खुशखबर - २०२३ वर्षा विहार - संयोजक हवे आहेत.

Submitted by Admin-team on 28 March, 2023 - 02:30

नमस्कार मायबोलीकर,

एक खुशखबर. २०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर यंदा २०२३ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधीक माहिती लवकरच कळवू.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्जे बात! धमाल करुया पुर्वीसारखी पुन्हा एकदा.

(हे बा पावसा, आत्ता पावसाळा नसताना येऊन जातोयस पण ऐन पावसाळ्यातही ये कारण माबोकर पाच वर्षांच्या गॅपने वविला धमाल करणार आहेत.)

सुरुवात नंतर करा
सर्वप्रथम जुन्या वविकर सभासदांनी ईथे सक्रिय व्हा.
नाहीतर नवीन सभासद हौसेने जायचा आणि त्याला आढळायचे की माबोवर सक्रिय असणारी जनता वेगळी आहे आणि वविची जनता वेगळी आहे.

खरंय

म्हणूनच नवीन मायबोलीकरांचा संयोजनात सहभाग आवश्यक आहे

जुने मायबोलीकर येऊन जाऊन असतात इथे , पण वावर कमी झालाय त्यांचा

आणि ववि हा समस्त मायबोलीकरांकरता आहे , नवीन काय जुने काय

आले तर भेटणं सगळ्यांचंच होईल

ऋन्मेष तू वविला ये. तू जुना आहेस आणि अजूनही सक्रीय आहेस मायबोलीवर. तुला भेटून नवीन माबोकरांना धक्का बसलाच तर तो सुखद धक्का ठरायची शक्यता जास्त

हम एक बार जीते है
हम एक बार मरते है
प्यार भी एक ही बार होता है
वविला कश्याला न मग उगाच परत परत जायचे

चल रे काहीही नको सांगूस उगाच

धागा कुठे एकही बार काढतोस रे Lol

चल ये वविला. ज्युनियर ऋन्मेषचा तर पहिला ववि असेल ना हा. तो एंजॉय करेल ववि

Proud
अरे हो.. हे लक्षातच नाही आले माझ्या.
मागे दहा वर्षांपुर्वी आलेलो तेव्हा पोरं नव्हती आयुष्यात.
त्यामुळे माझ्या सो कॉल्ड माणूसघण्या स्वभावाला अनुसरून बोअर झालेलो.
आता मुले पुरतात मजा करायला. त्यांना विचारून बघतो. त्यांनी ईटरेस्ट दाखवला तर येईनच. तरी पावसाळ्यातच जाल ना. म्हणजे वेळ आहे अजून.. विचार करतो नक्की Happy

नमस्कार
मी रघू आचार्य सरांची फटाकडी सेक्रेटरी मिस मदनिका. मी आले तर चालेल का ?
(माझं खातं नसल्याने सरांच्याच खात्यावरून विचारणा केली आहे. सरांना सांगू नका प्लीज)

कोणी तरी म्हणूनच गेलंय की 'एक तरी ववि अनुभवावी'
त्यामुळे एकातरी वविला यायचंय मला.
बघू कसं काय जमतंय ते.
तुर्तास संयोजकांना अनेक शुभेच्छा!

मिस मदनिका आपणास समज देण्यात येत आहे कि येऊ कशी कशी मी वविदिनला ही विचारणा करण्यासाठी स्वतःच्या खात्याचा उपयोग करावा. वविच्या पवित्र धाग्यावर पवित्र रघू सरांच्या पवित्र खात्यातून असे अपवित्र प्रतिसाद देऊ नयेत.
आज्ञेनुसार

सरांची नवीन सेक्रेटरी
XXX
मिस यौवना उफाडकर

ववि चांगला गाजतो असं मागील रिपोर्टांवरून जाणवलं. पण आपल्याला परवडत नाही रिझॉर्ट. ओपन सोर्स जागा आवडते. आणि शांतता.

इतक्या वर्षांनी आलो मायबोली वर , पण मायबोली आणि इथली लोकं बदलली नाहीत

मदनिका काय
पवित्र रघु सर काय
यौवना काय

स्वतःच स्वतःशी तीन पात्री प्रयोगात बोलतायत

Rofl

>> पण मायबोली आणि इथली लोकं बदलली नाहीत

सहसा जुनेजाणते आयडी "आमच्या वेळची मायबोली राहिली नाही" म्हणताना दिसतात Wink

मला पावसात भिजायला आवडत नाही. पण पावसाळी वातावरणात भटकायला आवडतं... माणसाना भेटायला आवडतं.
मलापण येण्याची इच्छा आहे.

संयोजनात काय कामे असतात?>> विस्तृत माहिती आधीच्या ववि बाफ वर मिळेल बहुतेक. मी ढोबळ कामे लिहीते

१) वविसाठी ठिकाण शोधणे, शॉर्टलिस्ट केलेल्या रिसॉर्टना फोन करुन माहिती घेणे, कोटेशन घेणे (per head खर्चाचा अंदाज घेणे) बाकी सोयी सुविधा वगैरेची माहिती घेणे

या माहितीच्या आधारे आपल्यासाठी सुयोग्य असे एखादे ठिकाण फायनल करणे
२) येण्याजाण्याची सोय - बस खर्च कोटेशन ते फायनल निवड वरच्या मुद्द्याप्रमाणेच चौकशी करुन चर्चा करुन वगैरे
३) मायबोलीवर यासंदर्भात वेळोवेळी माहिती देणे
४) मायबोलीवर वविची जाहिरात फिरवणे जेणेकरून वविची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल व वविचा आनंद बऱ्याच जणांना घेता येईल
५) येऊ इच्छिणाऱ्या मायबोलीकरांची नोंद व जमा पैशाचीही नोंद
६) बस थांबे आणि पिक अप ड्रॉप वेळा ठरवणे
७) या दरम्यान जेन्युईन शंका विचारल्या गेल्यास त्याचे निराकरण करणे व माहिती प्रदान करणे
8) प्रत्यक्ष वविच्या दिवशी हे सगळे ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पाडण्यासाठी मदत
९) जमा खर्चाची नोंदणी व पडताळणी
थोडक्यात प्लॅनिंग ते एक्झिक्युशन प्रत्येक स्टेपमधे सहभाग व योगदान. सगळे संयोजक मिळून हे काम करतात त्यामुळे एकावरच ताण येत नाही.

Pages