आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
या भिकार्यात धष्टपुष्ट, अपंग, कुष्ठरोगी, लहान मुले अशांचा भरणा असतो. मग देव देवतांचे फोटो गळ्यात लटकविले जातात. त्यांच्या भिक / दानाची रक्कम त्याच्या असहायतेनुसार ही वाढते. या पैश्या पैकी मोठा भाग भिकारी नशा पाणी व मजा करण्या साठी खर्ची करतात. यात भिकारी मुलेही मागे नाहीत.
मग भिकार्यांना भिक देणे योग्य आहे का? हा विचार मनात येतो.
याचा विचार करतांना खालिल मुद्दे समोर येतात-
यात पहिल्यांदा भिकार्यांचे वर्गिकरण करणे आवश्यक आहे.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी
ब) म्हातारे भिकारी
क) बाल भिकारी
ड) अपंग भिकारी
इ) वेडे भिकारी
ई) व्हाईट कॉलर भिकारी.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी :- आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.
ब) म्हातारे भिकारी:- म्हातारा काम करु शकत नाही म्हणून त्यांची मुले त्या म्हातार्याला भिक मागुन कमाई करायला लावतात. जर खरोखर असहाय्य असतिल तर वृध्दाश्रमात त्यांना भरती होता येईल. पण असे खुप कमी असतात.
क) बाल भिकारी:- आई वडील बळजबरी आपल्या मुलाला भिक मागण्यास भाग पाडतात. लहान मुलांनी भिक मागितल्यावर कोणीही लवकर भिक देतो. अशा मुलांचे शिक्षण बंद होते. यामुळे ही मुले व्यसनी ही होतात. ते मोठे झाल्यावर भिक मिळत नाही आणि काम करण्याची द्यानत नाही. म्हणुन ही मंडळी गुन्हेगारी कडे वळतात. उदा. चोरी, हप्तावसुली, खुन व इतर अनेक.
ड) अपंग भिकारी:- अपंगाचा बाऊ करुन ही मंडळी भिक मागते. परंतु जेष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे नी हे आनंदवन अपंग आणि कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुर्नवसनासाठी सुरु केले. आज किती तरी लोकांचा आधार हे आनंदवन झाले आहे. तेथे अपंगांना ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित केले जाते.याच धर्तीवर काम करणार्या अनेक शासकिय-अशासकिय संस्था आहेत. असे असतांना बर्याच अपंग लोकांनी भिक मागण्याचा सोपा मार्ग पत्करला आहे. त्यानी ठरवले तर त्यांनाही स्वयंपुर्ण होता येईल. पण त्याना आता कष्ट करण्याचे जिवावर येते म्हणुन बाय चॉईस ते भिकारी झालेत.
इ) वेडे भिकारी:- यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु अशा लोकांना पोलिस, तहसिदार यांच्या मदतीने वेड्यांच्या इस्पितळात नेऊन चांगले आणि स्वयंपुर्ण बनवता येऊ शकते.
ई) व्हाईट कॉलर भिकारी:- नव्या जमाण्यात असेही भिकारी निर्माण झालेत. चांगले कपडे घालायचे आणि माझे पाकिट चोरीला गेले. मला इंटरव्ह्युव ला जायला आणि घरी जायला पैसे नाहीत. मला मदत करा. मी घरी गेल्यावर तुमचे पैसे तुमच्या पत्त्यावर MOने परत पाठविन. कृपया मदत करा. असे सांगणारे व्यवसाईक भिकारी ही निर्माण झाले आहेत.
अशांना तर पोलिसांच्या ताब्यातच दिले पाहिजे. हे भिक मागत नाहीत तर लोकांची फसवणुक करतात.
मग अशा भिक मागणार्यांना आपण भिक /दान देऊन चांगले काम करतो कि वाईट?
आपणच भिक देणे बंद केले तर भिकार्यांना जगण्या करिता काम करावेच लागेल ना.
म्हणुन, भिकार्यांना भिक देणे योग्य आहे का?
आपल्याला काय वाटते?
<<अश्विनीच्या सगळ्या
<<अश्विनीच्या सगळ्या पोस्ट्सशी सहमत. >> मी पण.
अंध, अपंग, दलित, मागास अशा
अंध, अपंग, दलित, मागास अशा शब्दांना अधिक स्वीकारार्ह शब्द रुढ होत आहेत या पोस्टला व त्याला मधुकर यांनी दिलेले अनुमोदन यात एवढे प्रचंड हसण्यासारखे काय वाटले, हे आपण सांगू शकाल का? मी दिलेली माहिती ही विनोद निर्मितीसाठी नव्हती त्यामुळे मी जरा गोंधळलो आहे. तपशीलात काही चूक आहे का? >>>>>>>
प्रयोग,
मी तुला नाही तर त्या मधुकर ला हसलो. अगदी जातीय वादी विधाने करणारा आणि जाती व्देश वाढवण्याचे तो नेहमी काम करतो. फक्त विशय सोदुन हा जातिय मुद्यावर जातो. म्हनुन हसलो. फक्त संदर्भासाठी तुझी पोस्ट घेतली इतकच. तुझी काहीच चुक नाही. तु दुखावण्याचा हेतु नव्हता.
छावा, गोष्टी वैयक्तिक पातळीला
छावा,
गोष्टी वैयक्तिक पातळीला जाऊ नयेत हे अगदी मान्य. आणि दुर्दैवाने इथे असं वळण लागलं, एका चांगल्या विषयाची अशी धूळधाण उडाली. फार वाईट वाटलं. पण हे अपरिहार्य होतं. का ते जुन्या मायबोलीकरांना विचारा. तुम्ही अजून इथे नविन आहात.
आणि तुम्ही हे वाचलं नाहीत का?
>>आणि बीबीचा विषय भीक द्यावी का नको हा आहे त्यामुळे तेवढ्यापुरतंच बोललं जाणार.
मग ह्याला काय अर्थ उरतो?
>>पण (फोर्सफुल) बाल भिकारी यांचेवर पुढे चर्चा व्हावी . जेणे करुन काही तरी निर्ष्कष निघु शकेल.
आणि,
>>(फोर्सफुल) बाल भिकारी असोत वा इतर कोणताही भिकारी त्यांना भिक (आर्थिक) देण्याने प्रश्न सुटणार आहेत का? त्यापेक्षा त्यांचा पुर्नवसन व्हायला हवे. त्याने परत भिक मागता कामा नये, अशे पर्यायी व्यवस्था निर्माण करायला हवी. भिक देणे हे काही कायचे सोल्युशन नाही. भिक मिळाल्याने ते सुखी होणार नाहीत. मग त्यांचे पुर्नवसन कसे करता येईल. या वर चर्चा करु यात का?
अहो, तुम्ही काय बोलताय हे? आता व्हा परिणामांना तयार.
एकदा नक्की ठरवा तुम्हाला कशावर चर्चा हवी आहे आणि सबंधितांना त्याची कल्पना द्या.
निसर्गात सिम्बायोसिस नावाची
निसर्गात सिम्बायोसिस नावाची प्रकीया आहे. मोठ्या बलाढ्य झाडांवर , प्राण्यांवर छोटे अशक्त प्राणी क्लोरोफिल नसलेल्या वनस्पती वाढ्तात. तसे पॅरासाइट्स पण असतात. तसे समजा. भिकारी तुमचे हजारो लाखो रुपये मागत नसतात तर तुमच्या उत्पन्नाचा एक निग्लिजिबल भाग त्यानी द्यावा अशी त्यान्ची अपेक्षा असते. ते घाणेरडे, अशक्त रोगी असतात तरीही माणसेच असतात. इथे बायकोला बुरखा घालून मुलांसकट रोड्वर उभे राहून भीक मागायला लावणारे पती आहेत. आया बहिणी आहेत. सर्वायवल हा जिथे मेन इश्यु आहे तिथे ते कसे होते व त्यासाठी काय केले जाते हे जजमेन्ट पास करायचा ह्क्क आपल्याला नाही.
त्यान्च्या प्रजोत्पादनाला रेग्युलेट करणे वगैरेच्या बाता हास्यास्पद व अननुभवी आहेत. मद्रास मधे बॅन्यन ही संस्था आहे जी भीक मागणार्या मनोरुग्ण स्त्रीयांच्या पुनर्वसनाचे कार्य करते.
http://www.thebanyan.org/ बघा. परदेशस्थ भारतीय डोनेट करू शकता.
मी माझ्या आधिच्या पोस्ट मध्ये लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्यान्च्या जागी ठेवून बघा. लिफ्ट नसली,
नेट अर्धा तास गेले, पाणी एक दिवस २४ तास आले नाही तर वैतागणारे आपण आणि हे काहीच नसलेले
भिकारी. कसे वाट्ते. आपण लहान मुलांना १ रु. दिला तर त्यातील २५ पैसे तरी त्याना मिळतील.
बरेच ठिकाणी ह्याप्रकारची चॅरिटीला धार्मिक आधार दिला आहे. मंदिरासमोरील, मशीदीसमोरील भिकारी. इ.
सिग्नल मध्ये बरेच शबरी मलै चे व्रत घेतलेले लोक पैसे मागतात. असे पैसे मागूनच यात्रेला जायचे असते.
ते बायकांच्या जवळ ही जात नाहीत.
मी फुले अगरबत्तीवर खर्च करीत नाही पण शुक्रवारी एका मुलीला जेवायला घालते. शनीवारी एका म्हातार्याला पैसे देते. ( एका जेवणापुरतेच) इथे एक मसब टॅन्क सिग्नल आहे तिथून पुढे मुस्लीम भाग सुरू होतो. नेहमी ते भिकारी असतात. ते आपली दखल ही घेत नाहीत.
भिकार्यांच्या द्रुष्टीकोणातून बघितल्यास, एसी व काचा बंद गाड्या ही त्यांचा कमीपणा अतिशय अधोरेखित
करनारी गोष्ट आहे. काचेवर ट्क ट्क करायचे. व दूर जायचे. यात आतल्या माणसाच्या मनावर साधा ओरखाडाही पड्त नाही. स्कूटरवर असताना तुम्ही त्यांना बघता, त्यान्चा वास येतो व अगतिकता अधिक भावते. मान्य ते मला भोट्म, रडकी समजत असतील पण आय कांट हेल्प. मी भीक देण्याचे थांबवीणार नाही. हा बीबी वाचून तर नक्कीच नाही.
(No subject)
टीप देणे म्हणजे पैसे फुकट
टीप देणे म्हणजे पैसे फुकट घालवणे? तो दिलेल्या सेवेचा मोबदला नाही?
वेटरची टीप आणि भिकार्याची भीक यात मुलभूत फरक आहे. टीप प्रांमाणिकपणे मिळवलेली कष्टाची कमाई आहे. असो, या बीबीचा तो विषय नाही पण तुलना अवाजवी वाटली म्हणुन लिहीले.
.
.
.
.
कायद्याने तर नी, घरटी जास्तीत
कायद्याने तर नी, घरटी जास्तीत जास्त दोनच मुले होऊ द्यावीत असं करावं >> कायद्याने मूल होत नसतात
चायनासारखं करावं लागेल.>> इन्डीयाहत नाही जमायच ते!
आणि तो उपाय नव्हे!
भीक मागणं हा खरतर एक बिजीनेस झालाय! आपण भीक का देतो? बर्याचदा कटकट नको म्हणून! आणि सहानुभूती वाटते म्हणूनही! ( पैसा जास्त आहे म्हणून कुणी भीक देत नाही! नाही ना??) आपण भीक देतो म्हणजे काय करतो? तर आपल्या जवळचे पैसे देतो,वस्तू देतो इ. इ. आपण ह्या गरीबांना काही काम देऊ शकतो का? मेबी ह्यात कुठेतरी ह्या ? चे उत्तर असेलस वाटतं. आपल्यापरीने आपण चार पैसे / नोट देऊन स्वतःची जबाबदारी पार पाडल्याच तात्पुरत समाधान मानतो!
"बॅन्कर टू द पूअर" ह्या पुस्तकात लेखकाने बरेचसे उपाय योजले आहेत आणि "ग्रामीण बॅन्केद्वारा" ते बान्ग्लादेशात कार्यरत आहेत! मला वाटतं आपण त्यांच्यापास्न प्रेरीत होऊन काही तरी भरीव काम करू शकू. गरज आहे ती वेळेची ( जो दुर्दैवाने आपल्याकडे फार कमी असतो!) आय होप आपण ह्या चर्चेबरोबरच काहीतरी विधायक कार्य करू शकतो.
तुम्हाला काय वाटत? आपण काय करू शकू?
[वादावादीत न पडता एवढच म्हणू इच्छितो की लेट्स ट्राय टू फाइन्ड आउट अ सोल्यूशन]
हा मेसेज चर्च मधील मेसेज
हा मेसेज चर्च मधील मेसेज सारखा वाटेल.
तुमचे ह्र्दय जास्त मोठे करा. मुलाबाळांच्या भविष्याची, तुमच्या म्हातारपणाची सोय झाली असेल तर यथा शक्ती धन/ जुन्या वस्तू दान करा. एक ही पैसा मेल्यावर बरोबर घेउन जाता येत नाही. देण्याने त्यांची सोय नव्हे तर तुमचे कार्मिक बर्डन कमी होइल म्हणून द्या. आपला देश गरीब लोकांचा आहे. तिथे पहिल्या जगातील उपाय व विचारसरणी लागू पडेलच असे नाही. अर्थात हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे.
विस्थापित,जगण्याच्या संधी नष्ट झालेले अगतिक लोक समोर आले तर त्यान्च्या डोळ्यात बघा. तिथे तुम्हाला काय दिसते? तुम्हाला फसवायची एक संधी की पुढील जेवणाची एक संधी.?
आन्धरात पोर्ट डेवलप होत आहे त्यासाठी शेतकर्यांच्या जमीनी घेतल्या गेल्या आहेत. शेतकरी मेल्यास
त्याच्या बायकोला चहाची ट्परी चालविणे, व पोर्ट मध्ये माल आणणार्या वाहनचालकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे याशिवाय मुलांना अन्न पुरवीण्याचे मार्ग फारसे नाहीत. आपण आपले शहरी लॉजिक लावले तर
काय होइल यांचे.
Do unto others, be kind to others, share your good fortune and God will give it back to you hundred times more.
-----------------------------------------------------------
हा मेसेज भारतीय भिकार्यांनी स्पॉन्सर केलेला नाही.
देण्याने त्यांची सोय नव्हे तर
देण्याने त्यांची सोय नव्हे तर तुमचे कार्मिक बर्डन कमी होइल म्हणून द्या.
एकदम मान्य....... तुमचा शंभरावा प्रतिसाद अगदी शंभर नंबरी...
विस्थापित,जगण्याच्या संधी
विस्थापित,जगण्याच्या संधी नष्ट झालेले अगतिक लोक समोर आले तर त्यान्च्या डोळ्यात बघा. तिथे तुम्हाला काय दिसते?
--- डोळ्यात बघायला खरोखरच धाडस हवे, क्वचित ते माझ्याकडे नाही आहे असे वाटते कारण डोळे बंद करण्याचा अत्यंत सोपा मार्ग मी पत्करतो...
मला वाटते दोन प्रकारच्या लोकांच्या वृत्ती दिसत आहेत, जवळचे तसेच लांबवरची दृष्टी ठेवणारे (अ) तात्पुरती मदत करुन पुढे जाणारे, ह्यांच्या डोळ्यांना मदत मागणार्याचा पुढचा तासच दिसतो, ते २ -४ रु. किंवा खायचे, कपडे अशी मदत करुन पुढे जातात... विनियोग कसा होतो याच्याशी घेणे देणे ठेवणे शक्यच नाही किंवा जरुरही नाही. (ब) काही लोक पावलो पावली पैसे वाटत बसण्यापेक्षा एक मोठी रक्कम गोळा झाल्यावर, त्या रकमेचा विनियोग गरजू व्यक्तींसाठीच होतो आहे ना याची खातरजमा करतात. थोडा कायमस्वरुपी, क्लिष्ट असा हा मार्ग आहे. सर्वच गोष्टींचा पडताळा करणे एका व्यक्तीला निव्वळ अशक्य आहे.
दोन्ही प्रकारात स्वत:चे दोष आहेत. दुर्दैवाने मागणारे आणि देणारे हात ह्यांमधे काही योजने अंतर आहे... हे अंतर वाढत आहे. जन्म कुठे होतो ह्याच्या co-ordinates (रिलायन्सच्या महाली किंवा झोपडीमधे रस्त्यावर) वर हाताचे भविष्य अवलंबुन आहे.
शेवटी मानवाने मानवाशी मानवासारखा व्यावहार ठेवावा असे वाटते.
चर्चा वाचली. चांगल्या
चर्चा वाचली. चांगल्या भावनेतून मदत म्हणून भीक देणारे आणि काही प्रॅक्टिकल विचार करुन भीक न देणारे या दोन्ही बाजू वाचल्या. न देण्याच्या कारणांमधली मला दीपांजली, नीधपने लिहिलेल्या काही गोष्टी पटल्या. मीही भीक म्हणून पैसे देण्याच्या विरुद्धच आहे. पण प्रत्येकवेळी देणार नाही असंही नाही. अश्विनीके यांनी थोडक्यात खूप चांगलं मांडलं आहे,
>>आता आपण कुठल्या परिस्थितीतील मुल समोर पाहतो आहे त्याच बरोबर आपली मानसिक >>परिस्थितीही त्यावेळेस कशी आहे (म्हणजे आपण त्यावेळी जास्त भावूक आहोत की प्रॅक्टीकल >>आहोत) यावर त्यावेळचा आपला कन्सेप्ट बदलू शकतो.
हे मला पटलं. "आम्ही भीक देत नाही" हे इथे खरंच कोणी अभिमानाने लिहिलं असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या कारणांना "नाकर्तेपणा झाकणे" म्हणणे मला पटले नाही. ते कदाचित भीक घालत नसतील पण योग्य मार्गाने गरजूंना मदत होईल अश्या इतर गोष्टी करत असतील. आणि ते काय करतात आणि काय नाही हे इथे कोणी विचारण्याची गरज नाही. प्रत्येकाला या गोष्टी चारचौघात सांगाव्या वाटत असतील असे नाही.
ज्यांना हा विषय जवळचा वाटतो, जे मनापासून मदत करतात त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण भावनेच्या भरात पाऊल न उचलता थोडा वेगळा विचार करणार्यांची मतेही विचारात घ्यावीत. नीधपने लिहिलेला खालचा पॅरा पटला-
".....मुळात या सगळ्यामधे इतके विविध प्रकारातून भिकेशी पोचणारे लोक आहेत की प्रत्येक समस्येच्या शेवटाला भिक मागणे या पर्यायाकडे माणूस येतोय हे लक्षात येतं. तेव्हा भिकारी ही समस्या असण्यापेक्षा अनेक समस्यांचं एक बायप्रॉडक्ट आहे असं म्हणायला हवं. आणि प्रत्येक जण प्रत्येक समस्येवर समजून घेऊन आर्थिक मदत, वेळ वा पूर्णवेळ काम करू शकत नाही. जो तो त्याच्या परीने करत असतो. करायची इच्छा बाळगून असतो. विचार करत असतो. अभ्यास करत असतो."
इथला निष्कर्ष काहीही निघो अथवा न निघो, त्यातून कसलाही कायापालट होण्याची शक्यता कमीच. सगळ्या चर्चेनंतर काही विधायक कार्य हाती घेऊन पार पाडले पाहिजे असेही नाही. ही चर्चा वाचून काही लोकांची मते पालटतील, ते मदत देण्याचे नवीन मार्ग शोधतील किंवा पूर्वीप्रमाणेच लोक आपापल्या पद्धतीने मदत करत रहातील. आपल्याला जो विषय जिव्हाळ्याचा वाटतो तोच इतरांना वाटेल असे नाही तेव्हा प्रत्येकाचे मार्ग वेगळे.
उदय, चांगले विश्लेषण... एकूणच
उदय, चांगले विश्लेषण... एकूणच या दोन प्रव्रुत्ती आहेत... एकमेकाना नावे ठेवण्यापेक्षा आपापल्या मार्गाने जाणे योग्य...
२-४ रु देणार्यानी दिलेल्या पैशातून रोजच्या रोज वेळेवर वडापाव मिळाला, तरच उपेक्षित लोक जगणार आणि मग मोठ्या प्रमाणावर ज्याना पुनर्वसन करायचे आहे, ते लोक मदत करू शकतील......
एकाच नाण्याच्या/नोटेच्या (
) दोन बाजू...
पुण्यात, माझ्या मित्राचे
पुण्यात, माझ्या मित्राचे लक्ष्मी रोड वर दुकान आहे, तो बिस्कूटाचे पुडे आणून ठेवतो, आणि भिकारी आले कि तो एक पुडा देतो. तो म्हणाला कि, बरेच जण, दारू पितात, म्हणून तो पैसे देत नाही. तो म्हणाला , आता बरेच भिकारी, ज्यांना फक्त पैसे पाहिजे आहेत, ते कमी येतात.
इथे, अमेरिकेत, आम्ही, ख्रिसमस च्या आसपास, फक्त देतो, नाहीतर United Way ला डोनेशन देतो.
अश्विनीके, अभिनंदन. >>जे
अश्विनीके, अभिनंदन.
>>जे भरपूर कष्ट करतात आणि तरीही त्यांना जगण्यापुरेसं मिळत नाही, त्याच धडधाकट व्यक्तींना मदत करावी, ते भिकारी नाहीत.
या विचारसरणीपासून...
>>दुसर्या बाबतीत जेव्हा ते बाळ अगदी भुकेलं असेल, थंडीत कुडकुडत असेल तर नक्कीच त्याला काही देऊ करावं, भीक म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून.
या विचारापर्यंत तुम्ही आलात. >>>>>>>>>>
अश्विनी, अहो माझे विचार आधिपासूनच असे आहेत. या बाफमुळे बदललेले नाहियेत त्यामुळे अभिनंदन नको.
कुठल्या का भावनेनं असो, तुम्हाला काहीतरी करावसं वाटलं ह्याचं मोल फार मोठं आहे. >>>> अश्विनी, मी जे काही करते ते शक्यतो गुप्त ठेवते. ज्यांच्या माध्यमातून करते त्यांनाच फक्त ते (अपरिहार्यपणे) कळतं. काही मायबोलीकरांना त्याबद्दल माहित आहे. आणि नुस्तं करावसं वाटणं पेक्षा त्यानुसार प्रत्यक्ष करणं मला आवडतं. लहान मुलं / वृद्ध / अपंग व इतरही गरजू भावंडांसाठी (आपण सारी देवाची लेकरं या भावनेने मी भावंडं म्हटलं आहे) जे करावसं वाटतं त्याची बीजं या बाफमधून नाही तर माझ्या लहानपणीच माझ्यात पेरली गेली आहेत आणि मी स्वतःला नशिबवान समजते की मला ते करायची वारंवार संधी मिळत असते.
हा इतका संवेदनशिल विषय आहे की यात कसले आलेत आपले इगो सांभाळणं आणि माझं बरोबर की तुझं बरोबर वगैरे >>
ह्याचा संदर्भ लागला नाही.>>>>.. या बाफवर वाद होणार असे वाटल्याने मी हे लिहिले. वाद हे जास्तकरुन "माझेच बरोबर" या भावनेतून होतात. बाकी काहीच पर्सनल नाही, निव्वळ जनरल स्टेटमेंट आहे.
अश्विनीके, ह्या पहिल्या बाबतीतल्या दुर्दैवी मुलाचा वाली कोण हो? कुणीच नाही. त्याने तसच कुत्र्यासारखं आयुष्य जगायचं? विचार करून पाहा ना, समजा आपल्या ओळखीतल्या कुणाचं बाळ असतं तर ते? उन्हातान्हात, पावसापाण्यात दिवसभर सतत भीक मागत वणवण हिंडायचं. गुंडांकडे जाणार म्हणून तुम्ही त्याला काही देणार नाही, आणि तुम्ही काही दिलं नाही म्हणून गुंड त्याचे हाल हाल करणार. त्याने कुठे जायचं? >>>>>>> अहो पण असे करण्याने त्या मुलांची सुटका अशक्यच होईल. उलट त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजले जाईल त्याचं काय? त्यापेक्षा मुलांना पळवून जबरदस्तीने या मार्गाने नेणार्या गुन्हेगारांबद्दल काही कळलं तर पोलिस व समाजसेवी संस्था कळवणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
भिकार्याला भिक का
भिकार्याला भिक का द्यावि.आपले घामाचे पैसे या फुकट्याना का द्यावे.
मदत करणे वेगळे व भिक वेगळि
"बॅन्कर टू द पूअर" ह्या
"बॅन्कर टू द पूअर" ह्या पुस्तकात लेखकाने बरेचसे उपाय योजले आहेत आणि "ग्रामीण बॅन्केद्वारा" ते बान्ग्लादेशात कार्यरत आहेत! मला वाटतं आपण त्यांच्यापास्न प्रेरीत होऊन काही तरी भरीव काम करू शकू. गरज आहे ती वेळेची ( जो दुर्दैवाने आपल्याकडे फार कमी असतो!) आय होप आपण ह्या चर्चेबरोबरच काहीतरी विधायक कार्य करू शकतो.>>>>>>>>>>>>>>
आभारी डुआय महत्वपुर्ण माहीती करिता आणि तुमच्या दृष्टीकोणा बद्दल धन्यवाद.
तुम्हाला काय वाटत? आपण काय करू शकू?
[वादावादीत न पडता एवढच म्हणू इच्छितो की लेट्स ट्राय टू फाइन्ड आउट अ सोल्यूशन]>>>>>
१००% सहमत.
इंद्रधनू, मी सहमत!
अहो, तुम्ही काय बोलताय हे? आता व्हा परिणामांना तयार.
एकदा नक्की ठरवा तुम्हाला कशावर चर्चा हवी आहे आणि सबंधितांना त्याची कल्पना द्या.>>>>>>>
हा बाफ सुरु करतांना विषय "भिकार्यांना भिक देणे योग्य आहे का?" हा होता. त्यानंतर च्या चर्चेत त्यांच्या पुर्नवसनाचा मुद्दा पुढे आला. त्याबाबत मी चर्चा केलेलीच आहे. पुर्नवसनाचा मुद्दा मांडणे गैर आहे का? या बाफ वर पुर्नवसनाचा मुद्दा चर्चे अंती उपस्थीत करणे अयोग्य आहे का? माझ्याकडुन असे बोलतांना काही मोठे पाप झाले आहे, कि ज्याकरता आता मला परिणामांना तयार राहवे लागेल? असो.
बरेच जण मी भिक देतो किंवा देत नाही हे कसे बरोबर आहे, याचा पाठपुरावा करतांना / ठणकाउन सांगताना दिसतात तर काही अनुमोदन करतांना. पण पुर्नवसाना च्या मुद्यावर कोणी बोलु इच्छीत नाही.
छावेबुवा, भिकार्यांच्या
छावेबुवा,
भिकार्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न शासनाने केले आहेत. वर कुठेतरी मी बेगर्स होमबद्दल लिहिले पण त्यात एक वाक्य टाकायचे राहून गेले. शासनातर्फे बेगर्स होम उर्फ भिक्षेकरी गृहे चालवण्यात येतात. उदाहरणादाखल नगर जिल्ह्यात श्रीगोन्दा तालुक्यात असे एक गृह आहे. तिथे शेतीही आहे. पकदलेल्या भिकार्याना तिथे थोडेसे काम दिले जाते. जेवण, राहण्याची सोय केलेली असते. अत्यल्प मोबदलाही कामाचा दिला जात असावा.परन्तु भिकारी असताना त्यांची जी लाईफ स्टाईल झालेली असते (काम न करणे , अनिर्बंध फिरणे, नशापान करणे इ.)त्याच्याशी हे जीवन मेळ खात नाही. ते कामचुकार अथवा आळशी आहेत असे मला म्हणायचे नाही. पन त्याना इतक्या दिवसानन्तर कोणतेही स्किलफुल काम केलेले नसल्यानन्तर काही अंगमेहनतीचे काम करणे जमत नाही. आणि म्हणून आवडतही नाही. त्यामुळे बरेचसे भिकारी (शासकीय भाषेत 'भिक्षेकरी' :)) तेथून पळून जातात आणि पुन्हा भीक मागू लागतात . त्यांच्या आवडीचे काम देऊन पाहिले तर तेही त्यांची इच्छा नसते. काही विकलांग लोक फक्त राहतात.
त्यामुळे पुनर्वसनाच्या बाबतीत 'तुम्ही घोड्याला पाण्यापर्यन्त नेऊ शकता पण पाणी प्यायला लावू शकत नाही' असा प्रश निर्माण होऊ शकतो. अर्थात ही आयडिया वाईट आहे आणि ती अमलात आणू नये असा माझा विरोध नाही. पण त्या दिशेने प्रयत्न झालेले आहेत आणि ते फारसे उत्साहवर्धक नाहीत.
रॉबिनहुड, अतिशय महत्वाची
रॉबिनहुड,
अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्दल खुप आभारी आहे!
आपण तेथे दिलेली माहिती खुप बोलकी आहे.
अत्यल्प मोबदलाही कामाचा दिला जात असावा.परन्तु भिकारी असताना त्यांची जी लाईफ स्टाईल झालेली असते (काम न करणे , अनिर्बंध फिरणे, नशापान करणे इ.)त्याच्याशी हे जीवन मेळ खात नाही. ते कामचुकार अथवा आळशी आहेत असे मला म्हणायचे नाही. पन त्याना इतक्या दिवसानन्तर कोणतेही स्किलफुल काम केलेले नसल्यानन्तर काही अंगमेहनतीचे काम करणे जमत नाही. आणि म्हणून आवडतही नाही. त्यामुळे बरेचसे भिकारी (शासकीय भाषेत 'भिक्षेकरी' ) तेथून पळून जातात आणि पुन्हा भीक मागू लागतात . त्यांच्या आवडीचे काम देऊन पाहिले तर तेही त्यांची इच्छा नसते. काही विकलांग लोक फक्त राहतात.>>>>>>>>>>>>>>>
परंतु एकंदरीत माहिती वयस्क भिकार्यांबाबत वाटली. तेथे बालभिकारी ही असतात का? असतील तर त्यांच्या बद्दल जरा माहिती द्या ना. कारण येथे चर्चेचा मुख्य विषय बाल भिकारी हाच झाला आहे. आणि बालक ही कच्ची माती असते असे म्हणतात, त्याला जसे घडवाल तसा आकार त्याला मिळतो. मला वाटते कि, त्यांना नक्कीच सुधरवले जाऊ शकते (पळुन गेले/जाऊ दिले नाही तर).
त्यामुळे पुनर्वसनाच्या बाबतीत 'तुम्ही घोड्याला पाण्यापर्यन्त नेऊ शकता पण पाणी प्यायला लावू शकत नाही' असा प्रश निर्माण होऊ शकतो.>>>>>>
इथेच मुळ गोम आहे , असे मला वाटते.
म्हणजे आपण जे बोंबलतो आहोत कि या बिचार्या (भिकारी) लो़कांचे होणारे अतोनात हाल कमी करण्या करता आपण त्यांना भिक देतो. तोवर श्रमाच्या तळ्यातील पाणी या घोड्यांना नको असते. त्यांना हवे असते फुकट्च्या तळ्यातील पाणी. म्हणुन मला असे वाटते कि, जो वर आपण फुकट्च्या तळ्यातील पाणी बंद करत नाही तो वर हे घोडे (भिकारी) श्रमाच्या तळ्यातील पाणी पिणारच नाही. म्हणुनच मी या बाफ चे शिर्षक भिकार्यांना भिक देणे योग्य आहे का? असे दिले. म्हणजे या भिकार्यांना काम करण्याचे दुख लागते. काम करुन पैसे कमाऊन उदरनिर्वाह करावा, ही कंसेप्टच त्यांना पटत नाही. त्यांना माहिती असते कि, बाहेर गेले (बेगर्स होम उर्फ भिक्षेकरी गृहेतुन) दयाळु कणवाळु लोक आपल्या भिक घालतीलच. मग जो पर्यंत दयाळु कणवाळु लोक भिक घालतील तो वर बेगर्स होम उर्फ भिक्षेकरी गृहे रिकामीच राहतील ना!
यानंतर ज्यांना श्रमाच्या तळ्यातील पाणी इच्छा आहे पण काही अडचणी असतील तर आपण किंवा शासना च्या मदतीने सोडवता येतील असे मला वाटते.
म्हणून वर पंजाब राज्याचे उदाहरण दिले आहे. तेथे भिक कोणी घालतच नाही, म्हणुन भिकारी ही नाहीत.
मग असे सगळी कडे हळु हळु का असेना असे शकणार नाही का?
भारतामधे बेसुमार वाढलेल्या
भारतामधे बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणेच भिकार्यांची समस्याही हाताबाहेरची आहे असे वाटते. रॉबिनहूडनी म्हटल्याप्रमाणे सरकार याबाबतीत काही करतंय पण अपेक्षित यश मिळत नाहिये. भारताबाहेर रहाणार्या लोकांनी तिथे भिकारी त्यांना आढळतात का? असतील तर कुठल्या प्रकारचे? नसतील किंवा फारच कमी असतील तर त्या देशांना हे कसे काय साध्य झाले? हे सांगितले तर बरं होईल. म्हणजे माणसाच्या जन्माला आल्यावर स्वतःच्या दोन हातांनी आपल्या बेसिक गरजा (अन्न, वस्त्र व निवारा) मिळवण्यासाठी तिथे काय केले जाते? तसेच जे लोक कुठल्या अपरिहार्य कारणामुळे हे करु शकत नाहीत त्यांची व्यवस्था कशी केली जाते तेही आम्हाला कळेल.
हे सगळं अशासाठी विचारतेय की जसं गरिबी हटाव होतं त्या अंतर्गत काही योजना होत्या तशा काही योजना या समस्येसाठी करता येतील का? असा विचार मनात येतो.
पुर्वी कुष्ठरोगी पैसे / कपडे मागताना बरेच दिसायचे (त्यांना मी द्यायचे बरं का !) आता नाही दिसत. कुठे गेले ते? काय व्यवस्था झाली त्यांची?
कारणं काहीही असोत, कुणावरही नाईलाजाने भीक मागायची वेळ येणार नाही आणि कुणालाही कष्ट न करता आयता पैसा मिळवायची बुद्धी होणार नाही अशी आपण आशा करु शकतो का?
----------
तुटे वाद तो संवाद हितकारी
दुर्दैवाची पण सत्य गोष्ट आहे,
दुर्दैवाची पण सत्य गोष्ट आहे, बहुसंख्य कुष्ठरोगी हातभट्टीची दारू गाळण्याच्या व्यवसायात मजूर म्हणून कार्यरत आहेत कारण त्याना बाहेर काम देण्याची अजूनही लोकांची तयारी नाही. आणि तिथे ते स्वस्तात काम करतात त्यामुळे दारू 'उत्पादकाचा' उत्पादन खर्चही कमी होतो व नफा वाढतो. पोलीसानाही कुष्ठरोग्यावर कारवाई करताना नाही म्हतले तरी त्रासच होतो. नाशिक शहरात वाघाडी हा भाग याबाबत प्रसिद्ध आहे. इतरत्रही असतील. प्रत्येकाला आमटेंच्या केन्द्रावर जाणे शक्य नसते. शिवाय तिथले शिस्त बद्ध जीवन प्रत्यकाला आवडेल असे नाही....
माझ्यामते भिक देणे
माझ्यामते भिक देणे व्यक्तिसापेक्ष आहे.
आपण सारेच भिकारी, ते आपल्याकडे मागतात, आपण विठाईकडे.
भिक देणे हे गरजेशी मुळीच संबंधीत नसते, देण्याचा संबंध देणा-याच्या मुड वर असते.
दर वर्षी वारी करुनही विठोबाचा मुड नसेल तर काहीच मिळत नाही.
आणि विठाईचा चांगल्या मुडाच्या दिवसी पोहचणारे कित्येक भक्त पहिल्या वरित भरभरुन मिळवितात.
किंवा काहि लोकाना तर विठाई घरी येउन भरुभरुन (संपत्ती, संतत्ती, मान, सन्मान, वैगरे) देते.
भिक दयायचे तर दया अथवा देऊ नका. पण केवढी हि चर्चा.
भिका-याना कळल तर भिक घेणार नाहि आपल्याकडनं ( जोक अपार्ट)
भिक दयायचे तर दया अथवा देऊ
भिक दयायचे तर दया अथवा देऊ नका. पण केवढी हि चर्चा. >>>
अहो इथे अशाच अनेक विषयांवर अगदी हमरी तुमरीवर येऊन चर्चा होतात त्यापैकीच ही एक. कधी कधी आपल्याला काहीतरी चांगलं गवसून जातं तर कधी कधी या निमित्ताने उगाचच संबंध बिघडतात (हे कधीच होऊ नये).
---------
तुटे वाद तो संवाद हितकारी
अश्विनीके , तुटे वाद तो संवाद
अश्विनीके ,
तुटे वाद तो संवाद हितकारी >>>>>>>>
आता झ्याक वाटल.
कारणं काहीही असोत, कुणावरही नाईलाजाने भीक मागायची वेळ येणार नाही आणि कुणालाही कष्ट न करता आयता पैसा मिळवायची बुद्धी होणार नाही अशी आपण आशा करु शकतो का?>>>>>>
आता हे महत्वाचे.
आता आपण काय करु शकतो असे तुम्हाला वाटते?
जनजागृती आणि आधुनिक औषोधोपचार या मुळे कुष्ठरोग्यांची संख्याही आता वाढत नाही.
जनजागृती आणि आधुनिक औषोधोपचार
जनजागृती आणि आधुनिक औषोधोपचार या मुळे कुष्ठरोग्यांची संख्याही आता वाढत नाही.>>> हे तर चांगलंच आहे
नाईलाजाने भीक मागणार्यांमधे ---
१) वृद्धापकाळात हातपाय थकल्यावर मुलांनी घराबाहेर काढलेले वृद्ध
असे कुणी दिसल्यास पोलिसांना / समाजसेवी संस्थांना कळवून त्यांच्यामार्फत शासकीय किंवा धर्मादाय ट्रस्ट्स्नी चालवलेल्या वृद्धाश्रमात भरती करवावे व जमेल तशी देणगी त्या वृद्धाश्रमाला द्यावी.
२) आईबाप सांगतात म्हणून लोकांपुढे हात पसरणारी मुलं (ट्रेन व स्टेशनवर दिसतात)
जवळ खाऊ असेल तर मुलाला जरुर द्यावा पण जवळच बसून मुलावर लक्ष ठेवणार्या धडधाकट आईबापांना सगळ्यांनी मिळून सॉलिड दम द्यावा. पोरांच्या आयुष्याची ते कशी वाट लावत आहेत त्याबद्दल जरुर कटू बोलावे. (हे वरपांगी कटू बोलणे त्या मुलांच्या भल्यासाठीच असते).
३) पळवून नेऊन भिकेला लावली गेलेली मुलं

नेहमी दिसणारं मूल असल्यास जमल्यास त्या मुलावर नजर ठेवून ते मुल आईबापांनी भिकेला लावलंय की कुणी
गुन्हेगार त्यात इन्वोल्व आहे ते जाणून घ्यावे व इतरांच्या कानावर ही गोष्ट घालून त्या गुन्हेगाराबद्दल योग्य त्या ठिकाणी माहिती द्यावी. यामुळे एखादे कारस्थान उघड होऊ शकते. हे सोपे नाही पण प्रयास करायला काय हरकत आहे. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे त्याजागी आपल्या नात्यातलेही मूल असू शकते ज्याला कुणीतरी मुक्त करुन मानाचं आयुष्य देऊ करायची आवश्यकता आहे.
३) पुर्ण अपंगत्व असल्याने काहीच करु न शकणारे किंवा असाध्य रोगामुळे घराबाहेर काढले गेलेले रुग्ण - अशांना सांभाळणारी, पार्शिअली स्वावलंबी करणारी संस्था माहित करुन घेता आली तर त्यांना त्याबद्दल कळवावे. जमेल तशी देणगी संस्थेला द्यावी.
५) मानसिक संतुलन पुर्णपणे बिघडलेले लोक, ज्यांना आता घरच्यांनी दूर लोटलेले असते किंवा हरवले गेले असतात - सरकारी संस्था असतात तिथे कळवावे. मानखुर्दला अशी संस्था आहे. अशा ठिकाणी सरकारीच नोकर असतात व नेहमीचीच रड म्हणून रुग्णांकडे त्यांचं जरा दुर्लक्ष होतं. काही आपल्यासारखे लोक तिथे नियमीत सेवेला जातात.
६) बाहेरगावाहून आलेले व या मायानगरीत हरवलेले लोक / मुलं - समतोल फाऊंडेशन सारख्या संस्था झिंदाबाद
७) परावलंबी वृद्ध ज्यांच्या घरातील एकमेव कर्ता पुरुष्/स्त्री काळाने नेली आहे - सरकारी वृद्धाश्रम व आपल्यातर्फे देणगी / सेवा.
८) वृद्धापकाळी घरवालीकडून हाकलल्या गेलेल्या वेश्या ज्यांचे शरीरही रोगाने पोखरलेले गेले असू शकते - अगेन वृद्धाश्रम. आपल्यातर्फे देणगी / सेवा.
-----
भीक मागणे हाच धंदा असलेली कुटुंबं असतात त्यांना तर अजिबात भीक देऊ नये या मताची मी आहे. यांच्या पुढच्या पिढ्याही तोच धंदा करणार व त्यांची निरागस मुलंही लहानपणापासून याच धंद्याला लावली जाणार. कुणी भीक दिली नाही तर झक्कत हे धडधाकट लोक निदान रस्त्यावर काहीबाही विकायचे तरी कष्ट घेतील.
पोरं दुपट्यात पाठीशी बांधून डोक्यावर काही विकाऊ सामान घेऊन फिरणार्या माऊल्या तर नेहमीच ट्रेनमधे दिसतात. जे पालक स्वतः कष्टाची मीठ भाकर खातील ते कितीही गरीबी असली तरी मुलांना भिकेची दिक्षा देणार नाहीत.
३-४ वर्षांपुर्वी ठाणा स्टेशनच्या ब्रिजवर एक बाई कुठल्याशा रोगाने बेहाल होऊन एका कोपर्यात पडलेली होती. येणारे जाणारे नाक रुमालाने झाकून जात इतकी तिला घाण येई. तिच्या अंगात किडे पडले होते. कुणी तिच्यापुढे पैसे फेकत व पुढे जात. पण ते पैसे गोळाकरुन काही खायला आणायचंही तिच्यात त्राण नव्हतं. मी तिला बघितले नव्हते कारण मी त्या ब्रिजने जात नाही. पण तिथून नेहमी जाणार्या एका सद्गृहस्थाने म्युनिसिपालटीच्या लोकांना कळवून तिला जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधे उपचारासाठी भरती करवलं. भीक देण्यापेक्षा त्या माणसाने केलेले कृत्य खूप मोलाचे नाही काय?
---------
तुटे वाद संवाद तो हितकारी
अश्विनीके, तुमच्या सहमत
अश्विनीके,
तुमच्या सहमत आहे.
काही संस्था भिकार्यांचे / अनाथांचे पुर्नवसनाचे काम करतात,
तर काही भिकार्याना जेवण देणे, कपडे देणे, इ. तात्पुरत्या गरजा भागवण्याची कामे करतात. मग अशा संस्थांना ही मदत करावी का? मला असे वाटते कि, त्यामुळे भिक मागणार्यांना प्रोत्साहन मिळते.
छावा, तुमचं म्हणणं बरोबर
छावा, तुमचं म्हणणं बरोबर वाटतंय मला. पुनर्वसन म्हणजे माणसांना कुठलंतरी प्रशिक्षण देऊन, भांडवल उभारणीसाठी मार्गदर्शन करुन त्यांना स्वतः कमावण्यायोग्य केले पाहिजे. हे करण्या आधी समुपदेशन करावं लागेल कारण त्याला भिक मागून जगण्याची (म्हणजेच काम न करता जगण्याची) चटक लागलेली असू शकते.
अन्नदान जिथे होत असतं कुठल्यातरी कारणाने तिथे असे तांडे दिसतात. असे तात्पुरते अन्नदान्/वस्त्रदान हे मला वाटतं कुठल्या संस्थेतर्फे होत नसाव, व्यक्तीगत होत असावं (शुभकार्यानिमित्त किंवा स्मृतीप्रित्यर्थ). पण याने "आजचं तर भागलं, उद्या काय?" हा प्रश्न आहेच. कुणी कुणाला भिक रोज देऊ शकत नाही व तसे करणे योग्य नाही असे मला वाटते.
बर्याच संस्था आहेत की अश्या
बर्याच संस्था आहेत की अश्या ज्या (मला तरी आलेला अनुभव) खूप प्रामाणिक पणे काम करतात.
भिक म्हणून लहान मुलांना पैसे देण्यापेक्षा(हे व्यक्तीसापेक्ष आहे,चूक बरोबरचा प्रश्ण नाहीच) क्राय ज्या ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवतात. ते विकत घेणे हीच एक लहानशी मदत व सुरुवात ठरू शकते.
आशा तर्फे मॅराथॉन हा ही उपक्रम चांगला आहे. ह्याच्यात पळणे महत्वाचे नसून फक्त स्पिरिट महत्वाचा आहे. तुमची कॅपासिटी पळायची असो वा नसो पण you are supporting the cause some way हेच मला तरी इथे मी युनिवर्सिटीला असताना खूप भावला होता हा उपक्रम. I can tell you the spirit is infectious. Experience is awesome!
(वरील पोस्ट ही माहीती म्हणून देत आहे. बाकी काही हेतू नाही)
आकांक्षा फाउंडेशनदेखील
आकांक्षा फाउंडेशनदेखील रस्त्यावरील व झोपडपट्टींत राहणार्या मुलांसाठी काम करतं. या मुलांसाठी औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग भरवले जातात, व नंतर १८ वर्षांवरील मुलांना Thermax उद्योगसमुहात सामावून घेतलं जातं.
शनिवारी व रविवारी भरणार्या वर्गांसाठी कायमच स्वयंसेवकांची गरज भासते. कोणी मायबोलीकर जर या उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असेल तर आकांक्षाचं कार्यालय पुण्यात मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडीतील Thermaxच्या इमारतीत आहे. मुंबईतही त्यांची शाखा आहे.
Pages