककृती देतेस इथे.
अमित, नट चिक्की कडक असते हे फज सारखं आहे. पण हेल्दी प्रकार आहे.
स्वाती, मी मुद्दाम शोधली नाही, मला नेहमीचे pitted Medjool Dates मिळाले नाहीत, हेच होतं तिथं.
ऋ , खजूर चिक्की म्हणता येईल.
धन्यवाद अश्विनी, हो खजूर रोलही छानच लागतात. ह्याचेही रोल किंवा लाडू वळता येतील.
धन्यवाद मंजूताई.
मस्त!
मस्त!
मस्तच
मस्तच
Pages