मायबोलीकरांनो, या धाग्याच्या शीर्षकातच सगळे आहे. दरवर्षी हमखास मनोरंजन करणारा उपक्रम म्हणजे शशक पूर्ण करा. जुन्या जाणत्या मायबोलीकरांना याबद्दल माहित असेलच पण नवीन मायबोलीकरांसाठी आम्ही याच्या सूचना देतोय. यात एका गोष्टीची सुरुवात आम्ही करून देणार आहोत आणि तुम्हाला ती शशक तुमच्या कल्पनाशक्तीने पुढे नेत पूर्ण करायची आहे आणि कथेला योग्य असे शीर्षक द्यायचे आहे. कथेची सुरुवात खालीलप्रमाणे आहे.
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव लेखन उपक्रम २ - कथेचे शीर्षक - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "एकारंभा अनंतार्था" असे लिहावे.
3. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती म्हटले की शशक उपक्रम
गणपती म्हटले की शशक उपक्रम ठरलेलाच आहे...
पण कोणाला ठाऊक आहे का की मायबोलीवर पहिली शतशब्दकथा कोणी लिहिली आहे???
शोधा उत्तर या गणपतीत
तू विचारतोय म्हणजे उत्तर
तू विचारतोय म्हणजे उत्तर समजलं आम्हाला. लिहून लिहून लिहिणार कोण, माबोचा शारुख शिवाय दुसरं कोण!
अवघड वाटतीये काहीच सुचत
अवघड वाटतीये काहीच सुचत नाहीये.
नाही नाही. माबोशाने नाही
नाही नाही. माबोशाने नाही लिहिली. दुसरंच कोणीतरी होतं.
पण हा फार फार मस्त उपक्रम आहे.
मायबोलीकरांनो, या उपक्रमाचे
मायबोलीकरांनो, या उपक्रमाचे आधीचे नाव व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे होते त्यामुळे ते नाव बदलले आहे, तसेच मायबोलीकरांनी सुचवल्याप्रमाणे आणि माबो प्रशासकांनी अनुमती दिल्यामुळे धाग्याचे नाव लेखन उपक्रम क्रमांक-२ - कथेचे नाव- मायबोली आयडी असे लिहावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "एकारंभा अनंतार्था" असे लिहावे. ज्यांनी आधी प्रवेशिका दिल्यात त्यांनी शक्य झाल्यास नावात बदल करावा, जर शक्य नाही झाले तरीही त्यांची प्रवेशिका बाद होणार नाही. ती या उत्सवासाठी ग्राह्य धरली जाईल. तसदीबद्दल क्षमस्व.
धन्यवाद, संयोजक.
धन्यवाद, संयोजक.
'अतिवास' यांनी मिपावरती शशक
'अतिवास' यांनी मिपावरती शशक सुरु केली - असे मला तरी स्मरते.
सामो कर्रेक्ट.. आतिवास यांनी
सामो कर्रेक्ट.. आतिवास यांनी मिपावर लिहिले पहिल्यांदा.. त्याच वरून प्रेरणा घेऊन,
माबोवर खालील तीन लागोपाठ लिहून मी सुरुवात केली होती.
पण तुमचा अभिषेक या आयडीने
सावल्या ___ शतशब्दकथा (१०० शब्दांत कथा) - https://www.maayboli.com/node/44507
वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा - https://www.maayboli.com/node/44552
धाडस ___ शतशब्दकथा https://www.maayboli.com/node/44639
शताब्दी या आयडीने मायबोलीवर
शताब्दी या आयडीने मायबोलीवर पहिली शशक लिहीली आहे.
सहा शब्दांच्या कथेची लाट आलेली तेव्हां.
लिंक मिळेल का?
लिंक मिळेल का?
उगाच मी दुसर्या कोणाचे श्रेय लाटायला नको
माझ्याकडे सेव्ह केलेली नाही
माझ्याकडे सेव्ह केलेली नाही लिंक.
काही हरकत नाही,
काही हरकत नाही, मला तुम्ही म्हणता तो आयडी सुद्धा सापडला नाही.
असो,
मी पन्नास हजारांचे बक्षीस ठेवतो.
माझ्या आधी माबोवर कोणी शशक लिहिलेले असल्यास त्याला पंचवीस हजार आणि लिंक देणाऱ्याला पंचवीस हजार
तुम्ही म्हणता तो आयडी सुद्धा
तुम्ही म्हणता तो आयडी सुद्धा सापडला नाही. >>> ओह !
तो आयडी इथे नाही सापडणार. हा माझा गझनी प्रॉब्लेम आहे.
शताब्दी सहा वर्षांपूर्वी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर होती. ते नाव लक्षात राहिलेलं.
आता उसळी मारून वर आलं.
अॅडमिनजी / वेमाजी ,
अॅडमिनजी / वेमाजी , धाग्याची तारीख बदलता येते का ?
सर! पन्नास हजार काय? ते प्रथम
सर! पन्नास हजार काय? ते प्रथम क्लीअर करा.
धाग्याची तारीख बदलता येते का
धाग्याची तारीख बदलता येते का ?>> कोणाला? लेखकाला बदलत येत नाही.
लेखकाला बदलायची सोय करुन
लेखकाला बदलायची सोय करुन द्यावी. म्हणजे तारीख बदलायची नाही. डायरेक लेखकालाच बदलायचं!
(No subject)
सर! पन्नास हजार काय? ते प्रथम
सर! पन्नास हजार काय? ते प्रथम क्लीअर करा
>>>>
विजेता भारतातील असेल तर रुपये...
अमेरिकेतला असेल तर डॉलर
दुबईला दिनार..
आता पन्नास हजार न द्यायचं
आता पन्नास हजार न द्यायचं कारण ऐकायची इतकी उत्सुकता लागली आहे की तारीख बदलण्याच्या सोयीसाठी admin पुढं मी अदृश्य पदर पसरायला तयार आहे.
सर मी जर admin असतो ना तर ..
सर मी जर admin असतो ना तर ... ५०,००० डॉलर!
सरांचे बक्षीस, धाग्यास "काळ"
सरांचे बक्षीस, धाग्यास "काळ"
आता पन्नास हजार न द्यायचं
आता पन्नास हजार न द्यायचं कारण ऐकायची इतकी उत्सुकता लागली आहे की तारीख बदलण्याच्या सोयीसाठी admin पुढं मी अदृश्य पदर पसरायला तयार आहे. >>
अस्निता
अस्मिता

मी तर ती पोस्ट लिहिल्या लिहील्याच एक कागद पेन घेऊन कारणे शोधायला बसलो
पण जोक्स द अपार्ट,
पैली दुसरी आणि तिसरी देखील शशक माझीच असावी..
त्यामुळे ती कारणे पुढच्या वेळी वापरेन
बाई दवे,
एक कारण वरच मिळाले आहे..
आता आरतीच ताट इकडे दे ऋन्मेष.
आता आरतीच ताट इकडे दे ऋन्मेष. गणपतीची आरती करायचेय की नाही! आणि फुलं ठेव थोडी शिल्लक गणपतीच्या चरणी वहायला
कविन लोल
कविन लोल
(No subject)
कविन
ओके
सचिन तेंडुलकर याने सर्वप्रथम शंभर शतक मारले म्हणून उद्या विराट कोहलीने शंभर शतक मारल्यावर त्याचे महत्व कमी होणार नाही असे विनयपूर्वक नमूद करून मी खाली बसतो !
सर, तुम्ही पण शंभर शशकंं मारा
सर, तुम्ही पण शंभर शशकंं मारा.
जीवेत शशकः शतम््
या उपक्रमात भरपूर प्रवेशिका
या उपक्रमात भरपूर प्रवेशिका आलेल्या आहेत. शीर्षकात शशक - १ लिहीले आहे. म्हणजे वेगवेगळ्या शशक येतील असे वाटते.
हे चूक नसेल तर पुढची ओळ द्यावी म्हणजे पुन्हा बहार येईल.