मायबोलीकरांनो, तुम्ही ऑनलाईन वृत्तपत्र नक्कीच वाचत असाल. त्यात एखादा बातमीचा मथळा ठळक अक्षरात लिहिलेला असतो आणि पुढे ती बातमी सविस्तर वाचण्यासाठी रीड मोअर ची लिंक दिलेली असते. बातमीचा मथळा वाचून असे वाटते कि यात काहीतरी विशेष असे किंवा एखादे रहस्य सांगितले असावे. प्रत्यक्षात मात्र ती बातमी अतिशय सामान्य, गमतीशीर किंवा असंबद्ध असते.
उदा. ऐश्वर्या रायने आराध्याबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय, ऐकून अभिषेक झाला चकित. रीड मोअर- ही आहे तिच्या नवीन ड्रेसची किंमत.
किंवा , श्रीकृष्णाचे ठसे सापडले तुळशीबागेत. रीड मोअर - ते प्लास्टिकचे चिकटवण्याचे ठसे होते.
हाच खेळ आपल्याला खेळायचा आहे. यात संयोजक पहिल्यांदा एक बातमीचा मथळा देतील. तो मथळा आणि त्यापुढे रीड मोअर असे लिहून पुढची काल्पनिक ओळ तुम्हाला लिहायची आहे. जो आयडी रीड मोअर देईल त्याने पुढचा बातमीचा मथळा द्यायचा आहे. पुढचा मथळा येईपर्यंत इतर जण आधीच्या मथळ्याचे रीड मोअर लिहू शकतात. दुसऱ्या कोणाला मथळा सुचत नसल्यास इतर कोणीही नवीन काल्पनिक मथळा देऊ शकतो त्याचे काल्पनिक रीड मोअर दुसऱ्यांनी लिहायचे आहे.
पहिला काल्पनिक मथळा खालीलप्रमाणे आहे.
"राणादाची के बी सी मधील एंट्री बघून प्रेक्षक झाले चकित. रीड मोअर ..."
सुरु करा मित्र -मैत्रिणींनो हा खेळ खेळायला.
आज राणादाने नेहमीची वेणी
रीड मोअर ..
आज राणादाने नेहमीची वेणी घालण्याऐवजी तुळतुळीत टक्कल केले होते !
नवा मथळा
नवा मथळा
तुम्ही रोज 'हा' पदार्थ खाता का ? सावधान ! मग तुमच्या 'ह्याला' 'हे 'होऊ शकेल..
तुमच्या नाकाला गुदगुल्या होऊ
तुमच्या नाकाला गुदगुल्या होऊ शकतील.
नवा मथळा जगबुडी लवकरच?
नवा मथळा
जगबुडी लवकरच?
पृथ्वीचे गोल बनविणारी MIDC
पृथ्वीचे गोल बनविणारी MIDC मधील कंपनी लवकरच बंद पडणार.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माबो वाचक
माबो वाचक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जगबुडी लवकरच?
जगबुडी लवकरच?
रीड मोर..
काँटिकेनो या मॉरोक्को देशातील एका शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या निबंधानुसार जगबुडी ही १४ अब्ज वर्षाने येणार नसून तब्बल ५०००० वर्ष लवकर येणार आहे.
मथळा
मथळा
तुम्ही रोज 'हा' पदार्थ खाता का ? सावधान ! मग तुमच्या 'ह्याला' 'हे 'होऊ शकेल..
रीड मोर..
तुम्ही रोज कच्चे वांगे खात असाल तर नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तुमच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाला नखुरडे होऊ शकते
जगबुडी लवकरच?
जगबुडी लवकरच?
रीड मोर..
Pandemic मुळे पुढे ढकललेला बहुचर्चित जगबुडी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
खूपच मार्मिक अमितव!!!
खूपच मार्मिक अमितव!!!
जगबुडी लवकरच?
जगबुडी लवकरच?
रीड मोर..
Pandemic मुळे पुढे ढकललेला बहुचर्चित जगबुडी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.>>
जग च्या प्रमुख भूमिकेत रणबीर सिंग तर बुडी च्या भूमिकेत दीपिका पदुकोण
सिनेमातील काही दृष्यांवर जगभरणी सेनेचा आक्षेप
चित्रपट एकाही बेटावर प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा
जग बुडीया थारे जैसा ना कोई...
हा धागा ग्रुप मध्ये नाही.
हा धागा ग्रुप मध्ये नाही. हलवा बरं!
अमित, बेष्ट! आता मथळा दे.
अमित, बेष्ट! आता पुढचा क्लिकबेट मथळा दे.
"ट्रंप ने जनतेची जाहीर माफी
"ट्रंप ने जनतेची जाहीर माफी मागीतली .....................रीड मोअर
.
.
.
तर शिक्षेत सवलत मिळण्याची काही आशा आहे" असे जळजळीत भविष्य आज, सातपाडे बुद्रुकगावच्या हनुमान-जयंती उत्सवामध्ये काळतोंडमोडे मास्तरांनी वर्तविले.
सगळेच
सगळेच![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मंगळावरती सापडले .......
>>>>>>अमितव
यु मिस्ड युअर टर्न म्हणुन मग मी दिला आहे. आय होप इट्स ओके.
नवा मथळा -
अहो आश्चर्य! मंगळावरती सापडले ....... रीड मोअर
मंडळी वरती थोडा झोल झालेला
मंडळी वरती थोडा झोल झालेला आहे... प्लीज सांभाळुन घ्या व कंटिन्यु!
हो हो! माबो वाचक आणि पुणेकर
हो हो! माबो वाचक आणि पुणेकर माझ्यापुढे होते म्हणून मी गेलो चहा प्यायला.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हाहाहा
हाहाहा
माझाही झोलच झालाय. स्वतःच्याच मथळ्याला स्वतःच घाईघाईने उत्तर दिलेले आहे. इतरांनी द्यायचे असते ना.
अहो आश्चर्य! मंगळावरती सापडले
अहो आश्चर्य! मंगळावरती सापडले ....... रीड मोअर
मंगळावर सापडले रक्ताचे डाग. डाकू मंगळ सिंग यास खुनाच्या आरोपाखाली अटक.
मथळा
रात्री 'हे' केल्याशिवाय झोपत नाही सनी.. रीड मोअर
हपा
हपा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रात्री 'हे' केल्याशिवाय झोपत
रात्री 'हे' केल्याशिवाय झोपत नाही सनी.. रीड मोअर
>>>>> लहान असताना मला एकदा रूट कॅनाल करावे लागले होते. त्या वेदनेचा धसका घेऊन हे केल्याशिवाय मी झोपत नाही - सनी
तर फ्रेंडस् तुम्हाला समजलं असेल की सनी लिओनी ब्रश केल्याशिवाय झोपत नाही - मटा वार्ताहर
मथळा
ऋषी कपूर चित्रपटाच्या सेटवर करायचे हे - नीतू कपूर
रीड मोअर
ऋषी कपूर चित्रपटाच्या सेटवर
ऋषी कपूर चित्रपटाच्या सेटवर करायचे हे - नीतू कपूर
रीड मोअर
.
.
.
ऋषी कपूर सेटवरती क्वचितच टिवल्या बावल्या करत असे असे त्यांच्या सुविद्य पत्नी नीतू कपूर यांनी जाहीररीत्या सांगीतले.
--------------------------
नवीन मथळा -
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क यांनी जाहीर केली दिवाळखोरी? .................. रीड मोअर
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क यांनी जाहीर केली दिवाळखोरी? .................. रीड मोअर
.
.
अन्य कंपन्या दिवाळखोरीत निघतील अशी कार आम्ही काढणार आहोत असे एलॉन मस्क यांनी वार्ताहरांशी बोलताना, जाहीर केले.
- लोक हो तुम्हीही लिहा. व नवा मथळा द्या. मला सुचले म्हणुन लिहीले.
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क यांनी जाहीर केली दिवाळखोरी?
एका नव्या प्लँटच्या उद्घाटनावेळी एलॉन मस्क यांनी खूप जुनी आठवण सांगितली. शाळेत असताना त्यांनी अंतराळयान बनवणारी कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी ते पिगी बँक मध्ये खाऊचे पैसे जमा करत होते. परंतु एका मित्राने पिगी बॅंकच पळवून नेली त्यामुळे माझी काल्पनिक कंपनी सुरू होण्यापूर्वीच दिवाळखोरीत गेली असे ते म्हणाले.
पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब 'यांच्याकडे'? अमेरिकेचे दणाणले दाबे....... रीड मोअर
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क यांनी जाहीर केली दिवाळखोरी?
टेस्लाचे शेअर हेज करुन त्यांनी ट्विटर विकत घ्यायला कर्ज घेतलं. पण ट्विटर चालवता न आल्याने त्याच्यावर क्रॉस मारला. आता बँका मागे लागल्याने इलॉनने दिवाळखोरीचा अर्ज दिला आहे. बरोबर २०२४च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीचा ही अर्ज दिला आहे. मस्कच्या बातमीत काही क्लिक बेट कशाला हवंय. त्याच्या बातम्या खरच अतरंगी असतात.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क
काय!!टेस्ला जनक एलॉन मस्क यांनी जाहीर केली दिवाळखोरी? .................. रीड मोअर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.
या दिवाळीत हवेवर चालणारी "खोरी" नावाची नवीन कार लाँच करणार असे एलॉन मस्क यांनी एलॉन केले.
उप्स, पुढची बातमी टंके
उप्स, पुढची बातमी टंके पर्यन्त दोन पोस्टी आल्या.
पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता
पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब 'यांच्याकडे'? अमेरिकेचे दणाणले दाबे....... रीड मोअर
पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब अमेरिकेच्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ह्यांच्या Mar-a-Lago ह्या रिसॉर्ट च्या तळघरात असल्याचे आढळले.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडिया नावाचे स्पष्टिकरण देणार .................. रीड मोअर
Pages