मायबोलीकरांनो, तुम्ही ऑनलाईन वृत्तपत्र नक्कीच वाचत असाल. त्यात एखादा बातमीचा मथळा ठळक अक्षरात लिहिलेला असतो आणि पुढे ती बातमी सविस्तर वाचण्यासाठी रीड मोअर ची लिंक दिलेली असते. बातमीचा मथळा वाचून असे वाटते कि यात काहीतरी विशेष असे किंवा एखादे रहस्य सांगितले असावे. प्रत्यक्षात मात्र ती बातमी अतिशय सामान्य, गमतीशीर किंवा असंबद्ध असते.
उदा. ऐश्वर्या रायने आराध्याबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय, ऐकून अभिषेक झाला चकित. रीड मोअर- ही आहे तिच्या नवीन ड्रेसची किंमत.
किंवा , श्रीकृष्णाचे ठसे सापडले तुळशीबागेत. रीड मोअर - ते प्लास्टिकचे चिकटवण्याचे ठसे होते.
हाच खेळ आपल्याला खेळायचा आहे. यात संयोजक पहिल्यांदा एक बातमीचा मथळा देतील. तो मथळा आणि त्यापुढे रीड मोअर असे लिहून पुढची काल्पनिक ओळ तुम्हाला लिहायची आहे. जो आयडी रीड मोअर देईल त्याने पुढचा बातमीचा मथळा द्यायचा आहे. पुढचा मथळा येईपर्यंत इतर जण आधीच्या मथळ्याचे रीड मोअर लिहू शकतात. दुसऱ्या कोणाला मथळा सुचत नसल्यास इतर कोणीही नवीन काल्पनिक मथळा देऊ शकतो त्याचे काल्पनिक रीड मोअर दुसऱ्यांनी लिहायचे आहे.
पहिला काल्पनिक मथळा खालीलप्रमाणे आहे.
"राणादाची के बी सी मधील एंट्री बघून प्रेक्षक झाले चकित. रीड मोअर ..."
सुरु करा मित्र -मैत्रिणींनो हा खेळ खेळायला.
मुकेश अंबानी ऑफिसमधे आल्या
नवा कळगळ :
मुकेश अंबानी ऑफिसमधे आल्या आल्या सेक्रेटरीसोबत रोज 'हे' करतात. सेक्रेटरीने आज केला गौप्यस्फोट .... Read More
सेक्रेटरी म्हणाला कोव्हीड
सेक्रेटरी म्हणाला कोव्हीड काळा पासून मुकेश भाईने हस्तांदोलन करणे सोडून दिले होते, आता परत करताहेत हस्तांदोलन.
मानव
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उलटं पण करायला मजा येईल. एक
उलटं पण करायला मजा येईल. एक मंडेन वाक्य घ्यायचं आणि आता याचं क्लिकबेट बनवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी हे असेच टँजंट का मारता ?
मामी हे असेच टँजंट का मारता ? आधीचे रीड मोअर आहे ते पण वापरत जा कि.
"त्या" दोघांनी वर्षाविहारामधे
"त्या" दोघांनी वर्षाविहारामधे केली तूफान "मजा" - रीड मोअर
आज अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांचे हाल झाले. त्यात विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट असल्याने आबालवृद्धांनी पाण्यात कागदाच्या बोटी सोडून मजा घेतली. आजोबा आणि नात पाण्यात बोटी सोडतानाचा फोटो. वर सोसायटीचं नाव दिसतय वर्षा-विहार को. हौ. सो. लि.
मामी हे असेच टँजंट का मारता ?
मामी हे असेच टँजंट का मारता ? आधीचे रीड मोअर आहे ते पण वापरत जा कि. >>> सॉरी हा. पण आधीच्यावरून काही मजेशीर सुचलं नाही म्हणून नवं टाकलं. आता लक्षात ठेवेन.
माबोवरचे काही गुणी (त्यांच्या
माबोवरचे काही गुणी (त्यांच्या मते
)पण दुर्लक्षित ( का असे असावे; एनी वाईल्ड गेस
) कवि आणि गझलाकार, आज वर्षाविहाराला अनेक वर्षांनी भेटले. मग काय उधाणच आले की मजेला. सर्वांनी मिळून एकमेकांना आपापल्या कविता वाचून दाखवत 'अहो रुपम! अहो ध्वनिम" असा काही जल्लोश केला.
बारीकशी टिप- बाकीचे अत्यवस्थ आणि अनाहूत श्रोते माबोकर ससूनमध्ये दाखल झालेले असून ........... अजुन शुद्धीवर यायचे आहेत.
उलटं पण करायला मजा येईल. एक
उलटं पण करायला मजा येईल. एक मंडेन वाक्य घ्यायचं आणि आता याचं क्लिकबेट बनवा. >>> ही पण आयडिया भारी आहे.
सेक्रेटरी म्हणाला कोव्हीड काळा पासून मुकेश भाईने हस्तांदोलन करणे सोडून दिले होते, आता परत करताहेत हस्तांदोलन. >>>
मानव.
वर सोसायटीचं नाव दिसतय वर्षा
वर सोसायटीचं नाव दिसतय वर्षा-विहार को. हौ. सो. लि. , बारीकशी टिप- >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी सुचत नाही असे तुम्ही म्हणावे ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>मामी सुचत नाही असे
>>>>>मामी सुचत नाही असे तुम्ही म्हणावे ? Happy![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो ना!! मामी कॉफी ढोस जरा
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
नवा मथळा -![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाहरुख शेख यांना 'शाहरुख' हे नाव अव्हेलेबल नसल्याने, अन्य नाव घेउन प्रवेश करावा लागला. पहील्यांदा त्यांचा त्रागा झाला परंतु आता ते हळूहळू सरावत आहेत कारण सोप्पे आहे - त्रागा आणि माबो हे एकत्र नांदत नाहीत. माबो= प्रसन्नता
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर
कु. ऋ च्या डायरी मधून आमच्या वार्ताहराने चोरलेले पान :![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(कृपया अक्षरास हसू नये) आज शेवटी वैतागून शाहरुख नावाचा नवा आयडी बनवला नि माबोवरती लॉग इन करते झालो. आता तरी मला मायबोलीचा शाहरुख अशी मान्यता मिळेल . किती दिवस ते गरिबांचा स्व.जो. म्हणून म्हणून घ्यायचे ? तरीही नाही जमले तर दोन आठवड्यांनी 'तुमची सई' असा आयडी काढेन म्हणतो
Read More कोणी तरी नवा टाका पुढे किंवा हाच सुरू ठेवा.
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज साक्षात शाहरुखजी माबोवरती येऊन गेले..... नुसते वाचनमात्र न राहता त्यांनी दोन धाग्यावर कॉमेंट, एकाची विचारपूस आणि चक्क एक धागासुद्धा उघडला. अधिक चौकशीअंती कळाले की ते नेहमीप्रमाणे आपल्या फॅनचा ड्युआयडी घेऊन आले होते त्यामुळे कुणाच्या निदर्शनास आले नाहीत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जवान चित्रपटाची स्तुती आणि फॅनफॉलोविंग पहाता ते इतके लाजून चूर झाले की गावसकरांचा मंत्र त्यांनी अंमलात आणला 'रिटायर व्हेन यु आर ऑन टॉप.'
हा हन्त! हा हन्त!! आता मुकला ना भारत एका थोर अॅक्टरला.
मी शाहरुख वरून टॅनजंट मारून
मी शाहरुख वरून टॅनजंट मारून नवा रीड मोअर देते आहे.गोड मानून घ्या.
)
'ती'ने गाडीच्या इंजिनमध्ये टाकलं उकळतं पाणी आणि झाला 'हा' चमत्कार...
(मला ही बातमी खरोखरच येते msn पेज वर.पण उघडायची हिंमत नाही.मागे एकदा अशीच एक बातमी उघडली त्यात स्त्रीने उघडला नेकलेस आणि झाला हाहा:कार अशी बातमी आणि किमान 20 पानं नेक्स्ट नेक्स्ट केल्यावर तिला लाकडी नेकलेस मध्ये अंगठी दडवून प्रियकराने प्रपोज केलं असं कळलं.तेही तिने तो अनेक वर्षं वापरला, मग त्याने हातोडा मारून फोडायला लावला वगैरे.तेव्हापासून 'तिने घाण तुंबलेल्या सिंक मध्ये एक वापरलेली टीबॅग टाकली आणि झाला 'हा' चमत्कार..' ही बातमी असली की 25 पानं स्क्रोल करून 'सिंक तुंबून पूर्ण बाद झालं' असा निकाल येईल हे माहीत असतं
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर
त्यांनी माबोवर शाहरुख फॅन्सचा धिंगाणा पाहून सर्वात कट्टर फॅन्सना पैसे द्यायचे ठरवले, शाहरुख पोस्टिंग कमी करण्यासाठी.
रात्री 'हे' केल्याशिवाय झोपत
रात्री 'हे' केल्याशिवाय झोपत नाही सनी.. रीड मोअर
.
.
रोज रात्री विष्णु सहस्रनाम म्हटल्याशिवाय सनी झोपत नाही.
अहो आश्चर्य! मंगळावरती सापडले
अहो आश्चर्य! मंगळावरती सापडले ....... रीड मोअर
झुरळ. अर्थात त्यात आश्चर्य काहीच नाही म्हणा. ही प्रजातीच महाचिवट!
नला वाटले मंगळावरती सापडले
नला वाटले मंगळावरती सापडले माबो वरचे डु आयडी म्हणाताय कि काय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुढचे रीड मोअर द्या
'ती'ने गाडीच्या इंजिनमध्ये
'ती'ने गाडीच्या इंजिनमध्ये टाकलं उकळतं पाणी आणि झाला 'हा' चमत्कार...
"अहो, ही टेस्ला आहे. ती बॅटरी आहे. इंजिन नाही. लावलीत ना वाट!!" पेट्रोल पंपावरचा गंप्या ओरडला.
'ती'ने गाडीच्या इंजिनमध्ये
'ती'ने गाडीच्या इंजिनमध्ये टाकलं उकळतं पाणी आणि झाला 'हा' चमत्कार...
"अगागागा, मेलो, मेलो!!!" गाडीखाली काम करणारा मेकॅनिक गंप्या ओरडला.
त्यात स्त्रीने उघडला नेकलेस
त्यात स्त्रीने उघडला नेकलेस आणि झाला हाहा:कार अशी बातमी आणि किमान 20 पानं नेक्स्ट नेक्स्ट केल्यावर तिला लाकडी नेकलेस मध्ये अंगठी दडवून प्रियकराने प्रपोज केलं असं कळलं.तेही तिने तो अनेक वर्षं वापरला, मग त्याने हातोडा मारून फोडायला लावला वगैरे.
>>>>>> मी पण या बातमीची शिकार झालेय… अजूनही एमएसएनवर दिसते ती नेकलेसवाली बाई
>>>>>नला वाटले मंगळावरती
>>>>>नला वाटले मंगळावरती सापडले माबो वरचे डु आयडी म्हणाताय कि काय Lol![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्रे मस्तच की.
तुम्हाला झुरळ म्हटल्यावर डु आय डी आठवले का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे इथे शाहरूख येऊन गेला..
अरे इथे शाहरूख येऊन गेला.. तरीच उचक्या लागता होत्या.. मला विपू करत जा रे कोणीतरी.. धागा निवडक दहात घेतो.
तुम्हाला झुरळ म्हटल्यावर डु
तुम्हाला झुरळ म्हटल्यावर डु आय डी आठवले का? >> महाचिवट मूळे सामो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती
आज साक्षात शाहरुख जी माबोवरती लॉग इन करते झाले. ऐका तर मग .... ....... रीड मोअर
>>> आणि त्याने एका आयडीच्या कौतुकभरल्या पोस्ट वाचुन, खोटे लिहिल्याबद्दल ‘त्या’आयडीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. सुरक्षिततेच्या कारणास्तव आयडीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
(“तो आयडी“ हलकेच घे.)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तो आयडी हलकेच घेणारा आहे..
तो आयडी हलकेच घेणारा आहे.. उगाच अश्या सुचना कंसात लिहून त्याला लाजवू नका
रीड मोअर मध्ये तरी 'त्या' ला
रीड मोअर मध्ये तरी 'त्या' ला गुलदस्त्यातुन काढा की!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages