बंटीबाबा टु गॉड

Submitted by एम.कर्णिक on 17 December, 2009 - 02:17

मंडळी, दुबईला आल्यापासून बनुताईंनी स्वत:ला सगळ्या फूड आउट्लेट्सना भेटी देणे, डेझर्ट सफारी, मेट्रोतून प्रवास, मित्रमैत्रिणींची नवीन गँग जमवणे, प्लेग्राउंड्स, थिएटर्स, पार्क्स, शॉपिंग मॉल्सच्या फेर्‍या, आइस्क्रीम, चॉकलेटस् वगैरेंमधे गुंतवून ठेवलंय. नंतर मग शाळेत अ‍ॅडमिशन वगैरे कार्यक्रम आहेतच. त्यामुळे आता कवितांमधे यायला त्याना वेळ नाही मिळणार म्हणतात. "अधीमधीकधीतरी येईन म्हणावे" असा निरोप द्यायला सांगितलंय त्यानी. आणि तुम्हाला रेग्युलरली भेटायची जबाबदारी त्यानी आता 'बंटीबाबा' वर सोपवलीय. बंटी आठवतोय ना तुम्हाला? बनुताईंनी आईकडे खास मागणी केलेला भाऊ? तो आला परवा १४ डिसेंबरला.

थँक्स, सोड हात आता पलिकडे जातो
आतून दिस्ली आई तिला बाहेरून पहातो.

कोण रे या बाय्का आता बाहेर मला नेतायत?
तुझ्या हातामधुन हात माझा सोडवून घेतायत?

हस्तायत सग्ळया, तिकडं आई घामाने निथळते
पण खरं सांगू? अरे, तुझ्याऽऽ पेक्षाऽऽ छाऽऽन दिस्ते !!

येरे तुही थोडा इथे, आईला माझ्या भेट
घाम तिचा पूस आणि मगच जा तू थेट

नाहि नाही गरज माझी ओळख करुन द्याय्ची
बाहेर आलो तेव्हाच हाक ऐकू आली तिची

'ते कोण?' काय विचारतोस? अरे, बाबा माझे ते
रोज नाई का माझ्याशी बोबडे बोलाय्चे?

आईला रोज समजावाय्चे धीर देत देत
आता बघ अवतार ! स्वता तेच गोंधळलेत

आणि माणसाला एका मिठी मारून रडतायत
स्वत: बाबा आहेत तरी त्याला 'बाबा' म्हण्तायत

बाबा का रे बाबांचे ते? बरे वाट्तायत नई?
बघूऽऽ आता लाड माझे पुरवतायत की नाही.

ओके, ओके, नीघ आता, आय नो यू आर बिझी
पण विसरू नकोस मला...मीही ठेविन आठवण तुझी

गुलमोहर: 

अभिनंदन Happy

नवजात बाळाचं मुख पाहणार्‍या आईच्या अँगलमधल्या कविता वाचल्या होत्या. पण आईलाच काय, सगळ्या जगालाच पहिल्यांदा पाहणार्‍या व देवाघरचं फूल असल्याने देवाशीच संवाद करणार्‍या बाळाच्या अँगलमधून पहिलीच कविता वाचतेय. मस्तच Happy

अभिनंदन !!!बनुताईंच खास अभिनंदन !!!
कविता खुपच भावली.
आशुला १०१ मोदक , अगदी मनातला प्रतिसाद Happy

अप्रतिम !

-----------
प्रतिसाद संपादीत.

किती सुंदर!!!
मुकुंद काका, बंटी आणि बनुताई नशिबवान आहेत त्यांना तुमच्यासारखे आजोबा आहेत! छान छान कवतुकल्या करणारे!!!
बंटीबाबा छानच आहे पण बनुताईंना आमचा निरोप सांगा की थोडा वेळ काढाच आमच्यासाठी!!!!

छान .

मित्रानो,
कवितांचा आस्वाद घ्यायचा सोडून तुम्ही एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसला आहात ते पाहून मन उद्विग्न होते आहे. कृपा करून माझ्या कवितांवरील प्रतिसादात असा प्रकार करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे. अन्यथा मला वाटते की मी माझ्या कविता येथे देणे थांबवावे.
-मुकुंद कर्णिक

इथले वैयक्तिक वादाचे प्रतिसाद काढून टाकले आहेत. पुन्हा असं घडलं तर या वादात सहभागी होणार्‍या सर्व सदस्यांवर कारवाई करण्यात येईल.

ओके, ओके, नीघ आता, आय नो यू आर बिझी
पण विसरू नकोस मला...मीही ठेविन आठवण तुझी
====

कित्ती गोड!!!

माणूस देवाला केलेला हा प्रॉमिस लक्षात ठेवू शकला असता तर?

बनुताईंना नवा हक्काचा खेळ्गडी मिळाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आणि मग बाकी सर्व कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन!
बनुताई आता हळुहळु मोठ्या होताहेत,तेव्हा आता बंटी बाबाच्या गंमती जमती देखील आम्हाला वाचता येतील.तो अगदी छोट्टू असल्यापासूनच्या गंमती देणार का? हा आनंदाचा ठेवा आता दुणावणार याचा आनंद झाला.

धन्यवाद सगळ्याना. बंटीबाबालाही आपलंसं करून घ्याल याची खात्री आहे.

आधीच समग्र बनुताई वाचलच होत.
पण आज परत हि कविता वाचल्यावर परत प्रतिक्रिया द्याविच अस वाटल.
मस्त कविता आहे Happy मज्जा येते वाचताना.
बनुताई, बंटीबाबा मोठे झाले कि कस वाटेल त्याना या कविता वाचायला.. आम्हाला कळवा तेहि कवितेतुनच Happy

आजच तुमच्या बंटीबाबांच्या कविता वाचल्या खूप आवडल्या. माझी लेक तर तुमची फॅनच झाली आहे..... आधीच्या कवितांची लींक द्याल का प्लीज..... Happy

सो स्वीट ! फारच छान कवित आहे MK. आवडत्या ओळी कॉपी करायला वर गेले आणि मग वाटलं कि अख्खी कविताच कॉपी करायला लागेल. मस्त !