बैजिंग ऑलिंपिक्स... संभाव्य विजेते... जलतरण स्पर्धा...
तुम्हा सगळ्यांच्या विनंतीनुसार आजच्या पोस्टमधे आगामी बैजींग ऑलिंपिक्समधे मी कोणते स्पर्धक फॉलो करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे.पण एक आधीच ध्यानात घ्या... ही ऑलिंपिक्स स्पर्धा आहे व यात बर्याच वेळा कोणीतरी नवीनच स्पर्धक बाजी मारुन नेतो.. खासकरुन यजमान देशाचा खेळाडु.. त्यामुळे मी सांगत असलेल्या खेळाडुंपैकी काही जण जिंकतील तर काही जण नाही... असो.
आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की या स्पर्धा ८ ऑगस्ट पासुन सुरु होणार आहेत व २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. या स्पर्धांमधे पहिल्या आठवड्याचे आकर्षण म्हणजे जिमनॅस्टिक्स व जलतरण व डायव्हिंग स्पर्धां! व दुसर्या आठवड्याची प्रमुख आकर्षणे म्हणजे ऍथलेटिक्स स्पर्धा व प्रमुख सांघीक खेळ ... म्हणजे हॉकी,सॉकर् व बास्केटबॉल .झालच तर बॅडमिंटन व टेबल टेनिस या स्पर्धासुद्धा दुसर्याच आठवड्यात खेळल्या जातात. तसेच दुसर्या आठवड्यात रोविंग्,वेटलिफ्टिंग व मुष्टियुद्धाच्या स्पर्धाही होतात.(मुष्टीयुद्धाचा रानटी खेळ मला स्वतःला कधीच आवडत नाही...)
तर सर्वप्रथम या ऑलिंपिक्समधल्या जलतरण स्पर्धांबद्दल....आणी जलतरणच नाही तर या ऑलिंपिक्समधला सगळ्यात जास्त उत्सुकतेचा विषय असलेला ऍथलिट कोण असेल तर अमेरिकेचा अमेझिंग जलतरणपटु मायकेल फेल्प्स उर्फ फ्रिक! मला स्वतःला ओमाहा इथे नुकत्याच झालेल्या अमेरिकन स्विम ट्रायल्समधे या महाभागाला पाहण्याचे भाग्य लाभले... १९७२ पासुन मार्क स्पिट्झचा अबाधीत असलेला.. एकाच ऑलिंपिक्समधे ७ सुवर्णपदकाचा विक्रम... या वर्षी मायकेल फेल्प्स मोडेल असा तज्ञांचा अंदाज आहे. १०० व २०० मिटर्स बटरफ्लाय, २०० व ४०० मिटर्स ईंडिव्हिज्युअल मेड्ले रिले,२०० मिटर्स फ्रिस्टाइल, ४ बाय १०० टिम मेडले रिले, ४ बाय १०० फ्रिस्टाइल रिले व ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले अश्या ८ शर्यतीत हा उतरणार आहे... या आठपैकी सात स्पर्धांमधे याच्या नावावर जागतिक विक्रम आहेत.. आता बोला! असे असुनही प्रत्येक शर्यतीत हा स्वतःच्या शर्यतीचे इतके अचुक विच्छेदन व अवलोकन करतो की त्याला त्याच्या प्रत्येक स्ट्रोकमधे त्याने कुठे चुक केली हे ताबडतोब कळते... व लगेच पुढच्या शर्यतीत तो ती चुक दुरुस्त करुन शर्यत जिंकतो.. म्हणुन जेव्हा जेव्हा तो जलतरण तलावात उडी मारतो तेव्हा तेव्हा तो जागतिक विक्रम मोडण्याचीच अपेक्षा करतो.. थोडक्यात त्याच्यानुसार तो प्रत्येक वेळी स्वतःलाच हरवायचा प्रयत्न करत असतो.. दुसरे कोणी त्याला हरवु शकेल हा विचारच त्याच्या मनाला शिवत नाही... तर अश्या या मायकेल फेल्प्सला पाहण्याची सुवर्णसंधी तुम्ही पहिल्या आठवड्यात मुळीच सोडु नका... तो ८ शर्यतीत भाग घेणार आहे त्यामुळे तो बहुतेक प्रत्येक दिवशी जलतरण तलावात असणार आहे....(तळटिप.. याने २००४ च्या अथेन्स ऑलिंपिक्समधे ६ सुवर्णपदके मिळवली होती)
अमेरिकन पुरुषांमधे अजुन पाहण्यासारखे जलतरणपटु म्हणजे... १०० व २०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे जागतिक विक्रम व विश्वविजेतेपद असलेला एरन पिअरसॉल्( अथेन्सला याने १०० व २०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे सुवर्णपदक मिळवले होते व यंदाही तोच फेव्हरेट आहे!),१०० मिटर्स बटरफ्लायमधे मायकेल फेल्प्सला आव्हान देणारा इयान क्रॉकर,२०० मिटर्स बटरफ्लायमधे मायकेल फेल्प्सला आव्हान देणारा जिल स्टोव्हाल , ५० व १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे वर्ल्ड रेकॉर्ड असणार्या ऑस्ट्रेलियन व फ्रेंच स्विमर्सना झुंज देण्यास सज्ज असलेला गॅरेट वेबल गेल व अनुभवि जेसन लिझॅक.... पण सगळ्यात तगडी असलेली अमेरिकेची ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल रिलेची टिम.. (ज्यात मायकेल फेल्प्स्,पिटर व्हॅनडरके,रिकी बेरेन्स, क्लिट केलर व एरिक वेंड्ट आहेत....) व ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल अमेरिकन रिले टिम.. (ज्यात मायकेल फेल्प्स,नेथन ऍड्रिअन,कुलन जोन्स,बेन विल्डमन टोब्रिनर व जेसन लिझॅक आहेत....).त्यांची कामगीरी बघायला मात्र मी खुपच उत्सुक आहे.त्यांना ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधेलढत असणार आहे फ्रांसच्या बलाढ्य टिमची (ज्यात विश्वविक्रमी ऍलन बेअर्ड आहे व अमेरी लिव्हॉक्स आहे )व ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे ऑस्ट्रेलियाच्या टिमची (ज्यात ग्रँट हॅकेट व इमन सुलिव्हान आहेत.) आणी झालच तर २०० व ४०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले मधे मायकेल फेल्प्सला व २०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे एरन पिअर्सॉलला आव्हान असेल अमेरिकेच्याच रायन लॉक्टेचे... आणि हा रायन लॉक्टेच मायकेल फेल्प्सला ४०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले रिले मधे अपसेट करु शकतो...
अश्या या अमेरिकेच्या तगड्या टिमला जलतरण तलावात खरे आव्हान असेल ऑस्ट्रेलियन टिमचे... अर्थात त्यांचा कप्तान असेल....त्यांचा दिर्घ पल्ल्याचा अमेझिंग जलतरणपटु ग्रांट हॅकेट.. या वर्षी ४०० व १५०० मिटर्स फ्रिस्टाइलबरोबरच(ज्यात त्याच्या नावावर विश्वविक्रम आहे व अथेन्सला त्यात त्याला सुवर्णपदके मिळाली होती ..) तो या वर्षी २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधेही उतरुन अमेरिकेच्या मायकेल फेल्प्स्ला आव्हान देणार आहे.. त्यामुळे २०० मिटर्स फ्रिस्टाइलची शर्यत बघण्याची संधी मी मुळीच सोडणार नाही... तसेच ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे जागतिक विक्रम करुन जगातला सगळ्यात वेगवान जलतरणपटु म्हणुन किताब मिळवलेला ऑस्ट्रेलियाचाच इमन सुलिव्हान ,फ्रांसचा एलन बर्नार्ड व अमेरिकेचा गॅरेट वेबर गेल यांच्यातली चुरशीची ५० मिटर्स फ्रिस्टाइल शर्यत बघायलाही मजा येइल... आणि १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे विश्वविक्रम असणार्या फ्रांसचा ऍलन बर्नार्ड , हॉलंडचा पिटर व्हान हॉगनबाँड,अमेरिकेचा अनुभवी जेसन लिझॅक ,अमेरिकेचाच गॅरेट वेबर गेल व ऑस्ट्रेलियाचा इमन सुलिव्हान या पाच जणात १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे अतिशय चुरशीची लढत होइल..... जपानचा कोसुकी किटजिमा.. या ऑलिंपिक्समधेही परत एकदा १०० व २०० मिटर्स ब्रेस्टस्ट्रोकमधे सुवर्णपदक मिळवेल असा तज्ञांचा अंदाज आहे.. पण १०० मिटर्समधे अमेरिकेचा ब्रेंडन हेन्सन त्याला कडवी लढत देइल....
महिलांमधेही अमेरिकेच्या व ऑस्ट्रेलियाच्याच टिम्स सगळ्यात बलाढ्य आहेत...अमेरिकेची केटि हॉफ...२०० व ४०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले रिले व २००,४०० व ८०० मिटर्स फ्रिस्टाइल अश्या ५ वैयक्तिक व २ रिले शर्यतीत उतरुन ७ पदके मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे... व अमेरिकेच्या नॅटली कॉफलिनला.. १०० मिटर्स फ्रिस्टाइल,४ बाय १०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले व १०० मिटर्स बेकस्ट्रोक मधे पदक मिळवण्याची शक्यता आहे.. अमेरिकेच्या ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइलच्या महिलांच्या टिमला.. ज्यात जेसिका हार्डी,नॅटली कॉफलिन,कॅरा लिन जॉइस व लेसी नेमेयर आहेत...त्या टिमला लिबि ट्रिकेट्ची ऑस्ट्रेलियन टिम सहज हरवेल असे वाटते.. ..लिबी ट्रिकेट ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे अमेरिकेच्या डेरा टोरसला आव्हान देइल तर लायसेल जोन्स ब्रेस्टस्ट्रोकमधे अमेरिकेच्या अमांडा बेअर्ड व मेगन जेंड्रिकला टक्कर देतील व जेसिका शिपर बटरफ्लायमधे अमेरिकेच्या केटि हॉफला आव्हान देइल.... या स्पर्धेत अमेरिकेच्या केटी हॉफचा प्रयत्न असेल ७ पदके मिळवण्याचा... तसे जर झाले तर एकाच ऑलिंपिक्समधे ५ पदके मिळवण्याचा अमेरिकन विक्रम... जो सध्या डेरा टोरस व शर्ली बाबाशॉफच्या नावावर आहे... तो ती मोडीत काढेल.... ४१ वर्षांची डेरा टोरस ही जरी ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे सेंटिमेंटल फेव्हरेट असली तरी तिला सुवर्णपदक मिळण्याची संभावना फार कमी आहे... ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधले सुवर्णपदक बहुतेक हॉलंडच्या मर्लिन व्हेल्डुइसला किंवा ऑस्ट्रेलियाच्या लिबि ट्रिकेटला मिळेल... ऑस्ट्रेलियाची लिबी ट्रिकेट १०० मिटर्स फ्रिस्टाइल व १०० मिटर्स बटरफ्लायमधेही सुवर्णपदक मिळवेल असे वाटते . ऑस्ट्रेलियन महिलांची टिम ४ बाय १०० मिटर्स मेडले रिलेमधेही अमेरिकेला हरवेल.
एकंदरीत पुरुषांमधे व महिलांमधे... अमेरिकन व ऑस्ट्रेलियन जलतरणपटु नेहमिप्रमाणे पदकांची लयलुट करणार असे दिसत आहे... रिले शर्यतीत पुरुषांमधे अमेरिकन टिम सर्व रिले शर्यती कडव्या लढतीत जिंकतील तर ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले शर्यत सोडुन ऑस्ट्रेलियन महिला सर्व टिम रिले शर्यती जिंकतिल असे वाटते... पुरुषांच्या ईंडिव्हिज्युअल मेडले रिले शर्यतीत हंगेरीचा लॅझलो सेह हा डार्क हॉर्स आहे..... त्याच्यावर लक्ष ठेवा.... तर महिलांमधे १०० व २०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे झिम्बाब्वेची क्रिस्टि कोव्हेंट्री डार्क हॉर्स आहे......
तर मंडळी....पुढच्या पोस्टमधे आपण बैजिंग ऑलिंपिक्समधील जिमनॅस्टिक्स स्पर्धेचा आढावा घेउ...
क्रमंशः.............
धन्स
धन्स मुकुंद... ह्या वर्षी वरच्या सगळ्या स्पर्धा नक्की फॉलो करु..
यंदाच्या
यंदाच्या ऑलिंपिक्समधे जलतरण स्पर्धांत..अजुन एक दोन नावे सांगायचे विसरुन गेलो... ती म्हणजे साउथ आफ्रिकन मेन्स स्विम टिम... खासकरुन त्यांची अथेन्समधली ...४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल.. सुवर्णपदक विजेती रिले टिम.... त्यातले तिघे... रोलँड शुमन्,रिक नेदर्लिंग व डॅरिअन टाउनसेंड हे तिघे परत याही ऑलिंपिक्समधे येत आहेत... तेव्हा पुरुषांची ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले स्पर्धा ही अमेरिका- फ्रांस-ऑस्ट्रेलिया अशी तिरंगी नसुन साउथ आफ्रिकाही सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील असणार आहे... तर ही चौरंगी रिले स्पर्धा पाहायला विसरु नका.... त्यातला रोलँड शुमन हा ५० व १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधेही पदकासाठी फेव्हरेट आहे...
अमेरिकेच्या जेसिका हार्डिला... तिच्या रक्तात उत्तेजक सापडल्यामुळे.. टिममधुन परवा काढुन टाकले आहे.. त्या पार्श्वभुमिवर व एकंदरीत गेल्या १०-१२ वर्षात बरेच ऍथलिट्स.. खासकरुन अमेरिकेचे... उत्तेजकांच्या सेवनामुळे... बदनाम झाले असल्यामुळे(ज्यान अमेरिकेची प्रख्यात मेरिअन जोन्स सुद्धा गुंतली होती...) एकंदरीतच त्याचा जनमानसावर विपरित परिणाम झाला आहे व सध्या कोणीही जागतिक विक्रम केला तर सर्वप्रथम सगळ्यांच्या डोक्यात हाच विचार येतो... बहुतेक उत्तेजके घेत असला/असली पाहीजे.... तश्या बनावटी व अन-एथिकल ऍथलिट्समुळे सर्व ऑलिंपिक्स व जागतीक स्पर्धांवर एक प्रकारचे उदासनितचे सावट पसरले आहे... त्यामुळे १९६० च्या रोम ऑलिंपिक्सम्धे अनवाणी धाउन मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारा अबेबे बिकिला किंवा पोलिओतुन सावरलेली विल्मा रुडॉल्फ किंवा आफ्रिकेत... अतिशय गरीबीत मोठा झालेला हेली गेब्रसेलासी... यांच्या कहाण्या व त्यांचे प्रताप म्हणुन अजुनच थोर वाटु लागतात..
सही
सही मुकुन्द तुझी अभ्यासू मतं वाचायला नेहेमीच आवडतं
.
एक विनंति- या (आणि आधीच्याही) लेखाचं शीर्षक- 'बैजिंग ऑलिंपिक्स- 'संभाव्य' विजेते' हवं, 'संभावित' नाही!
-------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
मुकुन्द,
मुकुन्द, आपला वीरधवल खाडे पण ह्या स्पर्धेत आहे ना? त्याचे काय चान्सेस वाटतात ?
पूनम..
पूनम.. धन्यवाद... चुकीची दुरुस्ती केली आहे....
बाकरवडी.... विरधवल खाडे सर्वात वेगवान १६ वर्षाचा जलतरणपटु आहे व तो कोल्हापुरचा मराठी मुलगा आहे.. या दोन्ही गोष्टी आपण सर्व मराठी व भारतियांना अभिमानास्पद आहेत. पण दुर्दैवाने तो अजुन जागतीक दर्जाच्या जलतरणपटुंच्या मानाने बराच मागे आहे.. त्यामुळे त्याच्याकडुन पदकाची आशा नाही.. तो ५०,१०० व २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे भाग घेणार आहे
५० मिटर्समधे त्याचे बेस्ट टायमिंग आहे २२.६९ सेकंद तर जागतिक विक्रम २१.२८ सेकंदाचा आहे(तफावत लक्षात घ्यायची असेल तर एक उदाहरण देतो... त्याच्या सध्याच्या टायमिंग वर त्याला १९८० मधे सुवर्णपदक मिळाले असते!)
तर २०० मिटर्समधे त्याचे टायमिंग आहे १ मिनिट ५०.३५ सेकंद व जागतिक विक्रमविर मायकेल फेल्प्स्चे टायमिंग आहे...१ मिनिट ४३.८६ सेकंद(जवळ जवळ ७ सेकंदाने कमी)
पण ६ फुट ३ इंच उंचीच्या या १६ वर्षाच्या मुलाकडुन पुढच्या ऑलिंपिक्सपर्यंत( मॉडर्न प्रशिक्षण मिळाले तर!) बरीच प्रगती होउ शकते...
धन्यवाद
धन्यवाद मुकुंद अभ्यासपूर्ण लेख आवडला.
बाय द वे तुम्ही काही खेळता / खेळत होतात?
माधुरी... मी
माधुरी... मी क्रिकेट्,टेनिस व स्विमिंग व ब्रिज हे खेळ खेळतो.. बाकी सगळे खेळ आवडतात म्हणुन बघतो व वाचतो... लहानपणी बालमोहन शाळेत असताना आंतरशालेय स्विम स्पर्धात भाग घेतला होता तेवढाच माझा व शर्यतींचा संबंध आला. पण माझ्या लहानपणी मोठे झाल्यावर गावस्कर होण्याची स्वप्ने मी बघीतली होती.. पण वडिलांनी तंबी देउन सांगीतले होते... अभ्यासात प्रगती केल्याशिवाय तुला तुझ्या मोठ्या भावाच्या पावलांवर पावले टाकुन अमेरिकेत वैद्यकिय शिक्षणासाठी जाता येणार नाही तेव्हा अभ्यासात लक्ष घाल...:) (आमच्या वडिलांनी तेंडुलकराच्या वडिलांसारखे ... क्रिकेटला उत्तेजन दिले नाही...:) पण तरीही लहानपणी दादरला... शिवाजी पार्कवर... असंख्य रविवार.... टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचॅस खेळण्यात घालवले आहेत व गावस्कर-वेंगसरकर-विट्ठल पाटील यांच्या दादर युनिअन व वाडेकर्-रमाकांत देसाइ-मनोहर हर्डिकर-संदिप पाटिल्-अब्दुल इस्माइल यांच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या... कांगा लिगच्या मॅचॅस बघण्यात घालवले आहेत...) असो...
तर मंडळी... बैजिंग ऑलिंपिक्सचा पहिला दिवस पुर्ण झाला... आणि ज्यांनी ज्यांनी उदघाटनाचा सोहळा पाहीला त्यांना त्यांना एक अप्रतिम-डोळे दिपवणारा न भुतो-न भविष्यती.. असा नेत्रदिपक सोहळा पाहायला मिळाला.. मी १९७६ पासुन ऑलिंपिक्स पाहात आलो आहे.. पण माझ्या मते असा सोहळा मी कधीच पाहीला नव्हता.... सुरवातीच्या चायनिज ड्रमवरच्या काउंट डाउन पासुन.. ते शेवटच्या लि नांगने.. सर्व स्टेडिअमला.. ३६० डिग्रित्.. हवेत... स्टेडिअमच्या छताच्या परिघाला धावत फेरी मारुन... आर्टिस्टिक ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित करेसपर्यंत.... सर्व सोहळा भव्य दिव्य व डोळे दिपवणारा होता. मला खासकरुन ते प्रिंटिंग ब्लॉक्सचे.. म्युझिकवर वर-खाली होउन... वेगवेगळे डिझाइन व चायनिज लिपितले लेटर्स.. तयार होणे.. खुपच आवडले.. तसेच सबंध मैदानावर पसरलेला कागदरुपी एल सी डी स्क्रिन.. टोकाला.. खलित्यासारखा वळवलेला... व त्यावर तयार होत असलेले डिझाइन्..... मंत्रमुग्ध करुन गेले. आणि अर्थातच त्या सबंध स्टेडिअमला केलेले रंगिबेरंगी लाइटिंग व स्टेडिअमच्या कडेने बरसणार्या चायनिज फटाक्यांची आतषबाजी.. त्यामुळेही सर्व सोहोळा रंगांची उधळण करुन गेला...
आता प्रत्यक्ष स्पर्धांबद्दल.... स्पर्धांच्या पहिल्या दिवशी मला आवडलेल्या चार गोष्टी....
१: मायकेल फेल्प्सने.. विश्वविक्रम करुन जिंकलेली ४०० मिटर्स वैयक्तीक मेडले शर्यत...
२: स्पेनच्या सॅम्युएल सँकेजने जिंकलेली-- १५० मैलाची-- बैजिंग शहर्-टिनॅमन स्क्वेअर् व ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या...पार्श्वभुमिवर.. झालेली अटितटीची.. सायकल शर्यत...
३: साउथ कोरियाचा १८ वर्षाचा..टेहान पार्क.. याने ऑस्ट्रेलियाचा महान जलतरणपटु.. ग्रांट हॅकॅट याला हरवुन जिंकलेले.. ४०० मिटर्स फ्रिस्टाइलमधले सुवर्णपदक व
४: अमेरिकेच्या ४१ वर्षाच्या अमेझिंग डोरा टोरसने अमेरिकेला मिळवुन दिलेले.. ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधले रजतपदक..
मायकेल फेल्प्स... या माणसाला पोहोताना बघणे म्हणजे एक पर्वणिच असते... परत एकदा त्याने आजच्या शर्यतीत .. त्याचाच विश्वविक्रम मोडुन नविन विक्रम केला... मी सांगीतल्याप्रमाणे हंगेरिचा लॅझलो सेह.. दुसरा आला.. व अमेरिकेचाच रायन लॉक्टे तिसरा... मला मायकेल फेल्प्सच नाही तर त्याच्यासारखे व टायगर वुड व रॉजर फेडरर सारख्या ग्रॅट ऍथलिट्सचे नेहमी कौतुक यासाठी वाटते की.. त्यांच्यावर तेच जिंकणार या अपेक्षेचे सतत दडपण व ओझे असते.. व तरीही त्या दडपणाला बळी न पडता.. सर्व जगासमोर..ऑलिंपिक्स किंवा मास्टर्स किंवा विंबल्डनसारख्या रंगमंचावर... सगळ्या जगाचे लक्ष फक्त त्यांच्यावरच असताना... ते त्यांच्या लौकिकाला जागतात व स्पर्धा जिंकतात... खरच मानसिक जडणघडणीत ते जगावेगळे असतात्...असो.. अमेझिंग मायकेल फेल्प्स.. १ डाउन... ७ गोल्ड्स टु गो!
१५० मैलांची सायकल शर्यत म्हटल्यावर कोणाला सांगुनही खरे वाटणार नाही की या शर्यतीच्या अंतिम रेषेपर्यंत ६ सायकलपटु... नेक टु नेक.. पहिल्या नंबरसाठी झगडत होते... कोण जिंकेल ते कोणिच सांगु शकत नव्हते.. पण शेवटच्या ३ मिटर्समधे.. आपली लटपटती सायकल पुढे दामटवत.. स्पेनच्या सेम्युएल सेंकेजने इटलीच्या डेव्हिड रॅबोलिन व स्विझर्लडच्या फाबिअन कॅन्सेलाराला मागे टाकुन बाजी मारली... ही शर्यत बघता बघता माझ्याच पायात गोळे येतात की काय असे मला शर्यतीच्या शेवटी वाटत होते... पण या शर्यतीमुळे बैजिंग शहराचा व त्या शहराच्या वेशिवर असलेल्या ग्रेट वॉलला व त्याबाजुचा डोंगराळ व रम्य परिसर बघायला मिळाला.. उद्या हाच परिसर तुम्हाला महिलांच्या रोड रेसमधे बघायला मिळेल...
साउथ कोरियाच्या टेहान पार्कचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. ४ वर्षापुर्वी.. फक्त १४ वर्षाचा असताना.. अथेन्स ऑलिंपिक्समधे... याच ४०० मिटर्स शर्यतीत हा फायनलला आला होता.. पण फायनलमधे.. तलावात लवकर उडी मारल्यामुळे हा डिस्क्वालिफाय झाला होता... त्यावेळेला त्याच्या चुकीने लाजुन हा १४ वर्षाचा मुलगा.. बाथरुममधे २ तास स्वतःला कोंडुन बसला... कारण त्याला साउथ कोरिअन वार्ताहरांना तोंड दाखवायला लाज वाट्त होती... तोच मुलगा.. ४ वर्षांनी परत एकदा ऑलिंपिक्स फायनलला येतो व ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट ग्रांट हॅकेटला हरवुन सुवर्णपदक मिळवुन.. ४ वर्षापुर्विच्या आपल्या अपमानास्पद डिस्क्वालिफिकेशनचा असा बदला घेतो... याला म्हणतात जिद्द!
व ४१ वर्षाची डेरा टोरस.....तिचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.. ४१ व्या वर्षी ती ऑलिंपिक्समधे भाग घेउ शकते म्हणुन सर्व जगाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.. की बहुतेक ही बया पर्फॉरमंस एनहासिंग ड्रग्स घेत असली पाहीजे... पण तिने जगजाहीर करुन आव्हान दिले आहे की माझे रक्त कधीही तपासा.. कितीही वेळा तपासा.. पाहीजे तर अजुन बरीच वर्षे माझे रक्त सेव्ह करुन ठेवा व पुढे अजुनही काही चांगल्या रिलायबल टेस्ट आल्या तर त्यानेही माझे रक्त तपासुन बघा.. मी कधीच तसे ड्रग्स घेतले नाहीत.. आणि ती असेही म्हणाली की माझ्याकडे बरेच मिडल एज लोक आशेने बघत आहेत की ...ती करु शकते तर आपणही चाळिशीत फिट राहु शकतो... त्या सगळ्यांच्या विश्वासाला मी तडा जाउ देणार नाही... तर अश्या डेरा टोरसने.. अमेरिकेच्या पहिल्या ३ महिलांनी सुमार पोहुनही...... ऑस्ट्रेलियाच्या लिबि ट्रिकेटला शेवटच्या अँकर लेगमधे थोपवुन धरुन.. अमेरिकेला ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल रिलेमधे रजत पदक मिळवुन दिले.. व शेवटची १०० मिटर्सची अँकर लेग सगळ्यात वेगवान पाहुन नवा विक्रम केला... त्यामुळे आता ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे ती नक्कीच सुवर्णपदकाची आशा करु शकते... ती ,लिबी ट्रिकेट व हॉलंडच्या मार्लिन व्हाल्ड्युइस मधे ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे... सुवर्णपदकासाठी जबरदस्त लढत होइल.
आणि हो.. चायनाच्या पुरुषांच्या जिमनॅस्टिक्स संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहीलात का? अमेरिकेच्या टिममधल्या भारतिय वंशाच्या राज भावसारची कामगीरीही चांगली झाली... अमेरिकेची टिम सहाव्या नंबरवर येउन मंगळवारच्या फायनलला क्वालिफाय झाली आहे... चायनाचा यांग वे.. अपेक्षेप्रमाणे वैयक्तिक गुणात पहिला आहे तर जर्मनीचा फाबिअन हांबुचेन दुसरा... मंगळवारची फायनल पाहायला विसरु नका... मुलिंचे जिमनॅस्टिक उद्या सुरु होत आहे.. सगळ्यांचे लक्ष अमेरिकेच्या शॉन जॉन्सन व नॅस्टिआ ल्युकिनकडे असेल....
मुकुंद मी
मुकुंद मी बघितला ऑलिंपिक उद्घाटन सोहळा. अप्रतीम होताच होता. जवळपास १५००० कलाकार वापरुन केलेला हा समारंभ आणि कुठेच चुकुनही एकही चुक नाही. Hats off to all of them.
मी जलतरण स्पर्धा आणि जिमनॅस्टिक स्पर्धा बघितल्या. खुपच छान. मायकल फेल्स, डेरा टोरस, ऑस्ट्रेलियाची राईस, चिनची जिमनॅस्टिक टीम यांना खेळतांना बघुन अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले.
सायकल स्पर्धा बघितली नाही.
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
रुपाली..
रुपाली.. आजची पुरुषांची ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले शर्यत बघीतली की नाही?
मायकेल
मायकेल फेल्प्स.... ३ डाउन... ५ टु गो..
कालच्या रोमांचकारी रिले शर्यतीनंतर आजची फेल्प्सची २०० मिटर्स फ्रिस्टाइल शर्यत एकदमच एकतर्फी झाली... त्याने ती शर्यत स्वतःचाच विश्वविक्रम मोडुन जिंकली... खर म्हणजे त्याला कोणाचेच आव्हान नव्हते.... रजत पादक मिळवणारा तब्बल २ सेकंदांहुनही जास्त हळु होता...
उद्याची पुरुषांची ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले शर्यत अशीच एकतर्फी होणार आहे व त्यात मायकेल फेल्प्स त्याचे ४ थे सुवर्णपदक सहज जिंकणार आहे. २०० मिटर्स बटरफ्लायमधेही उद्या सहज जिंकुन आपले ५ वे सुवर्णपदक तो त्याच्या खिशात टाकणार आहे.
आणी मी आधी सांगितल्याप्रमाणे... अमेरिकेचा एरन पिअरसॉल.. १०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे जिंकला व नॅटली कॉफलिन महिलांच्या १०० मिटर्स बॅकस्ट्रोकमधे जिंकली...
तसेच जपानच्या किटिजिमाने १०० मिटर्स ब्रेस्ट्स्ट्रोकमधे सुवर्णपदक जिंकले.. फक्त याच शर्यतीत अमेरिकेला पदक मिळाले नाही... या वर्षीच्या अमेरिकेच्या जलतरण संघाला... अमेरिकेच्या जलतरण इतिहासातला सगळ्यात बलाढ्य संघ म्हणुन संबोधले जात आहे...
मायकल
मायकल फेल्प्स... अप्रतिम.:) ४ बाय २०० मधे कसला लिड घेतला त्याने.
मायकेल
मायकेल फेल्प्सची आत्ताची १०० मी बटरफ्लाय पाहिलीत का??
मी तरी आत्तापर्यंत पाहिलेली BESTEST रेस होती.. !!!!! खूपsssssssssssssच भारी..
मुकूंद, खास तुमच्या शैलीत हीचे वर्णन अपेक्षित आहे..