काही लोक वाचनाची अजिबात आवड नसलेले तर काही वाचनाशिवाय जगूच न शकणारे. पैकी मी या स्पेक्ट्रममध्ये कुठे तरी पडते. पुस्तकवेडी आहे मी. लहानपणीच्या माझ्या आठवणी म्हणजे - वाचनात गढलेल्या, आई किंवा बाबांच्या शेजारी पडून त्यांचे नीरीक्षण करणे. मासिकांत तर चित्र नाहीत मग ही मोठी मंडळी पान का उलटत नाहीत - हा प्रश्न मला पडलेला लख्ख आठवतो. पुढे अक्षरांशी ओळख झाल्यानंतर, अक्षरक्षः दुकानावरच्या पाट्यांपासून ते भेळेच्या कागदापर्यंत सर्वाहारी वाचक अशी मी अमेरीकेत येउन हरवुन गेले होते. काही काळ मराठी वाचनापासून वंचित राहील्याने कठीण गेला. त्यातून मग मराठी संस्थळे सापडत गेली. मराठी संस्थळांच्या संस्थापकांचे ऋण मानावे तितके थोडे आहेत. आता तर किंडलवरही मराठी, हिंदी पुस्तके उपलब्ध आहेत. अनेकानेक ब्लॉग्ज आहेत तेव्हा आता मराठीची उपासमार राहीलेली नाही.
मला मराठी खालोखाल हिंदी वाचन फार आवडते. शुद्ध हिंदी, संस्कृतप्रचुर हिंदी function at() { [native code] }इशय गोड व रुबाबदार भाषा आहे. अनेक कविता, लेख, उपन्यास(कादंबरी), नाटकख, प्रवासवर्णने, व्यंग (विनोदी लेखन). जालावरती भरभरुन हे साहित्य आता उपलब्ध आहे. वाचनाने मला मनःपूत आनंद तर मिळतोच परंतु आय अॅम पुट टुगेदर. मला विस्कळीत, दिशाहीन वाटत नाही. बरेचदा तर राग, घॄणा, कटकट आदि नकारात्मक विचारांपासून एक सुटका म्हणुन मी वाचते. वाचन माझ्याकरता अमॄतमय आहे, मला 'सेन' ठेवण्याकरता , फन्क्शनल ठेवण्याकरता गजेचे आहे. हां मग आपल्याला जगाची ओळख होते, माहीती मिळते, आत्मविकास होतो, आदि रुक्ष गोष्टी नंतर. आधी महत्वाचे मला पात्रांमध्ये परकाया प्रवेश करुन त्यांचे जीवन जगता येते. मला माझ्यापासून एक सुटका मिळते.
बुक्स ऑइल अवर ब्रेन. वंगणाचे काम करतात पुस्तके. विचारक्षमतेला, बुद्धीला गंज लागू देत नाहीत.
एकदाच मला चोरी करण्याची इच्छा झालेली होती. तीव्रतेने. पण अर्थात करु शकले नाही - तेही बरेच झाले. १९९६- भारतात, 'लायब्ररी सेक्रेटरी' नात्याने, हॉस्टेलवरती मीच लायब्ररीचे काम पाही. म्हणजे कोणी काय पुस्तके नेली/ परत केली वगैरे. त्यात मी एक पुस्तक घेउन वाचले होते ते म्हणजे 'द शॉर्ट स्टोरीज ऑफ गाय द मोपासा'. मला ते पुस्तक विलक्षण आवडले होते. तेव्हा भारतात , परदेशी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नसत. त्यामुळे ते पुस्तक चोरण्याचा प्र-ह-चं-ड मोह झालेला होता. अर्थात चोरले नाही.
सर्वात सुंदर चेहरा कोणता तर वाचनामध्ये गढून गेलेल्या, हरवुन गेलेल्या व्यक्तीचा - हे माझ्यापुरता सत्य उत्तर आहे. ग्रंथालयात सर्वात सुंदर चेहरे पहायला मिळतात तर कधी प्रवासात.
'तुम्ही का वाचता? तुम्हाला वाचनामधुन काय मिळते?' या प्रश्नाचे उत्तर ऐकायला खूप आवडेल. तुमचे वाचनासंबंधी उत्कट विचार ऐकायला आवडतील. अन्य पेरिफेरल विषय स्पर्श केलेत जसे वाचनाची गोडी कशी लागली, त्या अनुषंगाने झालेल्या गंमती - तर तेही ऐकायला आवडेल. पुस्तके न आवडणार्या लोकांना , वाचन या छंदाविषयी काय वाटते तेही ऐकायला आवडेल. त्यांना वाचन ओव्हररेटेड छंद वाटतो का? लोक त्यांना वाचन आवडत नाही म्हणुन कमी लेखतात का वगैरे वगैरे.
मैं अपने शोर-ओ-शर से किसी
मैं अपने शोर-ओ-शर से किसी रोज़ भाग कर
इक और जिस्म में कहीं आराम कर के आऊँ
असे जेव्हां वाटते तेव्हां वाचतो. त्याने मनातला “शोर” विसरायला होतो
वाचत असतांना भोवताली कुठलाही आवाज आवडत नाही, स्वत:चाही नाही, म्हणून मोठ्याने कधी वाचत नाही
मूड असेल तसे काहीही वाचतो. वृत्तपत्रे सोडून सर्व. अनेकांनी वाखाणलेले, क्लासिक वगैरे स्वत:ला आवडले नाही तर चार दोन पानानंतर मिटतो, काही महिन्या - वर्षांनी पुन्हा एकदा प्रयत्न करुनही नाही आवडले तर कटाप फॉर लाइफ. स्वत:ला नाही समजले/आवडले त्याचे मग वाईट वाटत नाही.
माझे मराठी वाचन अगदीच “हे” आहे. ईंग्रजी हिंदी त्यापेक्षा थोडे बरे. कामाव्यतिरिक्त दुसरे रोज तीनही भाषांमधे काही ना काही वाचण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर माझ्या रुक्ष कामात मी भाषा- साहित्य- कला विसरीन अशी (साधार) भीती वाटते. सध्या छापिल पुस्तकांच्या अपरिग्रहाचे धोरण आहे, तस्मात डिजिटल वाचनावर भर असतो.
तुम्ही उत्तम विषय निवडलात सामो, सर्वांचे अनुभव वाचायला आवडतील.
मला वाचनाचा फार कंटाळा आहे.
मला वाचनाचा फार कंटाळा आहे.
पुस्तक वाचन वगैरे तर बंदच झाले आहे.
सोशल साइटवर मी लोकांचे एवढ्यासाठीच वाचतो, की मी त्यांचे वाचले नाही तर माझे कोण वाचणार.
आणि हे बिलकुल गमतीने म्हणत नाहीये
अर्थात मायबोली बाहेरच्या जगात वाचनाची आवड नसणारी खूप लोक असतील.
मायबोलीवर मात्र वाचनाची आवड असणाऱ्यांचा टक्का जास्त असणे स्वाभाविक आहे.
>>>> क्लासिक वगैरे स्वत:ला
>>>> क्लासिक वगैरे स्वत:ला आवडले नाही तर चार दोन पानानंतर मिटतो, काही महिन्या - वर्षांनी पुन्हा एकदा प्रयत्न करुनही नाही आवडले तर कटाप फॉर लाइफ. स्वत:ला नाही समजले/आवडले त्याचे मग वाईट वाटत नाही.
अगदी अस्सेच. पी जी वुडहाउस वाचायच प्रयत्न केलेला पण अगदी आटोकाट नाही. एका मर्यादेनंतर सोडून दिले.
>>>>>मायबोलीवर मात्र वाचनाची आवड असणाऱ्यांचा टक्का जास्त असणे स्वाभाविक आहे.
होय नक्कीच. इथे बरेचजण वाचनवेडेच असणार. बुकवर्मस.
धारपांची पुस्तकं बरीच वर्षं
धारपांची पुस्तकं बरीच वर्षं आउट ऑफ स्टॉक होती , त्यावेळी लायब्ररीतून ढापली म्हणजे दिलीच नाहीत परत , 6 - 7 तरी असतील .. मग काही वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आली तेव्हा तर विकतच घेतली सगळी . लायब्ररीला दुसरी दिली , एकप्रकारची भरपाई म्हणून . अपराधी वगैरे काही वाटलेलं नाही तसं फारसं आजपर्यंत .
लहानपणी जसं खातो-पितो, जेवतो
लहानपणी जसं खातो-पितो, जेवतो-झोपतो तसंच वाचायचो. त्यामुळे बरचस मराठीच वाचन (जे झालं ते) नववी पर्यंत झालं. मग काही ना काही कारणाने थोडा दुरावा आला शिक्षण, मुलं, नोकरी अशी काही (स्वतःलाही) न पटणारी करणं देऊन.
गेल्या काही वर्षांत परत (सुदैवाने ) वाचायला लागलीये.
जेव्हा (जवळच्या) मैत्रिणींनी उगाच वाचनात आणि लिहिण्यात वेळ फुकट का घालवतेस, किंवा "लोकं का वाचतील ?" असं म्हंटल तेव्हा "आपण का वाचतो हा प्रश्न" उफाळून वर आला आणि आता तुम्ही विचारलात.
१. वाचाल तर वाचाल , अर्थात माहिती, ज्ञान मिळविणे
२. खूप चांगला मित्र / चांगली मैत्रीण, तासंतास कसे निघून गेले कळतही नाही
३. जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणा बाहेर असतात तेव्हा आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन आपण त्या आपण निवडलेल्या जगात हरवून जाऊ शकतो
४. वाचताना मनात एक छान चित्र, त्यातील पात्र, त्या जागा सगळ्यांसकट तयार होतं. माझा अनुभव असा कि एखाद्या पुस्तकावर चित्रपट/ वेब सिरीयस किंवा नाटक जरी आलं तरी ते बघण्यापेक्षा पुस्तक वाचायला जास्त आवडलय
बरचस मराठीच वाचन नववी पर्यंत झालं.>>> त्यामुळे त्या वयात काही पुस्तकातलं गांभीर्य किंवा खोली त्या वेळी नाही कळल किंवा लक्षात नाही राहील. आता लोकांच्या चर्चा रंगल्या की ते जाणवत.
मला 4 नंबर चा मुद्दा पटला,
मला 4 नंबर चा मुद्दा पटला, तोच लिहायचा होता.वाचनात आपल्याला मेंदुसमोर चित्र बनवण्याचं स्वातंत्र्य असतं.टीव्ही/युट्युब/वेब सिरीज मीडियावर आपल्याला एक रेडिमेड चित्र तयार करून दिलेलं असतं तेच बघावं लागतं.
खूप वेगळे काही मुद्दे आलेत वर
खूप वेगळे काही मुद्दे आलेत वर. मनासारखे चित्र रंगवता येणे. खरच की.
जेव्हा लोकं विचारतात पुस्तक का खरेदी करतेस एकदा वाचलं की कुचकामी होते तेव्हा खरच हसावं की रडावं ते कळत नाही. छंदीफंदी व अनु धन्यवाद.
माझं बरंचसं छन्दिफन्दि
माझं बरंचसं छन्दिफन्दि यांच्यासारखं आहे. वाचायची सवय आईकडून आली. लहानपणापासून जेवताना डाव्या हाताला पुस्तक असे. का वाचता म्हणजे श्वास का घेता, असं म्हणण्यासारखं आहे.
कॉलेजात गेल्यावर लायब्ररी आणि अध्यापकांमुळे वाचन बरंच वाढलं. नोकरी करू लागल्यावर ललित साहित्याचं वाचन काहीसं कमी झालं.
आताही वाचन जेवढं व्हायला हवं तेवढं होत नाही. बुकशेल्फ बघून लोक , एवढी सगळी पुस्तकं तुम्ही वाचलीत का असं विचारतात आणि सगळी काय, बरीचशी नाही .नाही हे खरं उत्तर देतो.
स्मार्टफोन आल्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी झाला ही सबब आहे.
शिवाय मायबोलीवर लिहायला मिळतं, त्यामुळे वाचताना त्याचं सखोल मनन , चिंतन करायची सवय सुटून इन्स्टंट रिअॅक्षन्स उमटत राहतात.
तस्मात् वाचनाला शिस्त लावायची गरज आहे.
>>>>शिवाय मायबोलीवर लिहायला
>>>>शिवाय मायबोलीवर लिहायला मिळतं, त्यामुळे वाचताना त्याचं सखोल मनन , चिंतन करायची सवय सुटून इन्स्टंट रिअॅक्षन्स उमटत राहतात.
तस्मात् वाचनाला शिस्त लावायची गरज आहे.
भरत तुम्ही केवढा सेन्सिबल मुद्दा मांडलेला आहे. आपल्या सर्वांनाच वव्हॅलिडेशनची किती गरज असते. आपण किती चटकन रिअॅक्ट करतो. त्यामध्ये चिंतन राहूनच जाते. हे सत्य आहे. काही धागे तर इतके वेगाने पळतात की प्रत्येकाचे व्ह्युज डायजेस्ट करायलाच वेळ मिळत नाही. मला अशा वेळी माईंडमॅपस बनवावेसे वाटतात. की या कॅरॅक्टरची अमकी मते. त्यांची तमकी. अॅट अ ग्लान्स हे हे मुद्दे ...
व्यासपीठांचे सर्वाधिक सौंदर्य मल function at() { [native code] }यातील मतांच्या वैविध्यात जाणवते.
असो.
बॅक टू वाचन.
>>>>का वाचता म्हणजे श्वास का घेता, असं म्हणण्यासारखं आहे.
वाह!!
खूप उत्कटतेने सर्वच जण मते मांडत आहेत. ऋन्मेष तुमचे अनुभवही सविस्तर लिहा. आतापर्यंत तुम्हीच या धाग्यावरती वेगळेपणाने उठून दिसलात.
सामो हो, कामातून वेळ
सामो हो, कामातून वेळ मिळाल्यावर जरूर लिहितो. वाचतोय हा धागा. वाचन हे माझ्यासाठी लहानपणीचे ते प्रेम आहे ज्याचे पुढे जाऊन लग्न होत नाही. पुढे जाऊन मनात गोड आठवण राहते, पण दुरावल्याची खंत राहत नाही
सोशल साइटवर मी लोकांचे
सोशल साइटवर मी लोकांचे एवढ्यासाठीच वाचतो, की मी त्यांचे वाचले नाही तर माझे कोण वाचणार.

आणि हे बिलकुल गमतीने म्हणत नाहीये >>>>
खर आहे, अस होत कधी कधी!
तस्मात् वाचनाला शिस्त लावायची गरज आहे.>>> +१
वाचताना नोन्दी करायलाही सुरुवात करायला पाहीजे असही एक जाणवल.
आत्ता एक सुंदर पॉड्कास्ट
आत्ता एक सुंदर पॉड्कास्ट ऐक्ते आहे. त्यात एक वाक्प्रचार आल आहे - ऑइलिंग ब्रेन
युरेका!!! बुक्स ऑइल अवर ब्रेन.
३. जेव्हा सगळ्या गोष्टी
३. जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणा बाहेर असतात तेव्हा आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन आपण त्या आपण निवडलेल्या जगात हरवून जाऊ शकतो >>>> हे करत आलोय लहानपणापासुन पण आपण बऱ्याचदा जेव्हा झपाटल्यासारखं पुस्तक वाचत असतो तेव्हा virtual रिऍलिटी सारखं आपण आपल्यासाठी बनवलेल्या दुनियेत घुसलेले असतो. आणि मग काय तो समाप्तीचा फलक बघितल्याशिवाय परत नसतो.
हे मला प्रगट पणे पहिल्यांदा माझ्या मुलाने सांगितले, तेव्हा क्लिक झाले मी आधी असा विचार केला नव्हता.
"आई
तू मला सतत पुस्तक वाचतो म्हणून बोलतेस पणमी का वाचतो सांगू ? मला covid मध्ये जेव्हा सगळं बंद होत, मित्र नव्हते, तेव्हा मला कळलं. पुस्तक वाचताना मस्त exciting , आनंदी जग तयार होत आणि मग बाहेरच जग ज्यात दुःख / कंटाळा आहे त्याचा फरक पडत नाही. "बाकी अनेक फायदे तर आहेतच
बाकी अनेक फायदे तर आहेतच
EQ (भावनांक ?) ,बुध्यांक वाढतो, empathy वाढते, एकंदर मानसिक आरोग्यासाठीही वाचन उत्तम उपाय आहे
>>वाचन हे माझ्यासाठी
>>वाचन हे माझ्यासाठी लहानपणीचे ते प्रेम आहे ज्याचे पुढे जाऊन लग्न होत नाही. पुढे जाऊन मनात गोड आठवण राहते, पण दुरावल्याची खंत राहत नाही
सेम हिअर! पण मला दुरावल्याची खंत निश्चित आहे. वाचन आयुष्यातून पूर्णपणे गेले आहे हे नक्की समजले आहे आणि ते आवडत नाहीये. डिजीटल बुक्स वाचायला आवडू शकेल का हे चेक करण्यासाठी मागच्या महिन्यात अॅमॅझॉन रीडरची ट्रायलही घेतली पण किंडलवर पुस्तके वाचणे अंगवळणी पडू शकले नाही.
धागा वाचतोय.
धागा वाचतोय.
-------
चौथीपासून चांदोबा.
मग फुलबाग
अमृत, नवनीत
दक्षता
काही गाजलेल्या लेखकांची पुस्तके ,कादंबऱ्या.(ऐतिहासिक कादंबऱ्या नाहीच. फार ललित वर्णन नकोच.)
विविध विषयांवरील पुस्तके,चरित्रे. अकाउंटन्सी,लॉ.पर्यटन.
मराठी आणि इंग्रजी दोन्ही.
माध्यम छापील आणि फोनवर इपब (पाच इंची फोनवर इपब सहज वाचता येतात.)पीडीएफ वाचण्यासाठी tablet घ्यावा लागेल आता. Multi column with pictures pdf साठी मोठी आडवी स्क्रीनच लागते.
पेपरातील लेखही अजून वाचतो. सध्या कुठे काय चालले आहे त्याचा आढावा कळावा म्हणून.
पुस्तके विकत घेतो का?- फक्त संदर्भ ग्रंथ. मोजकेच आहेत.
यावरून समजले की करमणूक,माहिती यांची आवड म्हणून वाचतो.
‘Short Stories of Guy De
‘Short Stories of Guy De Maupassant’ सांगितल्याबद्दल आभारी आहे. एखाद्यास चोरण्याचा मोह व्हावा असं कोणतं पुस्तक असतं हे पाहण्यासाठी ते घेऊन सकाळपासून काही गोष्टी वाचल्या. लघुकथांना खरोखर त्याच्या स्वतःच्या शैलीत आकार दिलेला आहे या माणसानं. परीक्षेच्या रगाड्यातून रिकामा झालो की सर्व गोष्टी सलग वाचेन.
मी का वाचतो हे माझं मलाच माहीत नाही! कदाचित मला दुसरं काही जमत नसल्यानं मी वाचतो! पण हल्ली ऑनलाईन वाचनाचा दर्जा वरचेवर खूप खालावत आहे इतरत्र. इथं त्यामानानं जबरदस्त संग्रह आहे. त्यामुळे इथं रमावसं वाटतं; पण खरी मजा आजही पुस्तकातच येते. त्यात पुन्हा स्वप्रकाशनाचे लाड मराठी साहित्यात घुसल्यापासून येणाऱ्या पुस्तकांचा दर्जा सुद्धा संशयास्पद राहतो आहे. असो.
ही कमेंट लिहीण्याचं मुळ कारण बऱ्याच वाचकांची ऑनलाईन पुसतकं (पीडीएफ/ई-पब/रार/मोबी/टीएक्सटी/वर्ड) वाचण्याची तक्रार दिसून येते. मलाही पूर्वी हातांना पानांचा स्पर्श जाणवायचा नाही तोपर्यंत 'कीक' बसायची नाही! मीही कधी जन्मात पिडीएफ वाचून पुस्तकाची चव घालवणार नाही असं ठरवलं होतं. पण गेल्या वर्षात काही कारणास्तव मी दवाखान्याच्या वऱ्हांड्यात पडून होतो (म्हणजे बसलेलो होतो!) तेव्हा मनातील वादळ शमवायला शेवटी अनिच्छेने पिडीएफ वाचायला घेतली आणि . . . वाचतच राहीलो. नंतर गडबडलेल्या अर्थकारणाने तर मला या निर्णयावर ठाम राहण्यासाठी प्रोत्साहनच दिलं! आता readera नावाच्या एका ॲपवर अतिशय सुंदर सेटींग निवडली आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास न होता कित्येक क्लासिक पुस्तकं मी वाचून काढली. इंग्रजी, मराठी, हिंदी, अनुवादित आणि गुजराती सगळीच. मांगा वगैरेही वाचल्या. नव्या सिस्टमची सवय होण्यासाठी आधीच्या सिस्टम पेक्षा जास्त आराम नव्यातून मिळाला पाहिजे. आणि जेव्हा पुस्तकं वाचण्यातील सहजता, खुणा करण्याची, टिपणं काढण्याची, क्वोट करण्याची सहजता परत एका खिशात कैक पुस्तकं हवी तेव्हा संदर्भासह चाळता येण्याची सोय याची जेव्हा सवय होते तेव्हा आपोआप ई-पुस्तकं अंगवळणी पडतात.
वाचकानं लवचिकता दाखवण्याचा हा भाग आहे. उदाहरणार्थ आज जर लवचिकता दाखवली नसती तर Guy De Maupassantची Two friends मला वाचता आली असती का? गेल्या दशकात 'पायरसी'चं भारतात वाहणारं वारं पुस्तकांनाही धडकलं आहे. हवी ती नवी-जुनी पुस्तकं ८०% या ना त्या फाॅर्मॅट मध्ये उपलब्ध आहेत. यातच सर्वकाही आलं. त्यामुळं जास्तीत जास्त वाचकांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी, वाचनातील आनंद मिळवण्यासाठी इकडं वळायला हवं.
ई-पुस्तकं वाचनावर सांगण्यासारखं खूप आहे मात्र सविस्तर सांगत बसण्यापेक्षा ज्या-त्या वाचकानं हा अनुभव घेतलेला केव्हाही उत्तम.
[ वाचण्यासाठी सर्वात उत्तम फाॅर्मॅट ई-पब आहे आणि सर्वात वाईट फाॅर्मॅट पिडीएफ. मात्र मराठी ई-पब मध्ये काही छोट्या चुका राहतात त्यांच्याशी हातमिळवणी करावी. वाचताना डार्क मोड किंवा रिडींग मोड वापरावा – अतिशय शून्य प्रकाश मोबाईल मधून येईल इतका ब्राईटनेस बरा. लेखकानं खास पुस्तकं वाचताना त्रास होऊ नये म्हणून 'टूवे ब्लू रे लेन्स' चष्मा बनवून घेतला आहे. लेखक 'लेखकांना मोबदला मिळाला पाहिजे' या मताचा असलग तरीही सर्वसामान्यांना पुस्तक उपलब्ध करून देण्याची 'पायरसी'ची ताकद नाकारत नाही. आणि पायरसीतून कुठेही मिळालेली ई-पुस्तकं एकावेळी एक अशीच डाऊनलोड करून वाचायला हवीत. कारण एकदा घबाड घावल्याप्रमाणं ढिगभर पुस्तकं घेऊन नंतर हे वाचू की ते हे न कळल्यानं पुन्हा सर्व पुस्तकं डिलीट करून एकच पुस्तक ठेवण्याची पाळी सदरहू लेखकावर आली आहे.]
मला सर्वाधिक भीती वाटते ती
मला सर्वाधिक भीती वाटते ती नेत्रज्योती गमावण्याची. आंधळे झालो तर वाचू कसे? सध्या तरी दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे. पण तो सहज काढता येइल. मात्र उद्या अजुन काही निघुन दॄष्टी जाउ नये.
रंगारी +१
रंगारी +१
<कारण एकदा घबाड घावल्याप्रमाणं ढिगभर पुस्तकं घेऊन नंतर हे वाचू की ते हे न कळल्यानं पुन्हा सर्व पुस्तकं डिलीट करून एकच पुस्तक ठेवण्याची पाळी सदरहू लेखकावर आली आहे.>
एकदम रीलेट झाले.
मी मुख्यत्वे मनोरंजनासाठी वाचतो. काहीचवेळेस माहिती घेण्यासाठी वाचतो.
आजकाल सगळ्यांचेच वाचन कमी झाले आहे ते एकूणच अटेंशन स्पॅन कमी झाल्याचे प्रतिबिंब आहे असे मला वाटते. कारण अजूनही क्विक करमणूक देणारी चेतन भगत, आमिष, किंवा तत्सम यंग अडल्ट पुस्तके खपतात आणि वाचलीही जातात. कारण कमी वेळात आणि सोप्या प्रकारे करमणूक त्यात अजूनही मिळते.
>>>>सकाळपासून काही गोष्टी
>>>>सकाळपासून काही गोष्टी वाचल्या. लघुकथांना खरोखर त्याच्या स्वतःच्या शैलीत आकार दिलेला आहे या माणसानं.
धन्यवाद रंगारी. 'कुतूहल' हा हुषार लोकांच अविभाज्य गुण असतो. जरुर वाचा. खसखशीच्या दाण्याइतकं बीज मोपासा काय कुशलतेने फुलवतो. गुंगवुन टाकतो तो वाचकांना.
द पर्ल नेकलेस घ्या किंवा ती गोष्ट घ्या (नाव आठवत नाही) जिच्यात एक बायको मरता मरता नवर्याला हे सांगून मरते की आपल्या ८ मुलांपैकी एक मूल तुझे नाही पण कोणते ते मुद्दाम गुलदस्त्यात ठेवते. .....
काय वैविध्य आहे त्याच्या कथांत. काय सुंदर कथा आहेत.
मला लहान पणा पासूनच सवय आहे.
मला लहान पणा पासूनच सवय आहे. घरी फिरता लायब्ररीवाला दोन मासिके व एक कादंबरी देउन जात असे. प्लस जिमखान्यावर उत्कर्ष लायब्ररी
जवळ च होती. बागडत जाउन पुस्तके आणणे हा एक महत्वाचा कार्यक्रम होता. शिवाय पॉप्युलर बुक हाउसच्या दुकानाच्या मागे एक स्पेशल चिल्डरन्स बुक लायब्ररी होती. वडील नगर वाचन मंदिराचे सदस्य होते. घरी वर्तमान पत्रे येत. त्यामुळे वाचनाचे कल्चर होते. शाळेत पण लायब्ररी होतीच. हैद्राबादला आल्यावर पुण्याची जाम आठवण यायची पण आर के खान लायब्ररी ही देखील नारायण गुड्यात घरासमोरच होती. तिथून काहीही आणून वाचत असे. इंग्रजी पुस्तके कादं बर्या मासिके. व्होग कॉस्मोचे जुने अंक. गुड हाउसकीपिन्ग सुद्धा. प्लस कार्टुन्स. आर्चीज मॅड अन हे ते. आबिद रोड वर पुस्तके विकायला असत तिथून आण त असू.
हेच पुढे चालू राहिले. वाचनाने कल्पना शक्ती विस्तारते किंवा जी मुले साधारण क्रिएटिव्ह कल्पक शक्ती ची असतात त्यांना पुस्तकांसारखे वरदान नाही. काही ही वाचल्याचा पुढे कॉपिरायटर म्हणून काम करताना उपयोग झाला. आजही सर्व माहिती थोडी फार का होईना असते.
व अनेक विचार प्रवाह कळतात माहीत होतात. मनाची क्षितिजे रुंदवतात.
आमच्या घरी संगीत विषयक व मराठी नाटकांची पुस्तके होती. मासिके यायची. किशोर कुमार, चांदोबा हे तर घरचेच होते. मी तर
रद्दीच्या दुकानातूनही पुस्तके घेते. मला ६० रुत छान गीतेचे पुस्तक मिळाले आहे. त्यात इंग्रजीत विवेचन आहे श्लोक वाइज. इट इज मोअर दॅन अ हॉबी. पॅशन मोअर लाइक.
माझ्या पोस्ट डेथ इमॅजरी मध्ये सुद्धा. वारल्यावर एका अश्या बागेत जायचे जिथे एक झा डा खाली सावलीत बेंच असेल माझे दोन्ही कुत्रे तिथे बसलेले असतील वाट बघत. व डब्यात साबुदाणा खिचडी, ताक व दोन आंबा बर्फी असतील. एक पुलंचे पुस्तक असेल. शेजारीच झरा वाहात असेल झुळू झुळू. तिथे बसून पुस्तक वाचत डबा खाउ व मग मी व कुत्रे स्वर्गाकडे प्रयाण करु. हे नक्कीच.
>>>> अनेक विचार प्रवाह कळतात
>>>> अनेक विचार प्रवाह कळतात माहीत होतात. मनाची क्षितिजे रुंदवतात.
+१०१
>>माझ्या पोस्ट डेथ इमॅजरी मध्ये सुद्धा..........हे नक्कीच.
सुंदर कल्पनाविलास.
# हे भारीच कल्पनाविलास. अमा.
# हे भारीच कल्पनाविलास. अमा.
# मला ६० रुत छान गीतेचे पुस्तक मिळाले आहे. त्यात इंग्रजीत विवेचन आहे श्लोक वाइज फ्री प्रेस जर्नल पेपरात स्वामी चिन्मयानंद लिहीत. अशक्य अशा बाबुराव पटेल (मदर इंडिया मासीकवाले) यांनी गीतेचा इंग्रजी काव्यमय अनुवाद केला आहे. तर हे दोन फारच छान होते.
#हैद्राबादला आल्यावर . . .
कोटि स्टँडजवळ एक मराठी वाचनालय आहे ना तिथे दोन दिवस पेपर वाचलेले.
#एकदा घबाड घावल्याप्रमाणं ढिगभर पुस्तकं घेऊन नंतर हे वाचू की ते हे न कळल्यानं . . .
मी डिलीट करत नाही. मेमरी कार्डावर काढून ठेवतो.
मापुसोचे दहा भाग मिळाले आहेत. वाचून बघतो.
एकदा लोड केलेले पुस्तक
एकदा लोड केलेले पुस्तक calibre लयब्रितून जात नाही, डिलीट केल्याशिवाय. मी आधी सगळी पुस्तकं किंडलवर लोड करून ठेवायचो आता तसे करत नाही. एक किंवा दोन वाचतोय तीच ठेवतो.
sarah ban breathnach हीचे
sarah ban breathnach हीचे पुस्तकांबद्दलचे पुढील वाक्य खूप आवडते - A passionate woman, I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first sight. I need to be bowled over by an author's insight, to wonder how I lived before the book explained it all to me, or how the author knew me so well.
I was also a member of the
I was also a member of the library near koti bus stand.
सामो, माझं साधं उत्तर,
सामो, माझं साधं उत्तर, माझ्यापुरते. खूप आवडतं म्हणून!
जसे कुणाला एखादा पदार्थ आवडतो आणि एखादा आवडत नाही तसे!
स्नेहा धन्यवाद. उत्तर आवडले.
स्नेहा धन्यवाद. उत्तर आवडले. साधे , सरळ
मी वाचतो कारण
मी वाचतो कारण
१) मी वाचतो
२) मेंदूची मशागत होते नाही तर तो गंजेल.
३) विचाराला काहीतरी नवीन खाद्य मिळतं
४) मी वाचतो तेव्हा विवंचना विसरतो
५) वाचन माझा रियाज आहे
६) वाचन सरस्वतीची पूजा आहे
८) मनाच्या कक्षा विस्तारतात
९) इतरांना वाटण्यासाठी..आनंद होतो एखादी उत्तम कविता, लेख, कथा, विचार दुस-याला सांगतो तेव्हा
१०) ज्ञानात भर...ग्रंथ हेच गुरु
११) सवय झालीय
१२) आपला आपल्याशी सुसंवाद घडतो...चिंतन
१३) इतरांना माझा उपद्रव होत नाही
१४) आपण बरोबर की चूक हे कळत़ एखादं वैचारिक लिखाण वाचतो तेव्हा.. उदाहरणार्थ येथले प्रतिसाद... खूप छान, छान प्रतिसाद असतात. बरंच शिकवून जातात.
१५) मनोरंजन होते
१६) शिकलो त्याचं सार्थक झालं वाटतं ्
#१३ द बेस्ट. खरे आहे.
#१३ द बेस्ट. खरे आहे.
#९ मुद्दा खूप आवडला
>>>>>>खूप छान, छान प्रतिसाद असतात. बरंच शिकवून जातात.
होय!
Pages