Submitted by क्षास on 13 December, 2021 - 11:59
code म्हणजे एक असं कोडं असतं
ज्याचं उत्तर सतत लपंडाव खेळत राहतं,
कधी stack overflow च्या कुठल्याशा कोपऱ्यात
तर कधी youtube च्या कुठल्याशा video मध्ये
code म्हणजे एक असं कोडं असतं
ज्यात कधी semicolon, quotes, brackets
हुलकावणी देतात,
तर कधी शुक्रवारी चालणारे कोड्स
सोमवारी चालेनासे होतात
code म्हणजे एक असं कोडं असतं
जे कोणी सांगून सुटत नाही
जे कॉफी पिऊन मिटत नाही,
code म्हणजे एक असं कोडं असतं
जे उत्तर सापडेपर्यंत कासावीस करतं,
आणि नकळत कधीतरी डिबग करताना
तू मलाच शोधत आहेस ना अशी
लाडिक विचारपूस करतं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मोअर लाईक गुरवारी चालणारे कोड शुक्रवारी माना टाकतात.
किती कमी प्रतिसाद.
किती कमी प्रतिसाद.
कुणाला codeकौतुक नाही.
हाहाहा
हाहाहा
छान आहे
छान आहे
> तू मलाच शोधत आहेस ना अशी
> तू मलाच शोधत आहेस ना अशी
> लाडिक विचारपूस करतं
हे वाचून एखादा bug मस्त राजाप्रमाणे एका हाताचा टेका घेऊन एक पाय दुमडून दासींकडून वारा घेत आणि आपली मजा बघत पडलेला असावा असं चित्र आलं डोळ्यासमोर
बरं विषयच असा होता की अगदी आतून आलं, तेच ओतलंय खाली
code म्हणजे एक असं कोडं असतं
जे local वर चालतं आणि server वर माना टाकतं
चालला की “हे माझं” म्हणून गर्व चढतो
Debug करताना “हे माझं?” म्हणून प्रश्न पडतो
लिहिताना ज्यासाठी सगळे forums धुंडाळतो
थोड्या दिवसांनी तोच ओळख दाखवणंही टाळतो
जो कोड नेहमी फक्त लोकल मशिनवर
जो कोड नेहमी फक्त लोकल मशिनवर चालतो व टेस्ट केला की भेलकांडतो. बट इट वर्क्स ऑन माय मशिन - हे नेहमीचे वाक्य.
टेस्टर- द मेसेंजर शूट केला जातो
Every tester has the heart of
Every tester has the heart of a developer
.
.
.
.
..
.
.
.
.
… in a jar on their desk
सामो
सामो
code म्हणजे एक असं कोडं असतं
code म्हणजे एक असं कोडं असतं
जे local वर चालतं आणि server वर माना टाकतं
चालला की “हे माझं” म्हणून गर्व चढतो
Debug करताना “हे माझं?” म्हणून प्रश्न पडतो
लिहिताना ज्यासाठी सगळे forums धुंडाळतो
थोड्या दिवसांनी तोच ओळख दाखवणंही टाळतो
नवीन Submitted by अभिषेक_ on 13 September, 2023 - 07:56 >>>> मस्त!
Every tester has the heart of
Every tester has the heart of a developer
.
.
.
.
..
.
.
.
.
… in a jar on their desk
Submitted by सामो on 13 September, 2023 - 08:>>>
आवडल!
सामो
सामो
सामो
.
डेमो मधे दगा देणार नाही असा
डेमो मधे दगा देणार नाही असा कोड अजुन जन्माला यायचा आहे ...