मराठी भाषा गौरव दिन २०२३ - शीघ्रकवितांच्या आनंदडोही २ आणि ३- प्रतिबिंब , रात्र आणि उषःकाल

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 06:06

बर्‍याच कवी व कलावंतांच्या बाबत असं होतं की त्यांच्या सुरुवातीच्या रचनांमध्ये त्यांच्या पूर्वसूरींची छाया दिसते. अनेकदा चित्रपटगीते ऐकताना त्यांच्या चाली या दुसर्‍या कुठल्या गीताची आठवण करून देतात. म्हणजे ते कलावंत या आधीच्या कलाकृतींची नक्कल करत असतात , असेच काही नाही. ते या कलाकृतींपासून प्रेरणा घेतात. अन्य कुणाला सुचलेल्या कल्पनेचे प्रतिबिंब त्यांच्या रचनेत उतरते.
शान्ता शेळके यांचे 'तोच चंद्रमा नभात ' हे गीत किंवा गदिमांच्या "दोन ओंडाक्यांची होते..." या ओळीं - यांचे मूळ संस्कृत श्लोकांत आहे.
ही एका परीने त्या मूळ रचनेला दिलेली दादसुद्धा!
अन्य भाषेतील कवितांचे अनुवाद हा कवितेच्या रियाजासारखा. संस्कृत ग्रंथांप्रमाणेच हायकू, त्रिवेणी यांचेही मराठी अनुवाद आवडीने केले आणि वाचले गेले आहेत.

तर आज आपण अशा अन्य भाषेतील कविता किंवा गीतांवरून सुचलेल्या कविता, अर्थातच मराठी भाषेत लिहिणार आहोत. ती कविता मूळ परभाषेतील कवितेचा अनुवादही असू शकते. किंवा त्यातील एखाद्या कल्पनेचे आपल्या मनाला भावलेले रूप ; नाहीतर ती कविता वाचताना, घोळवताना मनात उमटलेला वेगळाच विचारही !
तुमच्या प्रेरणेचा स्रोत काहीही असू शकतो. हिंदी चित्रपट गीत, इंग्रजी कविता, मीरेचे भजन किंवा उर्दू गझल

चला तर मग! बघा तुमच्या शब्दांत एखाद्या काव्यरचनेचं प्रतिबिंब उतरतंय का ?

तुमच्या कविता याच धाग्यावर लिहायच्या आहेत.
ज्या कवितेचे / कलाकृतीचे प्रतिबिंब तुमच्या कवितेत उतरले आहे, तिचाही उल्लेख करावा.
--------

सगळ्यांनीच सुरेख भर घातली आहे.
आज आम्ही एक नवीन संकेत घेऊन येतो आहोत.
तुम्ही तुमच्या कवितेत 'रात्र संपली तरी' , 'उषःकाल' किंवा यांचे योग्य समानार्थी शब्द वापरून आपापल्या कविता सादर करू शकता.
येऊ द्या नवीन कविता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर मार्गाने जात होतो
भेळपुरी खात होतो,
पोरगी फिरवत होतो,

मार्गाने जात होतो
भेळपुरी खात होतो,
पोरगी फिरवत होतो,

तुला मिरची झोंबली तर मी काय करू

संदर्भ # मै तो रस्तेसे जा रहा था

---------
मित्रमैत्रिणींनो, येऊद्या अशी व तुम्हाला आवडतील तशी गाणी धमाल रूपात Happy

हे मी पूर्वी किल्लीच्या धाग्यावर लिहीलेले.

असेच फिरता फिरता कुठवर आलो आपण दूर सखे
मीठीत तुझिया तनामनाचे विरघळले (साखर-स्फटिक) जसे

केश मल्मली मोकळे तुझे हे, अथवा रजनी कृष्ण जशी
नजर तुझी आरस्पानी का रोहीणी अथवा चंद्राची

चांद जणू हा कडे तुझ्या करी चांदणी तुझी ही चुनर जशी
तव देहाचा सुगंध म्हणु की झुळुक हवेची कातरशी

सळसळ पर्णांची ही केवळ आभास तुझा ऊरी पदोपदी
कुजबुज नाही जरी तुझी ही हृदय न माने परोपरी.. ....................हृदय न माने परोपरी

श्वासाश्वासामधुनी चंदनी सुगंध धुमसे जराजरा
माझ्या प्रांगणात तुझ्या प्रीतीचा जणू धवल सडा

ढलता ढलता सांज आज ही होउन गेली मृदुल मृदुल .............. होउन गेली मृदुल मृदुल
असेच फिरता फिरता कुठवर आलो आपण दूर सखे
मीठीत तुझिया तनामनाचे विरघळले (साखर-स्फटिक) जसे

विरहव्यथा जरी तुझीच ती अन माझीही ती मूक व्यथा
कळे न अपुली तगमग जरी आलम साऱ्या दुनियेला
ये झुगारुनी तू परंपरा, ये पाडुन अडसर अपुल्यामधला
'प्रेमी आम्ही - प्रेमी आम्ही' सांगू या साऱ्या दुनियेला.

_____________________________________________
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते
तेरी बाहों में है जानम
मेरे जिस्मोजां पिघलते
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते

ये रात है या तुम्हारी
जुल्फें खुली हुई हैं
है चाँदनी तुम्हारी नज़रों से
मेरी रातें धूलि हुई हैं
ये चाँद है या तुम्हारा कंगन
सितारे हैं या तुम्हारा आँचल
हवा का झोंका है या
तुम्हारे बदन की खुशबू
ये पत्तियों की है सरसराहट
के तुमने चुपके से कुछ
कहा ये सोचता हूँ
मैं कबसे गुमसुम
की जबकि मुझको भी ये खबर है
की तुम नहीं हो कहीं नहीं हो
मगर ये दिल है की कह रहा है
तुम यहीं हो यहीं कहीं हो

मेरी सांस सांस महके
कोई भीना भीना चन्दन
तेरा प्यार चाँदनी है
मेरा दिल है जैसे आँगन
कोई और भी मुलायम मेरी
शाम ढलते ढलते
मेरी शाम ढलते ढलते
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते
मजबूर ये हालात
इधर भी है उधर भी
तन्हाई के ये रात इधर
भी है उधर भी
कहने को बहुत कुछ
है मगर किससे कहें हम
कब तक यूँ ही खामोश
रहे और सहे हम
दिल कहता है दुनिया
की हर इक रस्म उठा दें
दीवार जो हम दोनों
में है आज गिरा दें
क्यों दिल में सुलगते
रहे लोगों को बता दें
हाँ हमको मुहब्बत है
मोहब्बत है मोहब्बत है
अब दिल में यही बात
इधर भी है उधर भी

राधे का चोरीशी माझी मुरली
चोरलीस का गं प्रिये, .......... इतकी का आवडली?
का अशी खळबळ ...... माजविली SSS माजविली

देते देते म्हणतसे आणाभाका घेते
कुठे म्हणुन लपविली परी ना सांगते
खट्याळ कशी जणु धिटुकली
गं राधे का चोरीशी माझी मुरली

ना तुझी सवत ना तुझी वैरीणी
कान्ह्याची मुरली घाले मनमोहीनी
नाही करत तुझी चुगली SSS चुगली
गं राधे का चोरीशी माझी मुरली

माझी मुरली गातसे मिठ्ठी मिठ्ठी गाणी
राधा राधा ना कधी बोले तिची वाणी
तिचिया आधीन दुनिया सारी बाई
गं राधे का चोरीशी माझी मुरली

______________________________________________________________________
राधिके तूने बंसुरी चुराई - २
बंसुरी बजाई क्या, तेरे मन आई - २
काहे को रार मचाई, मचाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २

देदूंगी कहे, क़समें खाये - २
कहाँ छुपाई, पर ना बताये - २
नटखट करत ढिठाई, ढिठाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २

ना तेरी बैरन, ना तेरी सौतन आ आ सौतन
ना तेरी बैरन, ना तेरी सौतन
मेरी मुरलिया, मोहे सबका मन - २
करी तेरी कौन बुराई, बुराई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २

निस दिन तेरे गीत सुनावे -2
राधा-राधा रट न लगावे -2
सब जग करत सुनाई, सुनाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई

ती - चल (राजसा) चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे

ती - चांदण्या राती दिन हरवुनी जाण्याचे
विसरुनी भान या जालीम जगाचे

ती - चल राजसा चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे

ती - धुंद यामिनी,मज सांभाळ राया
झोप लागेल जरी सावध कराया

ती - चल (राजसा) चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे

ती - अपुरे पडले जीवन अपुले तरीही
पथ ना प्रीतीचा अधुरा हा राही

ती - चल राजसा चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे
____________________________________
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
आओ खो जाये सितारों में कहीं
आओ खो जाये सितारों में कहीं
छोड़ दे आज ये दुनिया ये ज़मीं
दुनिया ये ज़मीं
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
हम नशे में हैं संभालो हमें तुम
हम नशे में हैं संभालो हमें तुम
नींद आती है जगा लो हमें तुम
जगा लो हमें तुम
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
जिंदगी ख़त्म भी हो जाये अगर
जिंदगी ख़त्म भी हो जाये अगर
ना कभी ख़त्म हो उल्फ़त का सफ़र
उल्फ़त का सफ़र
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो

पाहून कुणी कोणा पुसलेली साधी ख्यालखुशाली
डोळ्यांतुन माझ्या खळ्ळ एक अश्रूंची सर ओघळली
पाण्यात पाहिले चंद्रबिंब अन उरात हलले काही
सलतो का सांग दुरावा तिकडे दूर असाच तुलाही?

(पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिये
पानी में अक्स चाँद का देखा तो रो दिये)

मावळू लागला दिवस तशा पापण्या ओलसर झाल्या
विसरल्या म्हणेतो स्मृती तुझ्या दाटून पुन्हा बघ आल्या
हे रिते श्वास का जितेपणी ओढते सोडते आहे
या बेचैनीचे मरण हेच का अंतिम उत्तर आहे?

(शाम से आँख में नमी सी है)

आत्म्याच्या फांदीवरती आशेचा बिलोर पक्षी
मंजूळ सुरांनी विणतो निरवतेवरती नक्षी
हिमराशी वादळवारे निष्प्रभ सारे यापुढती
उबदार दिलासे त्याचे गीतांतुन विहरत उरती
विजनी तैसा गर्दीत तो सोबत सदैव राही
अन् कधीच, कधीच कसला मोबदला मागत नाही!

Hope is the thing with feathers

क्षणोक्षणी हृदयस्थ तूचही प्रिये
जीवनी माधुर्य तृप्तीची ओढ

नेत्रांवरली तूच मुग्ध ही संध्या
तुझ्या पदराची विसावी छाया
हर यामिनी स्मृतींची तूच
नवी पखरण ही सारावया
--------

पल पल दिल के पास, तुम रहती हो
जीवन मीठी प्यास, ये कहती हो
पल पल ...

हर शाम आँखों पर, तेरा आँचल लहराए
हर रात यादों की, बारात ले आए

>>>>>>आत्म्याच्या फांदीवरती आशेचा बिलोर पक्षी
मंजूळ सुरांनी विणतो निरवतेवरती नक्षी
हिमराशी वादळवारे निष्प्रभ सारे यापुढती
उबदार दिलासे त्याचे गीतांतुन विहरत उरती
विजनी तैसा गर्दीत तो सोबत सदैव राही
अन् कधीच, कधीच कसला मोबदला मागत नाही!

ख-त-र-ना-क!!!!

धन्यवाद Happy
तुमची 'प्रतिबंबं'ही मस्त आहेत, सामो आणि अस्मिता.
संयोजकांचं कौतुक आहे - खूप छान आहेत सगळे उपक्रम, मजा येते आहे! Happy

धन्यवाद
#एक शब्द , मला बाधा झाली आहे. Lol
हॅरी पॉटरची शाल पांघरून येते.

मी वाचत असता गुंगुनी येते ती स्वारी निशीदिनी
अन गाते गोड गळ्याने गाण्यांच्या सात लकेरी

मी किती हाकलून दमलो परी नसेचि ऐकत मुळी तो
हा गोड गळ्याचा पक्षी रात्रन दिवस किलबिलतो

मग एके दिवशी विटुनी मी पाहीला खडा मारुनी
झणी उडुन गेला तोही दूर सूर मारुनी गगनी

नंतर तो कधी न आला किती मी त्याला बोलविला
अशी लकेर कोणाचीही कुणी दमन करावी कशाला

ही कविता एका इंग्रजी कवि तेचे भाषांतर आहे पण मला ते पुस्तक सापडत नाहीये.

बसूनी आहे थडग्याशी सावध कट्यार घेउनी हाती
नकळो कोणती इच्छा (तमन्ना)उठेल अमृत पिऊनी
एकच माहीत मजला हे आयुष्य अर्धे सरले
पण अजुन या इच्छांना मी नव्हेच पुरते पुरले
म्हणुनच .....
बसूनी आहे थडग्याशी सावध कट्यार घेउनी हाती
नकळो कोणती इच्छा उठेल अमृत पिऊनी

एका अप्रतिम शेरा वरती ही कविता आधारीत आहे. आणि तो शेर असा हरवला आहे की ज्याचे नाव ते. मी गेली ३५ वर्षे शोधते आहे Happy

कब कोई तमन्ना जागे और हम कत्ल करे.... म्हणजे मी अतिशय सावध असा पहारा देतो आहे की कधी कोणती इच्छा डोके वर काढेल आणि मी तिचे शिरकाण करेन

कुणीतरी विचारेल म्हणून आळस केलेला. शीघ्रकविता या शीर्षकाने गोंधळ झाला.
यात विडंबनं पण चालणार आहेत का ?
कविता मराठीतच हव्यात ना ?

वरच्या विषयानुसार ते इतर भाषेतील गीतांचे मराठीतच भाषांतर हवे. ह्यात विडंबनंही चालतील. येऊ द्या.

गुपचूप गुपचूप रात्रं दिन
दरोडे टाकणे स्मरते ना
अजूनी लांबवलेला तो
खजिना तुजला स्मरतो ना ? ॥ धृ॥

पाहूनिया नोटा गुलाबी
माझे जरासे धीट होणे
आणि हासुनिया तुझे ते
माती उकरणे स्मरते ना ॥१॥

माझे तुझे ते चोरट्याने
भेटण्याचे गुप्त अड्डे
तपे गेली तरी कुणाला
ते ठिकाण का स्मरते ना ? ॥२॥

खेचणे अकस्मात माझे
बॅगा हातातुनी जनांच्या
आणि ओढणीत तुझ्या ते
माल लपवणे स्मरते ना ॥३॥

दुपारच्या उन्हात कडकडीत
एका इशार्यावर माझ्या
ते तुझे मांजरपाऊली
दागिने लुटणे स्मरते ना ? ॥४॥

( असंच काही तरी खरडलंय हजेरी लावायला )
गाणे ओळखू नाही आले तर फसलेच समजा.

प्रिया सोडूनी केश मोकळे फिरते का तू इकडेतिकडे, कुणास शोधी नजर बावरी सांगशील का गडे
आग लावुनी निघून गेला खुशाल मजला गमे, प्रियकर माझा शोधित फिरते मी तर चोहीकडे
शाप जरी हा प्रिय तो मजला खंत नसे मम ऊरी, रुतवुन गेला जरी तो माझ्या हृदयी मखमली सुरी
-----------
ओ हसीना जुल्फोवाली जाने जहां
ढुंढती है काफिर आंखे किसका निशां

आपल्याला रान मोकळं दिलय आणि आपण पडलो कवि (कवडे) मग सुसाट सुटायचं Wink Lol

झपझप चाले वाटसरु हा मार्ग जरी आक्रमे मधेच येता लकेर कुठुनी पाऊल की अडखळे
मधुर सूरांची छेडित वीणा सूर येतसे दुरूनी हां हां म्हणता विरुन जाती श्रमही सारे झणी
कळीकळीवर भ्रमर घालीतो रुंजी गुणगुणुनी पहाता पहाता थकवा जाई दूरदूर पळुनी
--------------------
राही मतवाले, तू छेड़ इक बार, मन का सितार
जाने कब चोरी-चोरी आई है बहार छेड़ मन का सितार

कली-कली चूम के पवन कहे खिल जा
कली-कली चूम के,
खिली कली भँवरे से कहे आ के मिल जा
आ पिया मिल जा, कली-कली चूम के
दिल ने सुनी कहीं दिल की पुकार -२
कहीं दिल की पुकार

https://www.youtube.com/watch?v=51hQa_msPBA

Pages