![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/09/16/Pakkruti-spardha%20-2.jpg)
भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार
मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक रंगतदार करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले हुशार मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्या अर्थाने रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा!
बहुतेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये भरपूर प्रमाणात सुगंधी मसाले, मिरची ,कांदे आणि लसूण असतात. लसूण आणि कांदा दोन्ही उष्णतावर्धक पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेच यांना तामसिक भोजन श्रेणीत गणले जाते.
पदार्थाला चव आणण्यासाठी कांदे ,टोमॅटो आणि लसूण अतिशय उपयुक्त ठरतो, हे अगदी खरं. पण हे पदार्थ टाकले तरच भाज्या खमंग आणि चवदार होतात अस काही नाही. मग कांदा-लसूण - टोमॅटो न वापरता भाज्या चविष्ट कशा बनवायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही घट्ट, स्वादीष्ट भाजी बनवू शकता. अशी भाजी बनवा आणि ती कशी बनवली हे तुम्ही आम्हाला लिहून पाठवा.
मग चला तर...उचला लेखणी आणि येऊ द्यात एक से बढकर एक खमंग, स्वादिष्ट भाज्यांच्या पाककृती पण कांदा, लसूण आणि टोमॅटो न वापरता बर का...
ही स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन पाककृती धागा काढून त्यात पाककृती लिहावी. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-२ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार - पदार्थाचे नाव- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. पदार्थ बनवतानाचे दोन, यात साहित्याचा फोटोसुद्धा देऊ शकता आणि पदार्थ तयार झाल्यानंतरचा एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहेत.
४. खाद्यपदार्थाचे नाव आधी द्यावे मग खाली साहित्य आणि पाककृती लिहावी.
५. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा आणि तो बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे.
६. कोणीही कितीही पाककृती देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
वा ! व! छान आहे ही पण
वा ! व! छान आहे ही पण स्पर्धा!
जैन रेसिपी चॅनेल वाल्याना
जैन रेसिपी चॅनेल वाल्याना ह्या गणपतीत जास्त हिट्स मिळणार यूट्यूबवरती![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
जैन जैन म्हणतात ते हेच का?
जैन जैन म्हणतात ते हेच का?
पदार्थाला चव आणण्यासाठी कांदे ,टोमॅटो आणि लसूण अतिशय उपयुक्त ठरतो, हे अगदी खरं. पण हे पदार्थ टाकले तरच भाज्या खमंग आणि चवदार होतात अस काही नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
पण स्पर्धकांचे पदार्थ चवदार झालेत हे ओळखणार कसे
स्पर्धकांचे पदार्थ चवदार
स्पर्धकांचे पदार्थ चवदार झालेत हे ओळखणार कसे Happy>>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त
तो पदार्थ घरातील छोट्या
तो पदार्थ घरातील छोट्या मुलांना खायला देऊन त्याचा फोटो किंवा व्हिडीओ पाठवायचा. एक्स्प्रेशन वरून कळेल कसा झालाय.
एकदा मी आयुष्यात कधीही न
एकदा मी आयुष्यात कधीही न बनवलेल्या मक्याच्या पॅटीसची रेसिपी पाठवून पा. कृ. स्पर्धेत बक्षीस जिंकलेलं. त्याची आठवण आली.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तेव्हा मोबाईल फोटो, selfies Cha अजिबात प्रस्थ नव्हतं.
एकदा मी आयुष्यात कधीही न
एकदा मी आयुष्यात कधीही न बनवलेल्या मक्याच्या पॅटीसची रेसिपी पाठवून >>>
विचार करत्रोय की बायकोला काहीतरी बनवायला लाऊन स्वताच्या नावावर खपवावे.. नम्बर नाही आला तरी तेवढेच पुरुष असून छान केलेत हं म्हणून कौतुक पदरी पडेल
छोट्या मुलांना खायला देऊन .... एक्स्प्रेशन वरून... >>> म्हणजे पौष्टिक काही बनवायलाच नको .. कांदा लसून टोमेटो भाज्या न टाकता फक्त चीज थापून पिझ्झा बनवतो.. असे एक्स्प्रेशन येतील की पहिला नंबर फिक्स![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणजे पौष्टिक काही बनवायलाच
म्हणजे पौष्टिक काही बनवायलाच नको .. कांदा लसून टोमेटो भाज्या न टाकता फक्त चीज थापून पिझ्झा बनवतो.. असे एक्स्प्रेशन येतील की पहिला नंबर फिक्स Proud>> kinva पनीर
तेही खरंय
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तोंडीलावणं चालेल का?
तोंडीलावणं चालेल का? (कोशिंबिर, चटणी तत्सम?) - मला वाटतं नाही चालणार.
वा! सर्व पाकृ स्पर्धा
वा! सर्व पाकृ स्पर्धा नावीन्यपूर्ण आहेत.
स्पर्धकांचे पदार्थ चवदार झालेत हे ओळखणार कसे >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
तोंडीलावणं चालेल का?
तोंडीलावणं चालेल का? (कोशिंबिर, चटणी तत्सम?) - मला वाटतं नाही चालणार.
>>>
हो, नाहीच चालायला पाहिजे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे जेवताना लोणचे मागितले की विचारतात, काय रे भाजी चांगली नाही झाली का?
छान विषय आहे.. कांदा-लसुण
छान विषय आहे.. कांदा-लसुण-टोमॅटो शिवायही भाज्या/सैपाक बनु शकतो हे लोक पार तिकडे खेड्यातही विसरले आहेत. हे घटक नाहीत म्हणजे जैन सैपाक हे काहीतरी नवेच ऐकतेय. चातुर्मासात पुर्ण सैपाक ह्या घटकांशिवाय करणार्या सुगरणी आहेत.
या निमित्ते जुन्या पाकृ नव्याने वाचायला मिळतील.
असे कांदा लसुण न वापरलेले
असे कांदा लसुण न वापरलेले पदार्थ इथे मिळतात अशी पाटी लिहिलेली हॉटेल्स भुवनेश्वर,पुरी येथे आहेत. पुरीच्या जगन्नाथाचा प्रसादही असाच असतो. आम्हाला आवडतं. चविष्ट पदार्थ म्हणजे रबडी,छेनापोडा, रसगुल्ले,तांदुळाची भजी,वडे ,दहीवडे,चिरोटे वगैरे.
गौरी गणपती मध्ये सगळं
गौरी गणपती मध्ये सगळं स्वयंपाक कांदा, लसूण न घालता (च) केला जातो.
सुगंधी मसाले चालतील का? नसतील
सुगंधी मसाले चालतील का? नसतील चालणार तर कोणते चालणार नाहीत याची यादी संयोजक लिहाल का प्लिज?
कांदा, लसूण, टोमॅटो नसलेले
कांदा, लसूण, टोमॅटो नसलेले सुगंधी मसाले चालतील