Submitted by bvijaykumar on 22 April, 2023 - 02:47
लाडघर बीच ला मुक्कामाचे ठिकाण आहे ... २ दिवस राहण्याचे बुकिंग केले आहे .. जुन्या धाग्यावरून बरीचशी माहिती मिळाली... नुकतेच लाडघर ला भेट दिलेले मायबोलीकर तत्कालीन परिस्थिती / अनुभवात भर टाकू शकतील ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सागर सावली येथे जेवण मस्त
सागर सावली येथे जेवण मस्त असते. स्टॅण्डजवळ संदेश म्हणुन एक खानावळ आहे, तिथे मटण डिश भारी असते. स्टेंड जवळच एक पान वाला आहे, त्याच्याकडील पान म्हणजे अहाहा !! बाकी तुम्ही जाउन आल्यावर अनुभव लिहा
सागर सावली येथे जेवण मस्त
सागर सावली येथे जेवण मस्त असते. स्टॅण्डजवळ संदेश म्हणुन एक खानावळ आहे, तिथे मटण डिश भारी असते. स्टेंड जवळच एक पान वाला आहे, त्याच्याकडील पान म्हणजे अहाहा !! बाकी तुम्ही जाउन आल्यावर अनुभव लिहा #
...........................................................................
धन्यवाद भ्रमर
आता उन्हाळ्यात समुद्रकिनारी
आता उन्हाळ्यात समुद्रकिनारी म्हणजे .............
आम्ही जानेवारीत थंडीत गेलो होतो. म्हणजे अगदी कुडकुड थंडी. त्यामुळे बीचवर दिवसभर फिरता आलं.
1. बीच स्वच्छ, अजिबात न गर्दीचा आणि अतिशय निसर्गसुंदर होता. बीचवर चालत गेलो तिथे एक काळया दगडांच पुराण मंदिर होतं. कोणता देव माहित नाही, पण तेथील मोठमोठी झाडं, शेतातील पायवाट यामुळे मजा आली.
2. दुसऱ्या दिवशी केशवराज मंदिर पहायला गेलो. (साधारण 12-14 kms). पार्किंग पासुन मंदिराकडे जायला छोटंसं कोकणी गाव, नारळाची वाडी, माफक जंगल (पण सावली भरपुर), एक ब्रीज, खाली नदी /ओढा अशी निसर्गरम्य पायवाट होती. मला परत परत जायला आवडेल. स्वच्छ सुंदर एकाकी पांडवकालीन मंदिर आहे. आम्ही मुख्यतः त्या छोट्याशा जंगल ट्रेल साठी गेलो होतो. अवघड नाही. कोणीही करेल (उन्हाळ्यात मात्र कसं असेल, कल्पना नाही).
3. लाडघरला परत येताना रस्त्यात एक 'Point of View ' नावाचं उच्च लोकेशन (अतिशय स्वच्छ, भरपूर उजेड, फुलबाग, झाडी) आणि चविष्ट पदार्थ देणारं restaurant होतं. फ्रेंडली फॅमिली होती. owner चा तरुण आणि talented भाचा interior architect होता आणि तो त्या दिवशी भेटला. पूर्ण ओपन जेवणाची उंचावरची जागा आणि तिथून दरी आणि गच्च झाडीचा सुंदर view होता, त्यामुळे नाव समर्पक वाटलं.
4. लाडघर बीचच्या अगदी जवळ एक दत्त मंदिर आहे. अगदी टिपीकल कोकणात असतं तसं एकाकी. उंच टेकडीवर, खाली खोल समुद्र दर्शन होतं. मंदिराचा परिसर सुनसान होता, पण स्वच्छ आणि पारिजातक, मोगरा, चाफ्याच्या झाडांनी surrounded होता. बीचवरून चालत जाऊ शकतो किंवा मग कार्स अगदी मंदिराच्या आवारात नेता येतात. देवदर्शन नाही तरी निसर्ग दर्शनाला तरी जावच असं ठिकाण आहे.
5. बाकी आंजरले, दापोली, कोणता तरी गणपती जिथुन फार सुंदर view होता. (कोकणात फार मंदिरं आहेत), हे सगळं भटकलो.
बाकी जेवण आम्ही रिसॉर्ट मधेच करायचो, जे फार चविष्ट असायचं.
एकुणात मनात खुप शंकाकुशंका घेऊन गेलो होतो पण कोकण खुप आवडलं. म्हणजे प्रेमात पडण्या एवढं आवडलं. (अगोदर मला कोकणात जायचं नव्हतं, म्हणून मी जरा रुसले होते )
तुम्ही आल्यावर तुमचे अनुभव लिहा.
मीरा का छान लिहिलस आमची
मीरा का छान लिहिलस आमची ट्रिप आठवली. खरच केशवराजचा रस्ता काय नयनमनोहर अन मन शांत करणारा आहे
अन गणपती मंदिर आंजर्ल्याचं. मंदीर असून छतावर जाता येतं अन तिथून दिसणारा समद्र... आहाहा
कोकण कॉलिंग
मासेखाऊ असाल तर हर्णे बीचवर
मासेखाऊ असाल तर हर्णे बीचवर रोज लिलाव असतो.
छान मासे घेऊन ज्या हाॅटेलमधे रहाता त्याच्या कुकला आधी विचारुन त्याच्याकडून मस्त डिशेस बनवून घ्या.
करणावळ घेऊन बहुतेक जण करुन देतात.
ताजे मासे आणि स्थानिक पाककृती मस्त लागते.
धन्यवाद ....... मीरा + अवल
धन्यवाद ....... मीरा + अवल + अ'निरु'द्ध
लाडघरला परत येताना रस्त्यात
लाडघरला परत येताना रस्त्यात एक 'Point of View ' नावाचं उच्च लोकेशन (अतिशय स्वच्छ, भरपूर उजेड, फुलबाग, झाडी) आणि चविष्ट पदार्थ देणारं restaurant होतं. फ्रेंडली फॅमिली होती. owner चा तरुण आणि talented भाचा interior architect होता आणि तो त्या दिवशी भेटला. पूर्ण ओपन जेवणाची उंचावरची जागा आणि तिथून दरी आणि गच्च झाडीचा सुंदर view होता, त्यामुळे नाव समर्पक वाटलं.
..............................................
.......... जरुर भेट दे णार आहे
मासेखाऊ असाल तर हर्णे बीचवर
मासेखाऊ असाल तर हर्णे बीचवर रोज लिलाव असतो.
छान मासे घेऊन ज्या हाॅटेलमधे रहाता त्याच्या कुकला आधी विचारुन त्याच्याकडून मस्त डिशेस बनवून घ्या.
करणावळ घेऊन बहुतेक जण करुन देतात.
ताजे मासे आणि स्थानिक पाककृती मस्त लागते
......... लिलाव नेमका किती वाजता असतो याचे मार्गदर्शन कोणी करेल का ?
आणि मासे घेतल्यानंतर ते करण्यासाठीचे चांगले हॉटेल कोणी सुचवेल का ?
लिलाव भल्या पहाटे आणि
लिलाव भल्या पहाटे आणि संध्याकाळी असतो
मासेखाऊ असाल आणि मुंबईत असाल
मासेखाऊ असाल आणि मुंबईत असाल तर
भाऊचा धक्का, रविवारी सकाळी जाणे.
किंवा मे महिन्यातले चार रविवारी 'पडघा'(कल्याणहून बस. किंवा खडवली रेल्वे स्टेशनहून ऑटो) येथील सुकट बाजार.
>>आणि मासे घेतल्यानंतर ते
>>आणि मासे घेतल्यानंतर ते करण्यासाठीचे चांगले हॉटेल कोणी सुचवेल का ?<<
आपण रहात असतो त्याच हाॅटेलच्या कुकला विचारावे.
आम्हाला आमच्या हाॅटेलच्या कुकने बनवून दिले होते..
धन्यवाद ....... भ्रमर + अ
धन्यवाद ....... भ्रमर + अ'निरु'द्ध +Srd
>>आणि मासे घेतल्यानंतर ते
>>आणि मासे घेतल्यानंतर ते करण्यासाठीचे चांगले हॉटेल कोणी सुचवेल का ?<<
आपण रहात असतो त्याच हाॅटेलच्या कुकला विचारावे.
आम्हाला आमच्या हाॅटेलच्या कुकने बनवून दिले होते.. <<
.ओ के
श्यामची आई.रात्र-एकतिसावी
श्यामची आई.रात्र-एकतिसावी.लाडघरचे तामस्तीर्थ.
हे लाडघर तेच आहे का?
होय
होय
श्यामची आई.रात्र-एकतिसावी
श्यामची आई.रात्र-एकतिसावी.लाडघरचे तामस्तीर्थ.
हे लाडघर तेच आहे का?
..होय
फार पूर्वी इकडे गेलो होतो
फार पूर्वी इकडे गेलो होतो तेव्हा वाटेत एक वाडी (माड पोफळी बाग )लागली. त्या वाडीतल्या बोअरवेलला पंप लावावा लागत नाही. भरतीच्या वेळी बोअरवेलमधून पाण्याचा फवारा उंच उडतो. अमावस्येला दुपारी जास्तच जोराने.