बर्याच कवी व कलावंतांच्या बाबत असं होतं की त्यांच्या सुरुवातीच्या रचनांमध्ये त्यांच्या पूर्वसूरींची छाया दिसते. अनेकदा चित्रपटगीते ऐकताना त्यांच्या चाली या दुसर्या कुठल्या गीताची आठवण करून देतात. म्हणजे ते कलावंत या आधीच्या कलाकृतींची नक्कल करत असतात , असेच काही नाही. ते या कलाकृतींपासून प्रेरणा घेतात. अन्य कुणाला सुचलेल्या कल्पनेचे प्रतिबिंब त्यांच्या रचनेत उतरते.
शान्ता शेळके यांचे 'तोच चंद्रमा नभात ' हे गीत किंवा गदिमांच्या "दोन ओंडाक्यांची होते..." या ओळीं - यांचे मूळ संस्कृत श्लोकांत आहे.
ही एका परीने त्या मूळ रचनेला दिलेली दादसुद्धा!
अन्य भाषेतील कवितांचे अनुवाद हा कवितेच्या रियाजासारखा. संस्कृत ग्रंथांप्रमाणेच हायकू, त्रिवेणी यांचेही मराठी अनुवाद आवडीने केले आणि वाचले गेले आहेत.
तर आज आपण अशा अन्य भाषेतील कविता किंवा गीतांवरून सुचलेल्या कविता, अर्थातच मराठी भाषेत लिहिणार आहोत. ती कविता मूळ परभाषेतील कवितेचा अनुवादही असू शकते. किंवा त्यातील एखाद्या कल्पनेचे आपल्या मनाला भावलेले रूप ; नाहीतर ती कविता वाचताना, घोळवताना मनात उमटलेला वेगळाच विचारही !
तुमच्या प्रेरणेचा स्रोत काहीही असू शकतो. हिंदी चित्रपट गीत, इंग्रजी कविता, मीरेचे भजन किंवा उर्दू गझल
चला तर मग! बघा तुमच्या शब्दांत एखाद्या काव्यरचनेचं प्रतिबिंब उतरतंय का ?
तुमच्या कविता याच धाग्यावर लिहायच्या आहेत.
ज्या कवितेचे / कलाकृतीचे प्रतिबिंब तुमच्या कवितेत उतरले आहे, तिचाही उल्लेख करावा.
--------
सगळ्यांनीच सुरेख भर घातली आहे.
आज आम्ही एक नवीन संकेत घेऊन येतो आहोत.
तुम्ही तुमच्या कवितेत 'रात्र संपली तरी' , 'उषःकाल' किंवा यांचे योग्य समानार्थी शब्द वापरून आपापल्या कविता सादर करू शकता.
येऊ द्या नवीन कविता.
खूपच छान कविता, सामो, स्वाती
खूपच छान कविता, सामो, स्वाती आणि रघू आचार्य.
खूपच छान कविता, सामो, स्वाती
.
फार सुरेख रचना आल्या आहेत.
फार सुरेख रचना आल्या आहेत.
माझ्या पोतडीत नवीन काही नाही.
माझ्या पोतडीत नवीन काही नाही. तेव्हा एक दोन जुन्याच चिजा
आज सोचा तो आँसू भर आए
मुद्दतें हो मुस्कुराए
अचानक
कोणीतरी समोर
आरसा होऊण
उभं ठाकलं
आणि जाणवलं
चेहर्यावर
एक वाळवंट
आक्रमण करते आहे.
त्याला थोपवण्यासाठी
दोन अश्रू
डोळ्यांत उभे.
चंद्र क्षितिजा ढळला उतरून
चंद्र क्षितिजा ढळला उतरून रात्र गेली|
घातली शपथ मला जी विसरून रात्र गेली||
वाटेवर नेत्र खिळवित मीच प्रतीक्षा झाले|
रंगात रंगुनी माझ्याच रात्र सरून गेली||
तुजसाठी प्रकाशकिरणा मी झुरले कणाकणाने|
वाहून आसवांना लपेटून रात्र गेली||
मीही एक वेडी त्या स्वप्नपक्षास भुलले|
झुलवून आशेवर मज जागवून रात्र गेली||
-----------------------------------------
डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली
डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे
स्वप्नांत हाय माझ्या बहरून रात्र गेली
आहाहा भरत व शर्मिला सुंदरच.
आहाहा भरत व शर्मिला सुंदरच.
शर्मिला मस्त आहे कविता.
शर्मिला मस्त आहे कविता.
>>> चेहर्यावर
>>> चेहर्यावर
एक वाळवंट
आक्रमण करते आहे
त्याला थोपवण्यासाठी
दोन अश्रू
डोळ्यांत उभे
<<<
किती अभिनव कल्पना! सुंदर! This will stay with me!
मस्त अनुवाद, विडंबने आली आहेत इथे.
सगळ्यांनीच सुरेख भर घातली आहे
सगळ्यांनीच सुरेख भर घातली आहे.
आज आम्ही एक नवीन संकेत घेऊन येतो आहोत.
तुम्ही तुमच्या कवितेत 'रात्र संपली तरी' , 'उषःकाल' किंवा यांचे योग्य समानार्थी शब्द वापरून आपापल्या कविता सादर करू शकता.
येऊ द्या नवीन कविता.
तम सरला बघ सरली रजनी निघे
तम सरला बघ सरली रजनी निघे अरुणरथ वेगी वेगी
मुखप्रक्षालन करुनी सकलजन चला उभारु गुढी तेजाची
कडुलिंबाचा पाला आणुनी बत्ताशाच्या माळा घालूनी
विजयीश्रीच्या काठीवरती वस्त्र उभारु चला रेशमी
नवे वर्ष अन नवीन आशा नवा जोम अन नवी आकांक्षा
मनामधे दाटू लागल्या नव्या उमेदी जराजराशा
भले बुरे ते झाले गेले विसरुन जाऊन आपण सारे
नवीन गलबत नवीन तारु नवाच नाविक नवेच वारे
>>>>>>छान लिहिते आहेस सामो.
>>>>>>छान लिहिते आहेस सामो. असू दे सुसाट Happy
>०<
अस्मिता धन्यवाद
लोळत का पडला अजून गधडा सुट्टी
लोळत का पडला अजून गधडा सुट्टी न त्याला जरी

तो अपुला केव्हाच येउन उभा आप्ल्या त्या याच्यावरी
संयोजक दमले उपक्रम किती दणक्यात कंडक्टिता
थोडा आळस झटकुनी झडकरी त्यांना करा साह्यता
नवीन धागा न आल्यामुळे इथे
नवीन धागा न आल्यामुळे इथे बघायचं राहिलं.
सामो, मस्त.
)
(पण गलबत आणि तारू दोन्ही का हवंय? दोन नवीन नाविक लागतील ना मग!
>>>>>>>>(पण गलबत आणि तारू
>>>>>>>>(पण गलबत आणि तारू दोन्ही का हवंय? दोन नवीन नाविक लागतील ना मग! Proud )
हाहाहा काय गं
दुपार सरली, अजून राधा उभी
दुपार सरली, अजून राधा उभी कदंबातळी
हसून बघते बिंब लाजरे कालिंदीच्या जळी
लपून रात्री शहारगात्री आली होती इथे
मिठीत काळ्या चिंब नाहले दोन प्रहर चोरटे
एक खूण ओठांवर मिरवे अजून काळीनिळी
एक कंचुकीआड खूण, जी फक्त तिने पाहिली
रात्र संपली कधीच, सांगे सखी हालवित तिला
बंद पापण्यांआड तरी अद्याप रास रंगला
वाह!!! छानच स्वाती.
वाह!!! छानच स्वाती.
वा!
वा!
संयोजक दमले उपक्रम किती
संयोजक दमले उपक्रम किती दणक्यात कंडक्टिता
थोडा आळस झटकुनी झडकरी त्यांना करा साह्यता >>
सर्वांच्याच कविता छान आहेत.
लोळत का पडला अजून गधडा सुट्टी
लोळत का पडला अजून गधडा सुट्टी न त्याला जरी
तो अपुला केव्हाच येउन उभा आप्ल्या त्या याच्यावरी
संयोजक दमले उपक्रम किती दणक्यात कंडक्टिता
थोडा आळस झटकुनी झडकरी त्यांना करा साह्यता >> अरे हे मिस झालेल!
(No subject)
पाने भिजली दवबिंदुनी,
पाने भिजली दवबिंदुनी,
लागली पहाटेची चाहूल.
किलबिलाट होई पक्षांचा,
नभात हळुच ठेवले सुर्याने पाऊल.
रात्र यायलाच हवी आहे का कवितेत की उष:काल साठी समानार्थी पहाट फक्त आलेली चालेल.
रात्र सरली सगळी उपसंपादकांची
रात्र सरली सगळी उपसंपादकांची मभागौ दिनी,
दाते,आपटे,वाळिंबे आणि कोश किती अजुनी.
पहाट झाली, हुश्श झाली मंडळी, उत्तर आले म्हणुनी,
परंतु मोठे मास्तर येती, जाती आणखी दुरुस्त्या करुनी ..
खरं तर आम्हीच मास्तरांची वाट
खरं तर आम्हीच मास्तरांची वाट बघत होतो. काल रात्री त्यांना उचकी लागली असेल.
Pages