गणेशोत्सव संपताना एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे.
मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.
संबंधित व्यक्ती ही मराठी भाषिक असावी. समजा, मराठी मातृभाषिक नसेल तर महाराष्ट्रात रुळलेली व मराठी बोलणारी सुद्धा चालेल. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले असेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा प्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.
धाग्याची सुरुवात खालील २ वाचलेल्या बातम्यांनी करतो :
१.
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. (https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-parivar-ganeshotsav...)
साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
................................................
२.
सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार.
(https://www.loksatta.com/pune-news/sonali-nawangul-dr-manjusha-ku-lakarn...)
तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांसंबंधीच्या गौरव बातम्या.
समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.
…………………………………………………………………………………….
वाह!!! असे जागरुक आणि
वाह!!! असे जागरुक आणि नेतृत्वगुण असणारे नागरिक, देशाचा चेहराच बदलत आहेत. किती अभिमानास्पद आहे.
रेल्वे रुळांना गेलेले तडे
रेल्वे रुळांना गेलेले तडे ओळखण्यासाठी आता रोबोचा वापर करण्यात येणार आहे.
या संदर्भात पुण्यातील कॉम्बॅट रोबोटिक्स या संस्थेने केलेल्या संशोधनाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली आहे.
आता या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी पुण्यात घेतली जाईल. ती यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी होईल.
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/pune/todays-latest-marat...
अशोक राणे:सत्यजित राय स्मृती
अशोक राणे:
सत्यजित राय स्मृती पुरस्कार ‘कान महोत्सवा’त प्रदान.
चित्रपट समीक्षकांची जागतिक संघटना असलेल्या ‘फिप्रेस्की’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
https://maharashtratimes.com/editorial/manasa/satyajit-ray-memorial-awar...
वैशिष्ट्यपूर्ण :
वैशिष्ट्यपूर्ण :
मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर पीएचडी प्राप्त
प्राध्यापक धनंजय सस्तकर
पुणे
रेल्वे सुरक्षितता
रेल्वे सुरक्षितता
ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील मोकळी जागा झाकणारी स्वयंचलित पायरी : राजू रामेकर या दहावीतल्या विद्यार्थ्यांने केले नवे संशोधन.
ही वापरल्यास गाडीत चढताना किंवा उतरताना पाय मधल्या सापटीत सापडणार नाही.
https://www.lokmat.com/yavatmal/ladder-an-automatic-step-that-bridges-ga...
केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान
केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) सचिवपदी प्रा. डॉ. अभय करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डीएसटीची स्थापना झाल्यापासून दुसऱ्यांदाच सचिवपदी मराठी शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. या आधी १९८६ ते १९९१ या काळात डॉ. वसंत गोवारीकर डीएसटीचे सचिव होते.
https://www.esakal.com/pune/pune-prof-as-secretary-of-science-and-techno...
..
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’मध्ये (आयआयएस्सी) कार्यरत डॉ. अपूर्व खरे यांना २०२२ या वर्षासाठी मिळालेला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार म्हणजे त्यांनी गणितात केलेल्या संशोधनकार्याची राष्ट्रीय स्तरावरून घेतलेली दखल आहे.
तरुण संशोधकांच्या मूलभूत संशोधनातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
https://maharashtratimes.com/editorial/manasa/selection-of-marathi-scien...
Pages