हस्तकला उपक्रम-२ छोटा गट - पणती सजवणे

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 12:07

मायबोलीकरांनो, दिवाळी हा दिव्यांचा सणआहे आणि तो आपण घराघरात दिवे लावून साजरा करत असतो. तसेच देवाच्यापुढे सुद्धा आपण दिवा, पणती लावत असतो. मांगल्याचे ते एक प्रतीक असते. अशीच पणती सजवण्याचा उपक्रम या वेळी संयोजक टीम छोट्या दोस्तांसाठी घेऊन आली आहे. यात मायबोलीकरांच्या लहान मुलांना एक न रंगविलेली किंवा एकाच रंगात रंगवलेली पणती घ्यायची आहे. तिला आकर्षक असे रंग देऊन किंवा सजावटीचे साहित्य उदा. मणी, काच, टिकल्या असे चिकटवून तिला सजवायचे आहे. सजावण्याआधीचा आणि सजावट पूर्ण झाल्याचा असे दोन फोटो धाग्यात द्यायचे आहेत.
चला लवकर साहित्य गोळा करा आणि पणती सजवायला घ्या.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव हस्तकला उपक्रम-२ - छोटा गट - पणती सजवणे - मायबोली आयडी - बाळगोपाळांचे नाव असे द्यावे
३. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४. वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं तर - मायबोली गणेशोत्सव २०२३ ही शब्दखूण प्रत्येक उपक्रमाच्या, स्पर्धेच्या धाग्यात आहे पण जर त्या शब्दखूणेवरती क्लिक केले तर - बरेच धागे लिस्टेड दिसत नाहीत. असे का माहीत नाही.

ते तीन धागे म्हणजे उपक्रमांच्या घोषणेच्या धाग्याचा काही भाग दिसतो. स्क्रोल डाउन केलेत की सगळे धागे दिसतत. दुसर्‍या पानावरही जावं लागतं.

इतके गोंधळ करण्यापेक्षा ग्रुप आधी उघडला आणि त्यात नवे धागे काढायचा मान सध्या फक्त संयोजक आयडीला देऊन चतुर्थीच्या मुहुर्तावर तो मान जन्तेला दिला तर सोपं नाही का होणार?
कारण नुसते धागे एकत्र दिसून काम होत नाही. त्यावर जी चर्चा असते, किती रिप्लाय आलेत, त्यातले आपण किती वाचलेले नाहीत, मग फोमो येतो, मग लोक संयोजकांना (आणि अ‍ॅडमिनना Wink ) कोणते प्रश्न विचारुन पिडताहेत... असा चौरस अनुभव येऊ लागला की उत्सवी वातावरण होतं. Happy
नुसत्या स्पर्धांची जंत्री दिसली तर फारच औपचारिक काही वाटतं. Happy

>>>>>ते तीन धागे म्हणजे उपक्रमांच्या घोषणेच्या धाग्याचा काही भाग दिसतो. स्क्रोल डाउन केलेत की सगळे धागे दिसतत. दुसर्‍या पानावरही जावं लागतं.
खरच की. सो मच फॉर अ डिटेल ओरिएंटेड टेस्टर (मी) Wink

ओह!