बेबी केल (२५० ग्रॅम)
चिकन (बोनलेस टेंडर्स ६)
कांदा (मोठा अर्धा - बारीक कापून)
आले लसूण पेस्ट (१ चमचा)
टोमॅटो (१ कापून)
हिरवी मिरची ( तुमच्या आवडीनुसार)
दही (१ मोठा चमचा)
धणे पूड (१ चमचा)
मीठ
तिखट (काश्मिरी लाल आणि तिखट तिखट)
हळद
गरम मसाला (एव्हरेस्ट - १ चमचा) किंवा चिकन मसाला (एम डी एच - १ चमचा)
साखर (चिमूटभर)
तेल
जीरे
आमच्याकडे हिरव्या भाजीचे वेगवेगळे प्रकार करून बघायला आवडतात त्यामुळे ही पाककृती सुचलेली आहे.
१) चिकन टेंडर्स चे १ इंचाचे तुकडे करून घ्या.
२) मी तसे तर बेबी केलचे एक पाकीट आणतो की जे आधीच धुतलेले असते. तुमच्या कडे नसेल तर बेबी केल नीट धुवून घ्या. पाने खूप मोठी असतील तर थोडी कापून घ्या.
३) एका भांड्यात तेल टाकून ते गरम करा. तेल गरम झाले की त्यात जीर्याची फोडणी करा.
४) त्यात कांदा टाकून परतून घ्या.
५) कांदा थोडा गुलाबी झाला की त्यात हिरवी मिरची आणि आले - लसूण घाला.
६) हे सगळे चांगले परतले गेले की त्यात टोमॅटो टाका.
७) टोमॅटो शिजला की त्यात धनेपूड, मीठ, तिखट, हळद आणि मसाला टाकून नीट परतून घ्या.
८) मसाला शिजत आला की त्यात दही टाका.
९) दही परतून तेल वेगळे होत आले की त्यात चिकन टाका.
१०) चिकन थोडे परतून घेतले की गॅस कमी करा आणि झाकण ठेवा.
११) झाकण ठेवून १० मिनीटे चिकन शिजवून घ्या. बोनलेस चिकन असल्याने ते तसे लवकर शिजते.
१२) चिकन शिजत आले की त्यात केल टाका.
१३) आपल्याला केल जास्ती शिजवायची नाही त्यामुळे केल टाकल्यावर अगदी थोडावेळ शिजवा.
१४) झाकण काढून रस आटवा.
१५) सगळे शिजले की शेवटी मीठ आणि साखर प्रमाणात आहे ना ते बघा.
१) केल ऐवजी पावर ग्रीन्स किंवा बेबी पालक वापरू शकता. पालक वापरणार असताल तर थोडी कसूरी मेथी मसाल्या बरोबर घाला आणि आल्याचे प्रमाण वाढवा.
२) दही आंबट असेल तर कमी घाला.
३) यात उद्देश हा भाज्यांमधील फायबर खाण्याचा आहे त्यामुळे त्या थोड्या क्रंची लागल्या तर चांगलेच आहे.
४) हे थोडे कमी मसालेदार केले तर पोळी/नान बरोबर न खाता नुसतेच खाता येते.
मस्त दिसतेय रेसिपी.
मस्त दिसतेय रेसिपी.
सलाड म्हणून खायला मस्तच आहे.
सलाड म्हणून खायला मस्तच आहे. कमी मसाल्याचे व पालक घालून करता येइल मला.
मला वाटले केलं (एकदाचं!) चिकन
मला वाटले केलं (एकदाचं!) चिकन! असे म्हणायचे आहे...
चांगली आहे आयडीया! केल चा
चांगली आहे आयडीया! केल चा काही फ्लेवर लागतो का वेगळा? मलाही मसाला कमी करून नुसतीच खायला आवडेल. हाय प्रोटीन, फायबर आणि लो कार्ब!
छान आयडीया!
छान आयडीया!
चिकन सूप मधे इतर भाज्यांसोबत केल नेहमी वापरला जातो आणि बरेचदा डाळ-केल करते. आता केल-चिकनही करेन. खरे तर पालक चिकन केले जाते पण केल चिकन करावे हे काही सुचले नाही.
मैत्रेयी, केलला वेगळा असा फ्लेवर नसतो. मी ऑम्लेटमधे घालते बारीक चिरुन.
चिकन टेंडर्स म्हणजे काय नक्की
चिकन टेंडर्स म्हणजे काय नक्की? आमच्याकडे नेहमी बोनलेस ब्रेस्ट आणतो चिकनचे तर ते चालतील का?
बोकचॉय /पौकचॉय कुणी try केलंं
बोकचॉय /पौकचॉय कुणी try केलंं आहेका?
मी मेथी चिकन करेन म्हणतेयं
मी मेथी चिकन करेन म्हणतेयं
मस्त आहे रेसेपी. खूप आवडली,
मस्त आहे रेसेपी. खूप आवडली, फोटोही मस्त आलायं.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
अमा, मैत्रेयी > कमी मसाल्याचे एकदम बरोबर.
स्वाती२ > मोठा केल वापरला तर एक स्ट्राँग फ्लेवर असतो त्याला. पण बेबी केलला इतका स्ट्राँग नसतो.
सायो > बोनलेस ब्रेस्ट चालतील की. टेंडर्स म्हणजे मी नेहमी टेंडरलॉइन्सचा पॅक आणतो. बर्याच ठिकाणी असे मिळतात वेगळे. त्यांची चव मला ब्रेस्ट मीट पेक्षा जास्ती आवडते.
केशवकुल > बॉकचॉय एशियन स्टाईल रेसेपी मध्ये वापरून पाहिलेले आहेत पण अजून देशी रेसेपी मध्ये टाकलेले नाही
खत्रा दिसतेय चिकन..
खत्रा दिसतेय चिकन..
केलं केल चिकन. वरुन थोडं
केलं केल चिकन. वरुन थोडं क्रिम घातलं हीच काय ती अॅडिशन.
भारी झालंय की !!
भारी झालंय की !!
मुठीपेक्षा थोडं जास्त केल
मुठीपेक्षा थोडं जास्त केल घेतलं. मुलगा फार कटकट्या आहे खाण्याबाबतीत म्हणून खूप नाही घातलं. त्याला चव आवडली तेव्हा पुढच्या वेळी थोडं जास्त केल घालेन किंवा पॉवर ग्रीन्स वगैरे.
मी आधी "केलं चिकन" असं वाचलं.
मी आधी "केलं चिकन" असं वाचलं.
केल हा प्रकार अजून माहिती नव्हता. म्हणजे बघितला होता पण हाच तो, तोच हा हे माहिती नव्हतं. छान वाटतेय रेसिपी.
केल चिप्स आवडता खाप.
केल चिप्स आवडता खाप.
गिल्ट फ्री चिप्स हाणता येतात.
केलं चिकन >> सध्याच्या
केलं चिकन >> सध्याच्या वर्तमानपत्रांमधले मराठी वाचून असे वाटले असेल
चामुंडराय >> केल चिप्स खाता आता केल चिकन पण खा
खूप आवडली मल रेसिपी. नक्की
खूप आवडली मला रेसिपी. नक्की करणार!