दोन धागे बंद झाले.
यातील "महाराष्ट्रात आणखी भूकंप होणार का ?" हा धागा बंद झाल्याने काहीच फरक पडत नाही.
https://www.maayboli.com/node/83681
अशा विषयावरचे धागे हे नियंत्रणात राहत नाहीत. प्रशासकांनी आवर घालावा किंवा आपला अमूल्य वेळ त्यात घालवावा असे कुणालाच वाटणार नाही.
द केरला स्टोरी हा धागा सुद्धा मूळ विषयापासून भरकटला. पण तरी तो असंबद्ध झाला असे म्हणता येत नाही. कारण चुकीचे का असेना युक्तीवाद करत करत विषयापासून धागा लांब गेला.
https://www.maayboli.com/node/83425
भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात
https://www.maayboli.com/node/83526
हा धागा राजकीय वळणावर गेला आणि भरकटला. प्रशासनाने लक्ष घातले नाही हे योग्यच केले. ज्याला विषयावर प्रतिसाद द्यायचा तो धागा कितीही भरकटला तरी देतच राहतो. अशा एका प्रतिसादाने धागा मूळ विषयावर येतो. सूज्ञ मायबोलीकरांना धागा भरकटण्याने फरक पडत नाही.
हे धागे बंद झाले नाहीत.
पण चित्रपट पाहण्याचे आकर्षण घसरत चालले आहे का ? हा धागा लगेचच बंद का झाला हे समजत नाही. हा काही राजकीय, सामाजिक विषय नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप केला. पण धागा बंद होण्याचे काय कारण असावे ? नको असलेले प्रतिसाद उडवून धागा चालू ठेवता आला असता. अॅडमिन / वेबमास्टर यांच्या निर्णयाचा पूर्ण आदर आहे.
https://www.maayboli.com/node/83631
एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद
एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद झाला होता का ? त्यानंतरच असे होतेय का ? याचा आढावा घ्या म्हणजे असे प्रश्न विचारण्यासाठी धागा काढायची गरज पडणार नाही. एका विशिष्ट व्यक्तीशी वाद झाल्यास ब्लॉक होणे, प्रतिसाद उडणे, धागे बंद होणे असे चमत्कार होतात. मंत्र तंत्र किंवा अघोरी विद्येचा वापर होतो का याची कल्पना नाही. पण असा संबंध असल्याचे आढळून आले आहे.
ठराविक आइडी कंटाळवाणे
ठराविक आइडी कंटाळवाणे ट्रोलिंग करतात
जोपर्यन्त इथे अमानवीय धागा
जोपर्यन्त इथे अमानवीय धागा आहे तर त्याचे अस्तित्व असे अधुन मधून काही धाग्याना जाणवत राहते आणि ते धागे बाधित झाल्याने असे अचानक नाहीसे होतात. हां फार गूढ़ विषय आहे त्यामुळे खबर्दारीचा उपाय म्हणून धागा प्रकाशित करतानाच शीर्षकाच्या बाजूला लिंबू मिर्चीची एक माळ टांगावी. नाहीतर कालांतराने एडमिन डायरेक्ट खीळा ठोकुन निघुन जातात आणि धाग्याचे सर्व कन्टेन्ट मायबोलीच्या बाटलीत कायमसाठी बंदिस्त होऊन इतरांच्या नजरेत कधीच दिसून येत नाही
इंटरेस्टिंग विषय आहे.
इंटरेस्टिंग विषय आहे.
आता तो धागा दिसत नाही.
आता तो धागा दिसत नाही. डिलीट केलाय कि ग्रुपमधे मर्यादीत केलाय ?
ज्या धाग्याला क्रुल्रुप्स लावलेय तो ग्रुपपुरता पण केला असेल तर डबल अॅक्शन घेतलीय.
असं काय आहे त्यात लपवण्यासारखं ?