नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ : साखर, गूळ, मध याव्यतिरिक्त कोणतेही घटक (साहित्य) वापरावे.
सगळ्यांनाच गोड पदार्थ खाण्यास आवडतात. मात्र, सामान्यत: आपल्या जीभेला जे आवडते, ते निरोगी नसते आणि जे निरोगी असते ते खाणे आपल्याला आवडत नाही. गौरी-गणपती म्हटले की गोडाधोडाच्या पदार्थांची भरपूर रेलचेल.
मोदक हा गणरायाचा आवडीचा पदार्थ असला, तरी माहेरवाशिण गौराई चे कोडकौतुकही आपण त्याच उत्साहाने करतो. मग या गणेश उत्सवात या कौतुकाला थोड आरोग्यपूर्ण आणि पौष्टिक बनवूया का?
द्या थोडी कल्पनाशक्तीला चालना आणि बनवा साखर, गूळ आणि मध न वापरता ज्या पदार्थांमध्ये साखर नैसर्गिकरित्या उपलब्ध असते असे घटक वापरून गोड पदार्थ.
चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं गोड, पौष्टिक, मजेदार असे 'मायबोली-स्पेशल' पदार्थ बनवूया आणि त्यांच्या पाककृती लिहूया.
ही स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन पाककृती धागा काढून त्यात पाककृती लिहावी. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-१ - नैसर्गिक साखरयुक्त पदार्थ - पदार्थाचे नाव- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. पदार्थ बनवतानाचे दोन, यात साहित्याचा फोटोसुद्धा देऊ शकता आणि पदार्थ तयार झाल्यानंतरचा एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहेत..
४. खाद्यपदार्थाचे नाव आधी द्यावे मग खाली साहित्य आणि पाककृती लिहावी.
५. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा आणि तो बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे.
६. कोणीही कितीही पाककृती देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
छान स्पर्धा, भाग घेणार.
छान स्पर्धा, भाग घेणार.
मस्त!
मस्त!
Good innovative concept
Good innovative concept
छान. पण मध का नैसर्गिक नाही?
छान. पण मध का नैसर्गिक नाही? तो कुठे मानवनिर्मित आहे? तो मधमाश्यानिर्मित आहे ना!
वाह कल्पना नाविन्यपूर्ण आहे.
वाह कल्पना नाविन्यपूर्ण आहे. पोस्टर तर इतकं गोड आहे.
आणि महत्वाचं म्हणजे पोस्टर
आणि महत्वाचं म्हणजे पोस्टर गोड असूनही त्यात साखर गुळ मध काहीही वापरलेले नाहीये
>>>>>>>>आणि महत्वाचं म्हणजे
>>>>>>>>आणि महत्वाचं म्हणजे पोस्टर गोड असूनही त्यात साखर गुळ मध काहीही वापरलेले नाहीये
(No subject)
सन्योजक - गुलकन्द वापरला तर
सन्योजक - गुलकन्द वापरला तर चालणार आहे का?
गुलकंदात साखर आणि गुलाब
गुलकंदात साखर आणि गुलाब पाकळ्या असतात. तो नैसर्गिक नाहीं.
ओके, धन्यवाद
ओके, धन्यवाद
मी संयोजक पैकी नाही.... फक्त
मी संयोजक पैकी नाही.... फक्त माहिती दिली.