महिला दिन

Submitted by रिक्शाचालक on 14 March, 2023 - 04:47

महिला दिन नुकताच साजरा झाला.
नव्याचे नऊ दिवस. सुरूवातिला महिला दिनावेळेला खूप उपक्रम व्हायचे. सेम्निनार्स, वर्कशॉप्स व्हायचे.
चांगले चांगले वक्ते यायचे. भाषणं व्हायची.
पेपरमधे लेख व्हायचे. टीव्हीवर पण चचा व्हायच्या.
नंतर उस्ताह ओसरला.
हे सर्व चालु असताना पण महिला दिनाला खेळाच्या स्पर्धा, पाककृतीच्या स्पर्धा व्हायच्या.
खूप सार्या शिकलेल्या बायांना आपन महिला दिन साजरा करतो म्हणजे ईन थींग वाटतं.
त्या असल्या स्पर्धा भरवतात. एकदा गाण्याच्या भेंड्या पन झाल्या.

काही ठिकाणी महिला दिन म्हणजे स्त्री पुरूष समानता असाच विशय असतो.
स्त्री वाद आणि स्त्री पुरूष समानता एकच करतात.
त्या विशयाची माहिती नसताना पण वाद घालतात. ठोकून देतात.
त्यामुळं महिला दिन महिलांसाठी असावाच.
पन पुरूषांना पण धरून आणुन बसवावं आणि ऐका, बोला म्हनावं वाटतं.

महिलांचे काय हक्क आहेत यावर चलवल चालवनं म्हनजे आमच्या वर अन्याय असं पन काही पुरूष म्हनतात.
यांना कुनाला नीट माहिती करून घ्यायचं नसतं.

त्याम्मुळं उच्चभरूंचं एकदा मत मांडुन गप बसायचं धोरन बरोबर नाही. एखादी गोष्ट
घडून यायची असेल तर त्याच्यावर सारखं सारखं बोललं पाहिजे तर ती रुजते.
ज्यांच्यापर्यंत महिला दिन का हे पोचायला पाहिजे हे पोचलं का ?
हे जानवल्याने हा प्रश्न.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/83137
या धाग्याची आठवण झाली. त्या धाग्यावर लिंका पण दिलेल्या आहेत. तर लिंका नको मतं मांडा असे आदेश सुटले.
एकाच साईटवर परत परत तीच ती चर्चा का करायची हे कुणीतरी पटवून सांगा.

काय पोचल काय नाही माहित नाही.........

मराठी व्याकरणाचे बारा वाजवले हे मात्र कळाले..

उच्चभ्रूचे हाल अजिबातच बघवले नाही.

आपण असेच अशुद्ध लिहीत राहिलो तर हे शब्द कायमचे तीर्थयात्रेला निघून जातील

वार्षिक घडामोडीचा दिन चालु घडामोडी कसा झाला आणि जागतिक दिनवाला कार्यक्रम फक्त भारतापुरता केंद्रीत कसा झाला !!
ग्रुपचा मेरु उचित जागी स्थापन केला तर अधिक बरे

इथेच रिक्शाचालक हा शब्द रिक्शाचालक असा लिहायचा किती वेळा
प्रयत्ने केला तरी पण तो रिक्शाचालक असाच उमततो त्याला कोन काय करनार ? >>>> गंभीर प्रकरण आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करा.

अशुद्ध लेखन त्या मुळे अनेक शब्दांचा अर्थ लागत नाही.
महिला दीन,मातृ दीन,पितृ दीन , व्हॅलेंटाईन दिवस.
ह्याला असा पण काही अर्थ नसतो.
समाज निरोगी राहण्यासाठी..निरोगी विचार समाजात रुजवावे लागतात.
मीच बाई शोषित, मीच बाबा शोषित असे टोकाचे विचार निरोगी समाजाला रोगी बनवतात.
आई,वडिलांना अनाथ आश्रमात टाकणारे पण ते कसे योग्य आहेत हे सांगत असतात.
आणि मातृदिन असतो त्या दिवशी आई ची थोरवी गाणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया वर टाकत असतात.
ही फक्त नाटक आहेत.
सत्यापासून खूप दूरची वागणूक असणाऱ्या स्वार्थी लोकांची

विचार , भावना पोहचविण्यासाठी भाषा हे माध्यम आहे असो

सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तरी नक्की काय समस्या आहे कळतच नाही ..
स्पर्धा , कार्यक्रम पाहिल्यासारखे होत नाहीत की नवरा कार्यक्रमाला येत नाही ...
२०२३ मधली स्री उपेक्षित आहे अस वातावरण तर नक्कीच नाही आहे